माझ्या बहिणीचा कर्करोग तिच्या शरिरात हळुहळू पसरायला सुरवात झाली आणि तिला त्याच्या वेदना देखील व्हायला लागल्या आहेत. पेनकिलर जर घेतलेले असले तरच तिला त्या वेदना सुसह्य होतात नाहीतर तळमळत पडत रहावे लागते. पुण्यात रुबी इथे तिने ३ वर्षांपुर्वी 'हरसेप्टीस' नावाची केमोथेरपीची ७ इन्जेक्शने घेतली होती पण ती अयशस्वी ठरलीत. परत कर्करोगाने अंग बाहेर काढले. सुदैवाने ताईचा मुलगा आता पुण्यात बर्यापैकी स्थायिक झाला आहे. त्याची बायको आणि तो दोघेही कमावतात. मला ताईला तिथेच ठेवायचे आहे. इथे एक विचारायचे आहे की शेवटच्या जाण्याच्या त्या काही महिन्यात तिला फार वेदना होऊ नये. तळमळत तिने जगाचा निरोप घेऊ नये. म्हणून पुण्यात काही खास दवाखाने म्हणा वा रग्णांची काळजी घेणार्या संस्था म्हणा, आहेत का? मला त्यांचे पत्ते/फोन नंबर मिळाल्यास मी त्यांच्याशी संपर्क करेन. धन्यवाद.
बहिणीचा कर्करोग
Submitted by हर्ट on 26 March, 2012 - 04:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी, इथली माहिती बघा. यातलं
बी, इथली माहिती बघा. यातलं सिप्ला मला ऐकून माहित आहे. त्याचं रेप्युटेशन चांगलं आहे असंच कानावर आलंय. दुसर्या संस्थेबद्दल माहित नाही पण चौकशी करायला हरकत नसावी..
१. http://www.carebeyondcure.org/
Cipla Palliative Care and Training Centre,
Off Mumbai-Bangalore Bypass Road,
Warje, Pune 411058.
Tel: +91-20-25231130/31
Fax: +91-20-25231133
Email: info@carebeyondcure.org
२. http://www.careindia.org.in/
अत्यंत जवळच्या, घरातल्या सद्स्यांना/ नातेवाईकांना यातून जाताना पाहिलंय (पण तेव्हा पॅलिअॅटिव केअरची संकल्पना अस्तित्वात नव्हती) त्यामुळे तुमची अवस्था समजू शकते. हे सगळं सोसायचं मानसिक आणि शारिरीक बळ तुमच्या परिवाराला मिळो ही सदिच्छा.. आणि तुमच्या ताईलाही सदिच्छा! हे खूप तोकडे शब्द आहेत पण यापरतं आणखी काय बोलणार?
वरदा, धन्यवाद. अगदी त्वरित
वरदा, धन्यवाद. अगदी त्वरित उत्तर पाहून खूप आधार वाटला मायबोलिकरांचा.
मी पण हेच सुचवणार होते. बी
मी पण हेच सुचवणार होते.
बी टेक केअर.
बी, धन्यवाद म्हणायची गरज
बी, धन्यवाद म्हणायची गरज नाहीये रे. तुझ्या ताईला आराम पडूदेत! सिप्लाला आधी ट्राय कर.
काळजी घेणे - इतरांची आणि स्वतःची पण
सिपला खरंच खुप चांगले आहे.++
सिपला खरंच खुप चांगले आहे.++ अनुमोदन
बी, तुमच्या ताईला आराम मिळो,
बी, तुमच्या ताईला आराम मिळो, हीच देवाकडे प्रार्थना.
काळजी घ्या.
काळजी घ्या...ताईची आणि
काळजी घ्या...ताईची आणि परिवाराचीही!
बी, सिप्लाबद्दलच ऐकून आहे.
बी, सिप्लाबद्दलच ऐकून आहे. काळजी घे.
बी, मुख्य म्हणजे तूम्ही
बी,
मुख्य म्हणजे तूम्ही सर्वांनी धीर सोडता कामा नये.
मुंबईत वांद्रा आणि बदलापूरलादेखील अशा संस्था आहेत. तिथल्या परिचारिका अत्यंत
मनोभावे सेवा करतात. नातेवाईकांना तिथे रहायची गरज नसते.
काळजी घ्या.
बी, सिप्ला मधे , डॉ.
बी, सिप्ला मधे , डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी आहेत. त्या pain management ह्या विषयाच्या तज्ञ आहेत. रुग्ण आणि त्यान्ची काळजी घेणारे ह्या सगळ्यान्साठी एक कार्यशाळा ही घेतात.
