इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
बाळूभाऊ, पेट्रोल-डिझेलबद्दल
बाळूभाऊ, पेट्रोल-डिझेलबद्दल ह्याच बीबीवरच्या काही जुन्या पोष्टी पेस्ट करतो बघ. आणखी मागे गेले, तर पेट्रोल-डिझेलची निरनिराळ्या गाड्यांसंदर्भातल्या पोष्टी आणखी सापडतील कदाचित.
१००० किमी हे कमी म्हणता येणार नाही. डिझेल गाडी घेण्यासाठी हे जस्टिफाईड रनिंग आहे. डिझेल गाड्या म्हणजे प्रचंड आवाजा, व्हायब्रेशन, मेंटेनन्स- हा समज आता बदलून टाकला पाहिजे. डिझायर, मांझा, लिनिया ही डिझेलवरची व्हरजन्स आहेत, हे नुसते आत बसून कळत नाही, इतकी रिफाइनमेंट यांच्या डिझेल इंजिनांत केली आहे. त्यांचे सर्व्हिस इंट्र्व्हल्सही वर्षातून एकदा असे केले आहेत. त्यामुळे (माझ्या तरी दृष्टिने) हा टॉप प्रॉयॉरिटीचा मुद्दा नाही. त्यापेक्षा अनेक जास्त चांगल्या गोष्टी या गाड्यांत आहेत. (टाटाच्या गाड्यांत. आणि ओव्हरऑल डिझेल गाड्यांत).
यांची (मांझा, डिझायर, लिनिया) पेट्रोल इंजिन्सही अर्थात जागतिक दर्जाची म्हणता येतील, अशी आहेत. पण मिळणारे किंचित कमी मायलेज आणि पेट्रोलची जास्त किंमत, यामुळे त्या गाड्या 'रनिंग कॉस्ट' वाइज थोड्या महागड्या ठरतात.
१००० किमी एका महिन्यात- असा हिशेब करू या.
डिझेल गाडीचे अंदाजे १७-१८ आणि पेट्रोलचे अंदाजे १४-१५ असे मायलेज- असे गृहित धरू या.
डिझेल गाडीसाठी- रु. २२७७ प्रतिमहिना
पेट्रोल गाडीसाठी- रु. ३६६६ प्रतिमहिना
हा फरक बरेच काही बोलून जातो, हे स्पष्टच दिसते आहे.
डिझेल गाड्यांसाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंत जास्त असते, हे खरेच आहे की. स्मित
सर्वसाधारणपणे डिझेल गाड्यांची रिसेल व्हॅल्यु पेट्रोल गाड्यांपेक्षा थोडी कमीच असते. पेट्रोल हा इंधनाचा डिझेलपेक्षा जास्त शुद्ध रुपात असलेला प्रकार. त्यामुळे इंजिन पार्ट्सची झीज कमी होते. त्याचमुळे पेट्रोल इंजिनाचे आयुष्य जास्त- हे ओघाने आलेच.
चिंगी, एसी चालू-बंदचा तसेच खिडक्या उघडल्यामुळे (वार्याच्या विरोधामुळे) खूप फरक पडलेला मी पाहिला नाही. मी एसी इंटरमिटंटली चालू ठेवतो. म्हणजे चालू.. बंद.. असे. मी सहसा खिडक्या उघडत नाही. प्रदुषणामुळे इंटेरियर लवकर खराब होते. बाहेर, घाटात, मोकळ्या-शुद्ध हवेत खिडक्या उघडतो.
पेट्रोल गाड्यांचा पिक-अपही थोडा जास्त असतो. (अर्थात वरना किंवा क्रुझ डिझेल सेदान्सना विमानाच्या टेक-ऑफ फील देणारा पिक-अप असतो स्मित ) शहरातल्या कटकटीच्या वाहतुकीत 'इझी नॅव्हिगेशन'साठी पेट्रोल गाडी आयडियल. डिझेल गाड्यांना पेट्रोल गाड्यांच्या तुलनेत वारंवार गियर्स बदलावे लागतात. त्यामुळे 'फटिग लेव्हल' चा विचार केला, तर पेट्रोल गाड्या जास्त सोप्या, आरामदायक. शिवाय तुलनेत स्मुथ फील आणि ड्राईव्ह. आवाज आणि व्हायब्रेशन्सही तुलनेने कमी.
...
पेट्रोल की डिझेल हे आधी ठरवायला हवं. जास्त वापर, रनिंग असेल, तर डिझेल गाड्या घेतल्या जातात. त्यांचे मायलेजही पेट्रोल गाड्यांपेक्षा चांगले असते. पेट्रोल आणि डिझेलमधल्या किंमतीच्या फरकामुळे रनिंग कॉस्ट डिझेल गाड्यांची बर्यापैकी कमी असते. जास्त मेंतेनन्स असलेल्या गाड्या म्हणून आजवर डिझेल गाड्या ओळखल्या जायच्या, आता तसं काही राहिलं नाही. डिझेल इंजिनांच्या नवनवीन तंत्रज्ञानांमुळे मेंटेनन्स कॉस्ट कमी होण्यास मदत झाली आहे. सर्व्हिस इंटर्व्हल्सदेखील ३ ते ५ हजार किमीवरून १५ हजार किमीपर्यंत वाढलेले आहेत. पारंपारिक डिझेल इंजिनांचे आवाज, व्हायब्रेशन्स यासकट इतर छोटेमोठे प्रॉब्लेम्स देखील खूपच कमी झाले आहेत.
पॉवर, पिक अप, कमी आवाज-प्रदूषण-मेंटेनन्स, रनिंगमधला स्विफ्ट्नेस आणि चालवण्यातला डिझेल गाड्यांच्या तुलनेतला थोडा जास्त आराम- यासाठी पेट्रोल गाड्या घेतल्या जातात.
