इथे कुणाला कुमॉन / Explore Learning/ Abacus किंवा तस्सम कोर्सेचा अनुभव आहे का?
लंडन मधे सध्या कुमॉन / Explore Learning ह्याचं बरच प्रस्थ आहे.
माझी मुलगी आता जुन मधे ७ वर्षाची होईल. मी विचार करतीये की ह्या पैकी एका कोर्स ला घालायचा. बाकी मैत्रीणींशी / पालकांशी चर्चा करताना ह्या दोन्हिंचे आधिक-उणे गुण दिसत आहेत.
कुमॉनला मुलं लगेच कंटाळतात अस लक्षात येतयं, बहुतेक त्याच्या तोचतोच (रिपिटेशन) पणा मुळे.
माझ्या काही मैत्रीणींची मुल जेमतेम ६ - ८ महिने जात होती नंतर ते कंटाळली.
मी मागे कुमॉनच्या एका शिक्षकाला पण भेटले होते, त्याने पद्धत समजुन सांगीतली होती. त्याच म्हणणं होत की मुलां मधे / पालकां मधे पेशन्स उरला नाहिये म्हणुन ते लवकर कंटाळतात आणि सोडुन देतात.
त्यांनी हे पण सांगितले की हा अभ्यासक्रमाने कुठला स्पेसिफिक National Curriculum डोळ्यासमोर न ठेवता बनवला आहे जेणे करुन मुलांचे बेसिक पक्के होईल (खरंही असेल)
Explore Learning चांगल ऑप्शन असु शकेल. पण गणित-ईग्लीश कॉप्युटर वरच शिकवतात / करुन घेतात. कागदावर शिकवणं जवळपास नाहिये. पण हा अभ्यासक्रम National Curriculum (key stage tests) वर आधारीत आहे.
असही कळालयं की अमेरिकेत कुमॉनच प्रस्थ बर्या पैकी आहे म्हणुन.
अब्याकस बद्दल मी तरी इथे जास्त ऐकल नाहिये.
ह्या किन्वा इतर काही कोर्सेस चे काही अनुभव असतील तर शेअर करुयात का?
धन्यवाद.
सीमा, स्वाती, अंजली -
सीमा, स्वाती, अंजली - धन्स.... तुम्ही म्हण्ता तस गीफटेड प्रोग्याम साठिच आहे हे. एकुण तीन परिक्शा आहेत. भारतात हा प्रकार नसल्याने, काहिच माहित नव्हते
तर, पुढ्ची स्टोरी: मी गेले होते शरंण्या च्या शाळेत, आणि भेटले तिच्या टिचर ला. सीमा म्हण्ते तसं खुप वेग्ळ विचारतात मुलांना. जसे शेप्स बनवणे (चित्रात पाहुन), वर्ड प्रोब्लेम्स, पिक्चर अनलोजी असे (शरु पिक्चर अनालोजी मधे कमी आहे असे तिचि टीचर म्हणाली, व्हर्बल छान आहे :-)) असं बरच काहि.
काल पहिली टेस्ट झाली. पण नंन्तर कळाले कि अजुन दोन परिक्षा असतात्. पुढ्ची परिक्षा स्प्रिंग ब्रेक नंन्तर आहे. त्या मधे म्हणे ह्या च्या पेक्षा जस्त अवघड प्रश्न असतात. पाहु काय होतय ते. कोणाला अनुभव आहे का अश्या तेस्ट चा?
रुजुता, या परीक्षांची तुम्ही
रुजुता, या परीक्षांची तुम्ही खास अशी तयारी करून घेऊ शकत नाही. मुलांची बुध्दी, शॉर्ट टर्म व्हिज्युअल मेमरी, एकूण प्रश्न सोडवण्याचं स्किल, visual-spatial oraganization skills, expressive language skills आणि तत्सम बर्याच गोष्टी तपासल्या जातात.
सगळ्या परीक्षांनंतर पालकांना 'सायकोएजुकेशनल इव्हॅल्युएशन रिपोर्ट' मिळतो. इन्टलेक्च्युअल स्क्रीनिंग इव्हॅल्युएशनसाठी Weschler Intelligence Scale (WISC) असते. कुठलं इव्हॅल्युएशन इन्स्ट्रुमेंट वापरलं ते सांगितल्या जातं. उदा: Differential Ability Scale - DAS. यामुळे verbal, spatial आणि non- verbal स्कोअर्स कळतात. यात पुन्हा ग्लोबल स्कोअर्स आणि T स्कोअर्स अशीही भानगड आहे. नेमकं काय ते आता आठवत नाही.
