निसर्गाच्या गप्पा - २

Submitted by साधना on 10 March, 2011 - 01:21

निसर्गमित्रांनो, इथे आपण आपले निसर्ग प्रकरण मागील पानावरुन पुढे चालु करुया.... Happy

आधीच्या गप्पा -
http://www.maayboli.com/node/21676

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा,
हाच शब्द !
धन्स !
माझ्या लक्षातच आला नाही हा शब्द,लहानपणी ऐकलेला असा अर्धवट शब्द डोक्यात बसलेलाच आठवला !
Happy

सा.सकाळच्या २००६ च्या दिवाळी अंकात डॉ.अनिल अवचटांचा एक लेख आहे मधमाश्यांवर. त्यात त्यांच्या अद्भूत विश्वाची खूप सहज,सोप्या आणि रंजकपणे माहिती दिली आहे. शिवाय सुंदर फोटोपण दिले आहेत.वाचून थक्क व्हायला होतं.आणि भिती बद्द्ल म्हणाल तर ती पार कुठल्या कुठे पळून जाते.

जागू,तुमचे फोटो फारच छान आले आहेत.आता खूप नारळ लागतील.किंवा आजूबाजूची फुलझाडे तरी खूप बहरतील.या बहुधा मोहोरी मधमाशा असाव्यात.त्या इतक्या आक्रमक नसतात.

शांकली, ते तर आहेच. पण त्यापेक्षाही त्यांचे समाजजीवन अत्यंत गुंतागुंतीचे असते.
मधमाश्या आणि मुंग्या दोघींचाही पूर्वज, गांधीलमाशी. ती मांसाहारीच असते. त्यापैकी काहीजणींनी शाकाहारी रहायचे ठरवले त्यांच्या मधमाशा झाल्या. काही जणींनी पंखांचा त्याग करुन, जमिनीवर व जमिनीखाली रहाणे पसंत केले, त्यांच्या मुंग्या झाल्या.
पण त्यातील राणीमाशी, तिने आपले स्थान टिकवण्यासाठी योजलेले उपाय. तिच्या लेकींनी तिच्याविरूद्ध केलेला उठाव, तिचा मृत्यू हे सगळे विलक्षण असते. याचे चित्रीकरण सर अटेंबरोंनी केलेले आहे.

होय दिनेशदा,
सर अटेंबरो साहेबांचा हा प्रोग्रॅम मी बघितलाय.मला तर नेहेमी असं वाटतं की यांसारख्या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे सर अटेंबरो,डॉ.अनिल अवचट,पुण्याच्या आबासाहेब गरवारे कॉलेजच्या बॉटनी डिपा.च्या माजी विभागप्रमुख डॉ. हेमा साने,डॉ.श्री.द.महाजन इ.(असे अनेक आहेत) यांना preserve करायला पाहिजे. ही सर्व ज्ञानवृद्ध,तपोवृद्ध व्यक्ती आहेत.डॉ.डहाणूकर आता हयात नाहीत म्हणून! अशा व्यक्ती परत होणे नाही.यांचं योगदान किती मोठं आहे याची गणतीच नाही करता येत.

डॉ. डहाणूकर यांची माझी प्रत्यक्ष भेट झाली होती. मी नुसतेच त्यांना एक पत्र लिहिले होते, ते वाचून त्यांनी मला भेटायला बोलावले होते (हि कहाणी मी अनेकवेळा लिहिली आहे तरी परत परत लिहावी अशीच आहे) पण त्यावेळी त्यांनी या विषयावर लेखन थांबवले होते व त्या "पांचालीची थाळी" लिहिण्यात
मग्न होत्या.
मी याबाबत तक्रार केल्यावर म्हणाल्या, कि आता तूम्ही नवीन लोकांनी लिहायचे. माझा पहिला लेख, लोकसत्तामधे प्रसिद्ध व्ह्यायच्या आधीच त्यांचे निधन झाले.

असो. त्यांच्या इतकी किंवा वर उल्लेख केलेल्या लोकांइतकी विद्वत्ता आपल्याला गाठणे शक्यच नाही, पण आपल्याकडे जे तूटपुंजे ज्ञान आहे ते इथे उधळत राहू.

हि वसुंधरा, अधिक संपन्न, सुंदर व्हावी, अशी सदिच्छा.
ते आपल्या सर्वांचे एकमेव आश्रयस्थान आहे.

