इथे कुणाला कुमॉन / Explore Learning/ Abacus किंवा तस्सम कोर्सेचा अनुभव आहे का?
लंडन मधे सध्या कुमॉन / Explore Learning ह्याचं बरच प्रस्थ आहे.
माझी मुलगी आता जुन मधे ७ वर्षाची होईल. मी विचार करतीये की ह्या पैकी एका कोर्स ला घालायचा. बाकी मैत्रीणींशी / पालकांशी चर्चा करताना ह्या दोन्हिंचे आधिक-उणे गुण दिसत आहेत.
कुमॉनला मुलं लगेच कंटाळतात अस लक्षात येतयं, बहुतेक त्याच्या तोचतोच (रिपिटेशन) पणा मुळे.
माझ्या काही मैत्रीणींची मुल जेमतेम ६ - ८ महिने जात होती नंतर ते कंटाळली.
मी मागे कुमॉनच्या एका शिक्षकाला पण भेटले होते, त्याने पद्धत समजुन सांगीतली होती. त्याच म्हणणं होत की मुलां मधे / पालकां मधे पेशन्स उरला नाहिये म्हणुन ते लवकर कंटाळतात आणि सोडुन देतात.
त्यांनी हे पण सांगितले की हा अभ्यासक्रमाने कुठला स्पेसिफिक National Curriculum डोळ्यासमोर न ठेवता बनवला आहे जेणे करुन मुलांचे बेसिक पक्के होईल (खरंही असेल)
Explore Learning चांगल ऑप्शन असु शकेल. पण गणित-ईग्लीश कॉप्युटर वरच शिकवतात / करुन घेतात. कागदावर शिकवणं जवळपास नाहिये. पण हा अभ्यासक्रम National Curriculum (key stage tests) वर आधारीत आहे.
असही कळालयं की अमेरिकेत कुमॉनच प्रस्थ बर्या पैकी आहे म्हणुन.
अब्याकस बद्दल मी तरी इथे जास्त ऐकल नाहिये.
ह्या किन्वा इतर काही कोर्सेस चे काही अनुभव असतील तर शेअर करुयात का?
धन्यवाद.
एक्स्प्लोअर प्रकरण माहित नाही
एक्स्प्लोअर प्रकरण माहित नाही पण कुमॉनचा ६,७ महिन्याचा अनुभव आहे. मला वाटतं मी सुरु केलं तेव्हा माझी मुलगी चौथीत होती. तिला ज्या वर्कशीट्स आल्या त्या केजी पासूनच्या. तिथपासून डोकं फिरतच गेलं. त्याच त्याच वर्कशीट्स रिपीट करत रहातात. ६ महिने बघितलं आणि वैतागून सोडून दिलं.
कुमॉनला माझा लेकही फार लवकर
कुमॉनला माझा लेकही फार लवकर कंटाळला.
मला वाटतं हा फिलॉसॉफीतला फरक आहे. शिकण्याची एकसाची पद्धत (पाठांतर / परवचा / सराव सराव सराव) आवडत असेल तर जरूर ट्राय करा. शिवाय लवकर सुरुवात केल्याने कदाचित सायो आणि माझ्या लेकासारखा प्रश्न यायचा नाही.
माझा लेक आता आय एक्सेल सोडवतो. इयत्तेनुसार प्रश्न, प्रत्येक प्रश्नासोबत त्याचं एक्सप्लनेशन आणि इन्स्टन्ट ग्राटिफिकेशन (लगेच मार्क्स मिळतात, किती स्किल्स मास्टर केली हे दिसतं) यामुळे ही साइट आम्हांला जास्त सूट झाली.
कुमॉन आम्हीही करुन सोदुन दिल,
कुमॉन आम्हीही करुन सोदुन दिल, एकतर तिथे जेमेतेम ३०-४० मिनिट शिकवतात त्यातही गणिताला २० मिनिट देतात.फक्त आठवड्याचे वर्कशिट आणण्यासाठी एवढा वेळ आणि पैसा देण पटत नाही.. शिवाय मुलांना नाविन्य हव असत त्यातल्या रिपीटेशनचा कंटाळा येवु शकतो.
त्यामानाने alohamindmath चंगले आहे अस एकलय.
