झटपट मटण

Submitted by मया on 12 May, 2011 - 23:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाऊण किलो मटण, मीठ चवीपुरते, व्हिनेगर, मालवणी मसाला (मी मालवणी आहे हा मसाला घरीच बनवला आहे ), आल लसून पेस्ट, कांदा, कढीपत्ता, सुख खोबर.

क्रमवार पाककृती: 

१) मटण साफ करून धुवून घ्यायचं नंतर त्याला दही, आल लसून पेस्ट, मालवणी मसाला (नसेल तर तुमच्याकडे असेल तो वापरावा ), व्हिनेगर, मीठ लाऊन अर्धा तास ठेऊन द्यायचं. नंतर कांदा, सुख खोबर भाजून वाटण कराव.

२) पातेल्यात किवा कुकर मटण शिजवण्यासाठी उपयोग करावा. प्रथम कांदा आणि कडीपत्ता याची फोडणी करावी मग ते मटण फोडणीत घालून ते परतावे नंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफ आल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं कांद्या खोबऱ्याच वाटण घालाव. त्यानंतर आपल्याला जाड किवा पातळ हव तेवढ पाणी ओताव.

३) वरील कृती झाल्यावर त्यात पुन्हा मीठ टाकावे. कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्या कराव्यात. अशा तर्हेने झाल झटापट मटण तयार.

वाढणी/प्रमाण: 
मटण सध्या महाग झाल असल्यामुळे सगळी मासाहारी मंडळी आता कोबडी कडे वळली आहेत. त्यामुळे आता जाड सर बनवून खात नाहीत. वरती सांगितल्या प्रमाणे वाटप टाकत असतानाच किती माणस आहेत त्यावरून पाणी टाकाव.
अधिक टिपा: 

माझा हा पहिलाच प्रयत्न आहे इथे पाककृती टाकण्याचा तरी यात कोणालाही अधिक माहित हवी असल्यास नक्की विचार मी नक्की तुमची मदत करीन. या पाककृती मध्ये तुम्हाला काही आजून टाकाव वाटत असेल तर नक्की सांगा.

माहितीचा स्रोत: 
रविवारी उशिरा उठल्यामुळे आई झटपट अशा प्रकारचे मटण बनवते. काही प्रती मी खाली टाकत आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षीणा...
मी ऐकलंय की मटण पचायला २४ तास लागतात... खरं का???...>>>... 'मटण' किती खाशील?, त्यावर अवलंबून आहे...

नमस्कार,
मी मायबोलीवर नवीनच आहे.
२-३ दिवसांपूर्वीच जॉईन झाले.
वरील रेसिपी मस्तच आहे.
मटणाला दही, व्हीनेगर ऐवजी लिंबुरस लावु शकतो का?

>>>दक्षिणा, अपोझिशन पार्टी मधे जाणार बहुतेक लवकरच. >> दिनेशदा एकदम बिनचूक ओळ्खलत. म्हणजे बघा या महिन्यातच ही घटना घडण्याची दाट शक्यता आहे. Happy

महेश तोंपासु.. फोटो जबरी Happy

जाहिरातीमध्ये मालवणी मसाल्याची जाहिरातवाले तुमीच ना. मी कधीची बघून ठेवलीय आईला पण सांगितलय. आताचा मसाला संपला की तुमच्याकडून घेणार आहे. Happy

काय क्लास प्रचि (प्रकाशचित्रे) आहेत!!! एकदम तों.पा.सु (तोंडाला पाणी सुटले)!!! कधी बनवेन या पद्धतीने असे झाले आहे.

मेधा.. अग मटण ते मटणं.. Wink

मलाही भयंकर आवडतं.. आता लग्नाच्या ८ वर्षात तिखट खाण्याची क्षमता कमी झालीये.. त्यामुळे माझ्यासाठी आईकडे केलं की माझ्या बहिणींना आवडत नाही Sad महेश, तुमचा मालवणी मसाला खूप झणझणीत असतो का?

रस्सा छान चमचमीत असतो.

दक्स, मला तुझा मांसाहारातला "रस" अचंबित करतोय! Wink

भन्नाट दिसतेय मटण!

(मटणात कढीपत्ता जराही आवडत नाही पण. मग ते मलबारी मटण लागेल.)

तांदूळाची भाकरी सुद्धा मस्त.

महेश, तुमचा मसाला खूप जळजळीत नसेल व एकदम पुर्वापार पद्धतीने बनवलेला मालवणी मसाला असेल तर घ्यायला आवडेल.

बाहेर मालवणी मसाल्याच्या नावाने नुसते मसाल्याची भगभगीत पूड विकतात ना त्यात नागकेशर ,ना दगडफूल ना बडीशेप वगैरे असते.

इथे मला एक कमी पणा दिनेशदा आपल्या मायबोलीकर ग्रुप मधील पुरुष मंडळीना या पाककृतीत काहीच रस दिसत नाही याची कमाल आहे. बनवण्यात नाही पण जागू ज्या माश्याच्या प्रती बघण्यासाठी मी भरपूर उसुक असतो.

तो.पा.सु. !!! मटन मला भयंकर आवडतं. मी अशाच पद्धतीने मटण करते फक्त वाटप मटण शिजल्यावर घालते.

Pages