उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा, 'Olay'चं In shower lotion फारच मस्त आहे. स्कीन एवढी सॉफ्ट आणि ग्लॉसी होते ना. क्षणात हेल्दी दिसायला लागते. वास तर असला मस्त आहे, कि बाजुच्या व्यक्तिला विचारल्याशिवाय रहावत नाही. Happy हे लावल्यावर लगेच धुवायचं असतं त्यामुळे सकाळी लावुन लगेच बाहेर पडलं तरी धुळ बसण्याची भीती नाही.

दक्षिणा.आय पी एल ग्लिसरीन ,लिंबुरस व गुलाबजल हे मिसळुन ठेवायचे व आंघोळीनंतर अंग पुसुन लगेच तळ्हातावर अगदी थोडेसे घेवुन सगळीकडे लावायचे..२ मिनिटे चिकटसर वाटते ..[आपल्याला सवय होईपर्यंत]पण नंतर दिवसभर त्वचा कमालीची नरम रहाते..

दक्षिणा मेडिकल स्टोर मधुन आय पी एल ग्लिसरीन व गुलाबजल घ्यावे..
गुलाबजल एका भांड्यत घेवुन त्यात अर्धे ग्लिसरीन व २ लिंबांचा रस गाळुन मिक्स करावा..साधारण २ गुलाबजल च्या बाटल्यात मावेल इतक हे मिश्रण तयार होते..अंग पुसल्यावर लगेच हे लोशन लावणे जरुरी आहे..तेलासारखं हातात घेवुन सगळीकडे लावायचे..बाथरुम मधुन बाहेर आल्यावर आपण चेहर्याला व हाताला सवयीनुसार कोणतेही क्रिम लावायचे अस्एल तर ते लावु शकता..

त्यात अर्धे ग्लिसरीन > अर्धे म्हणजे कशाच्या अर्धे? गुलाबजल जितकं घेऊ त्याच्या अर्ध की ग्लिसरीनची पुर्ण बाटली असते त्यातली अर्धी?

पातांजलीचे कोरफड जेल ,आणि दिव्य कांती लेप अफलातुन आहेत्.स्वस्त आणि मस्त. आईच्या हातावर भाजल्याने डाग पडला होता.कोरफड जेलने ५-६ दिवसात गेला. आणि तिच्या चेहर्‍यालापण जेल एकदम सुट झालय,जाम चमक(ग्लो) वगैरे Happy मला एवढा फरक नाहि पडला. पण दिव्य कांती लेपने बरीच स्वच्छ झाली माझी त्वचा,नाहितर प्रेग्नंसीत वाट लागलेली चेहर्‍याची.
त्यांची मेंदी पण चांगली आहे असं ऐकलय,पण मला मिळालीच नाहि Sad

पातांजलीचे कोरफड जेल ,आणि दिव्य कांती लेप अफलातुन आहेत्.स्वस्त आणि मस्त.>> अरे वाह, हरकत नै म्हणजे वापरुन बघायला.

पुण्यात पतंजलीचे प्रॉडक्ट्स कुठे मिळतील? >> कर्वे रोडला मारुती मन्दिरासमोर आहे दुकान. जिलॅटिनो ह्या आइस्क्रीम्च्या दुकानाच्या आसपास.

नाही. आपण मृत्युंजय मंदिराकडून डेक्कन कडे जाताना डाव्या हाताला बरीच दुकानं आहेत. तिथे जिलाटो आणि अजून एक आईस्क्रीमचं दुकान आहे तिथेच शेजारी किंवा जवळपास पंतंजलीचं दुकान आहे.

भान, ते कोरफड जेल खुप स्टिकी आहे गं. आणि त्याचा वास पण वाईटच आहे. हो ना? मला कोणी हिरव्या रंगाचं कोरफड जेल दिलं त्याचं नाव माहित नाही, पण त्याचा वास खुप असह्य वाटला, म्हणुन वापरलं नाही. (ट्रान्सपरंट हिरवी प्लास्टिक ट्युब होती, ऑरेंज लिडवाली)

गेस, ग्लिसरीन पण स्टिकी असावं. पण फेमिनामधे वाचलं होतं कि आंघोळ झाल्यावर शेवटच्या जगभर पाण्यामधे एक चमचा ग्लिसरीन टाकुन ते पाणी अंगावर घ्यायचं. त्याने स्कीन सॉफ्ट रहाते, पण स्टिकी होत नाही. मी तर कधी वापरलं नाही, पण तु एकदा प्रयोग करुन बघ.

सुलेखा, लिंबाचा रस अख्खा दिवस त्वचेवर राहिला तर चालेल ना?

