कुमॉन (Kumon)/एक्सप्लोर लर्नींग (explore learning)/तत्सम क्लासेस च्या माहिती ची देवाणघेवाण

Submitted by माधुरी१०१ on 16 March, 2012 - 10:34

इथे कुणाला कुमॉन / Explore Learning/ Abacus किंवा तस्सम कोर्सेचा अनुभव आहे का?
लंडन मधे सध्या कुमॉन / Explore Learning ह्याचं बरच प्रस्थ आहे.
माझी मुलगी आता जुन मधे ७ वर्षाची होईल. मी विचार करतीये की ह्या पैकी एका कोर्स ला घालायचा. बाकी मैत्रीणींशी / पालकांशी चर्चा करताना ह्या दोन्हिंचे आधिक-उणे गुण दिसत आहेत.

कुमॉनला मुलं लगेच कंटाळतात अस लक्षात येतयं, बहुतेक त्याच्या तोचतोच (रिपिटेशन) पणा मुळे.
माझ्या काही मैत्रीणींची मुल जेमतेम ६ - ८ महिने जात होती नंतर ते कंटाळली.
मी मागे कुमॉनच्या एका शिक्षकाला पण भेटले होते, त्याने पद्धत समजुन सांगीतली होती. त्याच म्हणणं होत की मुलां मधे / पालकां मधे पेशन्स उरला नाहिये Happy म्हणुन ते लवकर कंटाळतात आणि सोडुन देतात.
त्यांनी हे पण सांगितले की हा अभ्यासक्रमाने कुठला स्पेसिफिक National Curriculum डोळ्यासमोर न ठेवता बनवला आहे जेणे करुन मुलांचे बेसिक पक्के होईल (खरंही असेल)

Explore Learning चांगल ऑप्शन असु शकेल. पण गणित-ईग्लीश कॉप्युटर वरच शिकवतात / करुन घेतात. कागदावर शिकवणं जवळपास नाहिये. पण हा अभ्यासक्रम National Curriculum (key stage tests) वर आधारीत आहे.

असही कळालयं की अमेरिकेत कुमॉनच प्रस्थ बर्‍या पैकी आहे म्हणुन.
अब्याकस बद्दल मी तरी इथे जास्त ऐकल नाहिये.

ह्या किन्वा इतर काही कोर्सेस चे काही अनुभव असतील तर शेअर करुयात का?
धन्यवाद. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषयांतर माझ्या मुळे झालं - माफ करा, कद्दचित मी इथे हा विष्य काढाय्लाच नको होता.

पण हे वाक्य कुठे तरी चुक वाटतं - बर्‍याच देसी पालकाना शिक्षणाच्या प्राथमिक शिक्षणाची गरज आहे... >>>> असेल किंवा नसेल, मी कमेंट नाही करु शकत. पण इतकं नक्किच सांगु शकते कि कोण्त्या पालकाला आपली मुलगी स्ट्र्गल करावी असे वाटेल? लहान पणा पसुन कष्टाची, अभ्यासाची, सवय लावणे वाईट आहे का? आणि प्र्त्येक पालक हा मारुन मुट्कुनच करतो असे नाहि ना म्हणता येत. infact आजची जनरेशन रीबेलच करेल असे केले तर. तसेच असेल तर तु एखादी भाजी खा असे तरि का म्हणाय्चे, तिला जे आवड्ते तेच खाउ देत, अमेरिकन बहुतांशी मुलं डब्यामधे चिप्स, ज्युस आणातात तसेच आपल्या मुलांना पण करु द्यावे - तिच्या आवडी प्रमाणे - बरोबर?

असो हा मुद्दा मी मझ्यापुर्ता इथेच संपवते....

विषयांतर माझ्या मुळे झालं - माफ करा, कद्दचित मी इथे हा विष्य काढाय्लाच नको होता.>> मला तरी तस वाटत नाही, उलट बर्‍याच माहित नसलेल्या गोश्टी कळाल्या.

बरोबर आहे तुमचं..

