विंबल्डन - २०११

Submitted by Adm on 15 June, 2011 - 11:06

विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
गतविजेती सेरेना विल्यम्स आणि माजी विजेती व्हिनस विल्यम्स ह्यांनी दुखापतीतून सावरून ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन निश्चित केलं आहे. ह्या दोघींना अनुक्रमे आठवे आणि चोविसावे मानांकन मिळाले आहे.

मानांकनानुसार खेळाडू आपापले सामने जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेर्‍या अश्या होतील..

पुरूष एकेरी :
राफा वि बर्डिच
मरे वि रॉडिक
फेरर वि फेडरर
सोड्या वि जोको

महिला एकेरी :
वोझजियाकी वि शारापोव्हा
ना ली वि सेरेना
स्किव्होनी वि अझारेंका
क्विटोव्हा वि झ्वोनारेव्हा (ह्या भागात व्हिनस पण आहे)

हा धागा यंदाच्या विंबल्डनविषयी चर्चा करण्यासाठी....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहातय की नाही कोणी ?

व्हिनस किरकोळीत जिंकली... तिची मॅच पाहिली.. जोरदार खेळली.. !
राफाची मॅच सेंटर कोर्टवर सुरु झालीये..

पहिल्या आठवड्यात सगळी कोर्टस किती हिरवीगार दिसतात !!!

पाऊस Uhoh

हो... आज, उद्या आणि परवा अपेक्षित होता म्हणे पाऊस..

आजच्या दिवसाचे हायलाईट्स..
राफा, व्हिनस, मॉन्फिल्स, बर्डिच, वावारिंका सरळ सेट्समध्ये जिंकून पुढच्या फेरीत..

झ्वोनारेव्हा ला तीन सेट्स पर्यंत लढत द्यावी लागली... स्क्विव्होनी आणि डॉकीक १-१ सेट जिंकून तिसरा सेट खेळत आहेत..

ती सेरेनाच्या विरुद्ध टिकेल असं वाटलं च कसं तुला आडो...

यांकोविच पण बाहेर.. सर्बियन महिला खेळाडू कन्सिस्टन्सीच्या बाबतीत मार खातात काय.. ती इव्हानोवीच पण तशीच...

एक सेट तर घेतला होता. पण सेरेना फार जिद्दी खेळाडु आहे. तिच्यासमोर टिकणं अवघड आहे खरं.

भारतात कुठे दाखवताहेत? स्टार स्पोर्टस् की इएसपीएन? अचानक दिसेनासं झालंय Sad मला कार्ड परत रीचार्ज करावं लागणार आहे.

फ्रान्सिस्का सियाव्होनी, व्हेरा झ्वोनारेव्हा, कुझनेत्सोवा या बायांना घाम गाळायला लागला. सेरेनाताईंनी घाम गाळला, अश्रूही ढाळले.
आतापावेतो चार सीडेड महिला खेळाडू पहिल्या फेरीत गारद.
सध्या रॉफे मोरपीस घेऊन खेळतोय.

आज ऑफिसला दांडी मारून सर्व मॅचेस पाहिल्या !

शॅरापोव्हा ने पुढच्या मॅचेस रॅकेटला चप्पल किंवा मिर्ची लिंबू बांधून खेळावं.. म्हणजे कोणाची नजर लागणार नाही.. Proud जोरदार ग्राऊंड स्ट्रोक्स मारले.. सर्व्हिसही बरीच चांगली करत होती त्यामानाने..
जोको पण मस्त खेळला..
सेरेना सुरुवातीला खूप टेंटेटिव्ह खेळत होती.. शिवाय तिची हालचालही नेहमीसारखी होत नव्हती.. २ सेटस मध्ये जिंकली शेवटी..
रॉडीक ठिक ठिक.. त्याच्या विरुध्द जो होता तो पण मस्त खेळत होता..रॉडिकने अनुभवाच्या जोरावर बाजी मारली..
इसनर माहूट पहिला सेट परत टायब्रेकरला गेला होता !!!
ब्लेक वि बघदातिसचा शेवटचा सेट पाहिला.. ती मॅच पण जोरदार झाली एकदम.. बघदातीसला बर्‍याच दिवसांनी पाहिलं.. एकदम जोषात होता..
वोझनियाकी पण किरकोळीत जिंकली..
जँकोविक परत ढेपाळली !!!
फेडररच्या मॅचच्या वेळी झोपलो होतो.. उठेपर्यंत मॅच संपली.. Happy

बायांमध्ये व्हिनस वि शारापोव्हा अशी फायनल व्हायला पाहिजे... !

