- सारणासाठी
- २५० ग्रॅम खवा
- १ वाटी साखर (साधी, नेहमीची)
- २ मोठे चमचे बेसन, थोड्याश्या तुपावर भाजून
- १ मोठा चमचा रवा, खसखस थोडीशी, थोड्याश्या तुपावर भाजून
- फारच लाडात असल्यास किंचीत खोबरे, वेलदोड्याची पूड, केशराच्या काड्या, दुधाचा हबका वगैरे जे वाट्टेल ते
पारीसाठी
मैदा (२ मोठे चमचे) +कणिक (अडिच वाट्या)+ मोहन - फार घट्ट नाही, फार सैल नाही (just perfect u see) स्टाईलने कणिक भिजवून ठेवावी.
ही पाकृ नसून हा एक वृत्तांत समजावा. आपल्या जिकीरीवर करावे.
पदार्थ करायच्या आधी एखाद महिना वाहत्या बाफवर नुसतेच करणार, करणार म्हणत रहावे.
त्याने काय होते? माहौल बनतो आणि धीर गोळा करायला मदत होते. शिवाय फुकट टीका होते, त्याने मनोबल वाढते. शिवाय आपण कमिट केले, आता(तरी) करावेच लागेल, अशी परिस्थिती निर्माण होते.
मग एखाद आठवडा आधी उपलब्ध सर्व पाकृ वाचायला घ्याव्यात. वाचल्यानेही मनोबल वाढते (अथवा खचते).
जुन्या मायबोलीवरील पाकृ
- खव्याची पोळी http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59984.html?1079651858
- सांजोर्या/साटोर्या http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/93898.html
- पाकृ वाचून जमेल असे वाटल्यास नक्की जमते- (थंबरूल क्रमांक १)
- वाचता, वाचता, ज्या घटक पदार्थाचा अर्थ समजत नाही असे वाटते, अस्से दोनापेक्षा अधिक घटक पदार्थ निघाल्यास तो पदार्थ करण्याच्या इराद्यास डिच मारावे. (थंबरूल क्रमांक २)
- किंवा अगदी उत्तरआर्यंलडांतच मिळणारे exotic घटक पदार्थ असल्यासही डिच मारावे (आपण, आपला दुर्दम्य उत्साह आणि कामाचा उरक यांना शेवटपर्यंत विसरू नये. अंथरूण पाहून.. इ.इ.इ. ) (थंबरूल क्रमांक ३)
- सर्व पाकृ वाचल्या की ... मामी चांगल्या करते, तिलाच विचारू म्हणून फोन करावा. मग तिचीही पाकृ कानावर पडेल. की पुन्हा थंबरुल क्रमांक ३ रेफर करावा.
- मग गुमान सर्व पाकृ आणि आपले डोके यांचा वापर करुन आपल्याला जमेल तो घोळ घालावा. जमले तर पाकृ लिहावी आणि नाहीच जमले तर माकाचु वर अश्रु गाळावे. (थंबरूल क्रमांक ४)
१. खवा लालसार भाजून घ्यावा. (तूप सुटेपर्यंत). तो homogenous mass (mess) दिसेपर्यंत परतावे. (तो गिच्च गोळा जरा हार्टस्टॉपिंग दिसतो. :फिदी:)
२. मामी टाकते म्हणून त्यात साधी साखर टाकावी. मग ते एकदम लिक्वीड दिसते. मग गॅस बंद करावा.(मामीची टीप- रटराट उकळू नये म्हणे. साखर टाकली आणि वितळली की गॅस बंद कर.)
३. माकाचू, माकाचू म्हणून पॅनिक. मग अब 'ओखली में सिर दिया है तो मुसल से क्या डरना' असे आठवून, वाचलेल्या पाकृ आठवाव्या. मग भाजलेले बेसन, खसखस, खोबरे, आणि रवा त्यात ओतावे आणि हॅरीपॉटरच्या वाँड्सारखे वरवर न हलवता चांगले जीव खाऊन हलवावे. मग ते निदान सेमीसॉलिड दिसायला लागते. (तोवर घरातील एक सदस्य - हे लाटणार कसे? आमच्याकडे पुरणासारखे लाटताना मी पाहिले आहे' असा महत्त्वाची टिप्पण्णी करेल. त्याला अर्थातच इग्नोर करावे. त्यांच्या घराण्याबद्दल बोलण्याएवढा वेळ सध्या आपल्याकडे नाही एवढे लक्षात ठेवावे. मोह टाळावा. )
४. ते पुरेसे थंड होईपर्यंत टंगळमंगळ करावी. रामरक्षा (येत असल्यास) म्हणावी. रामरक्षा म्हणल्याने पदार्थ चांगला होतो की नाही ते त्या रामास ठाऊक. empirical evidence माझ्याकडे तरी नाही.
५. मिश्रण (आणि डोके) पुरेसे थंड झाले की पुरणासारखे पारीत ठेऊन, पोळ्या लाटाव्या.
