कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्याला न सांगणारा.
अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्यापैकी पैसेही कमवतो.
इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?
***
कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.
कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.
मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.
तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.
***
अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.
ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.
पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.
***
आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्यांचंच राहून जात असेल का?
आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.
***
जरा लोकांनां विचारा बघू, की
जरा लोकांनां विचारा बघू, की नऊवार लुगड्यातली, कपाळावर कुंकवाची चिरी असलेली, धन्यासाठी भाकर्या बडवणारी आणि 'आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर' गुणगुणणारी कतरिना आवडेल का बघायला .. :p
सशल, तू 'फॉरेनची पाटलीण'
सशल, तू 'फॉरेनची पाटलीण' शिनूमा पायलाय का? कत्रिनासाठी टेअलरमेड रोल हाय, रिमेक बनवाया पायजे
स्वाती माफ करा पण तुम्ही
स्वाती माफ करा पण तुम्ही माझ्या मुद्द्याला चुकिच म्हणत होत का..oh ok? कारण तुम्ही सरळ स्लमडॉग वर उडी मारून 'कुठला सामाजिक वर्ग, कुठली स्थळं, कुठला काळ ' अस विचारू लागल्या ;)..आणि मी सुरुवातीला एकाच चित्रपटा बद्दल बोलत होते(या एकाच चित्रपटापुरतं बोलू मग... )
>> स्वाती माफ करा पण तुम्ही
>> स्वाती माफ करा पण तुम्ही माझ्या मुद्द्याला चुकिच म्हणत होत का..oh ok?
तुम्हांला माझ्या पहिल्या पोस्टवरून ('चलो स्पेन') कळलं नाही ना? वाटलंच मला!
ती हृतिकलाच कुकिन्ग का करत
ती हृतिकलाच कुकिन्ग का करत नाहीस विचारत होती. हृतिकचं पात्र सुरवातीला शहाणं वाटलं जेव्हा ते बाकीच्यांना सारखं 'ग्रो अप' असं म्हणत होतं. खूप पैसे मिळवून चाळीसाव्या वर्षी रिटायर व्हायचे मग पायजे ते करा, हेच बरोबर.
अवांतर: तुम्हांला माझ्या
अवांतर:
तुम्हांला माझ्या पहिल्या पोस्टवरून ('चलो स्पेन') कळलं नाही ना? वाटलंच मला! फिदीफिदी
स्वाती काकू दात छान आहेत हो तुमचे!
आहेत खरे. थँक्स फॉर नोटिसिंग!
आहेत खरे. थँक्स फॉर नोटिसिंग!
श्या...स्वती काकू अस
श्या...स्वती काकू अस compliment accept (पर्यायी मराठी शब्द सांगणे - प.म.श.सां) नाही करायची...किती मज्जा येत होती
जरा लोकांनां विचारा बघू, की
जरा लोकांनां विचारा बघू, की नऊवार लुगड्यातली, कपाळावर कुंकवाची चिरी असलेली, धन्यासाठी भाकर्या बडवणारी आणि 'आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर' गुणगुणणारी कतरिना आवडेल का बघायला
<,<<<
भाकर्या बडवणारी पण आवडेल बहुदा, मराठी फटाकड्या लावणी गर्ल रुपात आवडते तशी..
पहा (०:५५ पासून लावणी फ्युज्जन)
http://www.youtube.com/watch?v=LNCPYg0LnQA
खूप खूप आवडला!! ह्रितिक
खूप खूप आवडला!!
ह्रितिक कॅतरीना जबरी दिसलेत.. अभय देओल खूप आवडला.. (त्याची डायलॉग डिलिव्हरी आणि बॉडी लँवेज उलट आवडली मला सन्मी..)
फरहानही चांगलाय..
शेवटच्या गाण्यावर हिचच्या लास्ट गाण्याचा/डान्सचा प्रभाव वाटला..
वॉव्..खूपच आवडेल हा सिनेमा
वॉव्..खूपच आवडेल हा सिनेमा असं वाटतंय..
कुठल्या विषयावर चित्रपट
कुठल्या विषयावर चित्रपट बनवावा याचे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला नाहीय का? भारतात अमुक एक परिस्थिती आहे म्हणुन त्यावरच चित्रपट काढावे? मग फक्त दबंगच काढावा सिंघम काढु नये कारण दबंगमधल पोलिस सगळीकडॅ दिसतो पण सिंघममधला अपवादानेच आढळतो. आणि जातपात न पाहता प्रेमात पडलेले लोक दाखवणारे तर अजिबातच नको, कारण आजही जातीबाहेरची प्रेमप्रकरणे लगेच स्विकारली जात नाहीत.
आणि हाच मुद्दा पुढे रेटायचा तर आधी टिवीवरच्या सगळ्या मालिका बंद कराव्या लागतील. मालिकांमध्ये जे दाखवतात ते तर भारतात नी भारताबाहेर दोन्हीकडे घडणे अशक्य..
