विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.
मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्या अश्या होतील..
पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको
महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)
हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....
कोणाशी मॅच आहे राफाची?
कोणाशी मॅच आहे राफाची?
Gilles Muller टाय ब्रेक
Gilles Muller
टाय ब्रेक जिंकला राफाने . मुल्लरचा डबल फॉल्ट पथ्यावर पडला.
राफाला इंज्युरी स्केअर. ओह नो.
आणि पाऊस.
आला आला वारा संगे पावसाच्या
आला आला वारा संगे पावसाच्या धारा...center court वरची मॅच सुरू आहे -अॅन्डी वि. लुबुचिच.
अॅन्डी वि. लुबुचिच - शेवटी
अॅन्डी वि. लुबुचिच - शेवटी अॅन्डी जिंकला. लु १५ हजार अॅन्डी समर्थकां पुढे खेळत असून फार शांत पणे खेळला आणि अॅन्डी ला सहजा सहजी जिंकू नाही दिला. ४ थ्या सेटला लू तो सेट जिंकतो आणि मॅच ५ व सेट ला जाते अस वाटल. अॅन्डी चि पुढची मॅच गॅस्के सोबत.
शारापोव्हा, वॉझनियाकी सरळ
शारापोव्हा, वॉझनियाकी सरळ सेट्स मध्ये जिंकल्या...
राफाने दुसरा टायब्रेकर जिंकला..
राफा पण जिंकला.. तिसरा सेट
राफा पण जिंकला.. तिसरा सेट ६-० !
दुसरा सेट चांगला झाला..
तो नदालविरूद्धचा म्युलर एकदम
तो नदालविरूद्धचा म्युलर एकदम फट्टू निघाला. एवढी चांगली सर्व्हिस करत होता, पण अत्यंत हताशपणे खेळत होता असे वाटले. साधे साधे लॉलीपॉप फोरहॅन्डसुद्धा नेटमध्ये मारत होता.
जोको- बघदातिस चांगली चालू आहे मॅच. १-१ झालाय सेट.
जोको बघदातिस मॅच मस्त झाली
जोको बघदातिस मॅच मस्त झाली !!!! क्राऊड पण एकदम उत्साहात होतं.. विंबल्डनला हे जरा कमीच दिसतं..
दोघांचंही कोर्ट कव्हरेज अफाट होतं.. काही काही रॅलीज आणि व्हॉली खूप्प्पच सही होत्या !
जोकोची सर्व्हिसपण मस्त पडतेय एकदम
आजचा दिवस एकूणात सार्थकी लागला.. शारापोव्हा, नदाल, वोझनियाकी, सेरेना आणि जोको सगळ्या मॅचेस पाहिल्या.. आणि त्या मस्त झाल्या.. मधे स्किव्होनी आणि त्या इव्हानोविकची पण पाहिली..
पुढच्या आठवड्यात मजा येणार..
नाल्बांडियन जास्तच फट्टु
नाल्बांडियन जास्तच फट्टु निघाला
सोडरलिंग गेला. बर्नार्ड टॉमिक या क्वालिफायरकडून हरला.
क्वालिफायिंग राउंडस मधून आलेला Lukasz Kubot सुद्धा शेवटच्या सोळात पोचलाय.
फेडीच्या मॅचला तेंडुलकर
फेडीच्या मॅचला तेंडुलकर आला
आम्ही नाही पाहिला
भरतजी हि लिंक पहा. तेंडूलकर
भरतजी
हि लिंक पहा. तेंडूलकर दिसेल
http://www.wimbledon.com/en_GB/news/match_reports/2011-06-25/20110625130...
धन्यवाद गौरांग
धन्यवाद गौरांग
सेरेना हरली ! वर्षभरानंतर परत
सेरेना हरली !
वर्षभरानंतर परत आल्यावर ती एकंदरीत चांगली खेळली असच म्हणायला हवं. तिचा फॉर्म परत येणार नक्की.
शारापोव्हा सरळ जिंकली.
वॉझनियाकी दुसर्या सेटचा टाय ब्रेकर हरली !
सेरेना - बार्टोली सामना पूर्ण
सेरेना - बार्टोली सामना पूर्ण कोणी बघितला का? सरळ दोन सेटमधे सेरेना हरली. 6-3, 7-6
पूर्ण नाही. पहिला सेट आणि
पूर्ण नाही. पहिला सेट आणि दुसर्या सेटचे पहिले २ गेम्स पाहिले..
पग्या.. यंदा वरचे अंदाज बरेच
पग्या.. यंदा वरचे अंदाज बरेच बदलणार की रे...
मी दुसऱ्या सेटचे शेवटचे दोन
मी दुसऱ्या सेटचे शेवटचे दोन गेम बघितले. बार्टोली सॉलिड अॅग्रेसिवली खेळली. शेवटचा पॉईंट तर सेरेनाने अक्षरशः बहाल केला तिला.
