केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>तिच्यावरच सगळी आशा आहे Lol
नी .. हो .. हिमालयाच्या शांपूचा माझा अनुभव सेम आहे.
पूनम सेसा चांगलेय गं माझे केस त्यामुळेच चांगले आहेत. Happy अजुन एक ते उर्जिता जैन चे तेल बनवून वापरून बघ ना. तिळाच्या तेलात रोझमेरी.. अमुक तमुक मिक्स करायचे आणि आठवड्यात दोनदा तेल लावयचे. तुला हवं असेल तर मी डिटेल्स देते किती कय मिक्स करायचं ते. Happy

डॅफोताई, नेकी और पूछ पूछ! Happy सर्व डीटेल्स हवे आहेत. सत्वर लिहा इथेच, विपूत अथवा संपर्कातून. अजिबात संकोच नको. सांगा सर्वे काही! Proud

नीरजा, मी पण Proud

मला पण हवे ते डीटेल्स इथेच लिहा प्लिज...... सेसा ने केस वाढतात का भरभर.... ?? माझ्या केसांची वाढ कमी होते फार Sad

५० मिली तिळाच्या तेलात १०मिली व्हीट्जर्म ऑईल (अंकुर तेल)आणि मग त्यात रोझमेरी, निंम, जिरेनियम आणि लव्हेंडर, ही तेले प्रत्येकी २० थेंब मिक्स कर मग एक सुवासिक हेयर ऑईल बनते. Proud हे तेल आठवड्यात दोन वेळा भरपूर लाव. शक्य असेल तर दिवसभर नाही तर रात्रभर लाउन सकाळी केस धुवायचे. सुंदर मुलायम आणि लांब पण होतात केस.
टिळक रोड वरच्या उर्जिता जैन च्या क्लिनिकमध्ये सगळी तेले मिळतात. फक्त व्हिट्जर्म ची १० मिलि ची बाटली घे आणि बाकी तेले ५ मिलि च्या छोट्या बाटल्याही चार पाच वेळा असे तेल बनवायला उपयोगी पडतात.
तिळाचे तेल जर कुणाला उष्ण वाटेत असेल तर खोबरेल तेल वापरले तरी चालते. Happy
हुश्श दमले केवढी मोठी पोस्ट टाकली.

टि. रो. वर उर्जिता जैनचं आता नाही बहुतेक.

खार ला शिफ्ट झालं असं एक दुकानदार म्हणाला. कुणाला खात्रीपुर्वक माहीत आहे का?

उर्जिता जैनचं हिरोमा हे केसांच तेल चांगलं आहे. वरील सर्व गोष्टी मिसळुन केलेलं

बायांनो, मासे खा भरपूर रोज सकाळ,दुपार, संध्याकाळ.. मग छान रहातात केस.

(हा सल्ला एका मालवणी कोळीण काकीने दिला होता मला..) तेव्हा पासून केस गुडघ्यापर्यत वाढतील अशी आशा बाळगून खातेय मासे.

ध्वनी, हा सल्ला किती वर्षांपूर्वी दिला होता आणि आता केस किती मोठे आहेत हे सांगा म्हणजे बाकी बायांच्या आशा पल्लवित होतील Proud

मी सध्या इथे मिळणारं वाटीका तेल लावतेय. मला तरी फायदा होतोय त्याचा. माझे केस दाट आहेत, मोठेही आहेत. फार गळत नाहीयेत, ड्राय नाहीत किंवा कोंडाही नाही पण तरीही पुढच्या वेळी जास्वंद जेल घेऊन येईन भारतातून. चांगलं हमखास यशस्वी तेल सुचवा बरं.

मंजूडी, सरलाजचा पत्ता/फोन देऊन ठेव ना. साधारण किती घेते ती हेअर ट्रिटमेंटचे?

मला डाक्टरीण बै प्रोटिनेशस डायट घे ,कॉस्टीपॅशन होउ देउ नको , मस्त झोप घे, टेन्शन घेउ नको अर्धी केसगळती थांबेल म्हणाल्या

आणी मग १ तेल दिलय डोक्याला लावायला, आणि बदाम देल २-४ थेंब रोज सकाळी दुधात घालुन प्याय्च, आणि कमितकमी ५ दिवसानी डोक धु म्हणाल्या.

बापरे! केसगळती रिसेशनपेक्षा भयंकर परिणामकारक झाली आहे. Proud खरंच पण, किती फॉलोअप ठेवायचा तो! मध्यंतरी चेहर्‍यावर उष्णतेने फोड आले ते घालवून, त्यांचे डाग घालवण्यासाठी महिन्याभराचं कोरफड जेल आणि चंदनादी लेपांचं व्रत धार्मिकपणे केलं तर केस अक्षरशः पळत सुटलेत लक्ष देत नाही म्हणून.. तेल, जेल, शिकेकाई, मेंदीचं काटेकोर पथ्य पाळलं की चेहरा रागाने टॅन होणार.. श्या!दिवसभरात दहा मिनिटंसुध्दा आरशासमोर उभं राहयचा पेशन्स नाही. या समस्येवर 'मनोनिग्रह' हा एकच उपाय असावा.. Sad Uhoh