तुम्हाला मिळणार्या रिपोर्टमधे पाल्याचं एकूण ब्याकग्राउंड, परिक्षा घेणार्या व्यक्तीची निरिक्षणं (उदा: पाल्य नजर भिडवून बोलते का) ही देखील असतात. मिळालेल्या रिपोर्टवर सायकॉलॉजिस्ट आणि वर्गशिक्षकांना एकत्र भेटून पालकांना चर्चा करता येते.
मायबोलीवर मितान(?) यात एक्स्पर्ट आहेत बहुतेक. त्यांच्याशी संपर्क साधून विचारू शकता.
तसच असेल मवा. कारण इथे
तसच असेल मवा. कारण इथे तिसरीपासून अभ्यास वाढतो असं म्हणतात.
रुतुजा , पुढची परिक्षा कोणती
रुतुजा , पुढची परिक्षा कोणती आहे? ITBS , Stanford-Binet कि WISC.
अतिशय उत्तम प्रोग्रॅम आहे GT. फक्त दुर्दैवाने अलिकडे बर्याच ISD मधून फंडिग कमी झाल्यामुळ या program ची व्याप्ती कमी होत चालली आहे.
मुलीच अभिनंदन . ९५ पर्सेन्टाईल म्हणजे मस्त स्कोअर आहे.
मी यासाठी काम करणार्या लोकल Org साठी व्हॉलंटियरिंगचे काम करते. तसच माझी मुलगी या प्रोग्रॅममध्ये आहे. (हे उगाच भाव मारल्यासारख होत म्हणुन लिहिल नाही. नंतर एडीट करेन. ) तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे असतील तर जरुर विचारा. मदत करायला आवडेल.
कोणाला अनुभव आहे का अश्या
कोणाला अनुभव आहे का अश्या तेस्ट चा?>>>उसगावात माझ्या मुलाची झाली आहे अशी टेस्ट.. ह्यासाठी तयारी करू शकत नाही.. किवा माझ्या मते न केलेली बरी.. इथे गिफ्टेड प्रोग्राम मध्ये टाकायचं असेल तर घेतात.. मुलाने सहज पास केली असं सांगितल्या गेलं आम्हाला.आमच्या इथे एकच लेव्हल होती.. एक्झाम कशी असते हे अज्जिबात सांगत नाही.. पण दुसर्या मुलाच्या वेळेस गेलो तेव्हा कम्प्युटर वर होती आणि आम्ही बाहेर उभं राहून बघत होतो (मुलगा एकटा जायला तयार नव्हता आणि आम्हाला सोबत जाता येत नाही म्हणून त्यांनी बाहेर उभं केलं होतं) .. त्यावरून
मृण्मयी म्हणते आहे >>मुलांची बुध्दी, शॉर्ट टर्म व्हिज्युअल मेमरी, एकूण प्रश्न सोडवण्याचं स्किल, visual-spatial oraganization skills,>>> तशीच होती..
http://www.ixl.com इथे जर बघितलं तर एक आयडिया मिळेल . काही गोष्टी तशा होत्या ..
शाळेच कोर्स बघताना विशेष फरक जाणवत नाही पण गणित, सायन्स एकदम मस्त आहे.. पहिल्या वर्गात त्याला measurements एनर्जी, वेदर, असलं बरंच काही होतं सायन्स ला . इथे सायन्स म्युझियम कडून त्यांचा कोर्स बनवून मिळतो.. आणि स्लाईड, प्रयोग सगळं दाखवतात..
गणितात नंबर्स, युनिट्स, वजाबाकी तत्सम सोबत जोमेट्री आणि अल्जेब्रा आहे आई शप्पथ त्याचा कोर्स बघून फार्र्रर्र्रर्र्र कॉम्प्लेक्स येतो.. आम्ही हे सोडून भारतात परत येतोय हि एक गोष्ट खूपच खटकतेय
मला प्रश्न विचारायचा आहे ..
