Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
सोन मला येणारे ट्पोरे
सोन
मला येणारे ट्पोरे पिम्पल्स "कुंकूमादि" ने घालवले आहेत
You have to apply it daily re, consistent effort works best with this oil
तू फक्त त्वचेत मूरवत बसू नकोस, मोजून ३ थेंब घे आणि हलक्या हाताने पसरव, अलवार हात फिरवत रहा काही सेकंद, बास!
नक्की positive च फरक पडेल
मुंबईत कोणी चांगला
मुंबईत कोणी चांगला Dermatologist माहित आहे का कोणाला?
डॉ. सतिश सावंत
अधेंरीला आहेत
hiiiiii. mi maayboli var
hiiiiii.
mi maayboli var navin ahe....
Actually 1 year back ,majya cheharya varati ani hatavarati chamkhil sarakh kahi tari uthal hot,means after delivery.mi doct.na dakhaval te bolele ki te chamkhil nasun tyatala cha ek type ahe.
tyani te chimatyane ohun kahale,pan parat atta te hatavarati ale ahet,plz mala help kara,khup kharab distat te.
निकिता, धन्यवाद.
निकिता, धन्यवाद.
राहूल फाटे रिसर्च प्रॉडक्ट्स
राहूल फाटे रिसर्च प्रॉडक्ट्स बद्दल कुणाला माहिती आहे का? गेले १० दिवस प्रखर उन्हात ८ तास काम केल्याने मला चांगल्या १५ शेड्सने टॅन आला असेल. काल शेवटचा दिवस झाल्यावर घरी येताना एका मैत्रिणीचा टॅन अजून एका मैत्रिणीने काढून दिल्याचे ऐकताच मी परस्पर त्या माझ्या घरगुती पार्लरोपचार करणार्या मैत्रिणीकडे गेले. तिने पहिलं मला एसीत पाऊण तास बसवून ठेवलं त्वचा थंड होण्यासाठी. तोपर्यंत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. नंतर तिने ते राहूल फाटेंचे (ते ट्रायकॉलॉजिस्ट आणि डर्मॅ. आहेत) प्रॉडक्ट्स वापरुन माझ्या चेहरा व मानेवर अडीच तास काय काय केलं. ह्या अॅडव्हान्स्ड ट्रिटमेंट्स तिने त्यांच्याच इन्स्टिट्युटमध्ये शिकून घेतल्या.
आणि फायनली माझा चेहरा ५०% पर्यंत एका सिटिंगमध्ये उजळला. मी हे नाव प्रथमच ऐकलं. तुम्ही कुणी ऐकलं आहे का?
काल इथल्या एका
काल इथल्या एका सुपरमार्केटमध्ये मी Aissis अश्या काहीतरी नावाचे बाथसोप्स पाहिले - लाईम, जास्मिन, चंदन, रोझ, Cucumber वगैरे सुगंधांचे होते. किंमत एका साबणाची ५५-५६. तसंच Afghan Soap म्हणूनही काही सोप्स पाहिलेत तिथे. कोणी वापरले आहेत का?
अश्विनी, माझी पार्लरवाली
अश्विनी, माझी पार्लरवाली राहूल फाटेंचे प्रोडक्ट्स विकते. बर्याच जणींना चांगला अनूभव आहे. मध्यंतरी त्यांचा टिवीवर कार्यक्रमही होता. मी तीन चार वर्षांपासून त्यांचे नाव एकून आहे.
जरा गुगला की ... हे मिलाले
जरा गुगला की ... हे मिलाले
http://rahulphate.com/
थँक्स वर्षा. मी त्यांचा रुपदा
थँक्स वर्षा. मी त्यांचा रुपदा फेस पॅक वापरला आहे. चांगला आहे.
