उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उन्हाळा येइल आता... ( तसा तर मुंबई त १२ महिने असतो ). सन स्क्रिन किती spf च वापराव? रोज बाहेर जाव लागत नसेल तर?

spf १५ ते ३० च्या मधे असावं असं मी एका मासिकात वाचलं होतं.

spf ३० असेल तर ते उत्तम असे डॉक्टर म्हणतात.

चेहरयावरील काळे डाग जाण्यासाठी काय करावे? डोळयाखालील काळी वर्तुळे (चश्मामुळे आलेली)जाण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?

डोळयाखालील काळी वर्तुळे (चश्मामुळे आलेली)जाण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? >>>> वर पहा.

माणुस, धन्यवाद. उपयोगी लिंक्स आहेत.

चेहर्यावरचे tan लवकरात लवकर जाण्यासाथी काय उपाय आहे ?

कोणी लॅक्मे आणि व्हि एल सी सी मधून फेशियल करुन घेतलय? कसा अनुभव आहे?

लॅक्मेचा अनुभव छानच आहे. व्हीएलसीसीचे फेशियलदेखील चांगले असते. मुळात या दोन्ही ठिकाणी आराम भरपूर मिळतो. कारण यांची जागा छोट्या पार्लराच्या मानाने चांगलीच प्रशस्त असते. सुसज्ज खोल्या असतात आणि आपले फेशियल करणारी सेविका ही व्यवस्थित वेळ देऊन फेशियल करते. छोट्या पार्लरांमध्ये एक सेविका अनेक कामे एकावेळी सांभाळत असली तर फेशियल चांगले झाले तरी निवांत वाटत नाही.
सुरभी, तुम्ही कुठे असता? पुण्यात असाल तर भांडारकर रस्त्यावरचे गॅझलदेखील छान आहे. ते फक्त रविवारी बंद असते.
अर्थात, किमतीचा विचार केला तर लॅक्मे, गॅझल वा व्हीएलसीसी इथले दर चढे आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.

मी ठाण्यात असते.. तिथले दर जास्त आहेतच, म्हणूनच विचारल.. सगळी फेशियल्स १५००/२००० पासून सुरु होतात; निवांत पणा मिळतो हे तर खरच..

उन्हामुळे त्वचा टॅन झाली आहे. सनस्क्रीनचा काही उपयोग नाही होत. टॅन जाण्यासाठी काय करावे?

पुनम, कच्चे दुध लावुन बघ.

पूनम,
मुळ्याचा रस्+कच्च्या बटाट्याचा रस+मुलतानी माती लाव.
कोरफड जेल लावून बघ ...खुप फरक वाटेल्...मी केलयं ....आणी मला खुपच फरक आहे.

**************************
पाऊस किती दिवसांत फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो

खुप जुने टॅनिग असेल (४-५ वर्ष) तर काय करावे

वैशाली,
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून लावून ठेवा आणि ५/१० मिनिटांनी धूऊन टाका,
असं थोडे दिवस केल्यास फरक पडेल शक्यतो.

धन्यवाद दक्षिना मी नक्की करेन.

माझा मुलगा swimming मुळे खुपच Tan झाला आहे. sunscreen लाऊन काहीच फायदा होत नहिए. तो competitive level la असल्यामुळे रोज swimming कराव लागत. Please advise.

थाने मधे मि एक पर्लर चे नाव सन्ग्ते mayself beatuy parlour vimal lohane kup chan hai
tyanche 25 to 30 year exp hai no 9820142365 ekda fecial karun bag mast hai.
rate pan kami hai ani product chan vaparat. (nanda manun ref de pahije tar)

माझ्या स्किन ला काले दाग आले आहेत.काहितरि उपाय सागा ज्याने माझ्या स्किन वर ग्लोव येनार व काले दाग निघुन जातिल

..

गेले ६महीने नोकरी निमीत्ताने माझा रोज कल्याण ते नवी मुंबई प्रवास होतो...प्रदुषणामुळे[स्कार्फ लावुनही]चेहर्‍यावर खड्डे,डाग आलेत्..लन्गा अगोदर मी नवी मुंबई राहत होते तेव्हा एवढे नव्हते...पण आत्ता चेहरा तेलकट आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे झालीत्. Sad
मी मुलतानी माती,हळद असा घरगुती उपचार करते पण थोड्यावेळा करता चेहरा कोरडा असतो
Sad
मसुरीच्या डाळी ने चेहर्‍याची आग आग होते
मी astringent पण वापरल त्याने काही फरक जाणवला नाही...

खड्डे आणी डाग कसे घालवावेत...

माझ्या डोळ्यांच्या वर भुवयांच्या खाली टाके पड्लेत पण टाक्यांचा व्रण हिरवा दिसतो कोणि उपाय सुचवा

Mazya Skin La Kale dag Aahet . mazya chehryawarche dag kase jatil & skin la glow kasa yel

thanks

suvarna

सुवि, तुम्हि स्किन स्पेशालिस्ट ल कन्सल्ट केलत का?...काळे डाग नक्की कशाने आलेत म्हन्जे पिग्मेन्टेशन आहे कि आणि काही आहे?...मला एक उपाय कोणीतरी सांगितलेला म्हण्जे दुधावरची साय आणि लिम्बु एकत्र करुन ते चेहर्यावर रोझ लावुन हल्का मसाज करायचा १५ ते २० मिनिटे....अर्थात मला असा काही त्रास नाही....तुम्हि करुन बघा. त्याने स्किन वर ग्लोव पण येतो...पण हा उपाय रोज चालु ठेवा फरक पदेपर्यन्त Happy

इथे वर डोळ्यांखालच्या फुगीर पणा बद्दल चर्चा आहे. मलासुद्धा असच झालय, पण ते आय बॅग्ज नाहीत, (त्याला पफीनेस म्हणतात ).. मी vlcc चौकशी केली तर त्यांनी 'बोटॅक्स' नावाची ट्रिटमेंट सांगीतली, काहीतरी इंजेक्शन असत आणि भरपूर महागड.. ( मला २००००० सांगीतले ))..... हे कितपत उपयोगी आहे? की दुसरा उपाय आहे? मी गार्नियर च अँटी पफीनेस लोशन वापरतीये, पण त्यानी काहीही झाल नाही. एरंडेल तेलानी मसाज करावा अस वाचल... आणखीन काही उपाय आहे?

Pages