गजलोत्सव २०१२

Submitted by आनंदयात्री on 6 March, 2012 - 05:23

रविवार, ४ मार्च रोजी 'बांधण जनप्रतिष्ठान' आयोजित पुण्यात झालेल्या चौथ्या 'गजलोत्सवा'तील ही काही प्रकाशचित्रे! यात अनेक माबोकरही होते, म्हणून इथे फोटो पोस्ट करत आहे. (जागेवरून अजिबात न उठता (कंटाळा!) कॅमेर्‍यातील उपजत झूमची देणगी वापरून सर्व फोटो घेतले गेले आहेत). मी उद्घाटन व पहिल्या मुशायर्‍यापर्यंत होतो, त्यामुळे तेवढेच फोटो माझ्याकडे आहेत. (सुटकेचा नि:श्वास अनुल्लेखित! ;))

प्रचि१: सुंदर, आकर्षक आणि नेत्रसुखद नेपथ्य -

प्रचि २: उद्घाटनाच्या वेळी पारंपारिक दीपप्रज्ज्वलनाबरोबरच गजल-पारंपारिक 'शमा'प्रज्ज्वलनही करण्यात आले

प्रचि ३: व्यासपीठावरील मान्यवर

प्रचि ४: डॉ. राम पंडित यांच्या 'सुरेश भटांनंतरची कविता' या पुस्तकाचे प्रकाशन

प्रचि ५: राजेश उमाळे यांच्या 'गझलेची स्वरलिपी' या पुस्तकाचे प्रकाशन

प्रचि ६:शायर ए.के. शेख यांना 'जीवनगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला

प्रचि ७: राजेश उमाळे यांना 'युवा गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला
(प्रकाशचित्रे - नचिकेत जोशी)

यानंतर पहिला मुशायरा सुरू झाला -
प्रचि ८: उपस्थित गझलकार

प्रचि ९: (मी, हबा आणि मिल्या तसेच निशिकांतजी व ममता सपकाळ)

प्रचि १०: मी

प्रचि ११: हबा (हबा हलला की फोटो हलला ते माहित नाही)

प्रचि १२: सुप्रिया जाधव

प्रचि १३: निशिकांत देशपांडे

प्रचि १४: ममता सपकाळ

प्रचि १५: मिल्या

प्रचि १६: वैभव जोशी
(प्रकाशचित्रे - डॉ. ज्ञानेश पाटील)

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/03/blog-post_06.html)

गुलमोहर: 

सुप्रिया जाधव म्हणजे एकदम झळकतायतच Proud

चित्तरंजनची नेहमीपमाणे मिश्कील छबी

आनंदयात्री एकदम भारी दिसतायत

मिल्या नेहमीप्रमाणे प्रेमळ आणि क्षमाशील स्मितहास्य धारण करून इतरांना बहुधा माफ करत असावा Proud

वैभवची अदा करारी दिसतीय (करारी वगैरे) Proud

डॉक्टर कुठे आहेत?

आणि डॉक्टर ज्ञानेश?

प्रचि मस्तच

निशिकांत देशपांडेंचा फोटो भारी

हबा गुंगलेले दिसतायत गझलेत

ममता ताईंची छबी - वा वा

यात्रींचे प्रचिसाठी अभिनंदन

तसेच सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन

डॉक्टर कुठे आहेत?

आणि डॉक्टर ज्ञानेश?

>>>

ही गझल पुण्याची....नव्या दमाची

आहे बेफि, ते गैरपुणे विभागात असतील दोघेही

फोटोंवर थोडे प्रथमोचार का नाही केले डॉ..पाटील .. अजून मजा आली असती..

यात्री आभार छान दर्शन घडवलं... वृत्तांत लिहा की राव...मजा येईल

हा मुशायरा फारच रंगतदार झाला. चित्तरंजन्,नचिकेत्,मिल्या, सुप्रिया,निशिकांतजी, यांच्या गजलांना भरभरुन दाद मिळाली. वैभव देशमुख आणि वैभव जोशी यांचे सादरीकरण अप्रतिम झालं.... सर्वोत्तम असं मी म्हणू शकेन.

