पुस्तक पारायण...

Submitted by हर्ट on 7 February, 2008 - 00:00

वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही

आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.)

तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.

या आधिची चर्चा या दुव्यावर वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! नक्की म्हणजे नक्की येईन एकदा... Happy

शंतनू
एका कोळियाने शाळेत असताना वाचले तर त्या पुस्तकाच्या प्रचंड प्रभावाखाली होते त्यानंतर कित्येक दिवस.
पण कॉलेजमध्ये ओल्ड मॅन हातात पडला तर एका कोळियाने चा इफेक्ट्च पुसला गेला. इतके ओल्ड मॅन आवडले.

मी शांतिब्रह्म वाचलं आहे - लीला गोळे यांनी लिहिलेलं.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत ३ वेळा आणि निवडक निवडक भाग कितीतरी वेळा...
एकदा वाचावं असं आहेच ते.
आणि दुसर्‍यांदा तुम्ही वाचणारच ! Happy

एका कोळियाने हा ओल्ड मॅन चा अनुवाद आहे ना?

पु.लं नी अनुवाद केलेले अजून एक पुस्तक - 'काय वाट्टेल ते होईल'
भन्नाट आहे जरूर वाचा. कुणि याचे ओरि जिनल इंग्रजि वाचलयं का?
***************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

लुइस ल' मुर, ह्या लेखकाची अमेरीकन वाईल्ड वेस्ट वर लिहिलेली पुस्तकं, कादंबर्‍या आहेत. २०० - ३०० वर्षांपुर्वी अमेरीका कशी वसली गेली, सार्‍या जगातली माणसं कशी जमली, जगली त्याचं यथार्थ आणि रंजक वर्णन आहे.
ह्यातली बरीचशी पुस्तकं मी सतरा - वीस वेळा वाचली असतील, अजुनही पुन्हा पुन्हा वाचतो.
गॅलोवे, ट्रेजर माउन्ट्न, सॅकेट ब्रॅन्ड, ही काही निवडक नावं, काही कथा संग्रहही आहेत.
पहा वाचुन, नक्कीच आवड्तील.
Joan Harris ह्या लेखीकेचं Chocolate, five quarters of an Orange वेगळी आणी विलक्षण पुस्तकं आहेत. कुणी वाचली असतील त्यांच्या बरोबर बोलायला मला आवडेल

इथे आल्यापासून मराठी वाचन जवळपास बन्द झाले आहे Sad वरचे वाचल्यामुळे आता पुन्हा हुरूप आला आहे Happy
मागवतेच आता देशातुन..
मी पारायण केलेली..पु ल ची जवळपास सगळी, श्रीमान योगी, राधेय, सागरा प्राण तळमळला,

मी इन्ग्रजी शेरलोक होम्स सोडुन काही वाचले नाहिये, सुचवा ना छान छोटी पुस्तके?
old man and the sea Earnest Hemingway che na?

अजुन एक प्रश्न,, प्रेन्गन्ट असताना वाचायला पुस्तके सुचवा ना..मैत्रीणीला भेट देन्यासाठी हवी आहेत..

मी नुकतेच गुरुनाथ नाइक यान्चे 'सद्दाम' हे वाचुन सम्पवले आहे. त्यात सद्दामचा आणि बुश चा खरा चेहरा (नि:पक्शपातिपणे) दाखविलेला आहे. शिवाय त्याला भारतियान्बद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा हि दाखविलेला आहे. मुस्लिमान्चा कट्टरपणा बद्दल असलेलि चिड हि दाखवलेलि आहे. जरुर वाचुन पहन्यासारखे पुस्तक आहे.

hi

मी तशि वचनात एवधि तर्बेज नाहीये मात्र जेव्हा वेल मीलेल तेव्हा कहितरि वाचायचा प्रयत्न करते.

मद्यन्तरि बरिच वपु आनि पुल चि बरिच पुस्तक वाचलित अनि सध्या स्वामी घेतलय वाचायला.

मध्ये मी सुधा मुर्थीन्चि १/२ पुस्तक वाचलित पन् पोत नाही भरल.

मी शेजारच्या अजोबान्कडुन "दुर्दैवि रन्गु" ह्या पुस्तकाच नाव ऐकल होत. पर्वा ते वाच्ण्याचा योग आला. पानिपत वर हे अस पन पुस्तक असेल अस वाटल नव्हत. केवळ अप्रतीम.

नेगल, मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी आणि वपुर्झा- कधीही , कितीही वेळा वाचू शकते मी तर ..!!!

मृत्युंजय - शिवाजी सावंत
स्वामी, श्रीमान योगी - रणजित देसाई
सखी - व पु
बाबासाहेब पुरंदरे ह्यांच कुठ्लहि पुस्तक....

ययाती
मृत्युंजय
मानसशास्त्रावरची काही इंग्रजी पुस्तके
ज्योतिषविषयक काही.

Pages