वसुंधरेला माझ्यातर्फे हि काही फूले. (तेराही तूझको अर्पण ) हिच फूले कारण, हि फूले कधीही सूकत नाहीत कि कोमेजत नाहीत. सूकल्यासारखी वाटली, तरी थोडे पाणी शिंपडल्यावर परत ताजीतवानी होतात..

काय रे.. ते पाचुंदा/वरुण वगैरे प्रकरण परत एकदा खोदतोयस काय? हे वरचे त्याच वर्गातले दिसतेय.. पण जे काय आहे ते अतिशय सुंदर आहे..

दिनेश, वरच्या फुलांचे नाव काय? यातली भगव्या रंगाची फुले इथे मिळत आधी. हल्ली बघितली नाहीत. फुले अगदी प्लेस्टिकची वाटत. आम्ही यांना भुताची फुले म्हणायचो. हे नाव कोणी सुचवले तेही माहित नाही.

तुला बरी भेटतात ही मंडळी.. मी जंगलात गेले की सगळे लक्ष पाय चुकुन एखाद्या सापावर तर पडत नाहीना यावर लागलेले असते Happy

जिप्सी १ ल्या फुलाला वाघाटी (capparis moonii) म्हणतात, आणि दुसरे फूल कबार ( capparis murrayana) आहे. ही फुले कुठे बघायला मिळाली ते लिहिणार का? ही दोन्ही फुले एकाच family तली आहेत. चुलत भावंड म्हणूया फारतर.

दिनेशदा,मस्त फुले आहेत आणि फोटो पण फार छान आले आहेत. फुलांना वाखाणताना छान,सुंदर,अप्रतिम हे शब्द अपुरे वाटतात नाही?

धन्स, शांकली Happy

ही फुले कुठे बघायला मिळाली ते लिहिणार का?>>>पहिले फुल एका प्रदर्शनातील आणि दुसरे वसईच्या किल्याजवळ. Happy

<<<वसुंधरेला माझ्यातर्फे हि काही फूले. (तेराही तूझको अर्पण ) हिच फूले कारण, हि फूले कधीही सूकत नाहीत कि कोमेजत नाहीत. सूकल्यासारखी वाटली, तरी थोडे पाणी शिंपडल्यावर परत ताजीतवानी होतात..>>>>>
दिनेशदा, फुले तर मस्तच! त्यामागची तुम्ही भावनाही सुंदर!!

साधना हि फूले पण गायब झाली ? याचे हार पण असायचे विकायला. आम्ही जादूची फूले म्हणायचो.
आणि जिप्स्याच्या फोटोतली फूले आंबोलीला भरपूर आहेत.
जिप्स्य्या, कांदळ Sonneratia caseolaris (कांडोळ नाही) ची फूले पण अशीच असतात.
Capparis zeylanica ची पण अशीच पण गुलाबी असतात.
आणि तू हिंगणबेटबद्दल म्हणाला होतास, ती फूले पुण्याजवळ बापदेव घाटात आहेत, असे वाचले.

प्रज्ञा, अनेक काप्लनिक देवांना आपण पूजतो, पण रोज जी आपल्या सर्व गरजा पूरवते त्या पृथ्वीला मात्र, समुद्र वसने देवी.. असे म्हणत पायदळी तूडवतो.

महिन्यापूर्वी जिप्स्याने रान मेवा टाकला होता. त्यात हा रान मेवा दिसला नाही. आत बाजारात विकायला आला आहे. या वर्षी महाग आहे. १०० रूपये किलो. माझ बालपण हि रांजण आणि करवंद खात गेल. त्यामूळे या फळाच मला खूप आकर्षण आहे. करवंद माझ्या शेतात खूप आहेत. रांजण नाहित.
रांजण
ranjan fruit.jpg
खालील झाड १०० वर्षापेक्षा जास्त वयाच आहे. माझे वडील ८/१० वर्षाचे असताना या झाडावर चढून रांजण काढायचे. ईतक्या वर्षात हे झाड थोड बाजूला पसरल आहे एवढ्च. या झाडाची वाढ हळू होते. पण त्यामूळे या झाडाची घनता जास्त असते. आपल्या कडील जास्त घनतेच्या लाकडामध्ये याचा नंबर लागतो.या झाडाचा दूसरा ऊपयोग म्हणजे याच्या खूंटावर चीकू च्या झाडाचे कलम करतात. राहूरी क्रूषि विद्यापिठाने चिकू च्या दर्जेदार ऊत्पादनासाठि केवळ याच्यावरच कलम करावयाची शीफारस केली आहे.
थोडफार शारंगधर शेती पद्द्ती प्रमाणे जूने आणि जाणते शेती तज्ञ सांगतात की या झाडावर बकूळीच कलम केल की चिकू ची फळ लागतात्.आता ५ वर्शानंतर हे असले प्रयोग करणार आहे.
Ceylon iron wood, milk tree, wedge-leaved ape flower • Hindi: खिरनी , क्षीरी , रायन • Konkani: कर्णी , रांजण• Marathi: खिरणी , राजण , रांजण, रायण
ranjan zad.jpg
पान
rsz_11rsz_ranjan_leaves378.jpg