मला प्रश्न विचारायचा आहे .. माझी लेक sr.K.G मधॅय जाणार आहे . s.s.c board ला आहे ..
मला वेगवेगळ्या विषयांच्या वर्क शीट्स हवे असलायस कुठे मिळेल .. आणि कुठले प्रकाशन ?
मधून मधून मुलांना बालपण पण
मधून मधून मुलांना बालपण पण Enjoy करू द्यावं.. खूप मजा असते त्याच्यात..
हल्ली आमच्याकडे आयानी तयार केलेली Gifted and Talented मुलं भरपूर मिळतात. पुढे जाऊन त्या मुलांचं काय होतं ते बघितल्यावर दया येते..
इथे नववीपासून खरा अभ्यास आणि भरपूर अभ्यास सुरू होतो. आधीची वर्षं मजा करून घ्या..
हल्ली आमच्याकडे आयानी तयार
हल्ली आमच्याकडे आयानी तयार केलेली Gifted and Talented मुलं भरपूर मिळतात. पुढे जाऊन त्या मुलांचं काय होतं ते बघितल्यावर दया येते..>>>> आयाच Gifted and Talented असतात.
>>इथे नववीपासून खरा अभ्यास
>>इथे नववीपासून खरा अभ्यास आणि भरपूर अभ्यास सुरू होतो. आधीची वर्षं मजा करून घ्या >>+१००
रुतुजा, तुमचे आणि तुमच्या लेकीचे अभिनंदन! प्रत्येक स्टेट/ शाळेनुसार गिफ्टेड प्रोग्रॅम वेगवेगळा असतो. तसेच प्रत्येक गिफ्टेड मुलाची गरज वेगवेगळी असते. गिफ्टेड प्रोग्रॅम मुलाला आवडणे महत्वाचे.
>>इथे नववीपासून खरा अभ्यास
>>इथे नववीपासून खरा अभ्यास आणि भरपूर अभ्यास सुरू होतो. आधीची वर्षं मजा करून घ्या >>:) अगदी..
हि शाळा माझा मुलगा खूप एन्जोय करतोय.. पण कुमोन वगैरे भानगडीत किवा विशेष क्लास्सेस अज्जिबात लावले नाहीत.. त्याला अजूनही रीडीग येत नाही..करतो पण पहिलीच्या मानाने बरोबर आहे असं टीचर म्हटल्यावर ते हि सोडून दिलं.. विशेष होमवर्क नसतो. त्यामुळे घरी काय करू हि त्याची मोठ्ठी कम्प्लेंट असते.. अजून तरी मला बोर होतंय म्हणायला शिकला नाहीये.. पत्त्याच घर बनव, कलरिंग मध्ये खुश आहे गाडी बाकी उनाडक्या असतातच .
पण कधी तरी मागे लागल्याच जातं मुलांच्या ..फार क्लासेस ला घातलं नाहीये त्यात हि कधी तरी वाटतं बाप रे आपला मुलगा काहीच करत नाही.. पियर प्रेशर आणखी काय . .
परिक्षे च नाव ओलस्ट आहे, आणि
परिक्षे च नाव ओलस्ट आहे, आणि नाहि ग आइ क्यु टेस्त नाहि म्हणाली कोगनेट आहे असे म्हणाली. तयारि करता येत नाहि हेच बरं आहे - नाहि तर तिच्या मागे कर्ता करता नाकि नौ....
परदेसाई - आय अग्री विथ यु...
परदेसाई - आय अग्री विथ यु... नाहि जास्त त्रास देत शरु ला, आणि खरं संगु तिला जबर्दस्ती केलि तर ति उलटं करते.....त्यामुळे तिच्या कलाने घ्यावच लागतं
होतं काय की स्पर्धेच्या नादात
होतं काय की स्पर्धेच्या नादात आपण मुलांचं बालपणच हिरावून घेतो.
काही आयाना (आणि क्वचित बापान्ना) आपल्या मुलाला/मुलीला ९७-९८-९९-१०० मार्क कसे पडतात हे सांगण्यात धन्य वाटतं. आणि त्यांच्या प्रेशरमधे उरलेले पालक मग आपल्या पाल्याला घाण्याला जुंपतात.