(जाताजाता आठवले, गुरूदत्तने प्यासा काढलेला... त्यात त्याने जो शेवट दाखवला ती परिस्थिती आजतरी लोक स्विकारतील काय?? मग त्यानेही मुर्खपणाच केला काय???)
टीआरपी वाढतोय सिनेमाचा
टीआरपी वाढतोय सिनेमाचा अश्याने.
बघुन चांगला म्हणणारे आहेत आणि वाईट आहे हे सिद्ध करण्यासाठी बघणारेही आहेत. एकुणात काय तर सिनेमा सुपर डुपर हीट.
साधना, मुद्दा पटेश
हायला! ४० नवीन बघून धसका घेऊन
हायला! ४० नवीन बघून धसका घेऊन बघायला आलो की इथे.
रसमलाई, (जरा प्रगल्भ भाषेत बोलायचं तर) साध्य आणि साधन यांची जरा गफलत होतेय, असं वाटत नाही का?
सिनेमा न आवडल्याच्या तुमच्या मताचा अर्थातच आदर आहे. आणि अर्थातच तो न आवडल्याची जी कारणे तुम्ही दिली आहेत, ती न पटल्याच्या मतांचाही.
अख्तर कॉलिंग अख्तर : फरहान
अख्तर कॉलिंग अख्तर :
फरहान (आपल्या प्रचंड घोगर्या आवाजात) :
पापा, देखिये ना, ये मायबोलीकर्स मुझे कितना क्रिटिसाईज कर रहे है. एक तरफ मेरा फॅन क्लब निकाला है और एक तरफ मेरी फिल्म्स को "प्रेडिक्टेबल" केहेते है.... मुझे कुछ समझ मे नही आ रहा.... पापा.
जावेद (शेरोशायरी मोड ऑन) :
बेटा, इसपर मुझे मेरीही कुछ पंक्तीयां याद आती है..... जरा गौर करना.
बिगडे दुनिया बिगडने भी दो, झगडे दुनिया झगड ने भी दो,
लडे भी दुनिया लडने भी दो, हम अपने धून मे गाये
दुनिया रुठे रुठने दो, बंधन टूटे तुटने दो, कोई छुटे छुटने दो,
ना घबराओ.....
फरहान (आपल्या प्रचंड घोगर्या आवाजात) :
पर पापा, इसका मेरे प्रॉब्लेम से क्या कनेक्शन है.
जावेद :
युंकी.... ईसमे कोई दो राय नहीं है के तुम्हारा फॅन क्लब भी निकला और साथ साथ तुम्हे क्रिटिसाईज भी किया. मगर बेटे, दुनिया का यही दस्तूर है और हमे दुनिया के साथ चलना है.
वैसे तुम्हारा खफा होना "लाजमी" है....... मगर अब जरा फोन जल्दी रखना, क्योंकी दुसरे लाईन पे "आजमी" है.
वा ,मिलिंद! मस्तच रे!
वा ,मिलिंद! मस्तच रे!
चित्रपट आवडला, चित्रपटात कोनि
चित्रपट आवडला,
चित्रपटात कोनि विलन नाहिये, तर त्या ऐवजि मनातिल खंत आणि अबोल विडंबना आहेत असं वाटल.
ह्रितिक च्या पात्रा सारखे निर्जिव जिवन जगनार्यांसाठि एक संदेश आहे या चित्रपटात.
मित्रांचि आठवन करुन देनारा आणी मजेदार चित्रपट असा हा चित्रपट, नक्किच पाहन्यायोग्य.
भुंगा
भुंगा
भुंगा
भुंगा
>> जगण्यासाठी काम कसलं
>> जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
>तो कॉपीरायटर असतो ना? आणि गाड्या उडवत नसला तरी बर्या स्थितीत दिसतो.
साजीर्याचे प्रोफेशन काय आहे?
ओहरऑल आवडला. ७/१०
उगीचच deep न केलेला.
शेवटच्या टायटल्स आधीचे वाक्य माझे नेहमीचे असल्याने किंचीत जास्त.
There has to be a certain kind of restlessness inside you.
One who is at complete peace is not alive.
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते कळले नाही ...
बुम्सबद्दल्चे वाक्य इम्रान ऐवजी अर्जुन का म्हणतो ते नाही कळले.
आजकालच्या टीनेजर्सनी मात्र पाहु नये - टेक वन डे अॅट अ टाईम खूप लिटरली घ्यायचे चुकुन.
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते कळले नाही ...
तिला तो आधी हँडसम हंक म्हणुन आवडला. मग त्याच्याबरोबर आयुष्य स्वतःच्या मनासारखे जगता यावे म्हणुन तिने स्वतःचे तत्वज्ञान त्याच्या गळी उतरवले. ती कतरीना असल्याने त्यानेही ते उतरवुन घेतले नाहितर एवढा पैसे पैसे करणारा शेवटी 'ज्यादासे ज्यादा क्या होगा, नौकरीही जायेगी ना?' हे म्हणणार नाही..