- जमल्या तर लग्गेच भाव खाऊ नये, कारण आपल्यासारख्यांना पुन्हा करायच्या झाल्यास नक्की जमतीलच असे नाही. त्यासाठी कमीतकमी १० वेळा जमल्या की मग भाव खावा. तोपर्यंत विमानं जमिनीवरच राहतील असे पहावे.
- फोटो टाकला रे टाकला की मायबोलीवरील सुगरण/सुगरणी साईज,वजन,प्लेट वगैरेंपासून टिपण्णी करत बिनाखव्याच्या वगैरे खव्याच्यापोळ्या कशा करतात तेही सांगतील, म्हणून टेंशन घेऊ नये. Chill !!
- प्रतिक्रियांमध्ये ' घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? अस प्रश्न आला की खचून जाऊ नये. मग 'खास' लोकांकडे उत्तरासाठी रेफर करावे.
- साखरेच्या दाण्याचा साईज आणि उसमळणी यावरही मायबोलीवरचे एक्ष्पर्ट बोलतील, बाफ काढतील, शंका विचारतील. ते क्वाईट नॉर्मल आहे. आपण तोंड म्हणून उघडायचे नाही.
- खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. (थंबरूल क्रमांक ५)
- घरी खपोळीच काय पंचपक्वान्न केली तरी आपली कार्टी 'वरणभात आणि साधी पोळी'च खाणार. तेच जर लोकांकडे केलेली असली तर मात्र मागून खाणार. (हा मात्र मर्फीज लॉ. अगदी आणि हमखास)
भन्नाट वृत्तांत! फर्मास मेनु!
भन्नाट वृत्तांत! फर्मास मेनु!
भन्नाट वृत्तांत! फर्मास मेनु!
भन्नाट वृत्तांत! फर्मास मेनु!
सगळे थंबरुल सही सही
सगळे थंबरुल सही सही आहेत...म्हणतात ना आगदी डिक्टो...
मस्त!!
मस्त!!
खव्याची पोळी होळीला कशी काय
खव्याची पोळी होळीला कशी काय चालते अशीही एक अर्धधार्मिकपूर्णतांत्रिक शंका काढली जाईल. मंद स्मित करावे. (थंबरूल क्रमांक ५)

>>>>
घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच
घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ? >>>
विचारतील हो काही सांगता येत नाही ह्या मायबोलीकरांच .
या जन्मात मी तरी खपो, पुपो,
या जन्मात मी तरी खपो, पुपो, गुपो यांच्या वाटेला कधी जाईन असं वाटत नाही. पण लिहिण्याची ष्टाईल एक नंबर.
सही पंचेस आहेत.
तुमचे हे लेखन 'ललित' अथवा
तुमचे हे लेखन 'ललित' अथवा माझे (फसलेले)किस्से भागात टाकणार का? चुकुन इथे आले आहे.
बरे, घरी खवा नाहीये, दोन महिन्यापुर्वी उरलेली बर्फी आहे, ती चालेल का? नाहितर बटाटा कसा वाटेल? (बटाटे ताजेच आणलेत दुकानातून). इथे कुठल्याही रेसीपीत बटाटे खपतात/खपवायला बघतात माबोकरणी.
(मनोबल वाढवणारे पोस्ट समजून घ्यावे)
मस्त रैना. माझा नुसताच मॉरल
अनेक महिन्यांपासून आम्हाला खव्याच्या पोळ्यांवर हात साफ करायचा होता. 'होळी' हा सुमुहूर्त ठरवण्यात आला होता. एकमेकींना आठवण करणे, धीर देणे, धैर्य गोळा करणे, कृती गोळा करून त्यावर 'सांगोपांग चर्चा' करणे आणि नंतर साहित्य गोळा करून एकदाच्या पोळ्या करणे हे सगळे टप्पे त्यात आले
हा माझ्या पोळ्यांचा फोटो. माझी कृती बरीच वेगळी आहे. इन फॅक्ट रैनाच्या आणि माझ्या कृतीत 'खवा'च काय तो कॉमन आहे, बाकी सगळ्याचं प्रमाण वेगवेगळं आहे. तरी एन्ड प्रॉडक्ट इज द सेम बरंका
त. टी.: ह्यात तीन पोळ्या खव्याच्या आहेत. बाकी फळं, फुलं, पानं ही टेबल मॅट आणि प्लेटवरची आहेत. त्याकडे लक्ष देऊ नये. त्याबद्दल प्रश्नही विचारू नयेत. म्हणायचंच असेल, तर 'पोळ्या सुरेख झाल्या आहेत' इतकंच म्हणावे
धमाल परफेक्ट आहे !!
धमाल
परफेक्ट आहे !!
रै तै, स्सॉल्लिड मेन्यू, आणि
रै तै, स्सॉल्लिड मेन्यू, आणि व्रुत्तांत, लईच भारी.

सगळे थंबरुल्स, टिपा जबरी आहेत.