हिम्या, माहितीये रे मला की सेरेनासमोर ती टिकली नसती. पण तिच्या सुरुवातीच्या खेळावरून खूप आशा निर्माण झालेल्या. मला आवडलं असतं ती जिंकली असती तर.

विल्यम्स भगिनी अजिब्बात म्हणजे अजिब्बातच नाही आवडत.

विल्यम्स भगिनी अजिब्बात म्हणजे अजिब्बातच नाही आवडत. >>>> Happy मला अगदी सुरुवातीला त्या आल्या होत्या तेव्हा वाटायचं तसं... पण नंतर वाटेनासं झालं... त्या दोघी जबरदस्त आहेत.. सहज हार मानत नाहीत अजिबात.. आणि विंबल्डनवर त्यांनी गेले दहा-अकरा वर्ष अक्षरशः हुकमत गाजवली आहे...
असो..

सँट्या.. अगदी मॅचेससाठीच दांडी मारली असं नाही.. पण मग सगळ्या मॅचेस पाहिल्या.. Happy

दाते काकू आणि व्हिनस ताई ह्यांची मॅच जोरदार चालू आहे.. पहिल्या सेट मध्ये व्हिनस १-५ ने मागे होती त्यावरून सेट टायब्रेकरमध्ये गेला... पण टायब्रेकर दाते काकू जिंकल्या.. दुसरा नेक टू नेक सुरु आहे..

फार जबरी चालू आहे मॅच... तिसरा सेट पण नेक टू नेक चालू आहे... डाटे बिच्चारी पहिल्या सेट मध्ये चांगला अ‍ॅडव्हँटेज घालवला.. तो सेट पटकन जिंकली असती तर व्हिनस वर फारच दडपण आले असते.. डाटे बाईंचे वय फक्त ४० वर्षे आहे.. आणि त्या व्हिनसला चांगलीच टफ देत आहेत.. गेल्या वर्षी कम बॅक केला त्यांनी लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी..

गांबारे दातेssssssss

दातेकाकूंचा अंदाजच येत नाहीये, आयत्यावेळेस कच खातायत असं वाटतंय.

huh !! जिंकली एकदाची व्हिनस.. !!

पहिल्या सेटच्या उत्तरार्धात बर्‍याच दिवसांनी जुनी व्हिनस दिसली आज.. ! असच खेळलं पाहिजे पुढच्या फेर्‍यांमध्ये..

आत्ताच नडाल आणि स्विटींगची मॅच बघितली. पहिल्या दोन सेट मधे स्विटींग ठिक ठाक खेळला, पण तिसरा सेट मस्त झाला. आता अ‍ॅन्डी आणि व्हिक्टरची मॅच सुरू होणार आहे.

तू आज पण घरी बसून मॅचेस बघतोय्स की काय ? >>>> नाही नाही.. सकाळी फक्त व्हिनसचा एक सेट पाहिला होता..

उद्या सोड्या वि हेविट मॅच पण चांगली होईल असं वाटतय..

आहा ... काय मस्त धागा सापडला...... टेनिस

आजचे धक्कादायक निकाल ..... एकच... वावरिंका हरला... ते पण सरळ सेट्स मध्ये... ह्याच्याकडून अपेक्षा करणच मूर्खपणाचे आहे... हा लंबी रेस का घोडा नाही... व्हीनस विल्यम्स नशीब चांगले म्हणून जिंकली.. पण नेक्स्ट राउंड हरणार..... बाकी नदाल, मरे, बर्डिच, रॉडिक, फिश, गास्केट, मॉनफिन्स आणि फेलीशियानो लोपेझ हे मानांकित खिलाडू जिंकले... वर्डेस्क्को हरला....

महिलांमध्ये...... आज एकाच म्याच बघितली.... आंद्रेआ पेट्कोविच ची.. माझे आवडती प्लेयर.... म्याच जिंकल्यानंतर कोर्टवर डान्स करते... गेल्या म्याचचा वेळी बघायला मिळाला नाही मला डान्स आणि ह्यावेळेस बहुतेक तिने केला नाही.... पण तिने किमान सेमिस पर्यंत तरी जावे अशी माझी इच्छा आहे.... ती किंवा अझारेन्का यांनी ही विम्बल्डन जिंकावी अशी पण एक इच्छा आहे.... बाके मेन्स मध्ये एकच माणूस आहे.... फेडरर...... तो जिंकणारच!!!!

Pages