फोटोग्राफीतील प्रयोग - कुठला फोटो चांगला आलाय ?
कोकणवारीत एकेठिकाणी हे कोळीमहाशय दिसले - सगळ्या फोटोग्राफर्सना हे अगदी सवयीचे असेल की आपण कॅमेरा एखाद्या प्राणी/किटक/ पक्ष्यावर रोखायचा अवकाश हे लगेच गायब तरी होतात किंवा प्रचंड हालचाल तरी करतात - आपण कॅमेरा बाजूला करायचा अवकाश - लगेच ही मंडळी स्थिर होतात.
यामुळे पहिला एक फोटो अग्दी घाईघाईने काढला - म्हटलं जसा येईल तसा येउ देत - पण हालचाल करायच्या आत फोटोत यायलाच पाहिजे हा .......
प्र चि१
मग लक्षात आले की हे चिरंजीव काहीही चुळबुळ करत नाहीयेत त्यामुळे जरा जवळ जाऊन हे दोन क्लोज अप घेतले.
प्र चि २
प्र चि ३
आता जाळ्याचा फोटो कसा काढता येईल या विवंचनेत पडलो - कारण या जाळ्यापलिकडे जाऊन फोटो काढणे शक्यच नव्हते व त्यामुळेच दुसरी मर्यादा प्रकाशाची आली. प्रकाश कुठून येतोय हे फोटो पाहिल्यावर कळेलच तुम्हाला. मला जाळ्याच्या फक्त डावीकडे व उजवीकडे जाता येत होते व वेळही थोडाच होता. प्रयोग म्हणून हे फोटो काढले - सगळे नाही तर निदान काही जाळे तरी व्यवस्थित फोटोत यावे एवढा साधा उद्देश मनात होता. जाळे खूपच मोठे होते, सबंध जाळे फ्रेममधे येणार नाही हे ही कळत होते....... पण प्रयत्न तर करु या म्हणून हे फोटो काढले - प्रवासात असल्याने लगेच निघायचेही होते - आधीच बरोबरची (घरचीच) मंडळी कसले फालतू फोटो काढतोय म्हणून नाकं मुरडत होतीच....
प्र चि ४
प्र चि ५
प्र चि ६
प्र चि ७
प्र चि ८
आता सांगा बरं जाळ्याचा कुठला फोटो चांगला आलाय, अजून चांगला येण्याकरता काय करायला पाहिजे होतं ????
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट A650IS , features - approx. 4X digital zoom (up to approx. 24X in combination with the optical zoom). Shooting modes - Auto, creative zones - Program, shutter speed priority, Aperture priority, Manual, Custom. Image zone - Portrait, Landscape, Night snapshot, Kids & Pets, Special Scene, Stitch assist & Movie.
(No subject)
छान आलेत प्रचि. विशेषता २
छान आलेत प्रचि. विशेषता २ नंबर.
तुमचा कॅमेरा पॉईंट शुट आहे आणि फोटो काढण्याच्या जागेची पण अडचण होती.
पलीकडे जाऊ शकाला असता तर जाळ्याचा चांगला प्रचि मिळाला असता
मला फोटोग्राफीतले काही कळत
मला फोटोग्राफीतले काही कळत नाही, तरीही गोव्याला मी असे काही फोटो घेतले
होते त्यावरून सांगतोय. जाळ्याच्या मागे उजेड नसावा. एखादी काळी भिंत, दाट
झाडी असे बघायला हवे होते. प्रकाश आपल्या मागून जाळ्यावर पडला असता तर
चांगले.
हा कोळी (कोळीण) बराच वेळ भक्ष्याची वाट बघत स्थिर असतो. हाच (किंवा असाच)
कोळी जाळ्यावर सही देखील करतो.
एखाद्या पावसाच्या सरीनंतर किंवा पहाटे दंव पडून गेल्यानंतर, त्यावर पाण्याचे तुषार
असताना, फोटो जास्त चांगला आला असता. एखादा फोटो, अंधार पडल्यानंतर
फ्लॅश वापरुनही काढता आला असता.
अँगल चुकीचे वाटतायत ,जरा साईड
अँगल चुकीचे वाटतायत ,जरा साईड अँगल ट्राय करा.
२. मग १. ७ जास्त छान वाटला
२. मग १.
७ जास्त छान वाटला असता जर ते जाळ म्हणजे झाडाची वार्षीक वलयं आहेत असं भासवता आलं असतं तर.
शशांक, तुम्ही macro
शशांक,
तुम्ही macro photography शिकताय का ??
माझ्यासारख्या अनभिज्ञाला २, ४ चांगले वाटले.
पण तज्ञांचं मत, मार्गदर्शन महत्वाचं
दुसरा चांगला आहे. A650IS ची
दुसरा चांगला आहे.