मी पण नवर्याच्या बड्डेला केल्या होत्या, स्वैपाकाच्या बुवाला येत नाहीत म्हणून, मस्त झाल्या होत्या, पण फोटू काढायचे लक्षात नाही आले, नाहीतर झब्बू दिला असता.
हे तर झकासच आहे, त्यामुळे विनोदी लिखाण मनावर घ्याच आता हो.
पौ. च्या पोळ्या सही दिसताहेत, मला वाटतंय माझी रेसिपी आणि तिची मिळती-जुळती असावी. माझ्या पण अश्याच दिसत होत्या.
मला ते थोडं सारण बाहेर येऊन तव्यावर पोळीबरोबर खरपूस भाजलं जातं त्याचा स्वाद फारच आवडतो, त्यामुळे मी तश्याच लाटते, सारण बाहेर येईल अश्या.
रै, सैच
रै, सैच
घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच
घरी आत्ता खवा नाहिये', काकडीच आहे, ती चालेल का ?
हा मात्र मर्फीज लॉ.
शाब्बास
म्हणायचंच असेल, तर 'पोळ्या
म्हणायचंच असेल, तर 'पोळ्या सुरेख झाल्या आहेत' इतकंच म्हणावे
सारणाने शक्य तितका पोळीची कड तोडून बाहेर पडायचा बहुतेकवेळा अयशस्वी पण काही वेळा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. अर्थात मी ही पोळी करायचा प्रयत्न केला तर सारणावर अयशस्वी व्हायची वेळ येणार नाही त्यामुळे 'पोळ्या सुरेख झाल्या आहेत'
रच्याकने, माबोवरच्या ब-याच रेसिपींबाबत मला नेहमी थंबरुल क्र. ३ अनुभवास येतो

हे हे हे ... खमंग आणि तोंपासु
हे हे हे ... खमंग आणि तोंपासु वृत्तांत.
सिंडरेला , रैना वॄतांत वाचुन
सिंडरेला :फिदी:, रैना वॄतांत वाचुन मजा वाटली,फोटो पण तोंपासु .
खुसखुशीत वॄ/लेख/पाकॄ. मला
खुसखुशीत वॄ/लेख/पाकॄ.
मला कालच आठवण झालेली की तुम्ही खपो करणार होत्या याची.. उद्या पुपु वर विचारणारच होते.
पूनमच्या पण छान दिसतायत
पूनमच्या पण छान दिसतायत पोळ्या
रैना दोन्ही फोटो वॉव मत्त
रैना

दोन्ही फोटो वॉव मत्त अगदी.
पूनम, तुझीही कृती लिही ना
अशक्य वृत्तांत. वृ इतका
वृ इतका खुसखुशीत म्हणजे खपो सुद्धा खुसखुशीत झाल्या असणारच.
मस्त आहे वृत्तांत.
अफाट है! फुडल्या
अफाट है! फुडल्या देशवारीत(माझ्या) करून घालणेचे करावे. इन पर्सन मॉरल सपोर्ट देण्याची हमी!
सह्हीच ! पुढील पाककृतीच्या
सह्हीच ! पुढील पाककृतीच्या प्रतिक्षेत...
ह्या पाकृ ने मला कुठलीही पाकृ
ह्या पाकृ ने मला कुठलीही पाकृ वाचल्यानंतर मनात येणार्या " बाप रे ही पण पाकृ लिहीते?/ कसं काय जमतं यांना ?/ आपण पण कधीतरी (तरी) काहीतरी करुन बघायला पाहिजे../ जाउ दे मेलं, इथे रोज दोन वेळेला पोळी-भाजी करता आली तरी खुप अशी परिस्थिती आहे .." ह्या असल्या नेहमीच्या विचारांपलिकडे जाऊन एक वेगळा आनंद दिला. ही नक्की कशाची पाकृ होती हे पण विसरायला लावलं.
धन्यवाद रैना, असेच पदार्थ करुन बघत जा आणि फक्त वृत्तांत टाकत जा.
पूनमः पोळ्या खुपच छान दिसताहेत. तीन जण म्हणून फक्त तीन केल्या होत्यास कां?
वॉव रैना, खव्याची पोळी किती
वॉव रैना, खव्याची पोळी किती छान झालीय . वृत्तांतही खुसखुशीत.
आपल्याला नाही बा जमणार अशी खपो ( आणि असा वृत्तांतही नाही लिहिता येणार)
आणि कित्ती मस्त लावलय ताट. ताटात काय काय आहे तेही सांग ना...
पौर्णिमा तुझी खपोही सुरेख.
खतरनाक वृत्तांत! पूनम आणि
खतरनाक वृत्तांत!
पूनम आणि रैना दोघींचेही अभिनंदन! मस्त मस्त! 
धमाल व्रुताण्त......
धमाल व्रुताण्त......
मस्तच!
मस्तच!
रैना त्या साहीत्यामधे खर तर
रैना
त्या साहीत्यामधे खर तर मोबाईल फोन व कमीत कमी ३-४ माबो मैत्रिणींचे काँटॅक्ट नंबर पण आवश्यक असे लिहायला हवे.
Pages