लई भारी गं वर्षा ! त्यातलं
लई भारी गं वर्षा ! त्यातलं अल्टीकेअर सनब्लॉक (रु. २६०/-) दिलंय तिने मला अजून स्कीन डॅमेज होऊ नये म्हणून. आज इमानेइतबारे लावून आलेय. सी अल्गे नावाचं प्रॉडक्ट तिने माझ्या तोंडाला मानेला फासलं होतं त्या अडिच तासांच्या टॅन उतरवणे प्रोग्रॅममध्ये.
स्वाती, अगं माझी ती मैत्रिण पण म्हणाली की रविवारी त्यांचा टिव्हीवर कुठल्याश्या चॅनेलवर 'रुपदा' नावाचा कार्यक्रम असतो.
बाकी हाताचा टॅन मी लाझुरने बराचसा उतरवलाय. ८ दिवसांत हात पुर्ववत होतील बहुतेक.
राहुल फाटे चेपुवर पण
राहुल फाटे चेपुवर पण सापडले
http://www.facebook.com/#!/profile.php?id=1128085770
पण त्यांची प्रॉडकट्स पुण्या-मुंबैत कुठे मिळतात ते काही सापडलं नाही.
ब्लिच आणी फेशियल दोन्ही एकाच
ब्लिच आणी फेशियल दोन्ही एकाच दिवशी करायच असेल तर आधी काय करायच? तुम्ही काय करता?
I hope आधी फेशियल आणी मग ब्लिच...??
माधुरी मला आठवते त्याप्रमाणे
माधुरी मला आठवते त्याप्रमाणे पार्लरमध्ये ब्लीच आधी आणि मग फेशियल असे करतात.
हाय............ चेहरा गोरा
हाय............
चेहरा गोरा होण्याकरीता कुठ्ली क्रीम एकदम चान्गली आहे?
Dr.Urjita Jain च कोणत उत्पादन (चेहरा गोरा ) best आहे?
tasech chehara plan honyasathi,kale Daag ani pimple janyasathi?
plz plz plz help me.i am waiting for replay.
युस मधे चांगलं सन-स्क्रिम
युस मधे चांगलं सन-स्क्रिम लोशन कोणतं? ईथे एवढे प्रॉडक्ट आहेत की कन्फुजन होतं.
हाय, मी चेहर्यला बदम तेल
हाय,
मी चेहर्यला बदम तेल ,ग्लिसरिन ,अनि लिबु रस मिश्रन्न करून लवते आहे रात्री पान दीवसा चेह्ररा खुप तेलगत देसतो . आनि काळवटाला पान आहे.
मझ्या चेहर्या वार काळे दाग आहेत .काहि उपाय सगा.
रोज चेहर्याला लावायला
रोज चेहर्याला लावायला न्यूट्रोजेना चे सन स्क्रीन असलेलं मॉइश्चरायझर मिळतं ते मला आवडलंय. अजिबात चिकट/ तेलकट वाटत नाही. १५-२०-३० एस पी एफ असलेले मिळतात.
बीचवर, किंवा इतरत्र उन्हात खूप फिरणं होणार असेल तर बनाना बोटचे सन स्क्रीन्स चांगले आहेत. . घरातले सर्वजण तेच वापरतो. कॉपरटोनचे एक स्प्रे सन स्क्रीन आहे, ते पण चांगले आहे.
एकदा क्लिनिक चे आणले होते पण ते इतके इफेक्टिव्ह वाटले नाही.
मोनली, कोरफड जेल मिळते, तिने
मोनली,
कोरफड जेल मिळते, तिने माझ्या तेलकट त्वचेला बराच फरक पडतो आहे.... transperent , हिरव्या रंगाची आहे.. रोज २० मिनिटं चेहरा आणि मानेला लावून ठेवायची, मग सुकली की थंड पाण्याने चेहरा धुवायचा... दिवसा जाणवणारा तेलकटपणा बराच कमी होतो आणि काळपटपणाही....