दप्तर उचलायची सवय व्हावी तर २५ पाऊंडाचं पोतं उचलायची सवय करायला काय हरकत आहे?
कुणाला असं वाटतं की आपली मुलं बलवान होऊ नयेत?

प्रत्येक पालक मारून मुटकून नाही हो करत. पण हल्ली जन्माला आलेली शेकडा ७० मुलं , 'तू मला क्लासला घालून दिवसभर अभ्यासाला का बसवत नाहीस?' हा प्रश्न विचारू लागलेली असावीत. का? हे मला न सुटलेलं कोडं आहे..

भाजीचं उदाहरण: तीच मुलं आई मला तिसरी/चौथीचा अभ्यास नको, मी फक्त पहिलीचा करेन असं म्हणत असतील तर त्याना चिप्स आणि फळाचे रस वगैरे द्यावेत.. (तशीही शक्यता आहेच.. )

बर्‍याच देसी पालकाना शिक्षणाच्या प्राथमिक शिक्षणाची गरज आहे... <<< हे चूक आहे..

रुतुजा , उलट त्यामुळे किती चांगली चर्चा झाली. तुमचे खरतर धन्यवाद. दोन्ही बाजू कळल्या.
वाटल्यास तुम्ही लिहिलेल्या पहिल्या पोस्ट पासून नविन बाफ काढाल का? मग विषयांतर करतोय असही कुणाला वाटणार नाही.

काल लेकीकडून अजून एक साइट समजली पण ती पेड आहे. थोड्या गोष्टी फुकट आहेत.
http://www.brainpop.com/

काल मुलगी स्टॉक/शेअर्स, comparing 2 diiff phone company plans and taking a decision etc. बघत होती.

काल मुलगी स्टॉक/शेअर्स >>>. लोल शिकवनी हवी आहे का?

परिक्षा तिसरीत असते.

माझी मुलगी पण त्या गिफ्टेड लर्निंग्च्या परिक्षेला बसली होती अन बहुदा नापास झाली. Lol कारण त्यांचे पत्र आले की, "अहो आम्हाला वाटले तुमची मुलगी गिफ्टेड आहे पण ती दुर्दैवाने एक्पडायटेड लर्निंग मध्ये तिची निवड होऊ शकत नाही." आम्ही चाट. अशी काही परिक्षा त्यांनी घेतली हेच माहिती नव्हते. आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये बहुदा आधी कळवत नाहीत.

हे मित्राला सांगीतले. सहज.

काही महिन्यांनी मित्र म्हणाला त्याच्या मुलीची निवड झाली. ती प्रि स्कुल मध्ये होती! त्याला एक्स्पडायटेड लर्निग तिसरीत परिक्षा घेऊन सुरू होते हेच मुळी माहिती नव्हते.

प्रत्येकाला आपली मुलं गिफ्टेड वाटतात. प्रॉब्लेम तो आहे. Happy

IXL आणि इथे आलेल्या एक दोन इतर साईटवर मुलं बरेचदा असतात. त्यांना आवडते. IXL वर प्रि स्कुल स्टफ पण आहे. माझ्या मुलाला मजा येते.

>>दुसर म्हणजे GT प्रोग्रॅम मध्ये मुल म्हणजे हुशार अस एक misconception आहे. <<
GT प्रोग्रॅम मध्ये "ढ" मुलांना प्रवेश मिळत नाहि, म्हणजेच GT प्रोग्रॅम मध्ये हुशार मुलं असतात असं म्हणायला हरकत नाहि. Happy

काल मुलगी स्टॉक/शेअर्स >>>. लोल शिकवनी हवी आहे का?
>>> अरे ते अगदीच प्राथमिक स्वरुपातली माहिती ह्या सदरात होतं आणि ते फ्री होतं म्हणून तिने त्यावर क्लिक केलं असणार Wink (आहे किनी हुशार!)

शुम्पी ब्रेनपॉप आयपॅड/आयफोन वर चं अ‍ॅप पण आहे. खूपच छान आहे. रोज एक नवा व्हीडीओ अप्लोड होतो. बरेच वेगळे वेगळे विषय कवर करतात. मुलांना समजेल अशा भाषेत बरीच माहिती असते.

