हिंदुस्थान बेकरी म्हणायचे असेल....त्यासारखे बेकरी चे पदार्थ मी आजवर आयुष्यात कुठेही खालेले नाहीत आणि यात काही अतिशयोक्ति नाही... >> अगदी अगदी!
एकेकाळी प्रार्थना हॉटेलची पावभाजी आणि गोकुळ (बसंत बहार समोरचे) हॉटेलची इडली फेमस होती.
स्टँडसमोर शालीमार आणि सम्राट मधे थाळी बरी असायची गेल्या ७-८ वर्षात खाल्ली नाहीये.
खूप जुनी आणी अजुनही टेस्ट अतिशय सुंदर >>>>अगदी अगदी केदार , महाद्व्रार रोडला जाउन हिन्दुस्थान बेकरीतून काही न घेता परत येणे शक्यच नाही ....
न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्या भाजुन मिळतात>>>>मलाही माहीत नव्हते हे....नवीनच दिसतेय.
हा बा. फ. भारी आहे एकदम , बसल्या बसल्या सगळय्या चवी जिभेवर रेन्गाळतात्...।हम्म...
फुलराणी.
अरे देवा:( कशाला वाचल मी हे. असो. जाणारच आहे मी मे/ जुन मध्ये
The smartest thing you can do is NOT to show people your insecurities or the things that annoy you.
लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर कोल्हापुरात आले होते तेव्हा आम्हाला गोकुळमधेच नेलं होतं थाळी खायला....
ताईकडे पूर्वी एक आजोबा यायचे. कुरुंदवाडची रबडी घेऊन. अरे काय खास चव असायची! मला स्वतःला साय आवडत नाही पण ही रबडी मी मिक्सरमधे फिरवून घेऊन खायचे. एका वाटीत पोटं फुल्ल.
अरे तुम्ही काय काय गोष्टींची आठवण करून देताय?
माझे आजोळ कुरूंदवाडजवळ अकिवाट... त्यामुळे बासुंदी, पेढे कायम असायचेच..
कुरूंदवाडला तांदळाच्या पीठाच्या चकल्या मिळतात.. अप्रतीम !!!
वा वा वा. या बा फ चा मला अतिशय उपयोग होणार आहे. कालच हापिसात गेल्या गेल्या एक मेमो मिळाला.
माझी कोल्हापूरला रवानगी केलीय सहा महिन्यांसाठी. चला निदान या बा फ मुळे कुठं काय हादडायचं त्याची
इत्यंभूत माहिती मिळतीय..
अरे होय! लाजो....मला पण पुणे-कोल्हापूर हाय्-वे वरचा वारणाचा स्टॉल आठवला. मस्तच होता.. तिथले फ्लेवर्ड दूध माझे कधीकाळी फेवरेट होते
पुणे-कोल्हापूर हाय्-वे वर 'विरंगुळा' हॉटेल आहे. तिथेही झुणका-भाकर वगैरे चांगली मिळते.
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
कोल्हापूरला पूर्वी ताईकडे गेलो की शाहुपूरीतल्या दूध कट्ट्याला एकदा तरी भेट व्ह्यायचीच. घरचे पाणी, आपली स्वच्छ भांडी घेऊन जायचे. गवळी आपल्या पाण्याने गाईची/म्हशीची आचळं धुवून आपल्या भांड्यात दूध काढुन द्यायचे. ते धारोष्ण दूध काय चविष्ट लागायचे. एका ग्लासात पोट अगदी टम्म भरून जायचे....
आता अनेक वर्षात तिथे गेले नाहिये. अजुन मिळतं का तिथे ताजं दुधं?
शाहुपुरीचे म्हणजे ते BT कॉलेज जवळचे तेच ना?...तिथे मिळते अजुनपण आणि त्याचबरोबर मंगळवारात, खासबागेकडुन येतानाच्या कोपर्यावर सुद्धा आहे... मी लहान असताना घेतलेले ते एकदा-दोनदा...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
हो अजुनही मिळते...
तिथे, केदार ने सांगितल्याप्रमाणे मंगळवारात, गंगावेस कट्ट्याला, महानगरपालिकेच्या चारही बाजूला, नदीकडे जाताना, पंचगंगा तालमीजवळ्..या सगळ्या ठिकाणी मिळते
हं शामचा वडा झकास...पॉलिटेक्नीक कॉलेजचा म्हणजे आप्पाचा वडा का?
राजारामपुरी ३ री गल्ली इथल्या सायबा या हाटिलात आज जेवण केलं. झकास पैकी सुरमई थाळी मागवली. सुरमई फ्राय, गोलमा,
(गोलमा हा खास कोल्हापुरी शब्द आहे असं मी गृहित धरलंय) मच्छी करी, तिसर्याचं कालवण, आणि
वडे यांच्यावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावर भात आणि सोलकढी बरोबर सुकट चटणी ओरपली आहे!