G & T आमच्याकडे सुरू झाल्यापासून आयांच्या असं लक्षात आलं की दुसरीच्या विद्यार्थ्यांना चौथी-पाचवीचे प्रश्न विचारले जातात. मग शिकवण्या मागे शिकवण्या लाऊन पोरांना अभ्यास. १०० मुलांमधे खरं तर १ किंवा २ मुलं G&T असायला हवीत. आमच्याकडे १०० मधे ७०. मग त्यांना पुढचं पुढचं शिकवण्याचा अट्टाहास. मग सहावी/सातवीत गेल्यावर ते कठिण पडतं. त्या वयात मुलं हाताबाहेर जाऊ लागतात. पालकाना सहन होत नाही, मुलाना सांगता येत नाही. मग एकतर मुलं मागे पडायला लागतात, कंटाळा करतात किंवा शिकवण्या एके शिकवण्या..
G&T मुलाचं एक चांगलं उदाहरणः जो मुलगा/मुलगी दुसरी तिसरीत असताना पाचवी सहावीचं पुस्तक बघून 'अरे वा, मज्जा आहे असं म्हणून स्वतः म्हणून सोडवायला लागतो तो.
पण आपलं मुलं G & T नाही हे बर्याच पालकाना पचवता येत नाही. मग मारझोड करून G&T तयार करतात. माझ्या UUV Segment मधे यावरच काही विनोद मी टाकले आहेत..
देसाई, तुमचा मुद्दा अगदी
देसाई, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.
इथे बरेच पालक आपणहून मुलांना गिफ्टेड प्रोग्रामला घालत नाहीत. (९९% पालकांना इथे आल्याआल्या ही भानगडही माहिती नसते.) शाळेनं निवडलंय, मुलाला आवडतंय, झेपतंय तर चांगलं एक्स्पोजर आहे! अभ्यासक्रम अत्यंत सुंदर तर्हेनं शिकवणारा शिक्षक मिळाला तर सोनं होतं. एकदा मूल या वर्गांमधे बसायला लागल्यावर, चार परीक्षांवरून काढलेला निष्कर्ष चूक ठरला आणि मुलाची ती क्षमता नाही, किंवा क्षमता आहे, पण आवडत नाही हे लक्षात येवूनही, आपल्या दिखाव्याखातर मुलांना त्यात ठेवलं तर तो अगदी वेडेपणा ठरेल.
१०० मुलांमधे खरं तर १ किंवा २
१०० मुलांमधे खरं तर १ किंवा २ मुलं G&T असायला हवीत. आमच्याकडे १०० मधे ७०. मग त्यांना पुढचं पुढचं शिकवण्याचा अट्टाहास. मग सहावी/सातवीत गेल्यावर ते कठिण पडतं. त्या वयात मुलं हाताबाहेर जाऊ लागतात. पालकाना सहन होत नाही, मुलाना सांगता येत नाही. मग एकतर मुलं मागे पडायला लागतात, कंटाळा करतात किंवा शिकवण्या एके शिकवण्या..>>
बाप रे हे भयानक आहे..ह्याचा विचार केला नव्हता.. सध्या मुलाला डोक्याला पुरेसं खाद्य मिळतंय इतकाच विचार केला होता.. बाकी भारतीय पालकांशी बोलताना बढाया थांबतच नाही आणि शाळा ह्या विषयावर बोलायची इछाच होत नाही त्यामुळे मी फार खोलात जावून विचारत नाही ..हे गिफ्टेड प्रकरण खूप उशिरा कळलं.. शेवटच्या दिवशी टेस्ट बंद व्हायच्या दिवशी दुपारी मुलाला नेलं आणि तो पास झाला बघून खरं तर आम्हाला धक्का बसला.. पण शेवटी भारतीय पालकच न त्यामुळे छान हि वाटलं (मला हि बढाया मारायला मिळाल्या ) ....सुरुवातीला त्यांनी map टेस्ट घेतली तेव्हा मात्र मुलाचा स्कोअर कमी आला त्यावेळेस अर्थात वाईट वाटलं .. पण ते दर वर्षी घेतात आणि मुलगा आणि टीचर बसून काय ते ठरवतात ..प्रोग्रेस कसा करायचा .. परत आत्ता जेव्हा घेतली तेव्हा मुलगा आपले निर्णय घेतोय आपण हून सांगतोय मी ह्या ह्या विषयात कमी आहे. आणि टीचर ला सांगत होता कि मी ह्यावर काम करेन . तेव्हाच ठरवलं कि आपण ह्यात पडायचं नाही.. असो
तुम्ही इथे अनुभव शेयर केला त्यासाठी आभार..