...
डिझेल आणि पेट्रोल मधे मुख्य
डिझेल आणि पेट्रोल मधे मुख्य फरक आहे तो व्हिस्कॉसिटीचा. कमी तापमानाला व्हिस्कॉसिटी वाढते. दुस-या शब्दात त्याचा प्रवाहीपणा कमी होतो. म्हणूनच थंडीत पुर्वीच्या डिझेल गाड्यांना हीटर दिलेला असायचा. तसच कार्बन डायऑक्साईडचं एमिशन पेट्रोलच्या तुलनेत १३% जास्त आहे. म्हणजेच एमिशन कंट्रोलमधे जास्त मेहनत घ्यावी लागते.
डिझेल सायकल हे कॉम्रेशन सायकल आहे तर पेट्रोल मधे स्पार्क मुळे इग्निशन होतं. दोन्ही इंजिनांच्या रचनेतला हा मुख्य फरक आहे.
डिस्टीलेशन प्रोसेस मधे पेट्रोल हे ३५ डिग्री से ते २५० डिग्री से पर्यंत मिळतं याउलट डिझेल २५० डिग्री से च्या पुढे मिळते. पेट्रोलच्या इन्ग्रेडिएन्टस मुळे ते स्मूथ फ्युएल आहे. तर डिझेल मधे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जास्त होण्याची क्षमता आहे हे आपण पाहीलंच.
पेट्रोल मधे ३४.६ मेगाज्यूल्स / लिटर इतकी उर्जा असते तर डिझेल मधे ३८.६ मेगाज्यूल्स / लिटर इतकी उर्जा असते. म्हणून डिझेल इंजिन जास्त पॉवर देतं .
फ्युएल एफिशिएन्सीच्या बाबतीतही डिझेल पेट्रोलपेक्षा १.५ पट सक्षम आहे.
दोन्हीचे आपापले काही फायदे तोटे आहेत. परदेशात पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीमधे फारसा फरक नाही. उलट डिझेल थोडं महागच आहे. आपल्याकडे अनुदान बंद झालं तर मात्र डिझेल गाड्या परवडतील का हा विचार करायला हवा.
एवढे सारे मेसेजेस केव्हा
एवढे सारे मेसेजेस केव्हा वाचून होणार
बजेट जर ५ ते ७ लक्षाच्या दरम्यान असेल तर कोणती गाडी चांगली आहे ?
- कुटुंबकार
- इंधनाचा खर्च कमी (पेट्रोल सुद्धा चालू शकेल)
- देखभालीचा खर्च कमी
- एसी, पॉवर स्टिअरींग, पॉवर खिडक्या
- शक्यतो सेदान
- चांगले सर्विस नेटवर्क
परत लिहिण्याची तसदी देत आहे त्याबद्दल कृपया आम्हाला धोपटू नये ही विनंती.
त.टी. : महिंद्रा लोगन कशी आहे ?
हे सगळं एकेकाळी अभ्यासाला
हे सगळं एकेकाळी अभ्यासाला होतं, हे सुद्धा आता जवळजवळ विस्मृतीत गेलं आहे.
चांगली पोस्ट किरण्यके.. धन्यवाद.
महेश, तुझ्या प्रश्नाला उत्तर
महेश, तुझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून जुन्याच काही पोस्ट्स. सहज सापडल्या तेवढ्या. आणखीही असतील. काही मदत झाली तर ओकेच.
======
आय १० ही डिझेल मध्ये नाही. इतर गाड्या डिझेल-पेट्रोल अशा दोन्ही प्रकारांत आहेत. या दोन्ही प्रकारांत उरलेल्या तिन्ही गाड्यांना एकच म्हणजे फियाटचे इंजिन आहे. फॉर्म, फिट, फिनिशच्या दृष्टीने आणि इफिशियंट आणि वाईड सर्व्हिस नेटवर्कच्या दॄष्टीने मारूतीच्या गाड्या सोयीस्कर आहेत, पण इंडिका व्हिस्टापेक्षा स्विफ्ट आणि रिट्झच्या किंमती जास्त आहेत. या चौघांना सध्या फॉर्मात असलेल्या फोर्ड फिगोची चांगली स्पर्धा आहे.
खरे तर लुक्स आणि स्टायलिंगच्या दृष्टीने विचार केला, तर तुम्ही म्हटलेल्या चारही गाड्या 'जुन्या' म्हणता येतील अशी परिस्थिती आहे. या द्रूष्टीने निस्सान मायक्रा, फोक्सवॅगन पोलो, फियाट पुंटो, शेवर्ले बीट, हुंडाई आय २०- अशी नवी पिढी मार्केटमध्ये समर्थपणे उतरली आहे. अजूनही काही येत आहेत.
हो, पेट्रोल निस्सान मायक्रा साडेपाच ते सहा लाखांच्या दरम्यान येते. मी अजून चालवली नाही, मात्र तिचे रिपोर्ट्स खरेच चांगले आहेत. स्मित
==========
'बीट'चे लुक्स थोडे 'डिस्प्युटेड' या प्रकारात गणले गेले असले (अनेक लोकांना तिचे शार्प कर्व्ह्ज अँड कॉर्नर्स आवडत नाहीत), तरी अत्यंत फ्युचरिस्टिक डिझाईन असलेले एक्स्टेरियर या गाडीला लाभले आहे. पेट्रोल इंजिनचा विचार केला, तर जवळपास याच शक्तीची इंजिने असलेल्या इतर गाड्या आहेत- आय१०, स्विफ्ट, रिट्झ, पोलो, पुंटो १.२ आणि फिगो. यांच्याशीच बीटची थेट तुलना होते. यातल्या स्विफ्ट आणि रिट्झ खरे तर एकच गाडी आहे. फक्त आकार थोडा वेगळा. पण रिट्झचे दिसणेही थोडे बीट सारखेच 'डिस्प्युटेड' असे म्हणता येईल. स्विफ्ट या सगळ्या गाड्यांत सर्वात जास्त चालणारी गाडी असली, तरी तिचे वय आता दिसायला लागले आहे, शिवाय वरच्या इतर गाड्यांच्या तुलनेत तिचे किंचित कमी असलेले मायलेज. हे पेट्रोल गाडीबद्दल. (डिझेल स्विफ्टचाच खप तुलनेने खूप जास्त असेल).
