शालेय आरोळ्या
रसायनशास्त्राचं अजब रसायन
संयुगं, सल्फ्युरीक अॅसिड अन जमवा समिकरण
परीक्षानळी, चंचुपात्रात काय असतं ते?
द्रावण का रावण का द्रावण का रावण ...
शाळेत शिकत असताना आपल्या 'रम्य त्या बालपणाच्या' स्वच्छंदी, आनंदी जीवनात आपल्याला छळणारे व्हिलन लोकं म्हणजे - बीजगणित, भुमिती, नागरीकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संस्कृत, जीवशास्त्र, इतिहास इ.इ. हे व्हिलनलोकं केवळ विद्यार्थ्यांनाच छळून थांबत नाहीत तर बरोबर पालक आणि शिक्षकांचीही धुलाई करतात .....
इथे आपण या व्हिलन लोकांच्या नावाने म्हणजे या विषयांच्या नावाने आरोळ्या ठोकायच्या आहेत ..... पालक, विद्यार्थी वा शिक्षकांच्या भुमिकेतून.
मग, वाट कसली बघता ... सुरू करा!
****************************************
सर्वसाधारण नियम:
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. कुठल्याही शाळेत शिकवल्या जाणार्या विषयांवर तुम्हाला चारोळी करायची आहे. उदाहरणार्थ बीजगणित, भुमिती, नागरीकशास्त्र, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संस्कृत, जीवशास्त्र, इतिहास इ.
५. चारोळी ही शिक्षकांनी, विद्यार्थ्याने किंवा पालकांनी केलेली असु शकते.
६. एका वेळेस एकच चारोळी टाकावी.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन चारोळ्या देऊ शकत नाही.
******************************************
आपापल्या नावडत्या विषयाच्या
आपापल्या नावडत्या विषयाच्या नावाने ठोका जोरदार आरोळ्या .........
कधी न जुळणार्या सिद्धता अन्
कधी न जुळणार्या सिद्धता
अन् न सुटणारी प्रमेयं
बीजगणितातल्या स्कोरिंगचे
भुमिती हिरावायची श्रेय
अजून एकही चारोळी नाही !!
अजून एकही चारोळी नाही !! म्हणजे कुठलाच विषय कुणाचाही नावडता नाही की काय ?
असो .... एखादा विषय काय, पूर्ण अभ्यासच नावडता असलेल्या
(माझ्यासारख्या) एका विद्यार्थ्याची ही कैफियत
(इंग्रजी माध्यमामुळे भाषेची वाट लागली आहे हे सांगणे नलगे)
(कुछ कुछ होता है या गाण्याच्या चालीत)
Exam पास आये, Study हो न पाये
प्रश्नोंके उत्तर याद न आये
अब तो मेरा दिल नतीजेसे डरता है
क्या करूं हाये कुछ नहीं होता है
बेडकाचा असतो म्हणे
बेडकाचा असतो म्हणे बेडुकमासा
सुरवंटाचं होतं फुलपाखरु
मी व्हायचो हायबरनेट
जिवशास्त्राचा तास झाला की सुरू
इतिहासाच्या तासाला
इतिहासाच्या तासाला हेडमास्तर
यायचे काठी आपटित
सतत सुरू त्याचा मंत्रोच्चार
नले घालीन काठी पाठित
संयोजक खातात आमच्या
संयोजक खातात आमच्या रसायनशास्त्रावर खार
लिहून कुजकट चारोळी, सार्या पुस्तकांच्या मध्ये त्यांनी केला सँडविच पार
ह्यात ते अन् त्यात हे; विरल-संहत अन् ऊन की गार
(अं?? आता काय जुळवावे बरे????)
ह्यातच आहे जीवणाचे सार
-संहत रसायनशास्त्रभक्ताची एक उत्प्रेरक चारोळी रसायनशास्त्रभक्तीप्रित्यर्थ विरंजकास अर्पण. __/\__
बाकोबा, कोबाको, बाबाबा कोणती
बाकोबा, कोबाको, बाबाबा
कोणती कसोटी लावू,
रिझल्टवरच्या वर्तुळाला ?
