बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो. पण पृथ्वीला एखादा नवीन उपग्रह मिळतो की काय अशी शंका आपल्याला यायच्या आत सिंघम त्यांच्या अंगावर उडी मारून तिसर्यालाच तो सुमारे ५०-६० फूट लांब फेकला जाईल व while he is going there वाटेतील दोन चार जीप ची हुडे, सळया, काचा तोडत जाईल एवढी फाईट मारतो.
एवढ्या पावर्फुल माणसाला सर्व व्हिलन्स ना संपवायला तीन तास लागतात हेच आश्चर्य आहे. पण लगे हाथो पोलिस फोर्स चे डोळे उघडणे (झोपेतून नव्हे) ई. समाजोपयोगी कामे व "काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
हा पिक्चर इतका अ. आणि अ. आहे हे आत्ता कळते. पण खरे सांगायचे तर बघताना फुल टाईमपास झाला. काही पिक्चर बघताना आपण एन्जॉय करतो पण आवडला हे नंतर सांगायला जरा अवघड वाटते असे काही असेल तर हा त्यातलाच.
थिएटर मधे मित्रांबरोबर जाऊन तेथील माहौल मधे हा बघणे आणि घरी व्हिडीओ वर बघणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हा बहुतेकांना प्रचंड आवडेल किंवा एकदम प्रचंड अतर्क्य वाटेल.
सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो. त्या एन्ट्री-ढोलांचा ताल एकदम मस्त आहे. पब्लिक जाम रिस्पॉन्स देते. अनेक शॉट्सला टाळ्या पडत होत्या. शेवटी एकदा मंत्री (अनंत जोग) च्या "खुर्चीवर बसताना आठवण यावी" म्हणून मारलेल्या लाथांना जो पब्लिक रिस्पॉन्स मिळतो तो सर्वांनी पाहावा.
बाकी सगळे सरधोपट आहे. मंत्री भ्रष्टाचारी म्हणजे सरळ खुर्चीवर बसून उघडपणे सर्व बोलणारा. राजकारणात मुरलेली व्यक्ती कशी वागेल/बोलेल यात खोल जाण्याचे कारणच नाही. भ्रष्ट पोलिस, नियमाने वागणारे पोलिस हे एकाच शॉट मधे क्लिअर होता. नो ग्रे एरिया. व्हिलन भाषणात बोबडी वळून सुद्धा निवडून येतो हे सध्या अशक्य वाटणार नाही पण तो आमदार की खासदार याचा पत्ता नसताना आपण मंत्री होणार हे त्याला नक्की माहीत असते.
बरेच सहकलाकार मराठी आहेत, जे प्रत्यक्षात मराठी नाहीत त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे मराठी आहेत आणि संवादांत ही मराठीचा भरपूर वापर आहे. गोव्यात शूटिंग खरोखर झाले असावे. गाणे एकही नीट कळत नाही पण प्रभाव सर्व दाक्षिणात्य आहे. अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो, पण येथे निदान त्याला काही चांगले शॉट्स आहेत, थोडेफार त्याचे अस्सल विनोदी कौशल्य दाखवणारेही.
तर रेकमेण्ड करावा का नाही? बघा, हरकत नाही, शक्यतो ग्रूप मधे. दबंग, सनीचे ढाई किलो का हाथ वाले पिक्चर्स या पठतीतील कलाकृती आपण बघत आहोत याची कल्पना ठेवून जा.
फारेंडा मस्त परिक्षण . सिनेमा
फारेंडा मस्त परिक्षण .
सिनेमा टाईमपास आहे , मराठी वाक्यांचा थोडाफार वापर , बाजीरावचे फटके वगैरे मुळे मजा आली बघताना.
जोरदार सिनेमा आहे. .उच्च
जोरदार सिनेमा आहे. .उच्च अभिरूचीवाल्यांनी शक्यतो या सिनेमापासून (आणि धाग्यापासूनही) दूरच राहीलेले बरे. (एकदा सूरज का सातवा घोडा पाहीला...समजला नाही पण अभिमानाने सांगायला झालं).