लुक्सचाच विचार केला तर पुंटो ही यातली हॉटेस्ट लुकिंग कार. पण तिचा ग्लोबाकाराबद्दलही पुन्हा तेच- लवकर आऊटडेट होऊ शकणारा- आणि म्हणूनच कुणाला आवडेल, कुणाला नाही. इंजिनाच्या बाबतीतही फियाटच्या गाड्या गुणाच्या असल्या, तरी फियाटचे टाटांशी झालेले लग्न- हाही कळीचा मुद्दा. टाटांच्या अफाट आफ्टर सेल्स सर्व्हिसने गेल्या दोन वर्षात अनेक फियाटच्या ग्राहकांना शिव्या मोजायला लावले असेल.
आय१० हे या कॅटेगरीतले, आणि पेट्रोल व्हर्जन्समधले यशस्वी मॉडेल असेल. आता नवीन टिकली बांगडी करून पुन्हा नव्याने बाजारातही ती आलीय. पण असे थोडाफार मेकप करून तीच गाडी नव्याने बाजारात येऊ लागली, की समजावे, गाडीचे वय झालेय, आणि शेवटी शेवटी सुगी कापून घ्यायचा प्रयत्न चाललाय. अर्थात असे सार्याच कंपन्या करतात. फॉर्मात असलेले मॉडेल अचानक मार्केटमधून काढून घेण्याचे साहस खूपच क्वचित आणि टोयोटासारखी एखादीच कंपनी दाखवू शकते.
नव्याचे आकर्षण असलेले, आणि परिणामांची फारशी पर्वा न करणारे लोकांचा एक खास वर्ग असतो. असे लोक रिस्क घेऊन, रिझल्ट्सची वाट न बघता नवीन वस्तू घेतात. (व्यक्तीशः माझे मत थोडेफार तशा लोकांशी जुळते. स्मित ) 'बीट'च्या बाबतीत तर इतकी रिस्कही नाहीये. गाडी बाजारात येऊन बरेच दिवस झालेत. अजूनही तिचे लुक्स, इंटेरियर, इनोव्हेटिव्ह बिल्ड (पाहा- आतले इंस्ट्रूमेंट पॅनल, मागच्या दरवाजांची हँडल्स, टेललँप्सचे डिझाईन इ.) फ्रेश आणि फ्युचरिस्टिक वाटतात. इतर गाड्यांपेक्षा ही थोडी छोटी भासते. पण तशी खरे तर ती नाही. किंमतीच्या बाबतीत तिच्याशी समर्थ स्पर्धा फक्त 'फोर्ड फिगो' करू शकेल.
वरच्या गाड्यांशी टेक्निकली तुलना करून बघायची असेल, तर मी काय सांगणार? थेट http://www.chevrolet.co.in/content_data/AP/IN/en/GBPIN/001/beat-compare.... इथेच पाहा. स्मित
=====
स्पार्क आणि बीट या दोघींना वेगळ्या सेगमेंटमधल्या गाड्या म्हटले पाहिजे.
स्पार्क ही मुळातच मारुती अल्टोला स्पर्धा म्हणून काढलेली. शेवर्लेची एंट्री लेव्हल कार. अल्टो ८०० सीसी तर स्पार्क १००० सीसी. वॅगन आरही १००० सीसी. तरी अल्टोपेक्षा स्पार्क आणि वॅगनआर या गाड्यांच्या किंमती किमान पन्नास हजाराने जास्त आहेत.
बीट ही स्पार्कपेक्षा लाखभराने तरी जास्त किंमत असलेली गाडी आहे. १२५० सीसी आणि ८४ बीएचपी पॉवर असलेल्या या गाडीची स्पर्धा थेट पोलो, पुंटो, रिट्झ, स्विफ्ट, फिगो यांच्याशी आहे. तिचे फुचरिस्टिक, लवकर आऊटडेट न होणारे लुक्स हा नक्कीच प्लस पॉईंट आहे. मागच्या दरवाजांच्या काचांच्या लहान आकारामुळे तुम्हाला ती 'अंधारी' वगैरे वाटली असेल. (मी बीट चालवली आहे, आणि मागे बसूनही पाहिले, पण तसं काही वाटलं नाही). आपल्याला थोड्या मोठ्या खिडक्या बघण्याची सवय असल्यामुळेही तसे वाटत असेल एखादे वेळेस.
२-३ दिवसांपुर्वी टाइम्समधल्या बीटच्या जाहिरातीत "Now Beat also with 3 years chevrolet Promise" असा उल्लेख दिसला, त्याबद्दल शोरुममधून पुन्हा माहिती घ्या. (अॅडिशनल वॉरंटीपोटी जास्त पैसे उकळत आहेत का, तेही बघा).
बाकी एंट्री लेव्हल कार्स मध्ये अल्टो आणि वॅगनआर या दोघींपैकी माझी पसंती स्पार्क ला. लुक्स, पर्फॉर्मन्स, मायलेज, व्हॅल्यु फॉर मनी, मेंटेनन्स कॉस्ट या सगळ्याच बाबतीत.