हे असं झकास खाद्यजीवन कोल्हापुरात अनुभवायला मिळणार या विचारानेच इथं बदली झाल्याचं काहिही
वाटेनासं झालंय!!
हिंदुस्था
हिंदुस्थान बेकरी म्हणायचे असेल....त्यासारखे बेकरी चे पदार्थ मी आजवर आयुष्यात कुठेही खालेले नाहीत आणि यात काही अतिशयोक्ति नाही... >> अगदी अगदी!
एकेकाळी प्रार्थना हॉटेलची पावभाजी आणि गोकुळ (बसंत बहार समोरचे) हॉटेलची इडली फेमस होती.
स्टँडसमोर शालीमार आणि सम्राट मधे थाळी बरी असायची गेल्या ७-८ वर्षात खाल्ली नाहीये.
सगळ वाचुन
सगळ वाचुन तोंडाला पाणी सुटलं. McDonald's सारखी मिसळ ची (आणि हो राजाभाऊ च्या भेळ्ची ) चेन असती तर खुप छान झालं असतं. अमेरीकेत पण खायला मिळालं असतं. (पण आता कल्पना माझी झाली. ©)
सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....
खूप जुनी
खूप जुनी आणी अजुनही टेस्ट अतिशय सुंदर >>>>अगदी अगदी केदार , महाद्व्रार रोडला जाउन हिन्दुस्थान बेकरीतून काही न घेता परत येणे शक्यच नाही ....
न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्या भाजुन मिळतात>>>>मलाही माहीत नव्हते हे....नवीनच दिसतेय.
हा बा. फ. भारी आहे एकदम , बसल्या बसल्या सगळय्या चवी जिभेवर रेन्गाळतात्...।हम्म...
फुलराणी.
अरे देवा:(
अरे देवा:( कशाला वाचल मी हे. असो. जाणारच आहे मी मे/ जुन मध्ये
The smartest thing you can do is NOT to show people your insecurities or the things that annoy you.
McDonald's सारखी
McDonald's सारखी मिसळ ची (आणि हो राजाभाऊ च्या भेळ्ची ) चेन असती तर खुप छान झालं असतं. अमेरीकेत पण खायला मिळालं असतं. (पण आता कल्पना माझी झाली. ©) >>>
निवांत, मग सुरू कर ना! business ideas अशाच सुरू होतात. बघ प्रयत्न करून.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
वा वा इकडे
वा वा इकडे खादाडीवर गप्पा मारता काय ? चान्गले आहे वाचायला आवडेल [:P]
गोकुळ
गोकुळ (बसंत बहार समोरचे) हॉटेलची इडली फेमस होती.>>> बरोब्बर बोलला कराडकर!!...आता गोकुळ हॉटेल पण चांगले झालेय्...सगळे साउथ इंडियन पदार्थ एकदम A1..
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
लहानपणी
लहानपणी शाळेच्या सहलीबरोबर कोल्हापुरात आले होते तेव्हा आम्हाला गोकुळमधेच नेलं होतं थाळी खायला....
ताईकडे पूर्वी एक आजोबा यायचे. कुरुंदवाडची रबडी घेऊन. अरे काय खास चव असायची! मला स्वतःला साय आवडत नाही पण ही रबडी मी मिक्सरमधे फिरवून घेऊन खायचे. एका वाटीत पोटं फुल्ल.
कुरुंदवाड
कुरुंदवाडची रबडी घेऊन.>>> लाजो..काय काय आठवणी करुन देता हो :)..आता मात्र खरच सहन control होत नाही...
माझी मावशी नरसोबावाडीची आणि बाबांचे आजोळ पण तिकडचेच!!... कुरुंदवाड ची रबडी, गणेशवाडीचा खवा, आणि वाडीचे पेढे-बासुंदी... आहाहहहाहाह्हाहा...!!
आणि खूपच त्वांड ग्वाड झाले तर्.....सांगली-जयसिंगपुरची भडंग!!...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
अरे तुम्ही
अरे तुम्ही काय काय गोष्टींची आठवण करून देताय?
माझे आजोळ कुरूंदवाडजवळ अकिवाट... त्यामुळे बासुंदी, पेढे कायम असायचेच..
कुरूंदवाडला तांदळाच्या पीठाच्या चकल्या मिळतात.. अप्रतीम !!!
सांगलीचे डॉन भडंग तर मस्तच...
आणि वाडीची
आणि वाडीची कवठ बर्फी? विसरलात?
वाडीची कवठ
वाडीची कवठ बर्फी? विसरलात?>>> दक्षिणा कवट बर्फी तर आहेच्!!..पण जास्ती करुन पेढे-बासुंदी प्रसिद्ध आहे...कलाकंद(कर्नाटकी गोड पदार्थ) पण जबरी मिळतो तिथे...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
चोरगेची
चोरगेची मिसळ अप्रतिम, आणि मग सोळंकी...व्वा मस्त
गोकुळही छान आहे, एकदम मुबंई स्टाईल..