कुमॉन वर्कबुक्स मिळतात ती
कुमॉन वर्कबुक्स मिळतात ती आणून तुम्ही घरच्याघरी हवं तर करून घेऊ शकता.
हो ग सायो हेच ऐकतीये मी..
हो ग सायो हेच ऐकतीये मी..
स्वाती, आय एक्सेल चे जे युके वर्जन आहे ना ते माझी लेक पण वापरते. तशीच फ्रंटर (fronter) म्हणुन पण एक वेबसाईट आहे (शाळेने लॉगिन दिले आहे प्रत्येक पाल्याला त्याचे). ह्या दोन्ही वेबसाईट जवळपास सेमच आहेत.
आज बर्याच वर्षांनी मायबोलि वर
आज बर्याच वर्षांनी मायबोलि वर येत आहे... विषयांतर होत असेल तर संगा, मी पोस्ट काढेन....
माझी मुलगी आता १ ग्रेड मधे जाइल. तिला तिच्या टिचर ने कोगनेट ची परिक्शा द्या म्हणुन सांगित्ले आहे. हा काय प्रकार आहे? ह्याचि काय तयारी करायची? गूगलुन पाहिल्यावर नोरमल एक्डेमिक नाहि वाटत... कोणाला अनुभव आहे का? असेल तर प्लीज कळवाल का? तिला हि परिक्शा डीसेंबर मधे द्याची आहे....
बिल्वा, धन्यवाद
बिल्वा, धन्यवाद
माधुरी, आम्हाला अत्यंत वाईट
माधुरी,
आम्हाला अत्यंत वाईट अनुभव आलेला आहे कुमॉनचा. मी स्ट्राँगली कुमानच्या विरुद्ध आहे. प्रॅक्टीस शीटस शाळेतल्या शिक्षकांना विचार कुठे मिळतील ते आणि घरीच अभ्यास करून घ्या.
रूतुजा,
आमच्या स्टेट मधे ही परिक्षा 'AG -Accademically gifted' or 'GT- Gifted and talented' मुलांसाठी घेतात. तुमच्या मुलीनं शाळेत तिच्या ग्रेड लेव्हल पेक्षा जास्त प्रगती दाखवली असेल (थोडक्यात तुमची मुलगी खूप हुषार आहे) असं तिच्या शिक्षिकेला वाटलं असेल म्हणून ही परिक्षा रेकेमेंड केली असावी. तुम्ही तिच्या शिक्षिकेशी परिक्षेचं स्वरूप, कारण वगैरे सविस्तर बोलून बघा.
कुमॉनला मुलं लवकर कंटाळतात हे
कुमॉनला मुलं लवकर कंटाळतात हे खरं आहे. एकतर १५ मि. तिथे बसायचं आणि घरी येऊन तासभर वर्कशीट करायचे. बोर होतं. जे काय आहे ते तिथेच करून घेत नाही वाटतं.
माझ्या ५ वर्षाच्या मुलीला मी सरळ भारतीय पद्धतीची शिकवणी लावली आहे.
कुमॉन च्या वर्कशीट्स मी
कुमॉन च्या वर्कशीट्स मी मुलाकडून घरी करून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला अजिबात आवडलं नाही. मग मी अलोहा अबॅकस मॅथ ला घातला त्याला. ते आवडतय.
रुतुजा, तुम्ही टिचरशी बोलून
रुतुजा, तुम्ही टिचरशी बोलून बघा. पण बरेचदा अशा परीक्षांसाठी मुद्दाम तयारी करणे अपेक्षित नसते. माझ्या मुलाच्या शाळेत टेस्ट कधी आहे वगैरे काही माहित नसायचे. टेस्ट केल्यावर टिचर नोट पाठवायची.
माझ्या ५ वर्षाच्या मुलीला मी
माझ्या ५ वर्षाच्या मुलीला मी सरळ भारतीय पद्धतीची शिकवणी लावली आहे >>> अंजली_१२ , सॉरी हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे पण एवढ्या लहान वयात कशाला हो बोजा मुलांवर एवढा?शाळेत किती हसत खेळत छान शिकवतात.