आणखी थोडे पैसे टाकणार असाल, तर बीटच्या सोबत वर उल्लेख केलेल्या इतर गाड्यांचाही विचार करा.
===========
स्पार्क आणि वॅगनआर या दोन्ही गाड्या (माझ्याकडे नसल्या तरी) मी त्या चालवून बघितल्या आहेत, आणि माझा पर्सनल चॉईस 'स्पार्क' असल्याचे मी वरती म्हटले आहेच.
वॅगनआरचे आता वय झाले आहे, आणि गुडविलचा फायदा घेऊन शेवटी जास्तीत जास्त गाड्या खपविण्याचा मारुतीचा प्रयत्न आहे. त्या तुलनेत स्पार्क ही अजून बरीच तरुण, फ्रेश लुक्स असलेली गाडी आहे. किंमत सारखीच आहे.
गाडी घेतल्यानंतर सहा-एक महिन्यातच आणखी थोडे पैसे टाकून 'वरचे' मॉडेल घ्यायला हवे होते, असं प्रत्येकालाच वाटतं. त्या दृष्टीने स्पार्कच्या थोड्या वरच्या किंवा टॉप एंड मॉडेलचा विचार करून बघा. (पण मग त्यानंतर आणखी काही पैसे टाकून जरा आणखी भारी, दुसरीच गाडी का नाही घेतली, असंही वाटतं. फिदीफिदी हे नेव्हर-एंडिंग्-लुप आहे, त्याला काही इलाज नाही. स्मित )
===========
जास्त वापर होणार नसेल वॅगन-आर-ड्युओ घेऊ नकोस. माणसांसाठी फारसा नसला, तरी सामानासाठीच्या स्पेसचा थोडा प्रॉब्लेम येतोच. लुक्स आणि नवीन डिझाईन महत्वाचे वाटत असेल, तर या गाडीचे भरपूर वय झाले आहे, हे लक्षात ठेवायला हवे.
स्विफ्ट इज द प्रुव्हन मशिन. त्यामुळे तिचा प्रश्नच नाही. पण गाडीच्या वयाचाच विचार केला, तर स्विफ्टचेही बर्यापैकी वय झाले आहे. रिट्झ आणि स्विफ्ट एकच गाडी आहे, फक्त लुक्स सोडले, तर. त्यामुळे मी निर्णय घेताना तरी रिट्झला पसंती देईन.
फिगो रिट्झपेक्षा थोड्या कमी किंमतीत मिळेल. तेवढीच जागा आणी कंफर्ट. पेट्रोल स्विफ्ट/रिट्झपेक्षा पेट्रोल फिगोचे मायलेज मात्र थोडे जास्त आहे. रिट्झ आणि फिगो दोन्ही नवीनच आहेत बाजारात. त्या दृष्टीने एक्साइटमेंट सारखीच. सर्व्हिस नेटवर्क आणि रिसेल व्हॅल्यु महत्वाचे वाटत असतील, तर अर्थातच रिट्झ विन्स द रेस.
पाच लाखांपर्यंत बजेट आहे म्हणलास म्हणून, खालच्या पद्धतीनेही विचार करून बघ-
१) १.२ पुंटो आणि १.२ आय२० ची बेसिक मॉडेल्स ५ ते ५.२५ च्या दरम्यान मिळतील. मला या दोन्हींत निवडायला सांगितल्यास- आय२०. या दोन्ही गाड्या भारतातल्या परंपरागत 'स्मॉल कार्स' पेक्षा नक्कीच मोठ्या आणि आकर्षक दिसतात.
२) १.२ पोलोचे बेसिक मॉडेल पाच लाखांत मिळेल. पण हिचे लुक्स मात्र पुंटो, आय२० किंवा रिट्झइतके (मला) एक्सायटिंग वाटत नाहीत. 'जर्मन टेक्नॉलॉजी' हा मात्र युएसपी.
======
स्मॉल कार वॉर मध्ये या वर्षात धडाधड पडलेल्या उड्यांपैकी ही एक. फोक्सवॅगन, फियाट, होंडा या लोकांनी पहिल्यांदाच 'स्मॉल कार्स' भारतीय बाजारपेठेत सादर केल्या आणि जनरल मोटर्स, टाटा, हुंडाई, मारूती यांनी आपली स्मॉल कार्सची रेंज वाढवली- ती याच वर्षात.
'फिएस्टा'चा सेल उतरणीला लागल्यापासून आणि 'फ्युजन' आणि 'आयकॉन' नावाच्या गाड्या इतिहासजमा व्हायच्या मार्गावर आल्यानंतरचे फोर्डचे हे जरा उशिराचे, पण पहिले पाऊल. १.२ लिटर्स-पेट्रोल इंजिन असलेल्या या गाडीचा बर्यापैकी मोठा आकार, आतली बरी स्पेस (शिवाय फिएस्टापेक्षाही मोठा व्हीलबेस) बघून ३.९ लाखांपासून सुरु होणारी किंमत नक्कीच आकर्षक आहे. या किंमतीत आता-आतापर्यंत मारुतीने झेन, वॅगनआर, अल्टो सारख्या गाड्या विकल्या यावर आता विश्वास बसत नाही.
१.४ डिझेल फिगो हाही पर्याय उपलब्ध आहेच. पण अर्थातच जास्त किंमतीत. जास्त मेंटेनन्ससह. रोजच्या रोज वापर नसेल, तर पेट्रोल गाडीच घ्यायला हवी.
१.२ पेट्रोलच्या इतर गाड्यांच्या कमीत कमी किंमती बघा.