आमच्याकडे GT टेस्ट शाळेत कधी
आमच्याकडे GT टेस्ट शाळेत कधी घेतात ह्याचा आम्हांला पत्ताही नसतो त्यामुळे तयारीचा वगैरे प्रश्नही येत नाही. आमच्या शाळेत तरी ३ रीत ही टेस्ट होते आणि सिलेक्ट झालेली मुलं ६ वी पर्यंत लॉक होतात. देसाई म्हणतात तशी खंडीभर मुलं त्यात असतात. ज्या मुलांच्या आया पिटीए मध्ये वगैरे अॅक्टिव असतात त्यांची मुलं सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात असंही ऐकून आहे. खखोदेजा.
मीपीटीए मध्ये अजिबातच
मीपीटीए मध्ये अजिबातच अॅक्टीव नाही त्यामुळे तो दावा खरा नसेल सायो.
माझ्या मोठीला तिच्या टिचरने किंडर मध्ये असतानाच टेस्ट टेस्ट ला बसवलं होतं (शाळेच्या वेळातच) मी फक्त एका फॉर्म वर सही करून पाठवली होती माझी परवानगी असल्याची. टेस्ट कधी झाली माहिती नव्हतं.
त्या वर्षी त्या कार्यक्रमात ३ पोरे होती, आता लेक तिसरीत आहे आणि पोरांची संख्या डझनभर आहे.
पण आता ते लोक किंडरमध्ये टेस्ट घेतच नाहीत.
लेकीला आठवड्यातून एक दिवस त्या रूम मध्ये जायला खूप आवडतं आहे सध्या तरी. त्यामुळे मी खुश आहे
परदेसाई, तुमची पोस्ट खूपच छान आहे. मुले मोठी होत जातील तशी त्याची जणीव मुद्दमून मनात ठेवावी लागणार.
तुम्ही म्हणता तशी खर्यखुर्या गिफ्टेड मुलांची संख्या १००त १-२ असायला हवी असं वाटतं त्यामुळे शाळेचे निकष समजत नाहीत.
माझी मुलगी काही ५-६ चं गणीताचं पुस्तक कित्ती मज्जा म्हणून उघडाणार नाही
तुम्ही म्हणता तशी
तुम्ही म्हणता तशी खर्यखुर्या गिफ्टेड मुलांची संख्या १००त १-२ असायला हवी असं वाटतं त्यामुळे शाळेचे निकष समजत नाहीत.>>अगदी.. त्याच्याच वर्गात २५ आहेत विचार करण्यासारखं आहे .. इथेही शाळा स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी किवा नवीन काही तरी म्हणून करत असतील.. उद्देश वाईट नसू हि शकतो कारण गिफ्टेड प्रोग्राम चालवायचा म्हटला आणि फंडिंग पाहिजे असेल तर २५ मुलं असल्याशिवाय त्यानाही सुरु करता येईल का माहिती नाही..
सीमा तुझा नं मेल करशील का?
सीमा तुझा नं मेल करशील का?
आणि हो वरती लिहिलेले जरी खरे
आणि हो वरती लिहिलेले जरी खरे असले तरी तिला काँप गेम्स येत नाहीत, आम्ही अजुन देत पण नाही. तिच्या बरोबरिची मुले शिताफिने ते खेळु शकतात.
हल्ली आमच्याकडे आयानी तयार
हल्ली आमच्याकडे आयानी तयार केलेली Gifted and Talented मुलं भरपूर मिळतात. पुढे जाऊन त्या मुलांचं काय होतं ते बघितल्यावर दया येते..>>>
आयाच Gifted and Talented असतात.>>>>
परदेसाई , अंजली प्रामाणीकपणे विचारते , तुम्हाला नेमक काय म्हणायच आहे? मला खरचं कळल नाहीये.
तुमची दुसरी पोस्ट छान आहे.
