एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण घेतलेला झब्बा नाही घातलास का तू?.....असं म्हणताना मुक्तानी नेसलेली साडी, तिचा मेकअप आणि हेअरस्टाईल मला नाही बाई आवडली....
हँ.....
चमकी, विचित्रं आकाराचे कुर्ते, विचित्रं काँबोज,मेकअप, हेअरस्टाईल, मटार, वाकडे टिळे.............यावर किती बोलणार आहोत आपण ?
मालिकेवर प्रतिसाद द्यायला एक्स्पर्ट आणि उत्सुक मंडळी इथे बरीच आहेत .....पण तेवढे मट्रल च नाही असं झालय..

मागच्या एका भागातला राधा आणि घनश्याम यांच्यातला फोनवरचा संवाद आणि काल घनश्यामशी आईचा लग्नसमारंभाबद्दलचा संवाद मस्त होते.
विनय आपटेंसाठी खास सीन लिहिल्यासारखे दिसताहेत.

जिथे सतीश तारेंचा मेकप डोळ्यावर येतो, तिथे मुक्ताचा न आला तर नवल!

कुहूबाई प्रचंड वात आणतायत.

घरात ती कायम एकच व्हाइट लखनवी टॉप का घालते >>> अगदी हाच प्रश्न मलाही पडला होता. बाकी पोस्टलापण पूर्ण अनुमोदन.

सतीश तारे कोण? माऊली का?
सगळं अगदी गोड मट्क्क नको वाटतं. कोणीतरी वाईट वागा बुवा नाहीतर काही मजा नाही Proud
मला चक्क ह्यात मुक्तापेक्षा स्वप्निल आवडतोय.मुक्ताच्या कॅरॅक्टरची आगाऊ शेड नाही आवडली मला.जरा ओस्मा वाटते ती.

तर........... मुक्ताचे कपडे आवडलेली मी एकटीच आणि सोबतीला मनिमाऊ..... बsssssssssssssरं!!! Wink

मुक्ता पे़क्षा स्वप्नील ची अ‍ॅक्टींग आवडते आहे, समहाऊ!

काल तर पळून जाता जाता- घरी जाण्या आधीच्या त्या सीन मधे, मलाच जाऊन मुक्ताच्या त्या अतिरेकी बटा मागे घेऊन टिक-टॅक पीन्सने गच्च बांधाव्या वाटाल्या Proud

मुक्ता स्वप्निलचं लग्नातले फोटो असे नको म्हणतानाचं विश्लेषण ऐकून जाम हसू आलं Proud
खरंच काय फनी फोटो असतात नै लग्नातले .. नंतर बघितले की मजा वाटते.

विनय आपटे अ‍ॅज युज्वल बेस्ट... मला वाटलं आता राधा पण रडणार थोडी... पण छे....

हा लांबलचक धागा बघितल्यानंतर काल एक भाग बघायची हिंमत केली. 'हलकीफुलकी' मालीका बनवणे म्हणजे 'सर्व मोठ्यांनी बालीशपणा करायचा आणि लहानांनी उगाच प्रौढपणा करत बोलायचे' असा समज करून घेतलेला दिसतोय निर्मात्यांनी. 'मालगुडी डेज' सारखी साधी, सहज आणि तरल मालीका बनवणे का जमू नये एवढे चांगले कलाकार असताना?

निल्या,
तरीबरीच बरी आहे इतर 'जंकयार्ड' पेक्षा. निदान प्रसन्न वाटते.
वासरात लंगडी गाय अन काय.

निल्या, हलकीफुलकी आणि फार्सिकल यात फरक आहे बहुतेक. ही मालिका हलकीफुलकीपेक्षा फार्सिकल अंगाने जास्त जाते. जसे काकांनी घनाला सावध करणे, कुहू नी प्रभात प्रकरण आणि त्यात तिचे हाताने चेहरा झाकणे...

कालचा भाग मस्त होता. आजचाही मस्त असेल असे वाटतेय.

या मालिकेतलं सगळ्यात जास्त इरिटेटिंग कॅरॅक्टरच्या किताबासाठी राधाची आत्या कुहूला तगडी स्पर्धक आहे. मधेच बाहेर पडणाअरे डोळे आहेतच. मराठीत हिंदी शब्दांचा वापर म्हणजे इंदूर असं कोणी सांगितलं? मराठीत जमाईबाबू, भाभी असं म्हणणारी मराठी माणसं इंदूरात ५ वर्षांत मला दिसली नाहीत. त्यातून ही आत्या इंदूरची सासुरवाशीण आहे. (कथा नक्की कुठल्या गावात घडतेय?) स्वतःच्या गावाचा ठसा असा पुसतो का? काय करून राहिले, करतीले असे शब्द इंदूरकर मराठी मंडळींच्या तोंडी असतात हे संवादलेखिकेला तसंच अन्य कोणालाच माहीत नसावं.
कालचा मुक्ता आणि तिचे वडील , आत्या यांच्यातला प्रसंग मस्त होता. खोड्या करताना पकडल्या गेलेल्या मुलांची आईवडिलांसमोर जी अवस्था होईल तसं मुक्ताच्या वडील व आत्यांचं झालं. अशा वेळी सूज्ञ पालक जसे वागतील, तशीच राधा बोलत होती!
परवाच्या भागातला राधाची आत्या आणि घनाचे काका यांच्यातल्या संभाषणातील विनोदाचा प्रयत्न केविलवाणा वाटला.