माझे वडिल पार्कीन्स्न्स्चे रुग्ण आहेत. त्यान्च्या सपोर्ट ग्रुप्मधे सिप्लाच्या त्या उपक्रमाची माहिती सान्गायला त्या आल्या होत्या.
काळजी घ्या.
मी इथे सिंगापुरात असल्यामुळे
मी इथे सिंगापुरात असल्यामुळे मी सिप्लाला कसा संपर्क करु मला नीट कळत नाहीये? वरील लिंक वरुन फोन घेऊन त्यांना फोन करु का? कितपत प्रभावी होईल तसे करणे? पण फोन नक्की करुन बघतो. दुसरे असे की मला येथून साथ देणारे असे कुणी नाही. मागेही मी 'रुबी'कडे तिला घेऊन गेलो होतो त्यावेळी मला भारतात यायला भाग पडले होते. घरुन फारसा आधार नाही .. आशा नाही! माणसं धैर्यवान नाहीत! मला काहीही करुन जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न करायचे आहेत.
आणखी एक दुसरा प्रश्न की मी हे का करतो आहे .. ताईचे घरचे करतील ना म्हणून मला सगळे सांगत आहेत. मला नाउमेद करत आहेत. मी मुर्ख आहे अशी विशेषणे मिळत आहेत
शक्यतो घरी मुलाबाळांच्यात
शक्यतो घरी मुलाबाळांच्यात अखेरचे दिवस जावे असे वाटत असेल तर घरी सेवाकर्मचारी/ प्रशिक्षित नर्स ठेवणे २४ तासांसाठी. वेदनांना वेदनाशामक हाच एक पर्याय आहे. जसजसे दिवस जातात तसतसे जास्त वेदनाशामक द्यावे लागते.
जो काही थोडाफार शुद्धीतला काळ असेल तो आरामदायी जाईल असे पाहिले तर थोडेसे समाधान.
गाड्या भरभरून नातेवाईक निरोप द्यायला येणार असतील तर ती सर्व व्यवस्था घरातल्या व्यक्तिंनी पहावे लागते.
हा सर्व काळ घरच्यांसाठी कसोटीचा असतो. पण म्हणून रुग्णासमोर त्रागा कमी होईल तर बरे.
घरच्यांना त्रास होतो, पण कैक पटीने जास्त शारिरिक वेदना रुग्णाला होत असतात हे कायम लक्षात ठेवावे.
शक्य असेल तेव्हा रुग्णाच्या जवळच्या नातेवाईंकांना थोडा ब्रेक मिळावा म्हणून राहण्याची सेवा आपण करु शकतो.
शक्य असेल तर नातेवाईक/शेजार्यांची ड्युटी लावू शकतो. त्यांची इच्छा असेल तर.
सर्व घरावर मृत्युची छाया दाटते. अपरिहार्य आहे ते. जन्ममृत्युचे सोहळे अपरिहार्य आहेत.
'अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी,
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी'
धन्यवाद रैना. खूप धीर येतो
धन्यवाद रैना. खूप धीर येतो असे काही वाचले की.
बी, तू खचू नकोस. तिथे
बी, तू खचू नकोस. तिथे ऑफिसच्या वेळेत (म्हणजे १० ते ५ वगैरे) फोन करून बघ. काय म्हणतात ते बघ. मग ठरव की कसं कोऑर्डिनेट करायचं
ताईच्या घरातले करतीलच. पण पॅलिअॅटिव केअर ही वेगळी कल्पना आहे. त्याचा वापर करणं म्हणजे घरच्यांवर अविश्वास दाखवणं नाही. हे शांतपणे समजावून सांग. आत्ता याक्षणी तुझ्या ताईच्या वेदना शक्य तितक्या कमी करणं किंवा तिचा कम्फर्ट हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे हे समजाव. तिथे २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध असते. काळजी घ्यायला प्रशिक्षित लोक असतात. नाहीतर हे असं आजारपण निभावता निभावता परिवारातील इतर सदस्य शारिरीक, मानसिक रीत्या कोसळण्याची खचण्याची शक्यताच जास्त असते. आणि रुग्णाला ते आणखी त्रासदायक होऊ शकतं.
एका मर्यादेनंतर या रुग्णाचं कणाकणाने संपून जाणं पचवायला फार फार अवघड असतं तेव्हा अशा वेळी त्या रुग्णाला आणि त्याच्या परिवाराला प्रशिक्षित मदतीचा आधार मिळाला तर काही गोष्टी तरी सुकर होतात.
