माझे मातीचे प्रयोग - ५ (Crystalline glazes continued)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

समर सेमिस्टर मध्ये जे क्रिस्टलाइन ग्लेझेस बद्दल काम करायला आम्हाला शिकवले तेच या फॉल सेम मध्ये स्वतःहून पुढे चालू ठेवायचे असे मी ठरवले होते. खर तर हे इतके जास्त वेळखाऊ काम होते की क्लास करतांना मी परत हे कधी करायला घेईन असे वाटले नव्हते. खर तर I never realized that I was actually addicted to crystalline glazes.
फॉल सेम मध्ये मी खर तर पाण्याचे जग/ चहाची किटली इ. (pouring vessels) क्लासमध्ये नाव घातले होते. ह्या क्लासच्या सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण केल्यावर उरलेल्या वेळात क्रिस्टलाइन ग्लेझ करायचे असतील तर परवानगी मिळेल असे सरांनी सांगितले.
हे म्हणजे चार ऐवजी आठ क्रेडीटचा कोर्स घेतल्यासारखे झाले. तेव्हा चहाच्या किटल्या वगैरे सगळ्या पाट्या टाकून मग ही काही भांडी केली.
फारच थोडी भांडी भट्टीत तडकली- फुटली नाहीत, रंग चांगले आले ती ही काही जमलेली भांडी.
खाद्य पदार्थ ठेवता यावेत म्हणून या भांड्याना आतून क्रिस्टलाइन ग्लेझेस न वापरता Lead Free, Food safe ग्लेझेस वापरले आहेत. क्रिस्टलाइन ग्लेझचा वापर फक्त बाहेरूनच केला आहे.
Turquoise Crystalline Lidded Jar : (७" बाय ५")
१.

२. Glossy Green Crystalline Lidded Jar (८" बाय ६")

३. Purple Crystalline Lidded Jar (६" बाय ६")

४. Off white Crystalline Lidded Jar (६" बाय ५")

५. Turquoise Crystalline Vases (५")

क्रिस्टलाइन ग्लेझेस म्हणजे नक्की काय, भांड्यांवर ते फुलांसारखे दिसणारे क्रिस्टल्स कसे येतात याबद्दल मागच्या भागात लिहीले होते. त्याचा दुवा माझे मातीचे प्रयोग ४- Crystalline Glaze.

वॉव रुनी, काय सुंदर आहेत सगळीच भांडी. अप्रतिम. सगळीच आवडली.

मामी Lol मृत्तिकापात्र हा शब्द कसा वाटतोय? Wink

छान

रुनी अशक्य बनवलस. खुप खुप आवडल मला आणि लेकीला पण. तिची प्रतिक्रिया वर आहेच.
किप इट अप Happy

वॉव! रुनी मस्तच...
सगळी भांडी एका पेक्षा एक, तुम्ही तयार केलेली भांडी पाहुन मलाही पॉटरी शिकण्याची ईच्छा होतेय.
मुंबईत कुठे शिकवत असतील तर शोधायला हवं पण जमेल की नाही हा ही प्रश्न मनात येतोय. Happy

रुनी पॉटर,

ह्या ग्लेझ केलेल्या भांड्यात खाद्य पदार्थ ठेवू शकतो काय? मी कुठंतरी वाचले की चांगले नाही. जरा प्रकाश टाकाल का?

वॉव!

फारच सुंदर. अगदी प्रोफेशनल पॉटर सारखे आकार जमले आहेत. जांभळा आणि ऑफव्हाईट खासच.

मला वाटते काही वर्षांपूर्वी बहुतेक मिनोतीचे कुंभारकाम बघून तुम्ही सुरवात केली होती ना?
अप्रतिम आहेत सर्वच.
अशीच सुंदर भांडी (आतापर्यंत हा शब्द वापरायचे टाळले होते :-)) करत रहा आणि आम्हाला दाखवत रहा.

अरे वा वा वा!
रुनीने नवीन भाग टाकला का? मस्त. Happy

रुनी- तुझ्या सातत्याचे आणि अर्थातच नवीन भांड्यांचे खूप खूप कौतुक. वे टु गो..

Pages