शनिवारची झलक शुक्रवारी दाखवली त्यात आई आजीला २५ तारखेला १२.१०चा मुहुर्त आहे हे ठणठणीत आवाजात सांगते. मग त्या रात्री असे काल घडले की शनिवारी जेव्हा जेव्हा २५ तारीख हे शब्द आले तेव्हा बोलणा-या पात्राचा आवाज बंद केला गेला? आता २५ म्हटल्यावर आम्ही कुठे आग्रह धरलेला की ती २५ फेब्रुवारी/मार्च्/एप्रिल २०१२च हवी म्हणुन? आजवरचा इतिहास पाहता ती २५ फेब्रुवारी/मार्च्/एप्रिल २०१३ ही होऊ शकते हे माहीती आहे.

साधना, हो ना ? तरीच मी विचार करत होते की हे तारखेच्या ठिकाणी बीप बीप काय चालू आहे सारखं. मुलगा आजूबाजूला मोठमोठ्याने गात उड्या मारत होता त्यामुळे साधे शब्दच ऐकू येत नव्हते, बीपच्या मागचं ऐकूच आलं नाही Happy

अगं बीपही नाही, चक्क म्युट केलेलं आणि गंमत म्हणजे आत्याबाई मोठ्ठाले डोळे नी मोठठाले तोंड वासुन २५ म्हणत होत्या ते चक्क कळत होतं की २५ आहे म्हणुन. Happy

भरतला अनुमोदन इंदूरच्या टिप्पणीबद्दल. संवादलेखिकेला आणि सुकन्याला निदान पु.लं.चं 'तुझे आहे तुजपाशी' वाचायला सांगा कुणीतरी ...

तरीच मी विचार करत होते की हे तारखेच्या ठिकाणी बीप बीप काय चालू आहे सारखं. मुलगा आजूबाजूला मोठमोठ्याने गात उड्या मारत होता त्यामुळे साधे शब्दच ऐकू येत नव्हते, बीपच्या मागचं ऐकूच आलं नाही

>>> अस्सं काहीतरी होतं होय. मला वाटले, प्रक्षेपणात गडबड झालीय.

ते म्यूट चं प्रकरण काय ते कळलं नाही? Uhoh

कथा नक्की कुठल्या गावात घडतेय? >> मलाही खूप दिवसांपासून हा प्रश्न पडलाय?? मध्ये एकदा घना आणि रधा सापु च्या खरेदीला जातात तेव्हा गोखले रोडचा उल्लेख आहे. तेव्हा मुंबईत कथानक घडत असावे असा मी समज करून घेतला आहे. (पुण्यातही गोखले रोड असल्यास मला माहीत नाही.)

जेव्हा जेव्हा २५ तारीख हे शब्द आले तेव्हा बोलणा-या पात्राचा आवाज बंद केला गेला?>>>>> १ ते ३ मार्च, ८ ते ९ असे तब्बल एका तासाचे खास भाग अशी जाहिरात येते आहे सारखी. म्हणजे तेव्हाच लग्न दाखवायचा बेत असेल Wink

इतक्या लवकर लग्नापर्यंत आलेही? Uhoh

इंदूरच्या आत्याबाबत अनुमोदन! काहीच अभ्यास नाही केलाय इंदूर आणि तिथल्या मराठीबद्दल. ती काय कोणत्याही गावातली चालली असती- सिरियली बघून हौसेनं हिंदी बोलणारी आत्या- अशी. तिचं हिंदी तसंच आहे! Proud

ह्यांचं मुंबईत इतकं प्रशस्त घर कसं काय असतं? घराला अंगण आहे चक्क! बरंय ब्वा!

मालिकेत ८ तारखेलाच 'आज २५ आहे' असे डिक्लेअर केले तरी काय बिघडणर? ते म्युट प्रकरण का केले असावे काही कळत नाही.

इतक्या लवकर लग्नापर्यंत आलेही?

अरे मग मालिका तिथेच संपवावी लागेल. त्यानंतर ती लग्नाची गोष्ट राहणार नाही तर संसाराची गोष्ट होईल. Happy

पण ही दुसरी गोष्ट आहे ना? Happy म्हणजे लग्नाची पहिली गोष्ट पार पाडल्याशिवाय संसाराची दुसरी गोष्ट कशी काय चालू करणार?

ओह! असंय होय. मी विचारणारच होते की 'दुसरी गोष्ट' कोणती आहे ते. अरे संसार संसारच का शेवटी? एकेकाळी भारी थापायला लागायच्या, इथे मटार सोलावे लागतील हाच काय तो फरक!! Proud

मालिकेतले कॅलेंडर पण प्रत्यक्षातल्या कॅलेंडरच्या बरोबरीने चालते असे आपल्या साध्याभोळ्या प्रेक्षकांना वाटते असा लेखक-दिग्दर्शक मंडळींचा समज असावा.
२५ तारखेच्याच भागात २५तारखेला लग्न आहे असे सांगितले आणि प्रेक्षक बुचकळ्यात पडले म्हणजे?

Proud खरंय भरत. हे लोक प्रेक्षकांना फारच भाबडे समजतात असे दिसते. 'गुंतता हृदय हे' मध्ये 'पूर्वी आणि आत्ता' किती दाखवायचे फ्लॅशबॅकच्या वेळी..... आणि आत्ता हे!

त्यांना २५ तारिख म्यूट करायची होती हे ठिक पण मग त्याचं दुसरी तारिख घालून नीट डबिंग तरी करायचं. ती आत्या कित्तीवेळा २५, २५ म्हणाली. सगळं समजत होतं आणि व्यत्यय येत होता... Uhoh

मुक्ताचा कालच्या भागातला ड्रेसही अचाट कलर काँबिनेशनचा होता. हिरवी पँट, काळा कुर्ता आणि अजून एका वेगळ्याच हिरव्या शेडचा स्टोल. Uhoh

Pages