वा वा वा. या
वा वा वा. या बा फ चा मला अतिशय उपयोग होणार आहे. कालच हापिसात गेल्या गेल्या एक मेमो मिळाला.
माझी कोल्हापूरला रवानगी केलीय सहा महिन्यांसाठी. चला निदान या बा फ मुळे कुठं काय हादडायचं त्याची
इत्यंभूत माहिती मिळतीय..
लगे रहो कोल्हापूरकरहो..
कोल्हापूर
कोल्हापूरला रवानगी केलीय सहा महिन्यांसाठी.>>> सह्हिच!!... निवान्त रहयचे कोलापुरात...
नाद करायचा नाय
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
अरे होय!
अरे होय! लाजो....मला पण पुणे-कोल्हापूर हाय्-वे वरचा वारणाचा स्टॉल आठवला. मस्तच होता.. तिथले फ्लेवर्ड दूध माझे कधीकाळी फेवरेट होते
पुणे-कोल्हापूर हाय्-वे वर 'विरंगुळा' हॉटेल आहे. तिथेही झुणका-भाकर वगैरे चांगली मिळते.
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
सुनील...कोल
सुनील...कोल्हापूरला रवानगी केलीय !! सहीच! नशीबवान आहात राव
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
मोकाट
मोकाट राव्...कस काय राव??
काय काय आणी इसेस?
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
राजाराम
राजाराम कॉलेजमागे मिळणारा शामचा वडा खाल्लाय कोणी ?..मस्त तिखट आणी पॉलिटेक्नीक कॉलेजचा
कट वडा ..
गौरी..
होय गौरी,
होय गौरी, मी खाल्लाय :)... तो म्हणजे शेतकी कॉलेज च्या समोर चा तोच ना?
पॉलिटेक्निक च्या इथला कटवडा नाही खाल्ला पण
०---------------------------०
गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
०---------------------------०
हो तोच
हो तोच !
आपल्याला पण गुढिपाडव्याच्या शुभेच्छा!!
तुम्ही कोल्हापूरचे का ?
गौरी
होय मी
होय मी कोल्हापुरचाच्!!...आपण कुठे असता?
०---------------------------०
गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
०---------------------------०
मी
मी अमेरिकेत ह्युस्टनला असते.
गौरी
रामराम
रामराम मंडळी...
कोल्हापूरला पूर्वी ताईकडे गेलो की शाहुपूरीतल्या दूध कट्ट्याला एकदा तरी भेट व्ह्यायचीच. घरचे पाणी, आपली स्वच्छ भांडी घेऊन जायचे. गवळी आपल्या पाण्याने गाईची/म्हशीची आचळं धुवून आपल्या भांड्यात दूध काढुन द्यायचे. ते धारोष्ण दूध काय चविष्ट लागायचे. एका ग्लासात पोट अगदी टम्म भरून जायचे....
आता अनेक वर्षात तिथे गेले नाहिये. अजुन मिळतं का तिथे ताजं दुधं?
शाहुपुरीच
शाहुपुरीचे म्हणजे ते BT कॉलेज जवळचे तेच ना?...तिथे मिळते अजुनपण आणि त्याचबरोबर मंगळवारात, खासबागेकडुन येतानाच्या कोपर्यावर सुद्धा आहे... मी लहान असताना घेतलेले ते एकदा-दोनदा...
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...
हो अजुनही
हो अजुनही मिळते...
तिथे, केदार ने सांगितल्याप्रमाणे मंगळवारात, गंगावेस कट्ट्याला, महानगरपालिकेच्या चारही बाजूला, नदीकडे जाताना, पंचगंगा तालमीजवळ्..या सगळ्या ठिकाणी मिळते
हं शामचा वडा झकास...पॉलिटेक्नीक कॉलेजचा म्हणजे आप्पाचा वडा का?
लाजो, "हाय
लाजो,
"हाय या, धरली या" ची हाक आठवली. आम्ही गंगावेशीत रोज अर्धा शेर धारोष्ण दूध प्यायचो.
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
kolhapur cha nad khula
kolhapur cha nad khula BHDANG
PLS REQUEST I WANT
PLS REQUEST
I WANT ADDRESS डॉन भडंग VERY IMPORTANT
SENT ON MY ID
ramdassawant2007@rediffmail.com
तुडुंब
तुडुंब भरलेल्या पोटानं डोळ्यांवर झोप अनावर झालीये...
पण आजचा खाद्यानुभव इथं लिहिल्यावाचून रहावत नाहिय्ये.
राजारामपुरी ३ री गल्ली इथल्या सायबा
या हाटिलात आज जेवण केलं. झकास पैकी सुरमई थाळी मागवली. सुरमई फ्राय, गोलमा,

Pages