कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

Submitted by मथुरादास दावणगिरी on 8 August, 2011 - 04:52

कपिलदेव यांना भारतरत्न देण्यात यावे.

भारताच्या क्रिकेटला ख-या अर्थाने नवं रूप देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते कपिलदेव यांनीच. कपिल भारतिय संघाय येण्यापूर्वी भारतीय संघ सपाटून मार खात असे. सीरीज ड्रॉ करणे म्हणजे मोठ काम समजलं जाई. बॅटसमन फक्त वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत. संघ जिंकावा म्हणून कधीच कुणी प्रयत्न करीत नसायचं.

बॉलिंग तरी कशी ? एक दोन ओव्हर कुणीही टाकायचं कि लगेच स्पिन अ‍ॅटॅक सुरू. या तिकडीच्या जोरावर मायदेशात काही सामने जिंकले कि पब्लिक खूष. पण परदेशात गेले कि हे वाघ मार खाऊन येत. ऑलआउट ३६ असा विक्रमही त्यांनी गाजवला. कुठलंच टीम स्पिरीट नसलेला हा संघ . कपिल आल्यानंतर वेगवान बॉलिंग भारताला मिळाली. पाच पाच विकेटस काढून त्याने ऑपोझिशन चं कंबरडं मोडायला सुरूवात केली. लवकरच त्याची दहशत बसली.

पण आपले विक्रमवीर त्याच्या कामगिरीचा फायदा घेऊ शकत नसत. म्हणून मग त्याने बॅटींग मधेही चमक दाखवायला सुरूवात केली. तळाच्या बॅटसमनना घेऊन खेळायला सुरूवात केली. या सर्वांवर कळस झाला तो १९८३च्या वर्ल्डकप मधे. दुस-या वर्ल्डकपमधे भारताने भाग घेतला होता. सुनील गावसकरने ६० ओव्हर्स खेळून आउट न होता ४६ धावा जमवल्या पण टीम स्पर्धेतून आउट झाली.

१९८३ला कपिलच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या टीममधे जिंकण्याचा विश्वास कपिलने निर्माण केला. स्वतः तर कामगिरी चांगली केलीच पण के श्रीकांत, मदनलाल, रॉजर बिन्नी, मोहिंदर अमरनाथ या प्लेयर्सकडूनही चांगला खेळ करून घेतला. लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे सिद्ध करताना झिंबावेविरूद्ध त्याने केलेली १७५ नाबाद ची खेळी आज माइलस्टोन आहे. त्या दिवशी कपिल मैदानात आला तेव्हा सीनयर्सने पुन्हा नांगी टाकली होती. पाच आउट १७ असा स्कोरबोर्ड. मॅच हरल्यास मुंबईचा रस्ता धरायचा. अंगात १०५ ताप अशा परिस्थितीत त्याणे सैद किरमाणीला साथीला घेत ती मॅच एकहाती जिंकून दिली.

त्या वर्ल्डकप नंतर भारतीय क्रिकेटचे दिवस बदलले. संघाकडे आदराने पाहिलं जाऊ लागलं. मानसिकता बदलली. देशातही क्रिकेटचं वारं जोमाने वाहू लागल. एक दिवसीय सामने लोकप्रिय झाले. सामने पहायला लोक येऊ लागले. टीव्हीचे हक्क मिळाले. जाहीरातींच उत्पन्न वाढलं. खेळाडूंना पैसे मिळू लागले. त्याआधी खेळाडू रेल्वे किंवा बँकेत नोकरी करून क्रिकेट खेळत.

भारतिय क्रिकेटला एकीकडे संजीवनी देतानाच कपिलने ४०० बळींचा टप्पाही पार केला. त्याने भारतीय बॉलिंगचा गाडा आपल्या खांद्यावर एकट्याने ओढला. त्यातूनही निम्मे सामने भारतातच झाले. अशा पाटा पीचेसवरही त्याने विकेटस काढल्या हे विशेष. त्याला दिवसभर दिवसभर बॉलिंग करूनही थकवा, दुखापती कधीही सतावत नसत. दुखापतीमुळे तो खेळला नाही अस झालच नाही.

फक्त एकदा पुण्याच्या सामन्यात सुनील गावसकरने त्याला खेळू दिल नाही त्यामुळे सलग सामने खेळण्याचा त्याचा विक्रम झाला नाही. असले विक्रम नाहीतर फालतू असतात. कपिल देशासाठी आणि संघासाठी खेळणा-यातला होता. स्वार्थी खेळाडू नव्हता.

या अशा खेळाडूला भारतरत्न द्यायची मागणी क्का झाली नाही याच आश्चर्य वाटतं. त्या वेळी कपिलच्या कोट्यावधी चाहत्यांना भारतरत्नची मागणी करायची असते हेच माहीत नव्हत. क्रिकेट खेळणा-यांना भारतरत्न दिल्याचं ऐकिवात नव्हतच मग त्यांना कसं समजणार ते ?

पण ज्यांनी त्याचा खेळाचा आनंद लुटला अशा सुशिक्षितांनी अशी मागणी त्या वेळी का केली नसावी ? कि त्याच्या या जिगरी खेळाचा आनंद त्यांना झाला नसावा ? कि त्याचं देशासाठी झोकून देणं त्यांना पसंत नसावं ? काही कळत नाही. जे झालं ते झाल.

आता भारत सरकार भारत रत्नच्या अटी शिथील करणार आहे अस ऐकलय. मग आता तरी ही मागणी का करू नये ? ज्यांना ज्यांना कपिलच्या खेळाचा अभिमान आहे , देशप्रेम आहे ते या मागणीला पाठिंबा देतीलच. ज्यांना देशाबद्दल काहीच वाटत नाही त्यांच्यावर जबरदस्ती करता येत नाही पण त्यांनी विरोध करू नये हे आवाहन आहे.

- मथुरादास दावणगिरी

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

जाता जाता

ओ बेफिकीरमामा, मोठ्याने म्हणा पाहू

मी मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा निषेध करतो Biggrin

>>> ओ बेफिकीरमामा, मोठ्याने म्हणा पाहू , मी मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा निषेध करतो

Rofl

>>> जातोय मी आता ( व्हा आता सुरू )

गेले वाटतं मथुरातात्या. Sad

आता हसण्यासाठी उद्यापर्यंत थांबावं लागणार.

बारात रत्न सापडले:हाहा:

माझ्या कडे एक सर्च नावाचे आगाऊ फीचर सुरू आहे. कोणत्याही शब्दाला हायलाईट करते. चुकून क्लिक केले कि कोणत्याही धाग्यावर नेते.

तक्रार करणार होतो. पण आता फायदे समजले. Lol

Pages