मारुती स्विफ्ट- ४.५
मारुती रिट्झ- ४.६
मारुती ए-स्टार- ४.२
शेवर्ले बीट- ४.६
फियाट पुंटो- ४.७
टाटा इंडिका- ४
होंडा जाझ- ८
हुंडाई आय१०- ४
हुंडाई आय २०- ५.३
या किंमती बघता, फोर्डने प्राईस वॉर मध्ये सॉलिड पंच मारला आहे, हे नक्की. लुक्स, पॉवर, इंजिन, स्पेस, पेस बाबतही ती ओके वाटते.
१.४ लिटर्स च्या फोक्सवॅगन पोलोची किंमत ४.९ पासून सुरू होते हे लक्षात ठेवा.
माझी निवड- शेवर्ले बीट किंवा फोक्स्वॅगन पोलो.
===========
कर्ज म्हणजे घरबुडवेपणा, ही समजूत जुनी झाली. कर्जे उचलून शहाणपणाने वागून प्रगती केल्याची नुसती आजूबाजूच्या कुटूंबांत/नातेवाईकांतच नव्हे, तर मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उदाहरणे सापडतील. सामान्यत: एकाच उत्पन्न पातळीवर जगातला कोणताही माणूस आयुष्यभर राहत नाही. आज जड वाटत असलेला हप्ता वर्षभराने हलका वाटतो, आणि पाच वर्षांनी जाणवतही नाही. विशेषतः होम लोन ही तर मला अभिमानाची गोष्ट वाटते. तुम्ही स्वतःच्या हिंमतीवर घर घेतले आहे, ते कर्ज फेडण्याची कुवत/धमक तुमच्यात आहे, आणि तुमची ही कुवत तुमच्या बँकेनेही ओळ्खून एक प्रकारे तुमचा सन्मान केला आहे, एक प्रकारे तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठाच दिली आहे- या पद्धतीने विचार करा. घराच्या हप्त्यांधल्या वार्षिक व्याजाच्या भागासाठी सरकार तुम्हाला टॅक्स मध्ये सुट देते, यातच सारे आले. शिवाय गृहकर्जाचा व्याजदर इतर कर्जांपेक्षा सर्वात कमी असतो, हेही एक मुख्य कारण.
यामुळे, काही अपदात्मक परिस्थिती वगळता, घराचे कर्ज लवकर 'निल' करण्याच्या भानगडीत पडू नका.
मित्र म्हनतो मंग आपन कधी हिंडायचं फिरायचं? आपल्या इच्चा कधी पुर्या करायच्या ? >>>
हा मुद्दा माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचा आहे. (स्वतःच्या हिंमतीवर) पंचविसाव्या वर्षी घेतलेली ३ लाखांची गाडी, तिसाव्या वर्षी ५ लाखांची गाडी, पस्तिसाव्या वर्षी १० लाखांची आणि चाळिसाव्या वर्षी घेतलेली ३०-४० लाखांची गाडी यांची किंमत माझ्या मते सारखीच आहे. वय वाढते, भावना बोथट होतात, फुलपाखरू अन इंद्रधनुष्ये बघून हरखायचे-नाचायचे दिवस संपतात अन मग लक्षात येतं, अरे, इतके दिवस घास घास घासलो, काम केलं, ते कोणासाठी? मी, माझी हौस-मौज तर राहून गेली तशीच!!
वय वाढल्यावर रोल्स रॉईस अन लँबर्घिनी पण येईल एखादे वेळेस; पण उमेदवारीच्या काळात हिंमत दाखवून, कर्ज काढून, हप्ते फेडून घेतलेल्या मारुती ८०० किंवा अल्टोइतकं सुख अन अभिमान नाही देणार ती. स्मित
हा अतिशय साधा असा 'लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी' आहे. हातात भाकरी अन पोटात प्रचंड भुक असल्यावर त्या भुकेची किंमत करोड रुपयेही होईल. पण एकदा का अर्धी भाकरी खाऊन संपवली, की हातात उरलेल्या अर्ध्या भाकरीची किंमत अर्धा कोटी नाही, तर त्यापेक्षा खुप कमी होईल. स्मित
हा सारा निर्णय जनाचे अन मनाचे ऐकून, नीट विचार करून, परिस्थिती अन भविष्यातल्या संधी बघून घ्यावा; हे ओघाने आलेच.
========
१) आधी बजेट ठरवा.
२) कॅश की लोन ते ठरवा.
३) त्यानंतर जास्तीत जास्त किती वर्षे जुनी गाडी चालू शकेल, ते ठरवा.
(यावरून क्र.१ आणि क्र.२ वर पुन्हा विचार करा.)
४) पेट्रोल की डिझेल ते ठरवा. (किती वापरणार, रनिंग किती होणार यावरून ठरवा.)
५) मग ब्रँड आणि प्रॉडक्ट (कंपनी आणि गाडी) ठरवा.
महिन्याला ५ ते ८ हजार हप्ता भरायची तयारी असेल, तर फक्त ५०००० ते १००००० भरून ३ ते ५ लाखांची गाडी दाराला लागू शकते, हाही हिशेब मनात ठेवा. स्मित
==========
धन्स, ह्या सगल्या पोस्ट मुले
धन्स, ह्या सगल्या पोस्ट मुले माझे थोडे ज्ञान वाढले
धन्स, ह्या सगल्या पोस्ट मुले
धन्स, ह्या सगल्या पोस्ट मुले माझे थोडे ज्ञान वाढले
सॉरी चुकून पोस्टलं .
सॉरी चुकून पोस्टलं .
वय वाढल्यावर रोल्स रॉईस अन
वय वाढल्यावर रोल्स रॉईस अन लँबर्घिनी पण येईल एखादे वेळेस; पण उमेदवारीच्या काळात हिंमत दाखवून, कर्ज काढून, हप्ते फेडून घेतलेल्या मारुती ८०० किंवा अल्टोइतकं सुख अन अभिमान नाही देणार ती.>>>>>> सोला आने सच कही!