तेव्हा तू मूर्ख नाहीस, किंवा अविचार करत नाहीयेस हे पक्कं. पहिलं डोक्यातून असलं काहीतरी काढून टाक. तू आत्ता सिप्ला ला फोन केलास तरी माहिती मिळेल. ते काय म्हणताहेत ते बघ. त्यांची आर्थिक गणितं तुमच्या गणिताशी जुळताहेत का बघा आणि बिन्धास्त पुढे जा. निर्णय अत्यंत बरोबर घेतलायस. त्यावर ठाम रहा
टेक केअर
बी, खारघरला टाटा कॅन्सर
बी, खारघरला टाटा कॅन्सर रीसर्च सेंटर आहे तिथे २४ तासासाठी घरी नर्स हवी असेल तर ते माहिती देतात. (या नर्सेस कॅन्सर रूग्णासाठी खास प्रशिक्षित असतात). पुण्यामधेदेखील अशी एखादी संस्था माहिती देत असेल का ते बघ.
खरंतर अशा वेळेला आजूबाजूला धीराची माणसे असणे जास्त गरजेचे. तू ताईच्या घरचा नसलास तरी रक्ताच्या नात्याचा आहेस, त्यामुळे तुला काळजी वाटणे साहजिक आहे. तरी कुणी असं काही बोललं तरी ते बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. जेवढे तुझ्याच्याने शक्य आहे तितके अवश्य कर. नंतर त्या विधात्याची मर्जी.
वरदा, नंदिनी धन्यवाद. खूप छान
वरदा, नंदिनी धन्यवाद. खूप छान सांगत आहात.
बी, फोन वर कर संपर्क. डॉकना
बी, फोन वर कर संपर्क. डॉकना परदेशातून फोन करतोय असे सांगून थोडक्यात माहिती दे.आपल्या माणसांच्या आजारपणात दूर रहायला लागते तेव्हा होणारी आपली तगमग डॉक्टर लोकं खूप छान समजून घेतात. ते करतील मार्गदर्शन. इतर काही म्हणाले तरी तुझ्या बाजूने तू जे शक्य होईल ते कर. बरेचदा रुग्णाच्या घरच्या लोकांना नक्की काय करावे, कुठे मदत मागावी ते सुचतही नसते. अशा वेळी तू पुढाकार घेत आहेस ते चांगलेच आहे. तुम्हा सर्वांना हे सर्व सोसायचे बळ मिळो हिच देवाकडे प्रार्थना!
बी फोन करून एकदा प्रयत्न तर
बी फोन करून एकदा प्रयत्न तर करून पहा. डोक्यातला एक विचार बाजूला पडेल. नसेल काही वर्क आऊट होत तर पुढचा पर्याय शोधता येईल. एकेक गोष्टी हातावेगळ्या केल्या की बरं पडतं.
बाकी कोण काय म्हणतय याकडे आता लक्ष देण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्या बहिणीच्या वेदना कमी करणं हे सर्वात महत्वाचं ध्येय आहे. नाही का?
बी, या काळात काळजी घेण्यासाठी
बी, या काळात काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित नर्सच हवी.
या काळात रुग्ण नीट सांगू शकत नाही, पण नर्सला ते बरोबर कळतं. आता नेमकी
काय पावले उचलायची, कुठले औषध द्यायचे, डॉक्टरला बोलवायचे का, हे त्यांना
बरोबर कळते.
शिवाय त्यांना असे रुग्ण बघायची सवय असते. त्यांना रुग्णाच्या अवस्थेचा मानसिक त्रास होत नाही. (जो घरच्या लोकांना खुपच होतो.)
आजूबाजूला जर अनेक नातेवाईक असतील आणि तेसुद्धा बाहेरुन आलेले असतील, तर रुग्णाला कण्हण्यासाठी, आपल्या गरजा सांगण्यासाठी खुप संकोच वाटतो. खास करुन स्त्रियांना हा संकोच फार जाणवतो. तसा संकोच नर्स समोर वाटत नाही.
हे मुद्दे तू घरच्या लोकांना खास करुन ताईच्या मूलांना समजाव.
बी, मी सिप्लाच्या पॅलिएटिव्ह
बी, मी सिप्लाच्या पॅलिएटिव्ह केअर युनिटमधील काम, पेशंट्स, तेथील वातावरण पाहिलंय. रुग्णाला फक्त शरीरालाच नव्हे तर मनालाही आराम पडावा यासाठी प्रयत्न असतो तेथील. डॉक्टर्स, नर्सेस, आया, वॉर्डबॉईज सगळे खास प्रशिक्षित असतात. खूप काळजी घेतात.
