निसर्गाच्या गप्पा (भाग - ६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 February, 2012 - 01:28

निसर्गाच्या गप्पांच्या धाग्याचा ६ वा भाग चालू होत आहे. त्याबद्दल सर्व निसर्गप्रेमींचे अभिनंदन. निसर्गची ओढ असणार्‍या व्यक्तींचे इथे केव्हांही स्वागत आहे.

निसर्गमय झालेले आयडी (माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर आणि मागच्या धाग्याचे संदर्भ घेऊन मी खाली आयडींची नावे देत आहे. कोणी राहून गेले असल्यास प्रतिसादात टाका, वेळ असल्यास माझ्या विपुतही टाका मी अपडेट करेन).

१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
२] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन
३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर
४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर
९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर
१०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री
११] गोईण - डॉ. राणी बंग
१२] कदंब - दुर्गा भागवत
१३] रानवाटा - मारूती चितमपल्ली
१४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली
१५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर
१६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली
१७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे
१८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन
१९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली
२०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली
२१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली
२२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली
२३] रातवा - मारुती चितमपल्ली
२४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली
२५] निळावंती - मारुती चितमपल्ली
२६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली
२७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत
२८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग) स्मित

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Image3191.jpg

सहाव्या धाग्याबद्दल सर्व निग्.प्रेमीचे अभिनंदन!!

जागू, फुल मस्तच.
साधना, मस्त दिसतय ग कमळ. आणि फोटो पण छान काढलाय हो.

साधना आता 'कमळ'वाली झालीये - "लक्षात ठेवा कमळ, कमळ आणि कमळ" - अभिनंदन "कमळाबाई".

घरात मनसेबाई बसल्यात. Happy आज दिवसभर फोनवर अपडेट्स मिळताहेत घरुन Happy

पुढच्या निसर्ग गटगला प्रत्येकाने किमान १ फुल, झाड किंवा निसर्गाशी संबंधित एखाद गिफ्ट घेऊन यायचे म्हणजे जितकी माणसे असतील तितकी गिफ्ट्स असतील आणि मग ती चिठ्या पाडून प्रत्येकी १ अशी वाटून घ्यायची.. परत जाताना आठवण म्हणून छान वाटतील.. >>> कल्पना छान आहे सेनापती Happy

साधना , कमळ भारी दिसतेय एकदम . कुंडी / बालदी केवढी मोठी आहे ? कमळ कसे लावलेस ?

आमच्या इथे एक मोठा फ्लावर शो होतो दरवर्षी - मागच्या वर्षी तिथे कमळाच्या बिया एक डॉलरला एक अशा विकायला होत्या, मला फार मोह होत होता, पण नवरा म्हणाला की त्या बिया काही रुजायच्या नाहीत. कमळ लावायचे असेल तर छोटे रोपच आणावे लागेल.

पण आज मी कल्टी मारण्याचा विचार करतेय.

माझ्याकडे हादग्याला खुप शेंगा लागल्या आहेत. हादगा गुणाने उष्ण की शित असतो ?

सध्या नेवाळी, लाल-पिवळी मखमल, अबोली मस्त फुलली आहे.

दिनेशदा, खल्लास फोटो. अँगल फारच आवडला.

जागूले, शेवग्याच्या शेंगा बहुधा उष्ण असतात. त्यामुळे जपून.

जिप्सी, जागू - फार दु:खी होऊ नका - मी कायमच शनीवारी ऑफिसात असतो.........

दिनेशदा - हे बक्षीस खास झरबेरा साठी...>>>>> हे काय ??, कळले नाही...

शशांक झरबेरा हा मायबोली आयडी आहे आणि ती साधनाची मुलगी आहे Happy

पुरंदरे म्हणूनच तर आम्ही दु:खी आहोत ना. दर शनिवारी यायचे असते तर ते रुटीन झाले असते पण मला २ र्‍या आणि ४थ्या शनिवारी सुट्टी असते तर जिप्स्याला प्रत्येक शनिवारी सुट्टी असते.

कालच्या साधनाच्या गुलबक्षीला झब्बू

आणि बाकिचे ३३० दिवस ?

साप्ताहिक सुट्टी, हि फक्त मानवप्राण्याची (निर्माण केलेली) गरज आहे !!