मला आजही माझ्या बॉक्सर गाडीची आठवण येते आणि तिच्यावर केलेली भटकन्ती आठवते!
वर साजिर्याने लिहिलेली
वर साजिर्याने लिहिलेली मायक्रा गेल्या महिन्यात जावेने घेतलिये. मस्त गाडी.
साजिरा, धन्यवाद जुन्या पोस्टस
साजिरा, धन्यवाद जुन्या पोस्टस रिपोस्टल्या बद्दल...
जर येत्या दिवाळीत गाडी घ्यायची झाली तर नविन येऊ घातलेल्या मॉडेल्सबद्दल काही सांगता येईल काय ? सद्ध्याच्या आणि येणार्या मॉडेल्समधे सेदान व उंच गाडी (फिएस्ता सारखी) कोणती चांगली असू शकते ?
छान चाललाय हा धागा आणि मुख्य
छान चाललाय हा धागा आणि मुख्य म्हणजे अतिशय उपयोगी. साजिरा धन्यवाद. किरण्यकेच्या पोस्टीही उपयोगी.
एक सुचना करू का? माहिती खुप आहे पण शोधणं कठीण आहे. एक कोष्टक करून सगळ्यात वर टाकलं तर? सगळ्यात वर जे वर्गीकरण आहे तेच ठेवा. पण इतर ठळक पॅरॅमीटर्सही त्यात दिसू देत. म्हणजे एकत्रित आणि थोडक्यात सर्व माहिती मिळेल. बाकी बारीक-सारीक डिटेल्स डिस्कशन्समध्ये येतच आहेत.
मामी, सूचना योग्यच आहे. पण
मामी, सूचना योग्यच आहे. पण अशी कोष्टकीकृत माहिती अनेक वेबसाईट्सवरही मिळतेच की. टेक्निकल आणि प्राईसिंग डिटेल्स, एखाद्या गाडीचा इतर गाड्यांशी तुलनात्मक अभ्यास इ. इ.. शिवाय शोरूमवालेही अशी मदत करायला तत्पर असतातच. तसं इथं करणं बर्यापैकी अवघड आहे. कारण गाडी घेण्यामागे आपल्या इथे अनंत डिसीजन मेकिंग पॅरामीटर्स असतात. त्यातले काही भावनिकही. कुणाला प्राईस महत्वाची, कुणाला ब्रँड इमेज आणि लॉयल्टी, कुणाला आफ्टर सेल्स सर्व्हिस, कुणाला रिसेल व्हॅल्यू, कुणाला स्टेटस सिंबॉल.. अनेक. त्यामुळेच इथे त्याला अनौपचारिक गप्पांचे स्वरूप आले आहे.
मुळ पोष्टीत जे काय वर्गीकरण वगैरे आहे, ते पण अतिशय प्राथमिक स्वरूपातले आहे, शिवाय दीडेक वर्षांपुर्वीचे आहे. त्यातल्या अनेक गोष्टी आता बदलल्या असतील, काही नवीनही आल्या असतील.
पण अनेक तांत्रिक/आर्थिक/इतर गोष्टींचा अभ्यास करून नव्याने कोष्टक इथे कुणी केले, तर मदत होईल, हेही नक्की. कुणी करू शकत असल्यास करावे कृपया. असे बिनचूक कोष्टक मांडण्यासाठी लागला टेक्निकल काँपीटन्स माझ्यात नाही, असं मला वाटतं.
सेदान व उंच गाडी (फिएस्ता
सेदान व उंच गाडी (फिएस्ता सारखी) कोणती चांगली असू शकते ?>> हे नीटसे कळले नाही. बर्याचशा गाड्या चालवणार्याची जास्तीत जास्त उंची गृहित धरूनच बनवलेल्या असाव्यात. सेदान कार्स तर नक्कीच.
अरे दु चाकी त Acces 125
अरे दु चाकी त Acces 125 झक्कास आहे . २.५ वर्ष वापरात ४५-५० मायलेज . होंडा activa पेक्शा मस्त.
ऱोयल ३५० परत येतीय साजीरा माहीती एकदम उपयुक्त अन अनुभवी. धन्स!
स्विफ्ट च्या suspention बद्दल
स्विफ्ट च्या suspention बद्दल अन मागे बसतना एन्ट्री करते वेळी विचीत्र वाटल फोर्ड फिगो मस्त
साजिरा अरे भावनाओंको समझो बर
साजिरा अरे भावनाओंको समझो
बर लोगन बद्दल सांग ना ? कशी आहे ? बेन्गलोरमधे खुप खुप लोगन्स आहेत. जास्त करून कॅब्स.
मला त्या गाडीचे लुक्स छान वाटत नव्हते (अजुनही नाही) पण काही वेळा प्रवास केल्यामुळे गाडी चांगली आहे असे मत होत चालले आहे. बाकी तांत्रिक बाबींबद्दल रिपोर्ट कसा आहे ?
टीम बीचपी चं रजिस्ट्रेशन करा.
टीम बीचपी चं रजिस्ट्रेशन करा. पिन पॉईंटेड प्रश्न टाका. तशीच उत्तरही मिळतील. या साईटवरच्या रिव्ह्यूजना कारमेकर्सकडून सिरीयसली घेतलं जातं. स्पार्कने बीज इंटिरियर पेश केल्यावर ताबडतोब झेन मधे तसे बदल केले गेले कारण या साईटवरचं विश्लेषण..