नी अलकाच्या चुकातून टिळकरोड ला जायला लागल्यावर लगेच आहे उजव्या साईड्ला. डाव्या साईडला सिंगर चे दुकान कि सर्विस सेंटर आहे त्याच्या समोर. किंवा दुर्वांकूरच्या डायगोनली आपोजिट. मी तिन वर्षांत गेले नाहिये पुण्याला ... भ्या Sad आता नसेल तिथे ते क्लिनिक तर मला फटके देउ नकोस. Proud

मंजुडे सुवासिक>>> Lol
आमच्याकडे म्हणतात की अगरबत्ती सुवासिक तेल Lol आणि माझ्याशिवाय दुसरे कुणि ते घेत नाही Wink

डाव्या साईडला सिंगर चे दुकान कि सर्विस सेंटर आहे त्याच्या समोर. किंवा दुर्वांकूरच्या डायगोनली आपोजिट. <<<
डायगोनल फारच दूर जातोय की... Wink
दोन वेगळ्या चौकातली ठिकाणं सांगितलीस ही. बघते आता चक्कर टाकून..:)

डॅफो तेलाबद्दल धन्यवाद Happy
तू सांगत्येस तो पत्ता बरोबर आहे. मागच्या वर्षी कोरफड जेल तिथूनच आणलं होतं. पण ते क्लिनिक तिथून हललंय जोंधळे चौकात म्हणे. मी सांगते नक्की पत्ता मला मिळाला की इकडे.

त्या व्यतिरिक्त उर्जिता जैन प्रॉडक्ट्स कुठे मिळतात पुण्यात, काही कल्पना?

बर्‍याचश्या मेडिकल्स मध्ये पण मिळतात. आता मी इथे बंगळूर ला आल्यापासून बहिणिला पुण्यातून पाठवायला सांगते. जर ति टि. ऱोड ला नाही गेली तर मेहेंदळे गॅरेज जवळाच्याच कुठल्यातरी दुकानातून घेउन पाठवते. Happy

रोहित(पेरूगेट पो चौ च्या गल्लीत), शारदा नॉव्हेल्टीज(भा मा बोळ.. जो आता बोळ राह्यलेला नाही!) आणि आयुर्वेदिक औषधांची दुकाने सगळीकडे मिळतात उर्जिता जैनची उत्पादने.

कुणी माझ्यापण समस्येवर उत्तर द्याना प्लिज...

केसगळ्ती, कोंडा, कोरडी स्काल्पची त्वचा यावर काय हमखास उपाय??? वर हेअर ट्रीटमेंट बद्द्ल लिहिले आहे, तर मुंबई(बोरीवलीच्या जवळपास) एखादे खात्रीलायक पार्लर सांगाल काय?? किती चार्जेस प्रत्येक सिटिंग्जचे असतात वगैरे ??

बागेश्री, सॉरी उशीरा पाहीलं... शाम्पू डायरेक्ट लावतेस? स्ट्राँग शाम्पू किंवा शाम्पू डायल्यूट करून न वापरल्याने भरभरीत होतात केस. तशी पण तुझी स्कीन कोरडी आहे... डोक्याचीपण ड्राय आहे का?
आदल्या रात्री तेल मुरवायचं मसाज करून दुसर्‍या दिवशी केस माईल्ड शाम्पूने धुवायचे. १ चमचा जास्वंद जेल आणि २-३ चमचे पाणी असं प्रमाण घेऊन हलक्या हाताने स्काल्प व केसांना चोळून १०-१५ मिनिटं ठेवायचं नंतर धुवायचं... माझे केस इतके ड्राय नाही होत. मी सौम्य शाम्पू वापरते... जास्त शाम्पू वापरून सगळं तेल डोक्यातून काढायचा खटाटोप मूळीच करत नाही.

सख्यांनो, मी ऑनलाईन मार्केटिंग करताना डॉ बात्रापासून सुरूवात केलेली... ब्रँड नेम विविध माध्यमांतील जाहीरातींमुळे सर्वश्रूत होतं... माझं काम सोप्पं झालं... पण अंदरकी बात... त्यांचे अत्यंत गलिच्छ शिव्या घातलेले रिव्हूज आम्हाला शोधून डिलेट करावे लागायचे... माफ करा सख्यांनो... कामाचा भाग वगळता... मी सांगेन "अवॉईड बात्रा..." Sad

आम्ही मार्केटिंग करून विजिटर्स आणून देतो... आता प्रॉडक्ट्स क्वालिटी मेंटेंड करणं त्यांच्यावर आहे ना... तेपण जमत नाही... कुठेतरी छान वाचलेलं... क्वालिटी मध्ये कमतरता असेल तर जास्त मार्केटिंग करावी लागते... Happy आता एखाद्याची जाहीरात जास्त बघीतली की काय ते समजून जा Wink

साक्षी... पहिल्या तीन पानांपासूनची पाने शेवटापर्यंत वाचत ये... कोंडा, केसगळतीसाठी खूप उपाय सापडतील... परत परत कोण लिहीत बसेल...

Pages