माझा मुलगा २री त आहे. त्याला सध्या टीचर ग्राफ्स शिकवत आहे. इतक्या छान पद्धतीने घेतायेत. अगदी मजेशीर होमवर्क असतो त्याचा. मला नाही आठवत मी २री त ग्राफ शिकले होते ते.
बिल्वा, तुमचं बरोबर आहे. आधी
बिल्वा, तुमचं बरोबर आहे. आधी मलाही असंच वाटायचं पण इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त काही शिकवत नाहीत आणि जेव्हा भारतात जाऊ तिथे मुलगी मागे राहू नये असं वाटलं म्हणून शिकवणी.
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त काही शिकवत नाहीत>>> नाही हो. माझा तरी अनुभव वेगळा आहे. पण तुम्हाला परत भारतात परतायचं ह्या दृष्टीने असेल तर मग ठीक आहे.
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त काही शिकवत नाहीत>>> हे शाळेवर, आणि मुख्यकरून त्या टिचर वर अवलंबून असत. तसच पालकांच्या अॅटिट्युड वर पण. माझ्या मुलीच्या शाळेत हसतखेळत बर्याच मस्त आणि अवघड गोष्टी शिकवतात. ती २ रित आहे आणि तिला permutations and combinations concept शिकवत आहेत. या टर्मस अजून नाही सांगितल्या पण प्रोसेस खेळामधून सांगतात.
शाळेमधल्या field trips या खरच प्रचंड अभ्यासू असतात. विषयांतर झालयं जरा तरी क्षमस्व.
रुतुजा, Cogat test ही
रुतुजा,
Cogat test ही मुलांमधील Cognitive abilities (सोप्या भाषेत -reasoning skills) मोजण्यासाठीची टेस्ट आहे. ह्या टेस्ट मध्ये भाषा किंवा गणितावर डायरेक्ट प्रश्न नसतात. ही IQ test नाही. त्यामुळे intelligence मोजण्यासाठी या टेस्टचा उपयोग नसून , मुलांमध्ये अशा काही exceptional abilities आहेत का कि ज्याला अधिक प्रोत्साहन दिल्यामुळं मुलाचा अधिक विकास होईल यासाठी केला जातो.
त्याचबरोबर national average जे ५० पेर्सेन्टाईल समजले जाते , त्याच्या पुढे आपले मुल किती आहे हे कळण्यासाठी ह्या टेस्टचा वापर होतो.
ISD किंवा school, gifted and talented program मध्ये entry देण्यासाठी या Test चा वापर करतात. साधारणतः ही test झाल्यावर WISC किंवा ITBS Test नेक्स्ट phase साठी घेतली जाते.
मुलं GT आहे म्हणजे काय यासाठी इथे पहा.
http://www.nsgt.org/articles/index.asp
GT मुलांच्या गरजा वेगळ्या असतात. त्याबद्दलही तुम्हाला त्या साईटवर माहिती मिळेल.
ह्या टेस्ट महाग आहेत. शाळा ह्याचा खर्च करतात. परिक्षेची तारीख जाहीर केली जाते काही ठिकाणी.
तयारीची गरज नाही.
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त काही शिकवत नाहीत>>> हे शाळेवर, आणि मुख्यकरून त्या टिचर वर अवलंबून असत. +१
हो बिल्वा माझ्या मुलाला बुक बॅग च्या होमवर्क मधे व्हेन डायग्रॅम काढायची होती. मी विचारलं हे तुला काय आहे माहीत आहे का? तर हो म्हणाला. किंडर गार्ट्न मधे टीचर ने शिकवलं आहे म्हणाला आणि बरोबर काढली पण. फार कॉम्प्लिकेटेड नवती अर्थात पण तरी मी अवाक.
स्वाती आय्-एक्सेल च्या
स्वाती आय्-एक्सेल च्या लिंकसाठी धन्यवाद! लिंक चांगली वाटतेय.
के जी मध्ये वेन डायग्रॅम !
के जी मध्ये वेन डायग्रॅम ! आम्हाला दहावीत आल्यावर होती !
