देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

Trooth लिहून बघ अवल. मी मोबाईलातून लिहितेय त्यामुळे मला ते कॉम्पवर कसं दिसतंय ते कळत नाहीये.

जे दिसतय ते बरोबर आहे.. आणि मराठी लेख असेल तर सत्य असा पर्यायी शब्द वापरायला काही हरकत नसावी.. किंवा Truth असाच शब्द वापरला तरी चालेल..

मग TRooth बघ येतंय का.. नसेल तर मग ते नाव इंग्रजीतूनच लिही. Happy

जोडाक्षरांचा भार होतो नुसता
का लिहावा शब्द चुकीचा नसता?
Wink

पुस्तकात लिहिलेलं असेल तर वाक्य सगळं देवनागरी लिपीत लिहिण्यापेक्षा तेव्हढंच वाक्य रोमन लिपीत चालू शकेल.. अर्थात अशी वाक्य फार असतील तर मग तो लेख फारच वेगळा दिसतो.. पण एखाद दुसरं वाक्य असेल तर रोमन चालेल..

आणि आपण जसे लिहितो तसेच्या तसे इथे दिसत नाही कारण प्रत्येक शब्दाला एक ठराविक उंची असते आणि तिच्यातच सगळं बसवायचं असल्याने काही अक्षरे अशीच दिसतात..

गमभन प्याकेज मधे येतय बरोबर पण इथे पेस्ट होत नाही
क्यारेक्टर म्याप मधे करुन घेता येतय, पण इथे पेस्ट होत नाही

बरोबर मन्जुडी, तसच काहीतरी दिसतय, कारण गमभन मधिल इतर अक्षरे इकडे कॉपी होताहेत Happy असो
सरळ तेवढे रोमन वापरुन काम भागवुन घ्यावे
पण मला उद्या वर्डफाईल मधे संस्कृत लिहीताना ही अडचण आली तर? म्हणून मी उपलब्ध सर्व पर्याय तपासतो आहे.

अरे आज मला शब्द्च शब्द अडताहेत Sad
अद्भूत हे लिहिताना अद् भूत यात जसा द मोडका आलाय तसं लिहायचय, पण जोडून . कसं लिहू ?

अवल, मी ही वेगवेगळे पर्याय वापरून पाहिले पण तसेच दिसते. कदाचित फॉन्टच तसा असेल किंवा आणखी कोणाला माहीत असेल.

१. देवनागरीत थेट इ-मेल लिहीणे कसे जमेल?
मायबोलीच्या साह्याने, मायबोलीच्या फलकावर देवनागरीत मजकूर लिहून तो कॉपी करून जीमेल, याहू मेल इत्यादींच्या फलकावर स्थापित (पेस्ट) करायचा या मार्गाने जाण्या ऐवजी थेट मेलच्या फलकावर मायबोली वापरून देवनागरीत मेल लिहीण्यासाठी काय करावे लागेल ? तसे करणे शक्य आहे का?

२. पेजमेकर, वर्ड यामधे असा थेट वापर करता येतो का ?
२. अक्षराचा आकार लहान-मोठा करणे (साईझ), अक्षराचे वेगळे वळण (फॉण्ट), काही मजकूर अधोरेखीत करणे हास्य्/खेद वगैरे भावना दर्शविणारी चित्र-चिन्हे कशी प्रस्थापित करणे .... इत्यादी प्रक्रिया कशा साधायच्या ?
कृपया या बाबत मार्गदर्शन करावे.
आपला,
..... श्रीविद

|| LMüzsÉÉåMüÐ ´ÉÏ SÒaÉÉïxÉmiÉzÉiÉÏ ||
rÉÉ cÉÇQûÏ qÉkÉÑMæüOûpÉmÉëqÉÍjÉlÉÏ rÉÉ qÉÌWûwÉÉålqÉÑÍsÉlÉÏ
rÉÉ kÉÔqÉëå¤ÉhÉcÉÇQûqÉÑÇQûqÉÍjÉlÉÏ rÉÉ U£üoÉÏeÉÉzÉlÉÏ |
rÉÉ zÉÌ£üÌWû zÉÑqpÉÌlÉzÉÑqpÉSæirÉSÍsÉlÉÏ rÉÉ ÍxÉ®sɤqÉÏ mÉUÉ
xÉÉ SÒaÉÉïÇ lÉuÉMüÉåÌOû qÉÔÌiÉïxÉÌWûiÉÉ qÉÉÇ mÉÉiÉÑ ÌuɵÉåµÉUÏ ||

माझ्याकडे बरच साहित्य एमएस वर्ड मधे (डॉक फाईल) बरहा वापरुन लिहीलेल आहे, मात्र ते तिथुन कॉपीकरुन इकडे पेस्ट केल्यास वरील प्रमाणे दिसते. हे टाळण्याकरता काही उपाय आहे का?