त्याखेरीज पुण्यात वानवडीला ए.एफ एम सी रुग्णालयाचे कॅन्सर युनिट आहे, तसेच कॅम्पात बुधरानी हॉस्पिटलचेही वेगळे कॅन्सर युनिट आहे. मात्र तिथे पॅलिएटिव्ह ट्रीटमेन्ट मिळते की नाही याबद्दल माहिती नाही.
याखेरीज जालावर ही माहिती मिळाली : http://www.indiacom.com/bp/care-india-medical-society-cancer-palliative-...
बी सिपला बद्दल चांगल ऐकुन आहे
बी सिपला बद्दल चांगल ऐकुन आहे कारण अगदी जवळच्या नातेवाईकांना ह्या त्रासातून जाताना बघीतल आहे. दिनानाथ मंगेशकर मधे पण ह्या बद्दल चौकशी करता येइल.
नाउमेद होऊनकोस तुला शक्य तेवढ तु करशीलच. तुझ्या निर्णयावर ठाम रहा. काळजी घ्या
बी, लवकरच काहीतरी चांगला
बी, लवकरच काहीतरी चांगला मार्ग तुला सापडेल आणि ताईचा वेदनामय काळ सुसह्य होईल!
माझ्या जवळच्या नातेवाईकांचे या आजाराने झालेले मृत्यु बघितले आहेत. पण त्या दोघींना घरीच रहाणे पसंत होते. अर्थात २५ वर्षांपुर्वी आत्या वारली तेव्हां फारशा सुविधा उपलब्ध नव्हत्या.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला जे काय करावसं वाटतय ते करुन मोकळा हो! इतर काहीही विचार करु नकोस!
http://www.holyspirithospital
http://www.holyspirithospital.org/Contactus.htm
बी रैना +१ देवाक काळजी.
बी
रैना +१
देवाक काळजी.
काही कॅन्सरतज्ञ डॉक्टरांचे
काही कॅन्सरतज्ञ डॉक्टरांचे नंबर्स
(असे देणे चूक असेल तर खोडेन, पण बहुधा तसे नसावे)
डॉ. अनुराधा सोवनी - ९८९०३ ०५०६६
डॉ. कसबेकर - ९८२२० ३७३९३
डॉ. कोप्पीकर -९८२२६ ७४०४०
डॉ. शोना नाग - ९३७१० ७२४४१
=========================================
काही हॉस्पीटल्सचे नंबर्स, जेथे कर्करोगाचे पेशंट राहू शकतात व तातडीचे उपचार होऊ शकतात
जोशी हॉस्पीटल - ०२० - २५६७ ६८६१
दीनानाथ हॉस्पीटल - ०२० - ४०१५ १०००
========================================
त्याशिवाय, अनेक नर्सेस मिळतात. माझ्याकडे अशा ब्युरोंचे दोन नंबर्स व काही नर्सेसचे नंबर्सही आहेत
========================================
याशिवाय एक लेडी डॉक्टर आहेत, डॉ. गौरी कुलकर्णी
या कॅन्सर पेशंटला घरी येऊन भेटतात व काही मदत हवी असल्यास , उपचार हवे असल्यास करतात
९८२२८ ७९६२३
=======================================
सर्वात शेवटी, मी कोथरुडला राहतो. माझी आई दोन वर्षांपूर्वी अशाच समस्येने गेली. तिचे उपचार करतना वरील सर्व डिटेल्स कळाली ती सेव्ह करून ठेवली. माझ्या घरात सुदैवाने भरपूर जागा आहे. जर आपल्याला योग्य वाटले व संकोच (जो मानू नयेत) वाटला नाही तर अवश्य माझ्याकडे ठेवावेत. माझी मिसेस सर्व काळजी घेईलच, त्याशिवाय अनेक नर्सेस व डॉ गौरी माझ्या घराच्या जवळ राहतात. हे मी मोकळेपणाने लिहीत असून आपण संकोच मानू नयेत.
देवाकडे प्रार्थना, आपल्या बहिणीला बरे वाटावे
-'बेफिकीर'!
ताईचे दिवस तिच्यासाठी सुसह्य
ताईचे दिवस तिच्यासाठी सुसह्य ठरोत आणि तुम्हां सर्वांनाही बळ मिळो...
यापरते काय म्हणू.. काळजी घ्या.
श्री.बेफिकीर..... तुमच्या
श्री.बेफिकीर.....