सिनेमा रिमेकच आहे त्यामुळं साउथचा भडकपणा असणारच. मारामा-यांचा जो ट्रेंड मॅट्रिक्स ने आणलाय त्याचा अतिरेक व्हायला लागलाय. यापेक्षा खालून वर पाचव्या माळ्यावर उडी मारणारे पूर्वीचे हिरो बरे असं वाटू लागलय.
जंजीरमधे पब्लिकच्या असंतोषाला वाट करून देणा-या अमिताभच्या अँग्री यंग मॅन पेक्षाही अजय देवगणचा नायक जोरदार झालाय. पब्लिकचा व्यवस्थेविरूद्ध असणा-या रागाला सिनेमा आणि अजय वाट करून देतो हे या सिनेमाचं खरं यश. हा आनंद मिलाल्यावर मग प्रेक्षक इतर गोष्टींकडं दुर्लक्ष करतो. ( प्रशिक्षित प्रेक्षक आहे आपला).
शेवटच्या सीनमधे घायल मधले कमिशनर आणि एसीपी मधलं संभाषण जसंच्या तसं उचलल्यासारखं वाटल> अजय देवगणची एण्ट्री घातक वरून घेतल्यासारखी वाटली. उचलेगिरी बरीच आहे.
एकंदर परीणाम मात्र भन्नाट ! अतर्क्य आहे हे माहीत असूनही अजयच्या संवांदांना आपण हसून दाद देतोच. शिट्ट्या आणि टाळ्या आपल्यालाही वाजवाव्याशा वाटतातच... तसा ग्रुप असेल तर मग मजाच !!
अरे वा. फारेंडा, रविवारी
अरे वा. फारेंडा, रविवारी ऑफीसला यावं लागल्यामुळे थोडिशी चिडचिड होत होती पण हे परिक्षण वाचताना मूड थोडा बरा झाला. मी सिंघम हे मराठी आडनाव आहे का असं विचारणार होते पण आता जैद्या झालं
सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव
सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
<<<
ही काय ट्रेंड आलीये सध्या हिंदी मधे साउथ सारखी , टीपी असला तरी अगदीच देमार वाटला सिंघम !
देवगणला एकच सांगावसं वाटतं.. Not everyone is Salman Khan to bear such movies :).
खास फारएंड टच रिव्ह्यू. मस्त
खास फारएंड टच रिव्ह्यू. मस्त लिहीले आहे. सिनेमाच्या वाटेला जाणारच नाही. अजय देवगण नॉट माय टाइप.
मी पण कालच हा सिनेमा पाहीला.
मी पण कालच हा सिनेमा पाहीला. टाईमपास म्हणूनच ठीक आहे. 'वॉन्टेड' सिनेमापासून अशा अॅक्शन सिनेमांचं पीकच आलयं.
मला आवडला. अती मारामारी सोडले
मला आवडला. अती मारामारी सोडले तर उत्तम.
>>sometime ridiculously
>>sometime ridiculously bigger reaction >
एकदा पाहणार आहे हा सिनेमा.
sometime ridiculously bigger
sometime ridiculously bigger reaction तू एकटा बघितल्याबद्दल निषेध!
अजयदेवगण हा माझा (एकेकाळचा) फेवरिट अॅक्टर. आता आजकाल त्याने स्वतःचे जे करून घेतले आहे, ते फारसे आवडत नाही. पण जुन्या फॅनगिरीला जागून (मी एकटा) हा सिनेमा बघणार.
deleted
deleted
.
.
"काव्या" हे "सिंघम" इतकेच
"काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
>>>>
फारेंडा, लय भारी.