मी वरच्या पोस्ट मध्ये लिहिलय तस परत लिहिते GT program ची तयारी करता येत नाही.
दुसर म्हणजे GT प्रोग्रॅम मध्ये मुल म्हणजे हुशार अस एक misconception आहे. तुमच्या सगळ्यांच्या posts वरुन मला अस वाटतय कि तुम्हालाही तसच वाटतय का?. (तस नसेल आणि माझ समजायला चुकत असेल. माफ करा. )
GT साठी एवढा आटापीटा करतात हे ही मला आजच कळतय. आमच्याकडे याच प्रमाण तुमच्याएवढ नाही हे कारण असेल. हार्डली एक किंवा दोन मुल एका वर्गातुन. शाळेतुन परिक्षा डिक्लेअर केली जाते. कारण सगळ्यांचीच परिक्षा घेतली जाते. रिकमंडेशन वगैरे भानगड नाही. सगळ्यांना संधी. परिक्षा कशा प्रकारची असु शकेल हे सांगण पालकांची जबाबदारी आहे हे गृहित धरल जात. तयारीसाठी नसून , मुल गोंधळून जाउ नये, रेस्टरुमला वगैरे जावून आलेल असाव यासाठी.
मुल GT असण आणि हाय अॅचिव्हर (देशी लोकांच्या द्रुष्टीने हुशार) असण या मध्ये प्रचंड मोठा फरक आहे.
GT मुलं हाय अॅचिव्हर असेलही आणि नसेलही. वेगळ्या प्रकारे ज्ञान आत्मसात करणारी, ठरावीक विषयांमध्ये out of the box , thinking करणारी आणि त्यात exceptional ability असणारी मुले ही GT मुलांची प्रायमरी ओळख आहे. हुशारीचा आणि GT चा संबध नाही.
उदा. माझ्याच मुलीच देते. अभ्यास करायला अजिब्बात आवडत नाही. वाचायला खुप आवडत. म्युझिक , चित्रकला आणि गणित प्रचंड आवडिचे विषय. तो अभ्यासाचा भाग आहे हे तिच्या लक्षात येत नाही. इतकावेळ ती ते करत बसते.
आणखी एका अमेरिकन कुटुंबातील मुलगी , म्युझिक मध्ये GT आहे. अभ्यासात 'C' grade. पास होणे एक मोठ टास्क आहे तिच्यासाठी.
आमची org स्पेशल नीडेड आणि गिफ्टेड दोन्ही साठी काम करते. थोडक्यात सांगायचे झाले तर गिफ्टेड मुलांना स्पेशल नीडेड म्हणुन वेगळ्या अर्थाने ट्रीट केल जात. कारण त्यांच्या मानसिक गरजा , शिक्षण घेण्याच्या मेथड्स वेगळ्या असतात म्हणुन. त्यामुळेच पालक ते एका अर्थाने Bragging ची संधी म्हणुन न घेता , एक रिस्पोन्सिबिलिटी आणि चॅलेंज म्हणुन घ्याव ही अपेक्षा आहे. GT मुलांना त्यांच्या पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी चालना दिली नाही तर ते आत्मविश्वास गमावू शकतात. कारण बरेचदा ती अति sensitive ,थोडी वीयर्ड असु शकतात. (असतीलच अस नाही.)
Org मधल्या बर्याच जणांची मुल "Twice Exceptional " आहेत . म्हणजे GT बरोबरच डायलेक्सिया , ADHD वगैरे असलेली.
मी यात एक्स्पर्ट नाही. पण वाचून ,पाहून थोड थोड लक्षात आलय ते लिहिलय.
अशा वेगळ्या मानसिक गरजा असलेली मुलं तयार करण शक्य नसाव अस मी समजते.
So please someone explain कि तुमच्याकडे नेमक यापेक्षा काय वेगळ समजतात GT मुलं म्हणजे.
छान माहिती मिळतेय या
छान माहिती मिळतेय या धाग्यामधून ! परदेसाई,तुमची पोस्ट पटली अगदी !!
