मार्च पर्यंतच सगळे महत्वाचे ट्रेक सुखरुप पार पडले होते... उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीतील ट्रेक म्हणजे फारच खडतर काम असते... तोरणा-राजगड करून महिना उलटला होता... संधन व्हॅली, उल्हास व्हॅली हे सोप्या कॅटेगीरी मोडणारा ट्रेक करायचा कट शिजला होता... पण शिजलेला कट उधळण्यास वेळ लागत नाही.
झाले ही तसेच... दिनदर्शिका चाळताना सोमवार १८ एप्रिलला चैत्र पौर्णिमा येत असल्याचे निर्दशनास आले... लगेचच मी शनिवार १६ अप्रिलच्या moonlight trekचे सुतोवाच भटकंती कट्ट्यावर केले... तरी जायचे कुठे या वर मात्र प्रश्णचिन्हच होते...
"गोरखगड!" तो प्रश्ण Yo Rocks ने सोडवला.
Yo ने मेलामेली करून कल्याण-मुरबाड-देहरी-गोरखगड असा कार्यक्रम आधीच जाहिर केला होता... ठाण्यातील अॅडमिन गटग आटोपून कल्याणला पोहचायला मला साडे दहा झाले... Yo ने एकरा ट्रेकर्सची जुळवाजुळव केल्यावर कल्याण वरून सव्वा अकराची मुरबाडला जाणारी शेवटची येस्टी पकडली... येस्टीत बसल्यावर ट्रेकचा 'खजिनदार' कोण? यावर बरीच टोलवा-टोलवी झाल्यावर गिरिविहारने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला... :p पुढे मुरबाड वरून देहरीला जाणारी येस्टी दोन मिनिटातच सुटते अशी आगाऊ सुचना Yo ने देऊन ठेवली होती... मुरबाडला पोहचताच ठरल्या प्रमाणे सगळा लवाजमा देहरीच्या येस्टीत घुसला... तिथे तर आधीच Yo चे Trekmates स्थिरस्थावर झालेले दिसले... मग काय एकच जल्लोष झाला.
खच्चुन भरलेल्या बस मधे मला ड्रायव्हरच्या मागे उभं रहाण्याची शिक्षा मिळाली... त्यातच एक गावकरी तर चक्क ड्रायव्हरच्या सिट मागेच बसला होता... साधारण एका तासात देहरी गाठले... गाव सामसुम होतं... ट्रेकमेट्सची मंडळी चहानाष्टा करून ट्रेकला सुरवात करणार होते... तीच संधी साधुन आम्ही गुहेवर ताबा मिळविण्याचा मनसुबा मनाशी ठरवून पुढे निघायचे ठरविले... निघण्या पुर्वी ठाणे गटगचे भेट-वडे आणि मैत्री-पेढ्यांची आहुती देण्यात आली... हवेत अजिबात गारवा जाणवत नव्हता... त्रयोदशीचा चंद्र आपलं काम चोख बजावत होता... इथे उणिव होती ती फक्त एका कवि मनाची
टॉर्च, कॅमेरे आदींनी सशस्त्र झालेल्या मावळ्यांनी गोरखगडाकडे कुच केली तेव्हा मध्यरात्रीचे दिड वाजून गेले होते... मुख्य रस्त्यावरील विहिर मागे टाकून डाविकडिल देवळाकडे वळलो आणि देवाळा मागिल रस्त्याने मार्गक्रमण सुरू केले...
पंधराव्या मिनिटाला हाशऽऽहुश्शऽऽ करत पहिला पडाव पडला... थोडीफार उंची गाठल्याने चांदण्यात सुखं झालेल गावं दिसलं... तेथुन थोडं पुढ गेल्यावर चढाईचा पहिला टप्पा लागला... तो टप्पा पार करता करता सगळे मावळे घामाने चिंब झाले...
रात्री ही परिस्थीती तर उद्या उतरताना काय हाल होणार याची जाणिव झाली... पहिल्या टप्प्या नंतर पठार लागले तसे प्रत्येकाचे कॅमेरे बाहेर येऊ लागले. जल्ला या कोळाखातही फोटो काढण्याची खुमखुमी काही स्वस्थ बसू देईना... म्हंटले फोटो कसला काढता तर, म्हणे "गोस्ट ट्री"चा... हो... बरोबर ऐकलात तुम्ही... 'गोस्ट ट्री'!... खोडांपासून फांद्यांपर्यंत पार सफेद रंगाची झाडे... त्यात तो चंद्रप्रकाश तर त्यांच्या रुपात अधिकच भर घालित होता... एकदम गुढरम्य! पहिल्यांदा पाहिले तेव्हा भारीच वाटलं... पण जसं जसं पुढे जाऊ लागलो तस तसे त्या गोस्ट ट्री च्या फांद्यांच्या आकारांनी अमानविय बाफच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या...