ओह, सापडला सापडला, एक उपाय सापडला, जरा लाम्बचा वळसा आहे, पण जमतय Happy
॥ एकश्लोकी श्री दुर्गासप्तशती ॥
या चंडी मधुकैटभप्रमथिनी या महिषोन्मुलिनी
या धूम्रेक्षणचंडमुंडमथिनी या रक्तबीजाशनी ।
या शक्तिहि शुम्भनिशुम्भदैत्यदलिनी या सिद्धलक्ष्मी परा
सा दुर्गां नवकोटि मूर्तिसहिता मां पातु विश्वेश्वरी ॥
वर्ड मधिल टेक्स्ट कॉपीकरुन बरहा च्या खालिल विन्डोत पेस्ट करताना पेस्ट स्पेशल वापरुन, "कन्व्हर्ट देवनागरी अ‍ॅन्सी अ‍ॅज सन्स्क्रित" ही ऑप्शन निवडून पेस्टायचे.... वरील विन्डोत कन्व्हर्शन घ्यायचे, ते कॉपी करुन इकडे पेस्ट होते, वर केलय. Happy

विजय दामले

>>थेट मेलच्या फलकावर मायबोली वापरून देवनागरीत मेल लिहीण्यासाठी काय करावे लागेल ? तसे करणे शक्य आहे का?

जीमेलमध्ये अशी सोय आहे.

>> पेजमेकर, वर्ड यामधे असा थेट वापर करता येतो का ?
बरहा.कॉम वरील सॉफ्टवेअर वापरून करता येते. तसेच गूगलची ट्रांसलिटरेशन प्रणाली आहे.

>>२. अक्षराचा आकार लहान-मोठा करणे (साईझ), अक्षराचे वेगळे वळण (फॉण्ट), काही मजकूर अधोरेखीत करणे हास्य्/खेद वगैरे भावना दर्शविणारी चित्र-चिन्हे कशी प्रस्थापित करणे .... इत्यादी प्रक्रिया कशा साधायच्या ?

हे कुठे करायचे आहे? इमेलमध्ये असल्यास त्या इमेलच्या हेल्प मेन्यूमध्ये बघावे.
मायबोलीविषयी असल्यास प्रतिसाद ही लिंक बघावी. आकार, वळण आणि अधोरेखन, या गोष्टी सध्या मायबोलीवर उपलब्ध नाहीत.

बरहा आयएमई ही प्रणाली सद्द्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही इतर देवनागरी टंकन प्रणाल्यांपेक्षा सर्वसमावेशक आणि कुठेही म्हणजे ऑनलाईन-ऑफलाईन वापरण्यास उपयुक्त आहे. जीमेल,याहू,स्काईप, थोपु(फेबु),गुगल+,ऑरकुट इत्यादि कोणत्याही संवादकात(मेसेंजर) आपण थेट देवनागरीत टंकू शकता
मात्र आता ही प्रणाली फुकट स्वरूपात मिळत नाही...ती विकत घ्यावी लागते....पण माझ्याकडे ह्याची जुनी फुकट आवृत्ती आहे जी व्यवस्थित काम करू शकते . गरजूंनी आणि इच्छुकांनी ती वरील दुव्यावरून उतरवून घ्यावी.
बरहामध्ये जोडाक्षरे कशी टंकायची ह्याबद्दलची मदत माझ्या विपूत आपल्याला मिळेल...ती तेवढीच नक्कल करून आपण आपल्या संगणकावर एखाद्या नोटपॅडमध्ये साठवून ठेवू शकता...म्हणजे गरज वाटेल तेव्हा ती वापरता येईल.
तेव्हा करा लगेच सुरुवात देवनागरीत टंकायला.

मला 'अ' च्या बाराखडीतील अ वरील वेलांट्या उकार एकार कसे द्यायचे ते हवे आहे. इ,ई,उ,ऊ,ए,ऐ नकोत.
अ, आ, नंतर ओ, औ, अं, अ: जमते. मधलेच जमत नाहीत.

Pages