सीमा,आत्ताच तुमची पण पोस्ट
सीमा,आत्ताच तुमची पण पोस्ट वाचली.छान explain केलय तुम्ही. पण बहुतांश देसी पालक हा हाय अचिव्हर आणि GT मधला फरक लक्षात घेतात असे वाटले नाही जो थोडाफार अनुभव आलाय असा त्यावरून हे सर्व माझ्या मुलांसाठी अजून तरी बरंच दूर आहे. पण इथली चर्चा उपयुक्त होईल तेव्हा माझ्यासाठी, हे नक्की.
सीमा उत्तम पोस्ट. मला या
सीमा उत्तम पोस्ट. मला या GT/मॅग्नेट स्टूडन्ट चा काहीच अनुभव नाही कारण आमच्या स्कूल डिस्ट्रिक्ट मधे असा काही प्रकार नसतो पण इतर ठिकाणी असतं असं ऐकलं आहे
सीमा, धन्यवाद! तुझी पोस्ट
सीमा, धन्यवाद! तुझी पोस्ट वाचण्यापूर्वी मलाही गिफ्टेड म्हणजे अचीव्हर्स असंच वाटलं होतं.
>>दुसर म्हणजे GT प्रोग्रॅम
>>दुसर म्हणजे GT प्रोग्रॅम मध्ये मुल म्हणजे हुशार अस एक misconception आहे. तुमच्या सगळ्यांच्या posts वरुन मला अस वाटतय कि तुम्हालाही तसच वाटतय का>> हो, माझा समज तसाच होता तुझी पोस्ट वाचेस्तोवर. माझ्या आजूबाजूला मैत्रिणींचाही असाच आहे हे लक्षात आलंय.
तुझी नक्की शंका काय आहे ते
तुझी नक्की शंका काय आहे ते कळत नाहीये, पण प्रयत्न करते.
मी वरच्या पोस्ट मध्ये लिहिलय तस परत लिहिते GT program ची तयारी करता येत नाही.
दुसर म्हणजे GT प्रोग्रॅम मध्ये मुल म्हणजे हुशार अस एक misconception आहे. तुमच्या सगळ्यांच्या posts वरुन मला अस वाटतय कि तुम्हालाही तसच वाटतय का?. >>>>> बरोबर. पण आमच्या इथल्या आयांनी त्यावरही उपाय शोधून काढला आहे. इंटरनेटवर मुबलक साहित्य उपलब्ध आहे. Practice tests पण मिळतात. मग दुसरीच्या समरमधे त्याची तयारी सुरू होते. (तिसरीत परीक्षा घेतली जाते). इथे साधारण माहित असतं परीक्षा कोणत्या महिन्यात घेणार ते. त्याप्रमाणे मग अभ्यास सुरू होतो. आमच्या इथे AG (Academically Gifted) आणि GT (Gifted and Talented) असे दोन गृप आहेत. AG साठी कोगॅट आणि आयटीबीस अशा दोन्ही परिक्षांमधे स्कोअर चांगला लागतो. GT मधे एक परिक्षेत स्कोर चांगला आला पण दुसर्या नाही पण मुलाची वर्गातली प्रगती चांगली असेल तर वर्गशिक्षक रेकमेंड करू शकतात. दोन्ही परिक्षांसाठी स्कोर लेव्हल्स असतात. मॉडरेट. स्ट्राँग, व्हेरी स्ट्राँग. माझी मुलगी दोन्ही परीक्षेत व्हेरी स्ट्राँग म्हणून निवडली गेली. यामुळे लेकीचा स्वभाव बघता AG किंवा GT प्रोग्रॅम मध्ये मुलं म्हणजे हुशार असा अजिबात गैरसमज नाही. वर देसाई म्हणाले तसं वर्गातली ५०% पेक्षा जास्त मुलं AG किंवा GT म्हणून निवडली जातात. लेकीच्या वर्गात ३० पैकी १७ मुलं AG होती. मग आता सांग, असं मारून मुटकून तयारी करून घेतलेली मुलं GT किंवा AG आहेत असं कसं समजायचं? माझा मुद्दा (आणि बहुतेक देसाईंचाही) या प्रोग्रॅमला विरोध नसून त्यासाठी इथल्या देसी आया (किंवा पालक) मुलांना कसं ठोकून ठोकून तयार करतात त्यावर आहे. मुलाची क्षमता, त्याचं वय, त्याची आवड, कल या गोष्टी फार क्वचित विचारात घेतल्या