नमस्कार मावळ्यांनो....
पहाटेच्या सुमारास ५ वाजताच आम्ही १५ मावळ्यांनी आमची ट्रव्हलर भोर वरंधा घाट मार्गे पिटाळली.
सासवड्च्या मोहिनी हॉटेलात गरमागरम मिसळ चा आस्वाद घेतला. आणि पुरंदर मार्गे भोर ला प्रस्थान केले.
गाडीतुनच पुरंदरला मुजरा केला .त्याने दाट धुक्यांची चादर पांघरली होती.
दुरुनच संभाजीरजांचे दर्शन घेउन आम्ही भोरकडे प्रस्थान केले. भोर ओलांड्ल्यानंतर लगेच गाडीतुनच दुरवर एक किल्ला दिसत होता.
पण या भागचा परिसर आभ्यास थोडा कमी असल्याकरणाने त्याचे नाव समजु शकले नाही. पण मला वाटते तो रायरेश्वर असावा.
आज पाउसाने बरीच उघडीप दिल्या कारणाने आम्ही भरपुर एन्जोय नाही करु शकलो.पण वरंधा घाट सुरु झाला आणि निसर्गाने त्याचे चमत्कार(खरे रुप) दाखवायला सुरु केले.
पाउस कांही येत नव्हता अणि आम्ही गाडीत बसुन बोर झाल्यामुळे वाटेतच एका धबधब्या खाली मनसोक्त भिजन्याचा आनंद घेतला.
आपल्या मावळ्याची एक अप्रतीम पोझ.......
माझ्या ऑफीसचे मावळे....
तेथुन कावळ्या किल्यावर गरमागरम भजे खाल्ली.
वरंधा घाटामुळे कावळ्या किल्याचे विभाजन झाले आहे.
दुरवर कावळ्याची एक माची दिसत आहे.
येथुन दिसणारा निसर्ग त्याची तुलना मी स्वर्गाशीच करेन .
दरीच्या एका टोकाला थांबुन मी निसर्गाला साद देताना.
कधी कधी असे वाट्ते या निसर्गातच रमुन जावे.
दुपारी बाराच्या सुमारास अम्ही शिवथरघळला पोहंचलो. शिवथरघळचा धबधबा खुपच भारी आहे राव.
पण तिथे त्याच्या खाली डुंबण्याची परवाणगी नाही. पण शिवथरघळ या जागेचे महत्व आम्हाला खर्या अर्थी आज समजले . समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती जागा. त्या जागेचे तिथल्या रम्यतेचे दर्शन घेउन अम्ही खरेच धन्य झालो. समर्थ रामदास स्वामींनी याच गुहेत "दासबोध" हा ग्रंथ लिहीला.
समर्थ रामदास स्वामींची मुर्ती....
माझ्या ऑफीसचे मावळे....
म्या निवांत रस्त्यावर पहुड्लो....
ही गुहा खरेच खुप शांत अणि सुंदर आहे.
समर्थ रामदास स्वामींचे दर्शन घेउन आम्ही गडांचा गड रायगड्ला प्रस्थान केले. पण वाटेत आमची गाडी पंक्चर झाल्याकारणाने आम्ही तोपर्यत फोटो सेशन करुन घेतला.
अम्ही ४ च्या सुमारास रायगडाच्या पायथ्याला पोहंचलो. वेळेच्या आभावी आम्ही रोप-वे नेच वरती गेलो.
खरे तर एका मावळ्याला अशा रितीने गड सर करणे कधीच आवड्णार नाही. पण ट्रीप ऑफीशीअल असल्यामुळे शेवटी रोप-वे चा देखील आनुभव घेतला.
रायगड बद्द्ल एक म्हण आहे. "या गडावरती येण्याची हिम्मत होईल ती फक्त वारयाची अणि खाली जातील त्या फक्त पाण्याच्या धारा". त्याची खरी प्रचीती आज आली .
रोप-वे ने जाण्याचा एक फायदा जरुर झाला. आम्हाला गाईड मिळाला. जो आपल्या सारखाच बाबासाहेब पुरंदरे चा शिश्य होता.
मला रायगडाबद्द्ल बरेच माहित आहे. पण तेथील बांधकामाचे शास्त्रोक्त पद्द्तीने महिती आज या आपल्या मावळ्याने दिली. याचे नाव "आनिल धीवरे" जो आपल्यासारख्या मावळ्यांच्या मदती करीता त्याने आपले आयुश्य वाहुन दिले आहे. तो मुळचा नाशिक चा . तो आपल्या सारख्या मावळ्यांना मद्त करण्या करीता तो सतत तत्पर असतो. कधी रायगडा वरती गेलात तर त्याची आवश्य भेट घ्या. तो तुम्हाला कोणत्याच अपेक्षेविना मदत करेल. गडंची संपुर्ण महिती सांगेल.
आम्ही वेळे अभावी खुप कांही पाहु शकलो नाही. पण शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले जगदीश्वराच्या मंदिरात माथा टेकविला थोर वास्तु तज्ञ ज्यांनी रायगडाची निर्मिती केली ते"हिरोजी ईंदुलकर" यांच्या नावांचा उल्लेख असलेल्या पायरीचे दर्शन घेतले.
शिवाजी महाराजांचे राजसिंहासन.......
जगदीश्वरची मुर्ती....
दाट धुक्यामुळे आम्ही कांहीच पाहु शकत नव्हतो . मग आम्ही नोव्हेंबर महिन्यात परत रायगड ला येण्याचे पक्के करुनच रात्री ८.३० ला गड उतरला आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
शिवाजीराजे आणि त्यांचे किल्ले
शिवाजीराजे आणि त्यांचे किल्ले ह्या बद्दल नेहमीच वाचायला आवडते. पण अशा गडाच्या वार्यांबद्दल वाचुन आपण पण जावे असे खुप वाटते. बघु, केव्हा मुहुर्त लागतो ते.
खुपच छान!!
मस्त रे
मस्त रे
किल्ले रायगड महाराष्ट्राची
किल्ले रायगड महाराष्ट्राची शान, एक पवित्र वास्तु ... कितीही वेळा जा तेथे परत परत जावेसे वाटते...
पवन भाऊ लगे रहो
छान वर्णन ! व्यक्तिन्चे चे
छान वर्णन ! व्यक्तिन्चे चे फोटो कमी आणि निसर्गाचे फोटो जास्त हवे होते.
भजेवाला आणी माकडाची पोझ
भजेवाला आणी माकडाची पोझ मस्तच.
मला खूप आवडले. रायगडास जायचे
मला खूप आवडले. रायगडास जायचे फार डोक्यात आहे. तुम्ही सर्व गट पण फार छान आणि उत्साही वाटता.
मोअर सच ट्रिप्स.
ही खरी घळ का खोटी खळ? दोन
ही खरी घळ का खोटी खळ? दोन आहेत ना? ( संदर्भ : मायबोलिवरचा धागा)
मस्त !
मस्त !