पठार संपल्यावर मुख्य चढाईला लागलो तसे आमच्या मधिल अंतर वाढत चालले... मानसिक आधारासाठी मग त्या जंगलात एऽओऽ सुरांची जुगलबंदी सुरू झाली... काही वेळाने पुढे गेलेले ट्रेकर्स साद देईनासे झाले... तेव्हा नक्की कोण चुकले याचा अंदाज येईनासा झाला... रोमाने जरा आजू बाजूचा कानोसा घेऊन योग्य वाट असल्याची खात्री केली आणि वाटचाल पुन्हा सुरू झाली... डाविकडे गोरखचा उभा कडा आणि उजविकडे धमधम्याचा उंचच उंच डोंगर दिसत होते... त्यावर बिनधास्त बागडणारे धुके पाहुन पुन्हा एकदा कवि मनाची उणिव प्रखर्षाने जाणवली...
उजविकडे दूर सिद्धगडावर तांबडी माळ दिसत होती... कुणाला तो वणवा वाटतं होता तर कुणाला सिद्धगड माची वरिल वस्तीचा शोध लागतं होता... रातकिड्यांच वाद्यवृंद, धुक्यात हरवलेले डोंगर, चांदणं शिंपडलेल्या डोंगरवाटा आणि काय हवं दुर्गभ्रमंती साठी... मस्तच... आपसूकच अंगावर शहारा येऊन गेला...
काही वेळाने एका पडक्या देवळापाशी पुढे गेलेले आमचे खट्ट्याळ लोक्स भेटले... देवळा समोरच पाण्याची टाकी आहे... नळा खाली कोरडा घसा ओला करून रिकाम्या बाटल्या भरून घेतल्या... ताजेतवाने झाल्यावर ट्रेक मधिल अंतिम चढ चढायला सुरवात केली... चढ सोप्पा होता पण अंधारात वाट सापडत नव्हती... शे-दिडशे फूट वर चढून गेल्यावर गोरखगडाचा दरवाजा दिसला... महाराजांच्या इतर गडांप्रमाणेच हा दरवाजाही आत शिरताच उजविकडे वळणारा होता... दरवाजात मिट्ट अंधार...
दरवाजात नारेबाजी करून पुढे सरकलो... पुढं एका पायरीवर शिलालेख दिसला... दरवाजातून उजविकडे गेल्यावर मश्चिंद्रगडाचे दर्शन झाले...
तेथून दहा पावलांवर गुहा सापडली... पुढे गेलेले टवाळखोर कोणत्या रस्त्याने गेले याचा अंदाज घेण्यासाठी पुन्हा एऽओऽ ची आळवणी झाली... पण व्यर्थ तिन वाजून गेले होते... मी, गिरि आणि Yo ने गुहेत जाऊन आधी पाठिवरील वजन कमी करू नी मग शोध मोहिम हाती घेऊ असे ठरविले... गिरीने गुहेत प्रवेश करताच दुसर्या क्षणाला गुहेत दबा धरून बसलेल्या टवाळखोरांनी जंगली चित्कारांनी गुहा दणाणून सोडली... #@$%@#$^
गुहेचा विस्तार मोठा होता... ५० एक जणांची आरामात रहाण्याची सोय होऊ शकते एव्हढा प्रशस्त मंडप होता... गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर दत्तगुरू आणि साईबाबांचे चित्र रेखाटलेलं होतं... जेवणासाठी चूलीची सोय होती... दिवा, मेणबत्तीची सोय देखिल होती... गुहे शेजारील टाक्यात पाणी होतं पण ते फार खाली गेल्या मुळे काढणे शक्य नव्हते... चढाई करून थकलेल्या प्रत्येक जिवाने आपली आवडती जागा बळकवून पथारी पसरली...