जातात. मुलांना त्यांच्या नैसर्गिक गुणांना वाव मिळावा, where they can thrive असं शिक्षण मिळावं या मताची मी आहे. जर अशा प्रोग्रॅमचा मुलांना फायदा होत असेल तर चांगलंच आहे ना? गंमत म्हणजे इथे या आयांच्या तालमीत मुलं अशी काही तयार होतात की जी मुलं या प्रोग्रॅममधे नाहीत, त्यांचं ब्रेन वॉशिंग स्वतःच करतात! मॅग्नेट स्कूल हे दुसरं प्रकरण मी सध्या बघतीये. आमच्या गावातल्या एका मायबोलीकरणीला आलेला अनुभव आहे. तिला तिच्या शेजारणींनी मॅग्नेटला मुलांना घालत नाही म्हणून बरंच पिडलं होतं. जणू काही ती मुलांचं प्रचंड नुकसान करत आहे असा आविर्भाव होता. कदाचित इथे देशी पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून असे अनुभव आले असतील. इथे खरं तर अभ्यासक्रम किती छान आहे. मुलांना कितीतरी संधी आहेत, पण त्याचा फायदा घेतला जातो का? प्रत्येक वेळी पार्टीत भेटलं की मुलांच्या शाळा, AG, मॅग्नेट हेच विषय असतात. त्या अनुषंगानं लिहीलं आहे. असंच जाता जाता आठवलं म्हणून. एका मैत्रिणीने मुलींना (एक ६ वीतली आणि दुसरी ४ थीत) pre-SAT च्या क्लासला घातलं आहे.
बरंच विषंयातर झालं पण माझा मुद्दा लक्षात आला असेल :).
सगळं वाचताना एक गंमत
सगळं वाचताना एक गंमत आठवली.
माझी मुलगी तिसरीत असताना तिच्या वर्गात एक पटेल नावाचा मुलगा होता. गुड काँडक्ट किंवा विकली टेस्ट्मध्ये चांगले मार्क्स मिळाले की टिचर हॉल पास द्यायच्या. ह्या हॉलपासवर मुलांना वर्गातून थोडावेळ बाहेर जाता येत असे. लायब्ररी किंवा तत्सम काही. हा पटेल मुलगा त्याचे हॉल पास क्वारटरला विकायचा मुलांना. इतक्या लहान वयात फायनान्समध्ये त्याचा कोणी हात धरु शकेल का? in a way he was gifted in finance.
केवळ मजा म्हणून हा किस्सा लिहिला आहे. चालू द्या तुमचं.
अंजली, आल लक्षात तुला आणि
अंजली, आल लक्षात तुला आणि देसाईंना काय म्हणायच आहे ते.
त्याची आवड, कल या गोष्टी फार क्वचित विचारात घेतल्या जातात. मुलांना त्यांच्या नैसर्गिक गुणांना वाव मिळावा, where they can thrive असं शिक्षण मिळावं या मताची मी आहे. >>>
हेच ते गं. GT प्रोग्रॅमचा उद्देशच सुद्धा तोच आहे खरतर. पालकांनी काय ह्या समजुती करुन घेतल्या आहेत.
(आमची ISD ,funding कमी करत चालली आहे. त्यामुळं program , survive होण्यासाठी Org ला झगडणे भाग आहे. पण मी वर म्हटल तस ते मुलांना/पालकांना सपोर्ट मिळावा या उद्देश्याने आहे.
ज्या देशी लोकांची मुलं या प्रोग्रॅम मध्ये आहेत ती लोक फक्त अभ्यास रिलेटेड काही असेल तरच मीटिंग्ज अटेंड करतात. इतरवेळी करत नाहीत. पण ते आता लिहित बसत नाही. वेळ वाया. )
तु जस मॅग्नेट स्कुलच म्हणती आहेस तस आमच्या इथे चार्टर स्कुल मध्ये देसी पालक करतात .
रोज तासभर अभ्यास दिला तरी देसी पालक अजुन अभ्यास द्या म्हणतात.
विषयांतराबद्दल मनापासून क्षमा.
बर्याच देसी पालकाना
बर्याच देसी पालकाना शिक्षणाच्या प्राथमिक शिक्षणाची गरज आहे...
Pages