बर्नार्ड टॉमिक क्वार्टर
बर्नार्ड टॉमिक क्वार्टर फायनलमध्ये पोचला.ल्युकास क्युबोट हा दुसरा क्वालिफायरही दोन सेट्स जिंकून पुढे आहे, लोपेझविरूद्ध. हिस्टरि इन मेकिंग?
वोझ्नियाकी तिसरा सेट खेळतेय.
क्युबोट डबल्स मधला चांगला
क्युबोट डबल्स मधला चांगला खेळाडू आहे.... सकाळी थोडा वेळ हायलाईट्स मधे टॉमिकला खेळताना बघितला.. कसला धोपटतो तो.. बांग बुंग एकदम..
व्हिनस, आज हारणार की जिंकणार??? पहिल्या सेट मध्ये ५-२ मागे..
व्हीनस काकू गेल्या. ६-२
व्हीनस काकू गेल्या. ६-२ ६-३
शारापोव्हा ला चांगली संधी आहे या वेळी.
दोन्ही विल्यम्स हारल्या की
दोन्ही विल्यम्स हारल्या की
महिला एकेरी स्पर्धेत अजून एक
महिला एकेरी स्पर्धेत अजून एक धक्कादायक exit - वोझनियाकी हरली. पहिला सेट ६-१ नि जिंकली पण २ आणि ३ मधे सिऊलकोवा नि जोरदार फोर्हॅन्ड चा वापर करत वो ला ७-६, ७-५ नि हरवल. त्यांचा एक गेम तर २६ शॉट्साचा चालला. अवघ्या ५'३" ऊंचिची सिऊलकोवाची पुढाची मॅच शारापोव्हा सोबत आहे आणि सिऊलकोवा खूप confident पण वाटत आहे!
नदाल वि. पेट्रो - सध्याचा
नदाल वि. पेट्रो - सध्याचा स्कोरः ७-६, ३-६,७-६,५-३
जिंकला राफा !!! फारच दमणूकीचा
जिंकला राफा !!!
फारच दमणूकीचा आणि धक्कादायक दिवस होता.. व्हिनस आणि सेरेना हरल्या, वॉझनियाकी हरली..
२००६ नंतर पहिल्यांदाच महिला विजेतीच आडनाव "विल्यम्स" नसणारे
राफा आणि फेडरर १-१ सेट हरले..
क्वार्टर फयनलला कोण कोण नविन नविन बाया आल्यात ! वॉझनियाकी बहूतेक सॅफिना आणि यांकोव्हिच च्या पंक्तीला बसणार.. !!
वॉझनियाकीच्या विरुद्ध
वॉझनियाकीच्या विरुद्ध जिंकलेली कोण ती (नावं फारच अवघड आहेत ब्वा!) काय फटके मारत होती! बुलेट्स!!
व्हीनस आता नक्की हरली बर्का पग्या (अवांतर, तरीही रिलेटेड- तिचा ड्रेस काय भयंकर होता!! :अओ:) तिच्याविरुद्ध जिंकलेली एकदम गोड आहे (काय म्हणतोस सँटी यावर? ;))
सिबुलकोवा का? सेरेनाविरुद्ध
सिबुलकोवा का?
सेरेनाविरुद्ध बार्टोली पण मस्त खेळत होती. बाकी व्हीनसबैंच्या ड्रेसबद्दल न बोलणंच बरं.
नादालची मॅच कोणी पाहिलीं का?
नादालची मॅच कोणी पाहिलीं का? त्याच्या पायाचा घोटा कसा आहे?
काल फक्त पहिला सेट पाहिला.
राफाचा घोटा फारसा त्रास देईल
राफाचा घोटा फारसा त्रास देईल असे वाटत तरी नाहीये.. पण उपांत्य पूर्व फेरीत झगडायला लागले तर काही सांगता येत नाही.. काल डेल पोट्रो चांगला खेळत होता.. कुठेतरी मधेच एकाग्रता घालवली आणि मार खाल्ला...
बाकी महिलांमध्ये पूर्णपणे नवीन विजेती बघायला मिळेल असे वाटते आहे.. पिरोन्कोव्हा आणि शारापोव्हा ह्यांच्यात फायनल होण्याचे चान्सेस आहेत..
महिलांच्या क्वार्टर फायनल्स
महिलांच्या क्वार्टर फायनल्स आजच. त्यांना नको वाट्ट आराम?
आज ब्रायन ब्रदर्स आणि मिर्झाबाईंच्या दोन दोन मॅचेस आहेत.
राफा.................विम्बल्ड
राफा.................विम्बल्डन च्या बाहेर...................................
आता फेडरर ला जास्त संधी....................................
Pages