A650IS ची मॅक्रो setting वापरून पहा.
दुसरा सुंदर आलाय. ४था ही
दुसरा सुंदर आलाय. ४था ही आवडला. काळ्या बॅकग्राउंडवर जाळं छान दिसतय.
तसाच ७व्यातही आहे, पण कोळी त्यात वरती गेलाय.
फोटोग्राफीतलं मला काही कळत
फोटोग्राफीतलं मला काही कळत नाही पण तरी २रा आणि ४था जास्त चांगले वाटत आहेत.. जाळं अगदी अंगठ्याच्या ठश्यासारखं वाटतयं...
इथे जे क्लोज अप्स दिलेत (२,
इथे जे क्लोज अप्स दिलेत (२, ३) ते मॅक्रो मोड वापरूनच काढलेत. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाहीये.
त्या जाळ्याचा क्लिअर फोटो कसा काढता आला असता - प्रकाशाची दिशा व फक्त समोरुनच फोटो काढता येणे या दोन मर्यादांचा विचार करता - असे मला विचारायचे आहे. याकरता कोणी तज्ञ सांगू शकतील का ?
कोकणवारीत हा फोटो काढला होता - त्यामुळे परत तिथे जाऊन फोटो काढणे शक्यच नाही - पण परत असा योग आला (व अशीच अडचण - जाळ्याच्या पलिकडे जाता न येणे, प्रकाशाची दिशा अशी विचित्र) तर अजून चांगला काही ऑपश्न आहे का असे विचारायचे आहे - जाळ्यासारख्या तलम गोष्टीचा फोटो काढताना अजून काय करता येईल ?
प्रचि १ मस्त आहे, काही तरी
प्रचि १ मस्त आहे, काही तरी गुढ आहे त्यात.
शशांकजी, हे सर्व
शशांकजी,
हे सर्व फोटोग्राफीच्या सदरात टेक्निकल भाषेत "डेफ्त्-ऑफ्-फिल्ड" या सदरात मोडते. असा फोटो पॉईंट अँड शूट कॅमेर्यावर काढायला अवघड असतो. कारण अशा फोटोसाठी अॅपर्चर पुर्ण ओपन करावे लागते. म्हणजे कमीत कमी डेफ्त्-ऑफ्-फिल्ड मिळेल. (म्हणजे फक्त जवळच्या वस्तु इन फोकस येतात व थोड्या लांबच्या ब्लर होतात. याच्या विरुध्ध जर डेफ्त्-ऑफ्-फिल्ड जास्त हवे असेल तर अॅपर्चर ११ / १६ पर्यंत क्लोज करायला हवे). जाळ्याचा फोटो काढायचा असेल तर अॅपर्चर १.४ / १.८ स्टॉपपर्यंत ओपन करायचे. पण खूप ओपन अॅपर्चरमूळे खूप जास्त लाईट सेन्सरवर येईल. तो कंट्रोल करण्यासाठी शटर स्पीड खूप फास्ट करायचा - जसे १/२००० से. वगैरे. वरील दोन्ही गोष्टी पॉईंट अँड शूटवर करु शकत नाही. (फारफारतर अॅपर्चर २.८ ओपन होईल व शटर स्पीड १/१२०० से. वगैरे असेल). तसेच बॅकग्राउंड डार्कर साईडला असावी. लाईट टॉप बॅकलाईट किंवा साईड बॅकलाईट असावा.
२,३,६ छान आलेत. डिजीटल झूमला
२,३,६ छान आलेत.
डिजीटल झूमला काही अर्थ नसतो. ऑटो फोकसने असे फोटो काढ्ण अवघडच असते. कारण फोकस करायचा सरफेस खूप छोटा असतो. अशावेळी सर्वच ऑब्जेक्ट्स क्लियर येतील असे सेटींग केले तर बरे पडते.
पॉइंट अँड शूट असला तरी
पॉइंट अँड शूट असला तरी मॅन्युअल मोड आहे.. त्यामुळे वर अतुलनीय ह्यांनी सांगितलेली सेटींग्स वापरून फोटो काढता येऊ शकेल..
तसेच थोडेसे एक्स्पोझर कमी करुन प्रचि ५,६,७ काढल्यास पण फोटो चांगला येऊ शकेल.. थोडे फोटोशॉप किंवा पिकासात एडीट करुन बघितल्यास काही फोटो अजून चांगले होऊ शकतील.
शापित गंधर्व, अतुलनीय, जो एस
शापित गंधर्व, अतुलनीय, जो एस व हिम्स्कूल - तांत्रिक माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार.
४, ५, ६, ७, ८ हे मॅन्युअल मोडवर जाऊन वेगवेगळे अॅपर्चर व शटर स्पीडची काँबिनेशन करुन काढले आहेत.