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त
इथे अमेरिकेतल्या शाळेत जास्त काही शिकवत नाहीत>>> हे शाळेवर, आणि मुख्यकरून त्या टिचर वर अवलंबून असत>> +१००००
मी पण आधी असच म्हणायची पण आता मला स्वतः ला इथल्या शिकवायच्या पद्धती आवडु लागल्या आहेत. मुल हसत खेळत, अनुभव घेत शिकत असतात. लेफ्ट ब्रेन / राईट ब्रेन दोन्हीलाही चालना मिळते.
अंजली, अंजली_१२, फुलपाखरु प्रतिसादा बद्दल धन्यवाद
कुमॉन काय आहे हे कळायच्या
कुमॉन काय आहे हे कळायच्या आधीच ते फार बोरींग आहे असे समजल्याने त्यांची पुस्तके बघितली. बार्नस् अँड नोबलमध्ये. वाचून मलाच गरगरले. कितीवेळा तेच ते.
नंतर मुलाच्या शाळेतून बर्याच वेबसाईट्स् दिल्या गेल्या (उदा. मॅथफॅक्टकॅफे. कॉम) आणि त्यातून आपल्याला आवडेल तिथे जाऊन सराव करायचा आणि गृहपाठात दिलेले पान सोडवून बाईंना ईमेल करायचा पर्याय काही ठिकाणी होता. यावर्षी थोडे वेगळे असले तरी साधारण असेच. कुमॉनला कंटाळलेले पालक नंतर अश्याच वेबसाईटस् वरून हवा तो धडा प्रिंट करून घेत व मुलामुलींना देताना पाहिले. मुलांच्या कंटाळलेपणाला दाद न देता एक मैत्रिण तरीही त्यांना घेऊन जात राहते पण तीच म्हणते की आमचे अर्धे अधिक क्लासेस बुडतात. तिच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी सहा क्लासेस आहेत अठवड्याला.:(
बाकी अमेरिकेतल्या (निदान चांगल्या स्कूल डिस्ट्रीक्टच्या) शाळेत अभ्यास फारसा नसतो हे काही खरे नाही. "आता बास" म्हणायची वेळ आमच्यावर आलिये सध्या. शिक्षक, शिक्षिकेनुसार हे बदलत असावे.
जामोप्या मला कितवीत होती आठवत
जामोप्या मला कितवीत होती आठवत नाही पण केजीत नक्कीच नव्हती
बाकी अमेरिकेतल्या (निदान
बाकी अमेरिकेतल्या (निदान चांगल्या स्कूल डिस्ट्रीक्टच्या) शाळेत अभ्यास फारसा नसतो हे काही खरे नाही. >>> + १००.. अगदी आठवड्यातच लक्षात आलंय हे चांगलंच.. भारतात नव्हता तेवढा अभ्यास आहे एथे.. वर देसी बायका ऐकवतात, तुम्ही भारतातून आलात, तुम्हाला तर हे सगळं आधीच येत असेल ना.. म्हणलं बायांनो, याचं तोंड पण कधी पाहीलं नव्हतं इतके दिवस.. अभ्यास बघून खरोखर दडपायला झालं इथे.
शाळा-शिक्षक सगळंच आवडलंय. मस्तच आहे शाळा, पण अभ्यास आहे नक्कीच खूप.
असो. विषयांतराबद्दल क्षमस्व.
मवा ती पहिलीत आहे ना गं? आमचा
मवा ती पहिलीत आहे ना गं? आमचा नसतो इतका. १५ मिनिटं जास्तितजास्त. पण खूप वरायटी ऑफ कन्सेप्ट असतात इथे लहानपणापासून
कुमॉन नाही कधी वापरल.
कुमॉन नाही कधी वापरल. प्रायवेट ट्युशन आवडत नाहीत मुलीला. शाळेव्यतिरिक्त मी च घरात शिकविते गरज पडेल तस. क्लासेस extra curricular activities (swimming etc) चे आहेत.
काही साईट्स माहित असलेल्या. सगळ्या वापरत नाही. (मुलीला अभ्यास करायला फारस आवडत नाही. पण डोक्याला खुराक लागतो. ती २० मिनिट्स च्यावर अभ्यासाला लावल कि छताकडे बघत बसते. :P)
http://www.khanacademy.org/#browse
http://www.beestar.org/index.jsp ( मस्त प्रोग्रॅम आहे हा. फक्त स्केज्युअल डेट बघा.)
http://www.artofproblemsolving.com/
http://www.homeschoolmath.net/worksheets/
http://havefunteaching.com/worksheets/
http://www.k12reader.com/ ( वापरली नाही)
http://www.spellingcity.com/ (हल्ली नाही बघितली ही साईट. पण चांगली आहे.)