विषयांतर होत नाहिये उलट बर्‍याच गोष्टी कळाल्या. छान माहिती मिळतेय या धाग्यामधून.

मधून मधून मुलांना बालपण पण Enjoy करू द्यावं.. खूप मजा असते त्याच्यात.. >>अगदी बरोब्बर.
माझा नवरा तर एक पाउल पुढे - तो म्हणतो की मधून मधून अभ्यास करावा Happy

G&T प्रकार काय आहे हे अजुन तरी माहित नाही .. आणि इथे ही आहे का ते माहित नाही.

सॅट (key stage1/ stage2, etc) ची परिक्षा शाळेत कुठल्या दिवशी होणार हे मुलांना / आयांना माहीत नसतं आणि हे खरचं चांगल आहे. अगदी हसत खेळत ह्या टेस्ट्स घेतात. पण आयांना (विशेषतः भारतीय, माफ करा पण हेच बघितलय) खुप टेंशन असत.

इथे 'ग्रामर स्कुल' हा प्रकार आहे. key stage-2 (वय वर्ष ११) नंतर 'ग्रामर स्कुल' ला अ‍ॅडमिशन मिळण्यासाठी परिक्षा असते. चांगले मार्क्स मिळाले तर चांगली स्कुल !! स्टेट्स स्कुल इतक्या चांगल्या नहियेत त्या मुळे बहुतेकांचा प्रयत्न असतो की चांगली 'ग्रामर' शाळा च मिळावी. असो.

'तुम्ही तिला काय बनवणार?' हा प्रश्न तर डोक्यात जातो. अरे आम्ही कोण तिला काही बनवणारे ती तिच्या आवडी/कुवती प्रमाणे करेल जे करायचय ते. अजुन ही 'माझ्या मुला/ली ने डॉक्टर / ईन्जींनिअर ' व्हावं ह्या पालकांनी मुलांवर लादलेल्या अपेक्षा बघीतलं की खुप वाईट वाटत. (ते ही त्यांच्या ह्या वयात!!)

GT प्रोग्रॅम मध्ये "ढ" मुलांना प्रवेश मिळत नाहि, म्हणजेच GT प्रोग्रॅम मध्ये हुशार मुलं असतात असं म्हणायला हरकत नाहि >>.

ढ म्हणजे काय? सर्वसाधरण मुल "ढ" कॅटेगिरीमध्ये कसे मोडेल? जी मुलं एक्स्पडायटेड लर्निंग मध्ये नाहीत ती सर्व च्या सर्व ढ मध्ये कशी मोडतील.

उलट असे म्हणा ती गिफ्टेड आहेत. कॅटेगिरी त्यांची वेगळी सर्वसाधारण मुलांची नाही. असो.

>>उलट असे म्हणा ती गिफ्टेड आहेत. कॅटेगिरी त्यांची वेगळी सर्वसाधारण मुलांची नाही. असो. <<
कबुल. ढ किंवा सर्वसाधारण असं म्हणुया. Happy

एक उत्सुकता म्हणून..
या वरती सगळ्या विविध शिकवण्याच्या पद्धती दिल्यात त्या ठराविक विषयांशी निगडीत आहेत की एकूण शिक्षणाशी?
मी सध्या एका संस्थेच्या शाळांसाठी (मिडलस्कूल) नाटकाच्या सिलॅबस डेव्हलपमेंट संदर्भात काम करतेय पण शिक्षणशास्त्र या विषयाशी चुकूनही संबंध आलेला नसल्याने अश्या नवीन गोष्टी ऐकल्या की आपण करतोय तो विचार फारच बेसिक ठरेल की काय असे वाटतेय.

http://usat.ly/NkbYNI

वर काही जणांनी लिहिल्या प्रमाणे आता ह्या मुलीचे काही खरे नाही - कारण ही वीक्डेस मधे ६ तास तर वीकएन्ड ला १०-१२ तास अभ्यास करायची.......

Pages