काल स्टॅनले का डब्बा पाहिला. खूप सुंदर सिनेमा आहे.
अवघ्या पावणेदोन तासांचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाद्वारे अमोल गुप्तेने समाजातील एका मोठ्या प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधलं आहे. चित्रपट पडद्यावर उलगडत असताना आपलं मनोरंजन होतच असतं पण आपल्याही नकळत आपण ज्याचा शोध घेत असतो ते वास्तव अचानकपणे चित्रपट संपतासंपता आपल्यासमोर येऊन उभं ठाकतं आणि आपण सुन्न होऊन जातो.
चित्रपटातून मांडलेल्या प्रश्नावर आपण ह्याआधी इतक्या गंभीरपणे विचार केलाही नसेल कदाचित, पण हा चित्रपट त्या सामाजिक प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडतो.
आधी या चित्रपटाविषयी काहीही वाचलं/ऐकलेलं नव्हतं. फक्त अमोल गुप्तेचा सिनेमा आहे एवढंच माहिती होतं. अमोल गुप्ते 'खुपते तिथे गुप्ते' मधे आला होता तो भाग माझा नेमका हुकला होता.
'स्टॅनले का डब्बा' तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघाच हे सांगण्यासाठी हा चार ओळींचा बाफप्रपंच!
पाहणार ! धन्यवाद मंजू.
पाहणार !
धन्यवाद मंजू.
मी पाह्यला. मला तरी आवडला.
मी पाह्यला. मला तरी आवडला. शेवटाला थोडा गोंधळला सिनेमा. बालमजुरीच्या प्रश्नाला तसा डिरेक्टली हात घालत नाही सिनेमा शेवटच्या २० मिनिटापर्यंत. पण तरी सगळ्यांनी बघायला हवा हे नक्की.
धन्यवाद मंजू
धन्यवाद मंजू
सगळ्याच वर्तमानपत्रात चांगले
सगळ्याच वर्तमानपत्रात चांगले समीक्षण आलेय, या चित्रपटाबद्दल.
बघणार बघणार..
बघणार बघणार..
पुढच्या आठवड्यात आलो की बघणार
पुढच्या आठवड्यात आलो की बघणार आहे...
मी पाहिला. खुप काही इंप्रेस
मी पाहिला. खुप काही इंप्रेस नाही झाले. बरेच प्रसंग तेच तेच रिपीट वाटले. या निमित्तानं लहान मुलांच्या विश्वात अजून डोकावता आलं असतं असं वाटलं. शिक्षक पण कॅरीकेचर्स सारखे फारच टिपीकल वाटले. दिव्या दत्त तर जरा जास्तच जॉली वाटली. गुप्त्यांचा वर्मा मात्र मस्त.
थोडक्यात सहजता कमी वाटली. मला वाटत मी अपेक्षांचं भलं मोठ ओझं घेऊन गेले होते बहुधा.
मामीला अनुमोदन, खूप काही
मामीला अनुमोदन, खूप काही इंप्रेस नाही झाले साठी.
गुप्त्यांचं कॅरेक्टर काही नीट समजलं नाही. काम मस्तच केलंय, पण एकादा शिक्षक कायम खाणे हुंगत भटकत राहतो यातून नक्की काय दाखवायचे होते ? सतत तेच ते खाण्यामागे जाणं बघून कंटाळा आला. त्या कॅरेक्टर मध्ये आणखी काही असते तर बरे झाले असते.
मुलगा मस्तय. गोड आहे अगदी. :).
बाकी विषय चांगलाय आणि शेवटी धक्का दिलाय ते चांगलंय.
उलट 'शिक्षकांचे वर्तन' याही
उलट 'शिक्षकांचे वर्तन' याही प्रश्नाकडे अमोल गुप्तेने लक्ष वेधलं आहे असं मला वाटलं. दिव्या दत्तने साकारलेली शिक्षिका खरंतर आताच्या युगातली 'आदर्श शिक्षिका' आहे, आणि तिने मुलांशी सहज सुंदर वागण्याचा परीणाम मध्यंतरानंतर दिसून येतोच.
'वर्मा सर' अजून खुलवायला हवे होते ह्याला अनुमोदन. पण त्यांचा तो स्वभावविशेष आहे, अश्या काही गंमतीदार (?) सवयी असणारे आमचे काही शिक्षक आठवले.
हो शिक्षकांचं वर्तन याकडे
हो शिक्षकांचं वर्तन याकडे लक्ष वेधलंच आहे, सगळ्या टाईप्स चे शिक्षक दाखवून. फक्त वर्मा मध्ये शिकवण्याच्या बाबतीत चांगले / वाईट असे काहीच दाखवले नाहीये, नुसतेच खा-खा.
हा चित्रपट कॅनन D7 (DSLR)
हा चित्रपट कॅनन D7 (DSLR) कॅमेर्याने चित्रित केला असं कुठे तरी वाचनात आले होते.
कॅनन D7 वर चित्रीत झालेला
कॅनन D7 वर चित्रीत झालेला मला वाट्त 'गजर' आहे.. हा नाही..
हा चित्रपट फक्त शनीवार
हा चित्रपट फक्त शनीवार रविवारी शुट करण्यात आला. मुलांची शाळा बुडु नये म्हणून. मस्त चित्रपट.
बघणार! लहान मुलांसाठी आहे का
बघणार!
लहान मुलांसाठी आहे का चित्रपट?
लहान मुलांचा चित्रपट आहे, पण
लहान मुलांचा चित्रपट आहे, पण लहान मुलांसाठी नाहिये. म्हणजे आक्षेपार्ह असं काही नाहिये पण चित्रपटाचं कथानक, हाताळणी वगैरे चौदा पंधरा वर्षांवरील मुलांना समजू शकेल बहुतेक.
९-१० + ला समजायला हरकत नाही.
९-१० + ला समजायला हरकत नाही.