साधारण साडे पाचच्या सुमारास जाग आली तेव्हा गुहेतील अंधाराला बाहेरील संधी प्रकाशाचे आव्हान देणे सुरू होते... एक दिड तासाच्या झोपेने चढाईचा थकवा निघून गेला होता... उनं डोक्यावर यायच्या आधी बाकी राहिलेला गुहेच्या वरिल कडा सर करून खाली उतरायचे होते... लगेच आवराआवर करून पहाटेच्या प्रकाशात गुहेच्या डाविकडील वाट पकडली... विस एक पावलांवर कड्यावर जाणार्या पायर्या दिसू लागल्या... सुरवातीचा १० फुटाचा बिनपायरीचा टप्पा चढून गेल्यावर पुढील गुढगाभर उंचीच्या पायर्या जातीने चौकशी करत होत्या... ("कसे उतरता तेच बघते" असा काहिसा रांगडा भाव त्यांतून प्रतीत होत होता.)
पाचच मिनिटांत सुळक्याच्या माथ्यावर पोहचलो... तेव्हा नारायण सुर्वे परिटघडीचा गणवेष परिधान करून कामावर निघाले होते... माथ्यावरील अरुंद जागेत महादेवाचे मंदिर आहे... त्याला नमस्कार करून टेहळणीचा कार्यक्रम सुरू झाला...
पुर्वेला सह्याद्रीच्या रांगेत नानाचा अंगठा, जिवधनचा परिसर दिसत होता... तर समोर धमधम्या आणि दक्षिणेला सिद्धगड ताठ मानेने उभा होता...
<
पश्विमे पासून उत्तरे पर्यंत मुरबाड ते देहरी पर्यंतचा परिसर नजरेत येत होता... दिशा ज्ञान अवगत होई पर्यंत सुर्व्या लालबुंद झाला होता... Yo ने लगेच उडी उडीचा कार्यक्रम सुरू केला, पण जागेच्या कमतरतेमुळे सगळ्यांच्या उड्या फसत होत्या... उडीबाबा उडीबाबा !!
पोटभर उड्या मारून झाल्यावर खाली उतरताना प्रगोची भंबेरी उडाली होती...
गुहे जवळ आलो तेव्हा मर्कटलीला सुरू होत्या... पाण्या अभावी तिथे नाष्टा करणे सोईस्कर नव्हते... म्हणून Yo आणि Jo(शी) ने खाली पडक्या देवळापाशी असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ चूल पेटवण्याची सुचना केली... Jo सोबत मी खाली उतरलो... मागोमाग नविन, शाम, संदिप, Yo खाली उतरले... देवळापाशी आयती चूल मिळालाच नविन आणि संदिपने काड्या टाकणे सुरू केले. :p
नविनने आठवणीने मॅगी आणि चहासाठी दोन टोप आणले होते... सोबत मॅगी खाण्यासाठी ८ चमचे सुद्धा... व्वा!!! सगळेच खुष... आता कमी होती ती फक्त ताट आणि वाट्यांची... मग काय 'भुक के आगे तुट पडो'... त्याच टोपात सामुहीक मॅगी ओरपण्याचा कार्यक्रम पार पडला... चहापानाला नको म्हणणारे इतर लोक्स चहाची टेस्ट कळल्यावर रोमाच्या थालीतच सामुहिक चायपानाला हजर झाले... मॅगी, केक, चकली, चहा असा भरपेट नाष्टा झाल्यावर मंडळी जड अंत:करणाने जागची हलली... सुर्व्याने कॉलर टाईट करायच्या आत गाव गाठावे म्हणून झपाझप पावले टाकीत उतरू लागली... वाटेत करवंदीची जाळी दिसताच गिलबिले बंधू त्यावर तुटून पडत होते... "काकडीवर पाणी नसते पियायचे" Yo ने मला राग दिला... "खरयं... पण मला चालते", म्हणून त्याची समजूत काढल्यावर Yo ने तोच कित्ता गिरविला.. :p
साडे दहाच्या सुमारास गावा जवळील देवाळात उतरलो... तिथे Yoने आणलेले जाम खाऊन श्रमपरिहार केला... देहरी फाट्यावर जाऊन येस्टीची चौकशी केली असता "एक वडा दोन पाव" टाईप उत्तरे मिळाली... जिप वाल्याशी बोलणी फिस्कटल्यावर नविन ने "वाट पाहिन पण येस्टीने जाईन" असा पवित्रा घेतला... एक तास उलटला तरी आमच्या तपश्चर्येला फळ येत नव्हते... तेव्हढ्यात समोरील दुकानावर आलेल्या 'जीपदूता'ला आमचा पुळका आला आणि त्याने वाहन मालकाशी संधान साधून जीप बोलवण्याचे कबूल केले... या वेळी Joने बोलणी करून एकरा जणांचे १०००>>>> ८००>>> ४००>> करता करता ३०० रुपयांचा 'शब्द' जीप वाल्याला दिला... जाताना तो 'जीपदूत' बजावून गेला, दुसरा कोणा सोबत जाऊ नका... आमचा माणूस येईल पंधरा मिनिटांत.