नेटवरची सर्वात चांगली साईट ( कार घेण्यासाठी )
विशेषतः तोंडात बोट घालायला
विशेषतः तोंडात बोट घालायला लावणारं जर्मन इंजिनियरिंग एकदा लोकांना कळलं कि मग जपान / कोरिया या देशांच्या कार्सचं काही खरं नाही. >>>>
आँ काय सांगता राव. आम्हाला तर वाटले की जपानी / कोरीयन गाड्या अमेरिकेत एक नं राखून आहेत.
आज अमेरिकेत जपानी आणि कोरीयन गाड्या सर्वात जास्त विकल्या जातात. अगदी अमेरिकन कार्स पेक्षाही. स्टॅट देत नाही. गुगल करून शोधावे. VW जेवढी हाईप करते त्यापेक्षा किती तरी चांगली कॅम्री आहे. (पर्सनली मला कॅम्री आवडत नाही तरी तिचेच नाव देतो कारण ती हाईप्ड VW पसाटपेक्षा चांगली आहे) आणि ऑडीने कितीही जोर मारला तरी ती लेक्सस, अॅक्युराच्या पुढे जात नाही! फक्त जर्मन बिमर्स मात्र विकल्या जातात. मर्सिडीजला लेक्सस आणि अॅक्युरा, इनफिनिटीमुळे वाईट दिवस आले आहेत, आणि इ क्लासवर १२००० $ चा डिस्काउंट घेऊन मित्राला कार खरेदी करून दिली! असो जर्मन पुराण बास.
गाडी कुठली मेड आहे ह्या पेक्षा गाडी आपल्याला चांगली का वाटते हे माझ्या मते जास्त महत्त्वाचे आहे.
बर्याचशा गाड्या चालवणार्याची जास्तीत जास्त उंची गृहित धरूनच बनवलेल्या असाव्यात. सेदान कार्स तर नक्कीच >>>
भारतीय मार्केट बाबत हे तेवढे खरे नाही साजिर्या, होंडा सिटीचा रोड क्लिअरंस आणि एखाद्या टाटाच्या गाडीचा रोड (सेडान मधीलच) क्लिअरंय ह्यात बराच फरक आहे. मला नक्की मॉडॅल आठवत नाही, पण रोड क्लिअरंस नसल्यामुळे लोक घेत नाहीत. आपल्याकडे रोड क्लिअरंस अशी काही भानगड नसते, ८० च्या स्पिडने अचानक जाताना एक भला मोठ्ठा स्पिड ब्रेकर येतो आणि खालचे बंपर घासले जाते.
शिवाय उत्पादन करणारे माणसं बसल्यावरचा क्लिअरंस लक्षात घेत नाहीत तर गाडी नेकेड असतानाचा, त्यामुळे अनेक गाड्यांना हा प्रॉब्लेम आहे व गाडी विकत घेताना नक्कीच प्रत्येकाने हे लक्षात घ्यावे.
हा मुद्दा आधीही फारएण्ड यांनी
हा मुद्दा आधीही फारएण्ड यांनी संयतपणे उपस्थित केलाय..
त्याचं उत्तर आधीच दिलं गेलेलं आहे.
जपान आणि कोरियन बनावटीच्या गाड्या जेव्हा युरोप आणि अमेरिकेत विकल्या जातात तेव्हा त्या सुरक्षविषयक सर्व नियम पाळतात. ४०% क्रॅश टेस्ट ही कंपल्सरी असल्याने गाडीच्या पत्र्याचा टफनेस तसा हवा असतो. भारतात ही अट नाही. मग वजन कमी करायच्या नादात ही अट फाट्यावर मारली जाते.
भारतातली झेन आणि युरोपातील झेन यात फरक आहे. इतरही ब-याच मॉडेल्स मधे फरक आहे. अगदी सर्रास !!
याउलट शेवर्ले (अमेरिकन), फिएट (युरोपीय) ऑडी, स्कोडा, मर्सिडीझ, फोक्सवॅगन या जर्मन कार्स यांनी भारतासाठी वेगळ्या कार्स अशी फूटपट्टी लावलेली नाही.
होंडाचा अमेरिकेत कारखाना आहे आणि ती सर्वाधिक खपाची कार आहे हे ठाऊक आहे... काय म्हनायचंय कळालं असावं
होंडाचा अमेरिकेत कारखाना आहे
होंडाचा अमेरिकेत कारखाना आहे आणि ती सर्वाधिक खपाची कार आहे हे ठाऊक आहे... काय म्हनायचंय कळालं असावं >>
जपानी की अमेरिकन हा घोळ घालायचा आहे का? मग मुळ अमेरिकन फोर्ड, शेव्ही आणि क्रायसलरच्या काही गाड्या / मॉडेल्स अमेरिकेबाहेर बनतात व अमेरिकन म्हणून विकल्या जातात हे सुद्धा माहीत असेलच.
असो कुठली गाडी आणि कुठलं इंजिनियरिंग ह्या वर माझी ठाम मतं नाहीत, ती गाडी "माझ्या क्रायट्रेरियात" बसावी इतके सोपे मी केले आहे. पण इतरांची मते तशी ठाम असू शकतात हे मान्य करून पुढे जाउ.
पण एवढे करूनही आज जपानी होन्डा मात्र भारतात नं १ वर आहे. ( आणि अमेरिकेत नं १ व होन्डा नाही, टोयोटा आहे. )
मी दोन पायावर चालतो डाव्या का
मी दोन पायावर चालतो
डाव्या का ?
मग उजव्या का नाही
उजव्या म्हणालात ?
काही लोक डावा पाय पण वापरतात
छे हो मी दोन्ही..
तेच ते
उपा आलाच कि त्यात
अहो पण मी म्हणालो ना
तेच ते डापा आलाच कि..
बर बाबा माझच चुकलं
मी वापर्तो उपाय
बघा
डापाय नाही ना वापरत ?