मेलो हसुन हसुन
मेलो हसुन हसुन
(No subject)
चिंगम
चिंगम
अजून एक लक्षात आले -
अजून एक लक्षात आले - चित्रपटात कोणत्याही शॉट मधे लोकांची करमणूक करणे हा एकमेव उद्देश आहे. क्लायमॅक्स ला व्हिलनला मारायच्या वेळेस सुद्धा इतके विनोद केलेत की लोक हा कधी मरतोय हे ही बघत असतात, त्याच बरोबर त्याच्या विनोदांनाही हसतात ("रजनीकांत नही आ रहा है" म्हणून केलेली नक्कल, पोलिसांपासून पळताना मधेच आडवे झोपणे वगैरे). त्यात पूर्ण चित्रपट भर उभ्या केलेल्या त्या शिक्रे च्या भारी भरकम व्यक्तिरेखेचा पार कचरा होतो वगैरे फार क्षुल्लक गोष्टी आहेत
लायन किंग (थ्रीडी) आणि सिंघम एकाच वेळी रिलीज हा मजेदार योगायोग आहे. "पहिल्यात सिंहाचे कार्टून करायचा प्रयत्न केला आहे, तर दुसर्यात कार्टूनचा सिंह करायचा" असे सुचले होते, पण अजय देवगण वर अन्यायकारक होईल तेवढा वाईट नाही तो
यु ट्यूब वर सिंघम असा सर्च
यु ट्यूब वर सिंघम असा सर्च दिला असता. मनमोहन सिंघम असा व्हिडिओ दिसतोय.
नेमका कोणता सिंघम ओरिजिनल आहे ?
>>लायन किंग (थ्रीडी) आणि
>>लायन किंग (थ्रीडी) आणि सिंघम एकाच वेळी रिलीज हा मजेदार योगायोग आहे. "पहिल्यात सिंहाचे कार्टून करायचा प्रयत्न केला आहे, तर दुसर्यात कार्टूनचा सिंह करायचा" असे सुचले होते, पण अजय देवगण वर अन्यायकारक होईल
जुन्या फॅनगिरीला जागून (मी
जुन्या फॅनगिरीला जागून (मी एकटा) हा सिनेमा बघणार >>> मी पण बघणार पण चित्रपट नेटफ्लिक्सवर ऑनलाइन आल्यावर चार डोस्की घरी बोलावून ग्रूपमध्ये बघणार
(No subject)
चार डोस्की घरी बोलावून
चार डोस्की घरी बोलावून ग्रूपमध्ये बघणार>>> यावरूनही सिंघमचा पोस्टरच आठवतो. त्यात अ.दे. चे चौथे डोस्के दिसत नाही, पण बाकी तीन अशोकस्तंभाप्रमाणेच दाखवलेत परवा जिनामिदो साठी बाहेर थांबलो होतो तेव्हा सिंघम च्या पोस्टर कडे बघून तीन अ.दे. का दाखवले असावेत विचार करताना एकदम लक्षात आले
(No subject)
(No subject)
तो देवगण 'सिंघम' टायटल साँग
तो देवगण 'सिंघम' टायटल साँग मधे हात काय करतो वेड्या सारखे, लहान मुलांना भीती दाखवण्याची अॅक्शन कि बल्ब उघडझाप कसे करतात त्याची अॅक्शन ..महाभयानक विनोदी आहे ते !
काही का असेना, पण 'सिंघम'च
काही का असेना, पण 'सिंघम'च नाही तर अजयचा सिनेमा बहुतेक करुन पैसा वसुल असतो,परवडतो, त्यामुळे मी तर बिन्धास्त बघतोच, तो इतरांपेक्षा नक्कीच वेगळा वाटतो, नाटकी वाटत नाही, माणुस म्हणुन लई भारी वाटतो.
"काव्या" हे "सिंघम" इतकेच
"काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
>>>>> मस्तच लिहिलय. अजून जरा सविस्तर लिहित जा हो.
एकदा सूरज का सातवा घोडा पाहीला...समजला नाही पण अभिमानाने सांगायला झालं >>>
"काव्या" हे "सिंघम" इतकेच
"काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे
सूचना : यू ट्यूब वर सिंघम
सूचना : यू ट्यूब वर सिंघम वरून काही सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्यांचा संगणकीय क्लुप्त्या वापरून बनवलेला व्हिडीओ उपलब्ध आहे. हा व्हिडिओ कृपया कुणाशीही शेअर करू नये अथवा कुणालाही फॉरवर्ड करू नये.
---------------------------------------------------------------------------------------------------------
भाईंचा गझनी (स्मृतीभ्रंश) मात्र बिनधास्त पहा.
अनिल, मामी
अनिल, मामी
(No subject)
Pages