धन्स विजयजी, रांजन पहिल्यांदाच पाहिला. Happy

रच्याकने, आज पुन्हा जुनी मासिके चाळताना त्यात झाडांचा आणि त्यांचा फुलांचा उल्लेख होता. यातील बर्‍याचशा झाडांची नावे मी पहिल्यांदाच वाचली. Sad

१. डंडीची फुले (पांढरीशुभ्र फुले)
२. कबरीचे काटेरी झुडुप (पांढरीशुभ्र तंतूमय फुले)
३. तरवडीचे झुडुप (पिवळे फुल)
४. गणेरी (पिवळे फुले, फळे चॉकलेटी रंगाची)
५. पिचकारीची फुले (नारिंगी रंगाचे कप लटकलेले दिसावेत अशी फुले)
६. गुलम (पीतवर्णी फुले)
७. रामेठा (पिवळ्या फुलांचे तुरे)
८. क्लिनोव्हिया (मोतिया गुलाबी फुलांचे गुच्छ)

आता दिसत नाहीत कुठे.. सांताक्रुझ रेल्वे ब्रिजवर गजरेवाल्या बायांच्या टोपल्यात ही फुलेही असायची. मी मुद्दाम विकत घ्यायचे.

योग्या, स्कॅन करु न्फोटो टाक की..

रांजणाच्या झाडासारखी झाडे खूप पाहिल्यासारखी वाटताहेत. विषेशतः पाने बघुन. काजुसारखी पाने आहेत, फक्त्स थोडी लांबट काजुपेक्षा. कोकणात पाहिलीही असतील पण एवढ्या झाडांमध्ये कोण कोणाचा हा प्रयोग करणे कठिण जाते. Happy

मी आज सुट्टी असताना ऑफीसला गेले होते म्हणजे ऑफिसमध्ये नाही. बाजुच्या परिसरात, जंगलात फोटो काढण्यासाठी. २-३ दिवसांत सगळे फोटो टाकते.

दिनेशदा तुम्ही जी जादुचीफुले म्हणता त्याला आम्ही कागदीफुले म्हणतो.
त्याचे हार आमच्याकडे येतात विकायला. पण ती फुले अलिबागवरुन येतात. त्या फुलांना पाणी मारले की मिटतात आणि सुकली की उघडतात. दोन ते तिन महिने हा हार टिकुन राहतो. माझ्याकडे आहे अजुन फोटो काढता काढता राहिला आहे. उद्याच काढते.

विजय, डॉ कैलासानी या झाडाचा फोटो टाकला होता. त्यांच्या जवळ आहे हे झाड. मुंबईत अहमदाबादी मेवा म्हणतात. चव खूपशी चि़कूच्या जवळची असते.
जिप्सी (मी प्रयत्नपूर्वक नीट नाव लिहिलय रे ) तरवड मुंबईत जागोजागी आहे.
आणि क्लाईनहाविया, मी राणीच्या बागेत दाखवलl होता तो. पिंपळासारखी पाने, फिक्कट गुलाबी फूले आणि आवळ्यासारखी पण पांचधारी पोकळ फळे. माटूंगा सेंट्रल स्टेशनवरुन जे रस्ते कीम्ग्ज सर्कलकडे येतात त्यापैकी एका रस्त्यावर (बहुतेक भाऊ दाजी रोडवर ) याची बरीच झाडे आहेत.
दुसरा फोटो, कुडाच्य फूलांचा आहे. सफेद कुडा. अर्थात काळा कुडाही असतो.

मी आज शहामृग पार्क मधे गेलो होतो. तिथले फोटो अपलोड करतोय.

Pages