किती वाइट
मी माफी मागतो आता.. मी डापाय वापरतो..
म्हणजे ..तुम्ही चक्क उपाय वापरत नाही
हद्द झाली
चालू द्या
Thanks for the entertainment.
Thanks for the entertainment. Pan mat khodla rather maze mat mandle tar ilas traga kaa? haa prashna padla ache.
Patra kami Jaad he Karan rheela ter lok tata sumo vaapartil!! Santo nahi vaa alto naahi.
Hundai va japani car German pexaa kami kimteet miltaat ani soi pan tych he arthik ganit tya pathimaage aahe.
आणि देसी लोक होंडा आणि टोयोटा
आणि देसी लोक होंडा आणि टोयोटा सोडुन दुसरी कुठली घेत नाहीत
भारतात मारुती, टाटा, hyundai
भारतात मारुती, टाटा, hyundai बेस्ट. मी अल्टो के १० घेतली. पैसावसुल कार. मला तर स्पार्क पेक्षा चांगली वाटली. असो...
केदार मत खोडून काढणे हा
केदार
मत खोडून काढणे हा प्रकार अशा फोरममधे बालिश वाटतो. इथं माहीती देणे घेणे अपेक्षित असावे. असो. यासाठीच मी एनर्जी वाया घालवत नव्हतो.
डबल स्टँडर्डचा कोरियन / जपानी कंपन्याचा मुद्दा तुमच्या लक्षात आला कि तुमच्याशीही चर्चा करू... अगदी नक्की.
तोपर्यंत तुमचं चालू द्या... . कुठली गाडी कुठल्या देशात नंबर वन आहे, आणि कुठल्या देशात किती खपते, हा इथल्या चर्चेचा विषय नव्हता अशी माझी समजूत आहे.. जपानी / कोरियन कंपन्यांना भारतात १५ - २० वर्ष झालेली आहेत. युरोप /अमेरिकन कार्स आत्ता कुठे येताहेत. या संदर्भात मी सेफ्टी स्टँडर्ड आणि इतर फीचर्स बद्दल बोलत होतो. या कार्स भारतात आणि इतरत्रही एकसारख्याच आहेत. काटछाट नाही. हा मुद्दा आधी सुद्धा दोन वेळा येऊन गेलाय. असो.
ब्य्लू मोशन टेक्नॉलॉजीबद्दल सांगत असाल तर मात्र आवडेल ऐकायला. . ( एनी वे, मी काही तज्ञ नाही. तज्ञांच्या रिव्ह्यूज साठी वर एक साइट रिफर केलेली आहे..)
गाडी घेतल्यानंतर सहा-एक
गाडी घेतल्यानंतर सहा-एक महिन्यातच आणखी थोडे पैसे टाकून 'वरचे' मॉडेल घ्यायला हवे होते, असं प्रत्येकालाच वाटतं.
>>
यावरून एक विनोदी एस एम एस आठवला.
what is similarity in marriage and mobile ?
Thode din aur ruk jate to isase achchha mODel mila jaataa....!
यात आता मोटारही टाकली पाहिजे.
रच्या कने
हभप. (हळूच भलतीकडे पहाणारे)दादाशास्त्री कोंडके यांच्या पिक्चरमध्ये एक सीन आहे.
दादा (बहुधा पद्मा चव्हाणच्या ) नादी लागलेला असतो तेव्हा उषाचे आणि त्याचे भांडण होते.
उषा चिडून विचारते ' माज्यात असं काय कमी हाय तव्हा तू तिच्या नादी लागला आहेस'?'
त्यावर दादा दोघींची तुलना करून सांगतात (सगळे आठवत नाही पण फारच भारी आहे ते..)
' तुझ्या पायात जोर हाये तर तिच्या पायात मोर हाय'
तुझ्या डोल्यात ... हाय तं तिच्या डोळ्यात..... हाय
तुज्या व्हटात .... हाय तं तिच्या व्हटात .... हाय...
वगैरे अशी बरीच तुलना झाल्यावर त्याला काहीच पुढे सुचत नाही.
मग शेवटी तो वैतागून तत पप करीत म्हनतो
"अगं तुला 'हे ' हाये तं तिला 'ते' हाये ..... "
तसं मोबाईल , गाड्या , टीव्ही घेताना या डायलॉगची प्रकर्षाने आठवण येते
"याला हे हाय तं त्याला 'ते 'हाये...
?
या संदर्भात मी सेफ्टी
या संदर्भात मी सेफ्टी स्टँडर्ड आणि इतर फीचर्स बद्दल बोलत होतो. या कार्स भारतात आणि इतरत्रही एकसारख्याच आहेत. काटछाट नाही. >> हे तीतके बरोबर नाही. मला अमेरीकेचे माहीत नाही. पण भारतात GM च्या spark, beat, Ford Figo, Fiesta या गाड्या without airbags, abs पण असतात. पण अमेरीकेत त्या तशा विकतील? In fact in India safety is optional आणि सर्व कंपन्या ते follow करतात.
अरे आज चक्क हा धागा पण
अरे आज चक्क हा धागा पण भरकटलेला दिसतोय. साजिरा आवर रे........
In fact in India safety is
In fact in India safety is optional
>>भारतातले चिन्धीचोर ग्राहक जास्त पैसे पडायला नकोत म्हणून स्वतःची सिक्युरिटी पणाला लावतात. विमा न काढणे, सर्विसिंग न करणे, टायर वेळेवर न बदलणे.स्कूटरला आरसे न लावणे. त्यातून तो व्यावसयिक असेल तर विचारूच नका. त्याला दर ठिकाणी 'नफ्यात घाटा' दिसत असतो..अगदी एस टी सारख्या सरकारी संस्था देखील तशाच..
Pages