भगवान पे भरोसा ठेवून येईल त्या वहानाकडे सगळे आशाळभूत चेहर्याने बघत होतो... खुर्चिवाहू ट्रक, कोंबड्यांचा टेम्पो, बैलगाडी... आमची अधोगती सुरू होती... पण यशाची गाडी का काय ती येईना... मधेच गिरि ने Joला विचारले, "जिप वाल्याचा मोबाईल नं. तरी घेतला का?"... नकार ऐकताच शिणलेल्या कपाळांवरील आठ्या अजूनच जाड झाल्या...
आली!!!! आली!!!! आली!!!! सरते शेवटी ती नविनच्या हाकेला धावून आली... आणि आम्ही सगळे Jo ने पाचच मिनिटा पूर्वी दिलेला 'शब्द' मोडून येस्टीत घुसलो... :p
-----------------------------
प्रचि Yo Rockच्या कॅमेर्यातून साभार
मी पहिला!! इथे उणिव होती ती
मी पहिला!!
इथे उणिव होती ती फक्त एका कवि मनाची >>
एक आठवडा थांबा असं सुचवलं होतं तुम्हाला... पण नाही!!
कविशिवाय ट्रेकला अर्थच नाही!
तिथे पोहोचल्यावर जागेपणी ट्रेकला न आलेल्या इतरांच्या झोपा मोडण्याचे पवित्र कार्यही केलंत त्याचा उल्लेखच नाही!!!
बाकी छान लिहिलंय... फोटॉच्या लिंकही छान दिसताहेत!
वा.. मस्तच एकदम.. सोबतच्या
वा.. मस्तच एकदम..
सोबतच्या भुतांचे फोटोही छान आहेत.
चढाई उतराई(?) चे फोटो नाहीत?
चढाई उतराई(?) चे फोटो नाहीत?
मस्त रे .. पण अरे कोण कोण
मस्त रे ..
पण अरे कोण कोण गेले होते ? आणि फोटो ???
यो ने तिकडे नुसत्या उड्या मारायला सुरुवात केलिये ..:फिदी:
रातकिड्यांच वाद्यवृंद,
रातकिड्यांच वाद्यवृंद, धुक्यात हरवलेले डोंगर, चांदणं शिंपडलेल्या डोंगरवाटा आणि काय हवं दुर्गभ्रमंती साठी... मस्तच... आपसूकच अंगावर शहारा येऊन गेला.. >>>
नारायण सुर्वे परिटघडीचा गणवेष परिधान करून कामावर निघाले होते..>>>
सुर्व्याने कॉलर टाईट करायच्या आत गाव गाठावे म्हणून झपाझप पावले टाकीत उतरू लागली.>>>
सही वर्णन... !!!
तिथे पोहोचल्यावर जागेपणी ट्रेकला न आलेल्या इतरांच्या झोपा मोडण्याचे पवित्र कार्यही केलंत त्याचा उल्लेखच नाही!! >>
इंद्रा मस्त लिव्हलयस... एकदम
इंद्रा मस्त लिव्हलयस... एकदम ब्येस..
बाकी सविस्तर वृतांत येईलच लवकर...
तिथे पोहोचल्यावर जागेपणी ट्रेकला न आलेल्या इतरांच्या झोपा मोडण्याचे पवित्र कार्यही केलंत त्याचा उल्लेखच नाही!!! >> नची काहितरी जळाल्याचा अजुन वास येतोय.
त्यातलाच मी एक साधलेला
त्यातलाच मी एक साधलेला प्रयत्न Yoच्या कॅमेर्यातून... >>>>>>>>> कुठेय काय?
त्यातलाच मी एक साधलेला
त्यातलाच मी एक साधलेला प्रयत्न Yoच्या कॅमेर्यातून... >>>>>>>>> कुठेय काय? >>> जल्ला तो फुटो उडीच्या BBवर वाहून गेला :p
मंडळी Yoच्या कॅमेर्यातील फोटो चिटकवले आहेत.
हा!! ये हुई ना बात! दगडा,
हा!! ये हुई ना बात!
दगडा, फोटॉग्रफिमध्ये करिअर कर!! बँकेमध्ये तुझी गुणवत्ता मारली जातेय वगैरे वगैरे...
रोमा
सूर्योदयाचे आणि त्याखालच्या
सूर्योदयाचे आणि त्याखालच्या ढगवाल्या देखाव्याचे फोटो खूपच मस्त आहेत.