इतिहास म्हणतो हास भूगोल करतो
इतिहास म्हणतो हास
भूगोल करतो पास
जीवशास्त्राशी आमची दोस्ती खास
पण गणित करतो सर्वनाश
न्युटनने शोधलं म्हणे,
न्युटनने शोधलं म्हणे, अॅप्पलवरुन गुरुत्वाकर्षण
मी म्हणालो ,माझ्यात आणि पिंकीत आहे तसलंच का वो सर ?
सर म्हणाले, नाही! तुझ्या हातामध्ये आणि या छडीमध्ये असते तसे !
प्रकाश... सही रे!
प्रकाश... सही रे!
सगळेच
सगळेच
गणिताच्या प्रमेयांनी कायम
गणिताच्या प्रमेयांनी कायम केला घात
सिध्दांत, समीकरणांचे कायमचे आघात
कोन, चौकोन, वर्तुळांनी लाज माझी काढली
वर्गमूळ, घनमुळांनी भाजणीसवे बोलतीच बंद केली!!
जिव घेतो विना शस्त्राने हा
जिव घेतो विना शस्त्राने
हा जिवावरचा अभ्यास
जिव घेतो शस्त्राने म्हणुन
जिवशास्त्रात खल्लास
भौतिकाची गृहितके गेली पार
भौतिकाची गृहितके गेली पार बंपर
आकृत्यांच्या भेंडोळ्यांनी आली मला चक्कर
तरी घोकंपट्टी करत कसेबसे निभावले
परीक्षेत मात्र डोळ्यांसमोर लख्ख काजवे चमकले!
लसावि मसावि.. अरे काहीच
लसावि मसावि..
अरे काहीच लक्षात येत नाही
मग मी का घासावी.....:)
कोण कुठली ती किरणे 'अल्फा'
कोण कुठली ती किरणे
'अल्फा' 'गॅमा' 'बिटा'
उमगण्या 'साईन' 'कॉस'
मेंदुही पडायचा 'थिटा'
आर्या
आर्या
आर्या सहीच ग
आर्या सहीच ग
इंग्रजी येतच नाही करायचे
इंग्रजी येतच नाही
करायचे काय?
मग परकिय भाषेला विरोध
आपले जातेय तरी काय.
एका बीजापोटी कष्ट कोटी
एका बीजापोटी
कष्ट कोटी कोटी
तेची बीजगणित
समजावे
'गणिता'त लागली होती कधीच
'गणिता'त लागली होती कधीच वाट
'रसायनशास्त्रा'त समिकरणांचा थाट
'भौतिक'ने भौतिक सुखांना कात्री लावली
निमुटपणे मग 'जीवशास्त्रा'ची वाट धरली
थीटा
थीटा
सगळ्या शास्त्रात
सगळ्या शास्त्रात नागरिकशास्त्र
कधीच कळले नाही
या शास्त्राशी माझे
कधीच सुर जुळले नाही
शास्त्रांची बातच नको गणित,
शास्त्रांची बातच नको
गणित, इग्रंजी दप्तरातच नको
खर सांगायचे म्हणजे
अभ्यासाची कटकटच नको
इतिहास शिकवितांना! बाईंनी
इतिहास शिकवितांना!
बाईंनी आम्हाला रडविले!
त्यामुळे इतिहासात मी!
फारच रमले!!!
भुक लागली म्हणुन लेखन मी
भुक लागली म्हणुन
लेखन मी खाल्ले
अक्षर नाही पण
बोलणे वळणदार झाले.
इतिहासातल्या सनावळी लक्षात
इतिहासातल्या सनावळी
लक्षात कधी राहिल्या नाही.
थोरामोठ्यांचे महानपण
त्यामुळे मात्र कमी झाले नाही.
सगळ्याच आरोळ्या मस्त
सगळ्याच आरोळ्या मस्त आहेत.
आर्या ___/\___. एकदम उच्च!