माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
कडकडीत मोहन घालून घट्ट कणिक
कडकडीत मोहन घालून घट्ट कणिक भिजवायची आणि तेल चांगले तापवून पुर्या तळायच्या (असे सल्ले ह्यापूर्वी येऊन गेले आहेत).
पुर्यांची कणिक घट्ट भिजवताना
पुर्यांची कणिक घट्ट भिजवताना त्यात २/४ चमचे बेसन घालावे, १ चमचा साखर घालावी. पुर्यांना रंगही छान चकचकीत सोनेरी येतो अन त्या तेलकटही होत नाहीत. तेल छान तापलेकीच पुरी तेलात सोडावी .
कोल्हापुरात काकवी घेतली.
कोल्हापुरात काकवी घेतली. फ्रिजमधे ठेवली. २ महिन्यांनी थोडा फेस बाटलीच्या तोंडाशी दिसू लागला. किंचित आंबट वासही वाटला. म्हणून पातेल्यात गॅसवर उकळायला ठेवली. तर इतका प्रचंड फेस आला की पातेल्यातून उतू जायला लागला. ते आवरता आवरता तोंडाला फेस आला. आता आंबट वास कमी आहे पण चव घेण्याची हिंमत नाही. ही काकवी फेकावी लागेल काय? जाणकार मार्गदर्शन करा.
मानुषी, बहुतेक काकवी आंबली
मानुषी, बहुतेक काकवी आंबली असणार . आमच्याकडेही २-३ आठवड्यापुर्वी सेम सीन झाला होता, आठवडाभर फ्रिजमध्ये ठेवुन बॉटल बाहेर काढली, झाकण उघडल्यावर भरपुर फेस आला, आंबट वास तर होताच.फेकुन दिली सगळी काकवी.
सगळं माझं काय चुकलं एकाच
सगळं माझं काय चुकलं एकाच ठिकाणी विचारण्यापेक्षा तुमच्या समस्येवर नवीन सुविधा वापरून प्रश्न विचारलात तर बाकीच्या मायबोलीकरांना (आणि तुम्हालाही) भविष्यात शोधणं सोपं जाईल.
धन्स..दिनेशदा,प्राजक्ता
धन्स..दिनेशदा,प्राजक्ता आर्च
कणीक तेल न घालताच घट्ट मळली..थोडा मैदा पण घातला होता. २-३ च पुर्या केल्या त्यानंतर सगळ्याच साध्या पोळ्या केल्या
पुर्यांसाठी दोन वाट्या कणिक
पुर्यांसाठी दोन वाट्या कणिक घेतली असेल तर त्यात मोहन आणि पाववाटी आपला नेहमीचा रवा (कच्चा न भाजता) घालून कणिक घट्ट मळायची.. पुरी लाटताना तेलाचं बोट पोळपाटाला पुसुन लाटायची, पीठ अजिबात लावायचं नाही... अजिबात तेलकट होत नाही.. फार पातळ लाटायची नाही , नाहीतर पापुद्रा तडकून आत तेल शिरतं... मग ते काढणं मुश्किल तर होतंच, पण अगदीच काढलं तरिही पुर्ण निघत नाही...
पुर्यांसाठी इथे धागा काढलाय
पुर्यांसाठी इथे धागा काढलाय - http://www.maayboli.com/node/25386
पुढील चर्चा इथे न करता कृपया तिकडे करा. दक्षिणा, तुझी पोस्ट तिथे हलवशील का?
काल मायक्रोवेव्हमधला केक
काल मायक्रोवेव्हमधला केक केला. नेहमी करते तशीच कृती केली. केक झाला. अगदी बाजूने सुटून वगैरे आला छान.


झाल्यावर बाहेर काढून ठेवला. इतर कामात गुंतल्याने जवळजवळ एक तासाने केक भांड्यातून प्लेटमध्ये काढला. तर काढताना केक सलग निघाला नाही. थोडा भाग भांड्याच्या तळाला चिकटून राहिला. केकही जास्तच हलका झालाय.
मी कोका पावडर घातली होती पण चार मिनिटंच लावली होती मावेत. त्यामुळे असं झालं असेल का? एखादं मिनिट जास्त लावायला हवं होतं का? पण मी नेहमी चार मिनिटंच लावते, कोका घातला तरीही.
मध्येच फोन आल्याने बोलताबोलता अंडी जास्तवेळ फेटली गेली. त्यामुळे तर नाही ना केक जास्त हलका झाला?
काही कळत नाहीये.
मध्येच फोन आल्याने बोलताबोलता
मध्येच फोन आल्याने बोलताबोलता अंडी जास्तवेळ फेटली गेली. त्यामुळे तर नाही ना केक जास्त हलका झाला?
>>
प्राची, हे कारण असु शकतं केक हलका होण्याचं.
हो ना. वाटलंच मला. पूर्वी
हो ना. वाटलंच मला. पूर्वी फुप्रोमध्ये फेटायचे मी अंडी. आता फुप्रो कुठेतरी गडदणीत असल्याने हातानेच फेटते. मग नीट फेटली जावीत म्हणून जरा जास्तच सिन्सिअरली फेटते.