हाय, मला heat चा खुप त्रास
हाय,
मला heat चा खुप त्रास होत आहे,म्हणजे मला रात्री पायाना खुप खाज होते.रात्र भर झोप लगत नाही,मला वाट्त कि हे heat मुले होत असेल्.फक्त रात्रीच जास्त त्रास होतो,पिल्ज मला एखादा उपाय सान्गा,ज्यामुळे हा त्रास कमि होइल.
माझा मुलगा ७ महीन्याचा आहे.
माझा मुलगा ७ महीन्याचा आहे. त्याची skin खुप dry होते. काही घरगुती उपाय सा॑गाल का?
अरे कोणी इथे फीरकत की नाही?
अरे कोणी इथे फीरकत की नाही?
हाय, मला एक मदत हवी आहे.माजी
हाय,
मला एक मदत हवी आहे.माजी स्किन उन्हाळ्यात खुपच तेलकट होते,आनि काळी पडते.pimples पन येतात्.तर हिवाळ्यात खुपच कोरडी होते,फुट्ते,ओढ्ल्यासरखी दिस्ते.ani mi jar eekhada product(cream,soap etc)chang kl ki lagech pimple yetata.plz मला सान्गाल का कि मजि skin cha typ kay ahe.(oily,dry,mormal).plz help me.
खुपच छान माहिती मिळ्तेय या
खुपच छान माहिती मिळ्तेय या साईट वर .
pornima तुम्ही बाळाला शक्यतो
pornima तुम्ही बाळाला शक्यतो कुठलाही साबण लावू नका. मसुराच्या पीठाने छान मऊ राहते त्वचा. आंघोळी आधी खोबरेल तेल जिरवा. आंघोळी नंतर आणि झोपण्याआधी बेबी क्रीम ने मसाज करा. २-३ दिवसात फरक पडेल.
सोन, तुळशी चे बी रात्रभर
सोन, तुळशी चे बी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी दुधातुन घेतले तर खूप फायदा होतो, झोपताना गार दुधातुन गुलकंद खा. शिवाय नाचणी थंड असते. आंबील एकदम मस्त उष्णतेसाठी.
घामोळ्यांवर काय उपाय करावा.
घामोळ्यांवर काय उपाय करावा. पोराच्या (वय ३ वर्षे) छातीवर आणि मानेवर घामोळ्या झाल्या आहेत. छातीवरच्या तर काळसर दिसताहेत. घामोळ्यांवर पावडर टाकणे, दिवसातून ३-४ वेळा आंघोळ घालणे हे उपाय करतच आहे. खोल्या एसी /कुलर /पंखा इ. च्या सहाय्याने थंड ठेवणे हे पण करतोच.
सोन, तुमच्या त्वचेसाठी
सोन, तुमच्या त्वचेसाठी उन्हाळ्यात चेहेर्यावरचे ऑईल कमी करणारा क्लेन्झर आणि मुलतानी मिट्टीचा एखादा पॅक वापरावा तसेच हिवाळ्यात चेहेर्याला पोषण देणारा क्लेन्झर आणि मॉइश्चर देणारा एखादा पॅक वापरावा.कारण सर्व ऋतूत आपली त्वचा एकसारखी नसते.
अल्पना शरीरात उष्णता खूप असेल
अल्पना
शरीरात उष्णता खूप असेल तरीपण घामोळ्यांचा त्रास होतो ना? तेव्हा पाणी, ताक, सरबत, शहाळ्याच पाणी असे दिवसभर सतत प्यायला देणे, जेवणातील उष्णता वाढवणारे पदार्थ कमी करणे, तळपायाला काश्याच्या वाटीने तेल लावून घासणे, तळपायांना मेंदी लावणे इ. उपाय करता येतील का?
अल्पना,कैरी उकडुन त्याचा
अल्पना,कैरी उकडुन त्याचा गर्/गीर लावुन आंघोळ घाल.साबण लावु नको.नायसील वा तत्सम पावडर.ताक्/लस्सी..दहि-भात ,लिंबु सरबत्,बटर स्कौच आइसक्रीम दे..
Pages