अजुन आहेत बर्याच. वापरल्या नाहीत. पण कुणालातरी use होइल म्हणुन सेव्ह केलेल्या. नंतर लिहिते. Hope it helps .
http://www.starfall.com
http://www.starfall.com
फुपा, अगं आम्हाला बॅकलॉग भरुन
फुपा, अगं आम्हाला बॅकलॉग भरुन काढायचा असल्यामुळे वाटत असेल. नंतर कमी होईल लोड बहुतेक. माहीत नाही काय ते.
लेफ्ट ब्रेन / राईट ब्रेन
लेफ्ट ब्रेन / राईट ब्रेन दोन्हीलाही चालना मिळते.>>> हे कसे करतात अथवा करावे?
वि.पु. नाहितर इथे मार्गदर्शन देता येईल का?
अजुन एक, स्पेलिंग पाठ करण्यापेक्षा ती मुळात तयार कशी करावी हे शिकवावे की पाठांतर व कसे? कोणी मार्गदर्शक प्लीज.
मोनालीप , तुम्हाला विपु केली
मोनालीप , तुम्हाला विपु केली आहे
अरे, इथे कुणाला हंटिंग्टन
अरे, इथे कुणाला हंटिंग्टन लर्निंग सेंटर माहित नाही का? अमेरिकाभर आहे, टीव्हीवर जाहिरातहि येते.
मी तिथे ८ वर्षे शिकवले.
तिथे प्रथम मुलाची परिक्षा घेतात. ही परीक्षा जवळ जवळ दोन तास चालते, अगदी ११ वि, १२ वी चा मुलगा असेल तरी त्याला ४ + ५ सारख्या प्रश्नांपासून कॅलक्युलस पर्यंत गणिते असतात. असेल हुषार तर सोपे प्रश्न पटकन सोडवेल. (कॅल्क्युलस शिकायला आलेल्या मुलीला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी येत नव्हती, २क्ष वजा क्ष = २ असे बीजगणित तिचे! नि त्या मुलीच्या आइने येऊन तक्रार केली की अहो हिला कॅल्क्युलस शिकायचे आहे, अपूर्णांक नि बीजगणिताचा काय संबंध? ) .
नि मग वाचन व लेखन याची परीक्षा घेतात. त्यावरून त्या विद्यार्थाचा अगदी वैयक्तिक अभ्यासक्रम ठरवतात. बहुतेक भारतीय मुले, विशेषतः जे नुकतेच भारतातून आलेले आहेत, ते अमेरिकन भाषेत थोडे कमी पडतात, विशेषतः उच्चाराच्या बाबतीत. म्हणून मग ते आठवीत असतील तरी त्यांना दुसरीतल्या सारखे फोनेटिक्स शिकवतात, पण गणितासाठी ते इथल्या नववीच्या पुढे असल्याने त्यांना दहावीची गणिते देतात. जर मी शिक्षक असलो तर कॅलक्युलस, ट्रिगॉनॉमेट्री पर्यंत शिकवतात. शेवटी पालक नि विद्यार्थी नि त्या संस्थेतले एक दोन शिक्षण तज्ञ ठरवतात की 'आठवीतला मुलगा दहावीची गणिते सोडवत असेल तर आनंद आहे, इथेच सध्या पुरे. '
तिथे अर्थातच शिक्षक काय लायकीचे असतात यावर बरेच अवलंबून असते!
तिथे दहावीनंतरच्या गणितांनाच कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी असते. तोपर्यंत कॅल्क्युलेटर न वापरताच गणिते करायची!!
पण एकूण मॅनेजर व पालक यांच्या मिटींग्स असतात, एरवीही पालक येऊन बोलू शकतात मुलाच्या अभ्यासा बद्दल, वेळ असेल नि त्यांना समजत असेल तर!!
Pages