पाऊसथेंब
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
11
पावसाचे थेंब झेलायला तू नेहमीच धावतेस
मोठ्ठ्या मोठ्ठ्या डोळ्यांनी पाऊस पाहत राहतेस
दुसरा थेंब झेलताना पहिला गळून जातो
अन् नवीन थेंबही हातून हळूच पळून जातो
तरी थकत नाहीस अन् अशीच खेळत राहतेस
अल्लड बालेसारखी मनमुराद भिजत राहतेस
कसं समजत नाही तुला, आयुष्य असंच असतं
म्हटलं तरी मुठीत बंद करता येत नसतं
क्षण असेच निसटत राहतात प्रत्येकाच्या हातून
एकास पकडू जाता अलगद् दुसरा जातो सुटून
जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा नसतो खेळ
परत झेलता येत नाही निघून गेली वेळ!
विषय:
प्रकार:
शेअर करा
आयुष्याचं वास्तव सुंदर शब्दात
आयुष्याचं वास्तव सुंदर शब्दात वर्णन केलंय..
कविता आवडली..
क्षण असेच निसटत राहतात
क्षण असेच निसटत राहतात प्रत्येकाच्या हातून
एकास पकडू जाता अलगद् दुसरा जातो सुटून>>
सुरेख!!
आवडली कविता
जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा
जगणं मात्र पाऊसथेंबांसारखा नसतो खेळ
परत झेलता येत नाही निघून गेली वेळ
खरच छान....
सावरी
मस्तय
मस्तय
आने वाल पल जाने वाला है...
आने वाल पल जाने वाला है...
धन्यवाद! पेशवा: खूप दिवसांनी
धन्यवाद!
पेशवा: खूप दिवसांनी इकडे पायधूळ झाडलीत.... बरं वाटलं!
>>आने वाल पल जाने वाला
>>आने वाल पल जाने वाला है...
पेशव्या, अगदी...
कविता आवडली. तुमच्या
कविता आवडली. तुमच्या पाऊलखुणा तपासायला गेलो आणि काही चांगल्या कविता मिळाल्या.
अभिनंदन!
सुर्रेख कविता.... धन्यवाद
सुर्रेख कविता....
धन्यवाद बेफिकीर.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
सुरेखच
सुरेखच