पहिला फोटो सुपर्ब!! लाजवाब!!
पहिला फोटो सुपर्ब!! लाजवाब!!
सही है.
सही है.
धमाल रे
धमाल रे
मस्तच लिवलयस रे मित्रा
मस्तच लिवलयस रे मित्रा
इंद्रा, मस्त फोटो आणि
इंद्रा, मस्त फोटो आणि लेखन.
आठवणी जाग्या झाल्या रे. आम्ही भर दिवसा वाट चुकलो होतो, रात्री काय चढणार होतो ?
पण तूम्ही जिथे बसला होतात, तिथूनच फोटो काढले होते. जी एस, गिर्या, मिहिर, सुभाष असे मोजके जणच होतो.
मस्तच
मस्तच
टॉर्च, कॅमेरे आदींनी सशस्त्र
टॉर्च, कॅमेरे आदींनी सशस्त्र झालेल्या मावळ्यांनी गोरखगडाकडे कुच केली तेव्हा मध्यरात्रीचे दिड वाजून गेले होते... >>>>.......आणि पहाटे ठिक ३:४५ मि.नी (!!!) या मावळ्यांनी गडावर पोहचल्यावर (न आलेल्यांना) मोबाईलमधुन तोफांची सलामी दिली. मावळे गडावर पोहचल्याचे कळताच आम्ही शांतपणे (?) झोपलो
यावेळेस मात्र न आल्याचे बिलकुल दु:ख होत नाही तुम्ही केली तितकीच धम्माल आम्ही "गोरखगड बाईक ट्रेक"ला केली होती.
रच्याकने, त्याच रात्री मी, आशु आणि हेम थोबाडपुस्तकावरील (मा मा group chat) फोटो बघुन गोरखगडाचा Virtual Night Trek करत होतो.
मस्त प्र.ची.आणि लेख
मस्त प्र.ची.आणि लेख
...आणि पहाटे ठिक ३:४५ मि.नी
...आणि पहाटे ठिक ३:४५ मि.नी (!!!) या मावळ्यांनी गडावर पोहचल्यावर (न आलेल्यांना) मोबाईलमधुन तोफांची सलामी दिली >>
यावेळेस मात्र न आल्याचे बिलकुल दु:ख होत नाही >> आम्हालाही तू न आल्याचे दु:ख होत नाही.. कारण तू काय मिसलास हे तुला कुठल्यातरी गडावर (मग छोटा का असो वा आधी केलेला असो..) चांदण्या रात्री गेल्याशिवाय कळणार नाही..
तू काय मिसलास हे तुला
तू काय मिसलास हे तुला कुठल्यातरी गडावर (मग छोटा का असो वा आधी केलेला असो..) चांदण्या रात्री गेल्याशिवाय कळणार नाही..>>>>>मित्रा, दोन वेळा रायगड चांदण्या रात्रीतच केला आहे.
पण जल्ला आमच्याबरोबर कुठे
पण जल्ला आमच्याबरोबर कुठे केला आहेस...
पण जल्ला आमच्याबरोबर कुठे
पण जल्ला आमच्याबरोबर कुठे केला आहेस...>>>:फिदी:
छान.
छान.
मस्त !
मस्त !
इंद्रा, यो, खास माझ्या
इंद्रा, यो,
खास माझ्या आठवणीतून(८ वर्षांपूर्वीचे आहेत हे फोटो !)
दिनेशदा.. तुम्ही जिएस बरोबर
दिनेशदा.. तुम्ही जिएस बरोबर केला होता ना.. तुमचे ते वर्णन वाचून ठेवले होते हा ट्रेक करण्याआधी.. फोटो मस्तच
वा: इंद्रा, मस्त वर्णन!!
वा: इंद्रा, मस्त वर्णन!! पायर्या उतरतांना 'आई तुझा आशिर्वाद' पुटपुटतांनाचे फोटो हवे होते.
वरुन ५ वा अमानवीय फोटो पाहून दचकलो...
जबराट.....
जबराट.....
मस्त वर्णन आणि जबरा
मस्त वर्णन आणि जबरा ट्रेक.
चांदण्यांच्या रातीचा ट्रेक आणि कॉलेजचं वाढलेलं वर्ष पून्हा एकदा आठवलं.
ह्या शनीवार्-रवी ला कुठे? मी
ह्या शनीवार्-रवी ला कुठे? मी शोधतोय कोणी ट्रेक ला जातोय का...
Pages