मनिमाऊ ,हो हो तेच्,पण मला ते एवढं स्टिकि नाहि वाटलं,आणि वास पण आवडला Happy आणि महत्त्वाचं म्हणजे आईच्या चेहर्‍यावरचा परिणाम पाहुन मी सध्या तेच लावते मॉईस्टराईजर म्हणुन्.जेव्हा जमेल तेव्हा चेहर्‍यावर चोपडते.

भान, ते लावल्यावर थोडं चरचरतं का गं तुला? फार नाही, ब्लिचसारखं किंचित? का मलाच सुट नाही झालं? मी २ वेळा वापरलं.
मी वासाच्या बाबतीत फार सेन्सिटिव आहे गं. मला तो वास अजिबात आवडला नाही, त्यामुळे मी ते वापरु शकणार नाही. माझी ट्युब शोधुन तुलाच द्यायला हवी. Happy

नाहि गं,मला त्यांचं क्रिम लावल्यावर चरचरतं,त्यातल्या हळदीमुळे असेल.
बादवे,कुणाला जमलं तर पातांजलीची कपडे धुण्याची पावडर वापरुन बघा.भारी आहे.
आणि मनिमाऊ,जेल पाठवणार असशील तर भारतातुन बाकिचा खाऊ पण पाठव हं. Wink

स्किन सोफ्ट राहण्यासाठी, मी रोज आंघोळ करतानाच साबण लावून झाला कि, उटण्यात तेल मिसळून अंगाला जरां मिनिट भर चोळून, गरम पाणी घेते, त्याने तेल मस्त मुरते त्वचे मध्ये, आणि दिवस भर मस्त सोफ्ट वाटते, बाथरूम मध्ये उटण्याचा डब्बा आणि तेलाची बाटली ठेवूनच द्यावी, म्हंजे रोज जमतही, ५ मिनिटे जास्त जातात एवढच .

मनिमाऊ तु नक्की कोणाचं कोरफड जेल वापरलस? उर्जिता जैन चं वापर. चांगलं आहे. उन्हाळ्यात मी ते कपाळाला लावून झोपायची रात्री.. शांत थंड वाटतं. भाजलं/खरचटलं की सुद्धा लावायचं पटकन फरक पडतो. त्याला बिलकूल वास नाहिये आणि. कोरफड जेलच्या खाली बरीच भेसळ करून विकलं जातं, तेव्हा सावधान.

चेहेर्‍यावर मधेच काळे डाग येतात. स्क्रबने घासले की लाईट होतात पण जात नाहीत. थंडीमुळे होतं का? कोणी चांगला स्क्रब सुचवा ना.

मला या खालच्या गोष्टींचा क्रम सांगा कोणीतरी प्लीज. कंसात आहे ते माझ्याकडे असलेलं प्रॉडक्ट आहे.

१. स्क्रबिंग (एवरयुथ अ‍ॅप्रिकॉट + वॉलनट)
२. क्लिन्सिंग (Cetaphil क्लिन्सिंग लोशन)
३. टोनिंग (गुलाबपाणी)
४. मोइस्चराईजर (अयूर क्रीम/ साय + मध मिश्रण/ ताजा कोरफड रस)
५. वाफ घेणे.

मला मेक-अप वगैरेसाठी नकोय. कधीतरीच वाफ घेणे, कधीतरीच स्क्रबिंग करणे हे केलंय आधी.
इथे प्रदूषणामुळे त्वचा लगेच कोरडी आणि काळी पडतेय. उन्हाळापण जाणवतोय. सेंसिटिव आहे माझी त्वचा, त्यामुळे वर लिहिलेलेच प्रॉडक्ट्स वापरीन मी, ते वापरून टेस्ट केलेले आहेत. फक्त योग्य क्रम हवाय.

आणि यातलं काय रोज करून चालेल आणि काय आठवड्याने करून चालेल तेही सांगा प्लीज. (आणि अजून भर नाही घातली तर बरं, मी या बाबतीत आळशी आहे! Proud )

प्रज्ञा९,
1. क्लिन्सिंग
2. वाफ घेणे.
3. स्क्रबिंग
4. स्क्रब पुसुन चेहर्‍याच्या त्वचेला चालेल अश्या क्रीम ने मसाज.
5. फेस पॅक
6. फेस पॅक धुवुन चेहरा कोरडा केल्यावर टोनिंग

ह्या फेशिअलच्या स्टेप्स आहेत.

रोजच्या रुटीनमध्ये:

रात्री झोपण्याआधी Cleansing करावे. मग चेहरा पाण्यने स्वच्छ धुवावा.
सकाळी आंघोळ केल्यानंतर चेहर्‍याला गुलाब पाणी लावु शकता मग थोड्यावेळाने moisturizer किंवा सनस्क्रिन.

Pages