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते कळले नाही ...>> ते आपल्यास दिसत नाही भाउ. साधा पिक्चर आहे.
अभय देओल व काल्की मधील आर्ग्युमेन्ट पाहिले का? एका क्षणा परेन्त अभय तिचे ऐकून घेतो मग तटकन
राहायचे तर राहा नाहीतर एअर पोर्ट वर सोड्तो. म्हणतो. लग्नाचा बाजा तिथेच वाजला आहे. बाकी फक्त निर्णया प्रत येणे. हे आवडले मला.
काल्की एक सर्वस्वी विसंगत असे गर्ली गाणे लावते तेव्हा ह्रितिक व फरहान उगीचच तिला भरीस घालतात ते गाणे म्हणून तो ही अतिशय मस्त सीन आहे. हे गाणे तिथे किती विसंगत आहे ते लगेच जाणवते. झोयातैंना कोणीतरी जबरी स्क्रिप्ट दिले तर त्या सोने करतील.
फायनली बघितला हा पिक्चर...
फायनली बघितला हा पिक्चर... एकदा बघण्यासारखा नक्कीच... काही काही सीन्स जबरी जमलेत....
मी काल बघितला. मस्त आहे.
मी काल बघितला. मस्त आहे. अस्चिग म्हणतो तसं, उगाच डीप नाहीये आजिबात. आवडला! डि वी डी खरेदी करणार. मूड आला की बघता आला पाहिजे असा सिनेमा आहे. तिघांनी कामं मस्त केली आहेत, कटरिना सुद्धा फिट बसते एकदम. हृतिक कमालीचा रिलॅक्स्ड वाटला ह्यावेळी. This is the first time I felt he was having fun!
गाणी, बॅकड्रॉप्स अफलातून आहेत.
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते
लैलाला अर्जुनमधे काय दिसले ते कळले नाही ...>>>>
हे पिक्चर पाहुन कोणाला कशात काय दिसले ते कोणालाच कळले नाहि. लैलाची कसली बात घेउन बसलात ?
लैलाच्या फसण्यामुळेच
लैलाच्या फसण्यामुळेच चित्रपटातील नंतरचे अनेक प्रसंग घडतात - थेट शेवटापर्यंतचे. त्याच जोडीला एकमेकांबद्दल तितकेच माहीत असते जितके आपल्याला.
तसेही न्युअमरॉलॉजीचा वापर केल्या गेलेला उघड आहे (bewitched/enchanted). डेस्टीनीबद्दल अर्जुन कोकलतो त्याकडे नशीबाने इतर दुर्लक्ष करतात, पण चित्रपटाच्या नावाचेच घ्या:
ZNMD
Z=26
N=14
M=13
D=4
6-2=4
1*4=4
1+3=4
4=4
चार वेगवेगळ्या पद्धतिंनी चार वर येऊन ठेपता येते.
ब्रीलिअंट.
काल्की एक सर्वस्वी विसंगत असे
काल्की एक सर्वस्वी विसंगत असे गर्ली गाणे लावते तेव्हा ह्रितिक व फरहान उगीचच तिला भरीस घालतात ते गाणे म्हणून तो ही अतिशय मस्त सीन आहे.
<<< हो झक्कास सीन.. अॅम अ रॉक चिक इन अ हार्ड रॉक वर्ल्ड :).
हा तो सीन... टु गुड :).
http://www.youtube.com/watch?v=H1CLJ9xOE7g
अजुन एक आवडलेली गोष्ट, होणार्या नवर्याला बाजुला घेऊन बसली नाहीये
ह्रितिक शेजारी बसलीये :).
अखेर पाहिला. आवडणे आणि न
अखेर पाहिला. आवडणे आणि न आवडणे यांच्या धूसर सीमारेषेवर कुठेतरी असल्यासारखे वाटले.
त्याची रिक्षा इथे.
http://rbk137.blogspot.com/2011/08/blog-post_09.html
हो झक्कास सीन.. अॅम अ रॉक
हो झक्कास सीन.. अॅम अ रॉक चिक इन अ हार्ड रॉक वर्ल्ड>> ते माझ्या बरोबर सिनेमा बघणार्या नव टीनजर मुलीस माहीत होते व लगेच तिने पण ते काल्की बरोबर म्हटले. आमचा माइंड सेट साधारण त्या रॉक चिक सारखा असतो त्यामुळे ते इथे फिट होत नाहीये हे लगेच कळले.
रच्याकने अस्चिग हान्स झिमरमन इन्सेप्शनचे संगीतकार यांच्या संगीतरचनांमध्ये पण अश्या अशक्य
परफेक्ट न्युमेरिकल व अल्फाबेटिकल अरेंजमेंट असतात. इन्सेप्शन सौंडट्रॅक जरूर ऐकणे.
अमा, लिंक आहे का त्याची
अमा, लिंक आहे का त्याची एखादी?
Pages