काल मी, श्री म्हात्रे (पूर्ण नाव मग लिहितो) यांचे साप, आपला सोबती हे पुस्तक वाचायला घेतले. छोटेसेच आहे. पण सुरवात छानच आहे.
सापाचे डोके, टोकेरी / गोल / त्रिकोणी असे का असते याचे छान विवेचन केलेय. ट्रेकर्सनी अवश्य जवळ ठेवावे असे आहे ते.

मी ३५ दिवस ऑफिस मध्येच राहतो...

नंतरचे ३५ दिवस डोंगरद-या फिरायला मोकळे त्याचे काय????????????????

आम्हीही शनिवारी पुर्ण दिवस हाफिसात..... Sad Sad Angry

दिनेश, मस्त आहेत फुले. झरबेराला सांगते इथे येऊन घ्यायला Happy

काल मी घरी गेले तर कळी मिटलेली. आज सकाळी उघडत होती हळूहळू.. आज रात्री मी आंबोलीला जाणार ते येणार थेट बुधवारी. तोपर्यंत कितींदा उघडणार नी मिटणार देव जाणे.

त्रिकोणी डोकेवाले साप विषारी असतात बहुतेक. सकाळ पेपरात सापांचे फोटो येतात दर शनवारी. आज बांबु पिट असले नाव असलेला साप छापलाय. बांबु नी पिटच्या मध्येही त्याला अजुन एक नाव आहे, मी विसरले.

मी ३५ दिवस ऑफिस मध्येच राहतो... हाहा
आणि बाकिचे ३३० दिवस ?>>>> सर्व आघाड्या (व छंदही) सांभाळत असतात..........

सापाचे डोके, टोकेरी / गोल / त्रिकोणी असे का असते याचे छान विवेचन केलेय.>> काय आहे हे थोडेसे आम्हालाही कळू द्या की दिनेशदा....
साप ही थंड रक्ताचा प्राणी असल्याने स्वतःच्या शरीराचे तापमान आपल्यासारखे (उष्ण रक्तिय प्राणी) राखू शकत नाही. भारता सारख्या उष्ण कटीबंधीय देशात दिवसा जर साप बाहेर पडला तर त्याचे तापमान वाढून तो मरु शकतो - म्हणून बहुतेक साप निशाचर तरी असतात किंवा नैसर्गिक गारवा (झाडे झुडपे) शोधून तिथे रहातात.
मला वाटतं स्वतःच्या शरीराचे तापमान व्यवस्थित राखण्यासाठीच बहुतेक तो बिळात किंवा जमिनीखाली आश्रय घेत असावा.

आपण सर्व माणूस जमातीतील प्राणी म्हणजे निव्वळ माठ........ Wink Wink उन्हाळ्यात आपल्याला घाम का येतो जरा आठवा म्हणजे कळेल - शरीराचे ३७ डि. सें. तापमान राखण्यासाठी आपल्या धर्मग्रंथींना भरपूर घाम तयार करण्याची आज्ञा दिली जाते - या घामाच्या धारा लागल्या की आपण बसतो पंख्याखाली किंवा हातपंख्याने वारा घेत - या वार्‍याने घामाचे बाष्पीभवन होऊ लागते - हे बाष्पीभवन होताना शरीराकडून उष्णता शोषली जाते - शरीर सहाजिकच थंड होऊ लागते - अगदी "माठात" पाणी गार कसे होते तसेच - म्हणून याबाबतीत आपण सर्व निव्वळ "माठच"....
आता कोणी माठ म्हटले तर अजिबात वाईट वाटणार नाही.... नाही का???;) Wink

हे सगळ्यांना माहित असेलच.... (मी का लिहितो उगाचच देव जाणे - काय करणार - शेवटी माठच ना????)....

माणसे तशीही माठच आहेत. त्यात काय एवढे??

आशु, तु लगेच गडपलास? आणि तिथुन कै-यांचे फोटो टाकतोयस?? कुफेहेपा??????

मेधा, अगं नि.ग. नं ५ वर बघ मी लिहिलेय तिथे. सध्या तरी रंगाच्या डब्ब्यात आहे पण प्रत्येक वेळचे नविन पान आधी आलेल्या पानापेक्षा मोठे येतेय, त्यामुळे लवकरच खुप पसरट भांडे पाहावे लागणार. तसेही मी हे कमळ गावी नेण्यासाठीच घेतलेले. तिकडे जाईपर्यंत माझ्याकडे मुक्काम.

बीया घ्यायची काही गरज नाही. मी लिहिलेय ते वाच.

Pages