हबा याने जागेवर बसूनच गजल पेश केली....,'' गजलेत नाविन्य नाही,निदान सादरीकरणात नाविन्य असावं म्हणून इथेच बसून गजल पेश करतोय'' अशी खुसखुशीत सुरुवात करुन ''मी वेड्यांच्या जत्रेमध्ये'' आणि ''ती काळजीत असते'' या दोन्ही गजल हबाने खुमासदाररीत्या पेश करुन रसिकांची प्रचंड दाद घेतली,.

एकूण काय तर हा गजलोत्सव माबोकरांनी गाजवला. बेफि आणि अजय जोशी असते तर अजून मजा आली असती.

मस्त ..

वा, सुंदर फोटो........
बेफिकीर व डॉ. कैलासरावांच्या कॉमेंट्सही मस्तच.....
मनःपूर्वक अभिनंदन नचिकेत.

फोटो कमी प्रकाशातले असुन देखील नॉइज नाहिये. गुड. Happy

मिल्या दिवसेंदिवस तरुण होत चाललाय. Happy
वैभवने लुक बराच बदललाय. हबा म्हणजे मायबोलीचे आर आर आबाच. Happy
तु बराच सोज्वळ दिसतोस रे फोटोत. Proud

छान आलेत प्रचि... मनःपूर्वक अभिनंदन नचि.

हबा म्हणजे मायबोलीचे आर आर आबाच. >>>>> झकास Happy

झकास Happy

मस्त मस्त मस्त प्रचि!
ओये बसल्या जागेवरून बरेच चांगले टिपतोस प्रचि तू.. लैच क्लास! Happy

डॉक्टारांचा स्नॅप कुठाय?
बाकी सगळ्यांचेच मस्त आलेत फोटोज.. कार्यक्रम मिस केल्याबद्दल पुन्हा एकदा वाईट वाट्लं!

छानच !

होय

सगळेच फोटो छान आलेत. वैभव जोशींचे सादरीकरण आणि गझला दोन्ही अप्रतीम झाले. त्याना अध्यक्ष करून संयोजकांनी भन्नाट वन्स मोअर समारोप साधला. वैभव, मिल्या, नचिकेत, चित्तरंजन, सुप्रिया आणि निशीकांतजींच्या गझला सुरेख झाल्या. मला ममताच्या गझला सर्वाधीक भावल्या. बाकिचे सगळेच गझलकार गझल पुण्याची नव्या दमाची हे सिध्द करणारे असेच होते. मी पण ठिक ठाक सादर केली.
दुसर्‍या मुशायर्‍यात ज्ञानेशने 'शिकलेले बिनडोक किती... ' म्हणत वन्स मोअर घेतला तर डॉक्टरांच्या 'श्वास झाला मोकळा की कोंडल्यागत वाटते' या शेराला तुफान दाद मिळाली. एक देखणा कार्यक्रम बघायला व ऐकायला मिळाला, राम पंडीत, संगिता जोशी, म. भा. चव्हाण आणि इतर जेष्ठ गझलकारांना भेटता आले आणि विशेष म्हणजे सर्वांना मानधनही मिळाले. संयोजकांचे आभार.

सगळेच फोटो छान आलेत. वैभव जोशींचे सादरीकरण आणि गझला दोन्ही अप्रतीम झाले. त्याना अध्यक्ष करून संयोजकांनी भन्नाट वन्स मोअर समारोप साधला. वैभव, मिल्या, नचिकेत, चित्तरंजन, सुप्रिया आणि निशीकांतजींच्या गझला सुरेख झाल्या. मला ममताच्या गझला सर्वाधीक भावल्या. बाकिचे सगळेच गझलकार गझल पुण्याची नव्या दमाची हे सिध्द करणारे असेच होते. मी पण ठिक ठाक सादर केली.
दुसर्‍या मुशायर्‍यात ज्ञानेशने 'शिकलेले बिनडोक किती... ' म्हणत वन्स मोअर घेतला तर डॉक्टरांच्या 'श्वास झाला मोकळा की कोंडल्यागत वाटते' या शेराला तुफान दाद मिळाली. एक देखणा कार्यक्रम बघायला व ऐकायला मिळाला, राम पंडीत, संगिता जोशी, म. भा. चव्हाण आणि इतर जेष्ठ गझलकारांना भेटता आले आणि विशेष म्हणजे सर्वांना मानधनही मिळाले. संयोजकांचे आभार.

Pages