भजी - ओव्याची पाने, डाळीचे पीठ, मीठ, हळद, तिखट, चिमूटभर सोडा, पीठ भिजवायला पाणी, तळण्यासाठी तेल
पराठे - कणिक, डाळीचे पीठ, तांदुळाची पिठी, तेल, हळद, तिखट, मीठ, तीळ
गोळवलकरकाकूंकडे गेले होते. डवरलेला हिरवागार बगीचा! रमाशी गप्पा मारत बसले होते. 'जाताना ओव्याची पानं घेऊन जाशील गं भजी करायला' काकूंचा प्रेमळ आदेश. पाने तर खुडली पण भजी कशी करायची हे कुठे माहित होते अर्थात काकुंनाच पाकृ विचारली. अगदी सोप्पी कृती. घरी येऊन लगेच करायची ठरवलं. वरूणराजालाही मनापासून साथ द्यावीशी वटली म्हणूनच की काय सतत दोन दिवस पडूनही त्याला विश्रांती घ्यावाशी वाटली नाही. मनात ठरवल्याप्रमाणे घरी येऊन लगेच केली. घरच्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घालण्याऐवजी भजी घातली. असो! भजी अप्रतिम लागतात.
कृतीः नेहमीप्रमाणे डाळीच्या पीठात पाने घोळवून भजी तळून गरमागरम सॉस बरोबर खावी
उरलेली पाने व मिरच्या वाटून पीठांमध्ये मिसळून पालकपराठ्याप्रमाणे पराठे तीळावर लाटून शेकावे. वेगळ्या पण छान चवीचे पराठे!
सोडा आयत्यावेळी घालावा.
हे हे मंजु मस्त. मी पण अशिच
हे हे मंजु मस्त. मी पण अशिच करते. पण पराठे करतात हे माहीत नव्हत. आता ते करुन बघेन.
मस्त ओव्याची भजी नेहमी करतो.
मस्त
ओव्याची भजी नेहमी करतो. पराठ्याची आयडिया छान आहे 
उरलेल्य पानांच काय करावं ?
उरलेल्य पानांच काय करावं ? फेकून द्यावीशी वाटत नव्हती. मी सगळ्या पराठ्यांमध्ये ओवा व तीळ घालतेच म्हणून हा प्रयोग करुन बघितला.
पराठ्याची आयडीया झक्कास.
पराठ्याची आयडीया झक्कास. माझ्याकडे भरमसाठ पिक आलेय ओव्याच्या पानांचे... भजी करुन खाण्यात डायटचा मोठा अडथळा. त्यमुळे काय करावे कळत नव्हते.
भजी मस्तच लागतात! पराठे खाऊ
भजी मस्तच लागतात! पराठे खाऊ घाला कोणीतरी
भजी मस्तच लागतात .. चविला...
भजी मस्तच लागतात .. चविला... तोंडाला पाणी सुटल
ओव्याच्या पानांची भजी मी करते
ओव्याच्या पानांची भजी मी करते पण पराठ्याचं माहित नव्हत. आता नक्की करीन.
यम्मी!
यम्मी!
ओव्याच्या पानाची ही पण एक
ओव्याच्या पानाची ही पण एक रेसिपी पहा :
http://www.monsoonspice.com/2011/07/doddapatre-tambli-from-ajjis-kitchen...