तुमच्या वरील प्रतिसादातील भावनेबद्दल तुमचे करावे तितके अभिनंदन कमीच होईल. आजच्या या धावपळीच्या आणि दगदगीच्या जगात जिथे नात्याच्या रक्तातील दाटपणा दिवसेदिवस कमी होत चालला आहे, तिथे केवळ एक जालीय सदस्य आपल्या घरातील व्यथा इथे मांडतो आणि त्याला प्रतिसाद देताना एखादा बुक्कीने कैरी फोडून त्यातील एक तुला एक मला असे ज्या सहजतेने म्हणेल तशारितीने तुम्ही 'बी' याना आपल्या बहिणीची आत्मियतेने काळजी घेऊ असे म्हणता, याचे व्यक्तिगतरित्या फार कौतुक वाटते. अनामिकाना मदतीचा हात पुढे करणार्या स्वभावाचे तुमच्यासारखे सदस्य इथे आहेत याबद्दल खुद्द 'मायबोली' अॅडमिन टीमला अभिमान वाटेल.
"माझी मिसेस सर्व काळजी घेईलच...." हे वाक्य तर तुमच्या दोघांच्या पतिपत्नी नात्यातील समंजसपणाची पताकाच होय.
अशोक पाटील
अशोकराव, तरीही ते बहिणीला
अशोकराव,
तरीही ते बहिणीला ठेवणार नाहीत आमच्याघरी हे तितकेच खरे
कदाचित म्हणूनच मी 'म्हणायला काय जातंय' या वृत्तीनेही तसे लिहिले असेल
पण तुम्ही माझ्या प्रतिसादाला गौरवून मला लज्जीत करताच नेहमी
कृपया लोभ असू द्यावात
बी, अवांतराबद्दल दिलगीर
श्री.बेफिकीर.... तुम्ही
श्री.बेफिकीर....
तुम्ही जाणताच की मी तुमच्यापेक्षा (वयाने) सीनिअर आहे आणि विविध अनुभवाच्या पावसाळ्यांत चिंब भिजलोही आहे, त्यामुळे मी नक्की जाणतो (च) की 'बी' आपल्या विनंतीचा आभारपूर्वक स्वीकार करणार नाहीत. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो; तरीही एखाद्याने अशी सहकार्याची भावना (जी तुम्ही प्रकट केली आहे) करणेही दुखर्या अस्वस्थ मनावर जादूची कांडी मनावर फिरविल्यासम होय.
~ हे मी अनुभवले आहे....विशेषतः नातेवाईक ज्यावेळी ( बेमालूमपणे सोयिस्कररित्या) पाठ फिरवितात त्यावेळी अगदी एस.टी. च्या तीन-चार तासाच्या प्रवासात ओळख झालेली व्यक्ती तेवढ्या त्रोटक ओळखीवर मध्यरात्री मदतीला धावून येते.....अन् तेही अत्यंत निरपेक्षवृत्तीने.
(बाकी... तुमचा गौरव मी करावा इतपत माझी पात्रता नाही, पण गौरवास तुम्ही पात्र आहात, हे मी नक्की जाणतो.)
अशोक पाटील
@ बी.... श्री.बेफिकीर आणि मी
@ बी....
श्री.बेफिकीर आणि मी यांच्यातील विचाराची देवाणघेवाण कृपया 'अवांतर' मानू नये. तुमच्या ताईंच्या सध्याच्या स्टेजमुळे तुम्हाला जसे माणसामाणसातील विविध नात्याची रुपे पाहायला मिळत आहेत, तद्वतच तुम्ही हा धागा इथे सुरू केल्यामुळे वाचकानांही विविध सेवाभावी संस्थांची, दवाखान्याची नावे, ठिकाणे समजत आहेत. तसेच ओळखदेख नसतानाही मदतीची हात पुढे करणार्या व्यक्तीही समजल्या. असो.
तुम्हाला "मातोश्री वृद्धाश्रम" संबंधी काही माहिती असल्यास ठीक, नसल्यास तिथे तुमचा भाचा थेट संपर्क साधू शकतो. त्यांच्या इथेही अशा पेशन्ट्सची देखभाल (अर्थाच योग्य तो चार्ज आकारला जातो) केली जाते. याशिवाय तत्सम काही खाजगी संस्थाही पुण्यात कार्यरत आहेत. मला माहीत असलेली त्यापैकी :
१. संध्या होम ~ नाना पेठ, पुणे
२. ईशप्रेम निकेतन ~ डॉ.सी. पथ, भवानी पेठ, कॅम्प, पुणे.
[नोट : पण कॅन्सर पेशन्ट्साठी स्वतंत्र रूम घेणे गरजेचे आहे, असे तेथील व्यवस्थापक सांगतात. चार्जेसही फिक्स असतात.]
Pages