सगळं माझं काय चुकलं एकाच
सगळं माझं काय चुकलं एकाच ठिकाणी विचारण्यापेक्षा तुमच्या समस्येवर नवीन सुविधा वापरून प्रश्न विचारलात तर बाकीच्या मायबोलीकरांना (आणि तुम्हालाही) भविष्यात शोधणं सोपं जाईल.>>> ओहो.
इकडे लिहायचं नव्हतं का? मी वरील पोस्ट वाचली नव्हती. 
आता परत प्रश्नाचा धागा काढू का?
म स मदद करो रेऽऽऽ
इकडे लिहिलंस तरी चालेल
इकडे लिहिलंस तरी चालेल प्राची, पण नविन सुविधा वापरलीस तर तिथे रेटिंग आणि वोटिंग असल्यामुळे बाकिच्यांनाही फायदा होईल.
लिहिण्यासाठी नवीन सुविधा
लिहिण्यासाठी नवीन सुविधा कुठे आहे?
जामोप्या मायबोलीच्या या
जामोप्या
मायबोलीच्या या पानाच्या उजव्या बाजूला नवीन धागा, नवीन प्रश्न, नवीन गप्पांचे पान असे पर्याय दिसतील.
इथे बर्याच जणींच्या पोस्ट मधे
इथे बर्याच जणींच्या पोस्ट मधे " आठवड्याच्य स्वैपाकाची पूर्व तयारी" असा रेफरन्स येतो. असा कुठे बाफ
आहे का? मी बराच शोधला पण मिळाला नाही.
हे घ्या
हे घ्या http://www.maayboli.com/node/25725
हा एक जुन्या
हा एक जुन्या मायबोलीतला-
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/60019.html
IE मध्ये पहा.
पीहू आणी लालू धन्यवाद गं ,
पीहू आणी लालू धन्यवाद गं , पीहू मी तोच बाफं वाचून हा प्रश्नं विचारला कारणं तिथे आठवड्याच्या
स्वैपाकाची पूर्वतयारी बद्दल चर्चा होती.
लालू तू दिलेलाचं धागा मी शोधत होते पण तो जुन्या हितगूजवर होता हे माहीती न्हवत.
शोधुन दिल्यामुळे आता वाचता येइल.
२ आब्याचे लोणचे केले आणि
२ आब्याचे लोणचे केले आणि त्यात गार फोडणी घातली. मेथीदाणे घालुन. पण आता ते लोणचे कडू लागत आहे
काय कारण असावे? आणि उपाय काय आता ह्यावर? मला मदत करा कोणीतरी!!
आताच ४ तास आटवून बासुंदी
आताच ४ तास आटवून बासुंदी केली, पण तळाला लागली आहे , तर वास जाण्यास काय करु?
वेलदोडा पूड घातली आहे.
मला तरी वाटत नाही बासुंदी
मला तरी वाटत नाही बासुंदी करपल्याचा वास लागलेला जाईल म्हणून.
नाही जाणार बहुदा
नाही जाणार बहुदा
मलाही नाही वाटत बासुंदीचा वास
मलाही नाही वाटत बासुंदीचा वास जाईल असे. अगदी थंद करुन दिली, तरी जिभेला ते जाणवेलच.
बासुंदी /रबडी/खीर/दुध
बासुंदी /रबडी/खीर/दुध करपल्याचा वास काहीही केले तरी जात नाही..दुध आटवताना पातेले,कढई,पॅन तळाला कितीही जाड बुडाचे असले तरी थोडे दुध आटवल्यावर खाली तवा ठेवुन आटवावे..
एक कैरीच्या फोडी तिखट- मीठ लावुन लोणच्यात टाकाव्या..मेथीचा कडुपणा कमी होइल..
चारुता, पुढल्या वेळेकरता:
चारुता, पुढल्या वेळेकरता: काहीही आटवताना (अगदी कढी करताही) पातेल्यात खाली आधी एक हलका पाण्याचा लेअर द्यावा. पाव कपापेक्षाही कमी (बासुंदीकरता). बारीक गॅसवर अधे मधे ढवळत उभं रहावं.
हो दिनेशदा , रात्रभर फ्रीज
हो दिनेशदा , रात्रभर फ्रीज मधे असून ही चव जाणवती आहेच. सायो मी पाण्याचा लेअर दिला होता.
आता बहुतेक मला च कुल्फी खावी लागेल
चारुता, रोजवॉटर/इसेन्स नी
चारुता, रोजवॉटर/इसेन्स नी जाईल का? वाटीभर बासुंदीवर प्रयोग करुन बघायला हरकत नाही. जमलं तर इथे सांगा
थंड तपमानामूळे जिभेची गोड चव
थंड तपमानामूळे जिभेची गोड चव जाणवण्याची क्षमता कमी होते. पण लागलेला वास नाकाला जाणवतो आणि मग जिभेलाही चव जाणवते.
मला एक सांगा,आपल्या पारंपारिक
मला एक सांगा,आपल्या पारंपारिक लिंबू लोणच्यात आंब्याच्या लोणच्यासारखं तेल घालतात का?
मी दोनवेळा तेल न घालता केलं,पण ते थोडंच असल्याने लगेच संपवायचे असल्याने प्रश्न नव्हता.
आत्ता जरा बरणीभर घालायचा बेत आहे.
Pages