Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुरटी ने आग होणार का त्वचेची?
तुरटी ने आग होणार का त्वचेची?
मी_सखी आणि बागेश्री, ज्या
मी_सखी आणि बागेश्री,
ज्या गुलाबपाण्यावर for external use असं लिहिलेलं असेल ते बर्यापैकी स्ट्राँग असतं, खाण्यासाठीचं माइल्ड असतं. केमिस्ट्च्या दुकानातलं चालेल. अप्पर लिप्सच काय कुठेही चालेल, फक्त जिथले केस शाबूत हवेत तिथे अजिबात लागू देउ नका. भुवयांच्या आजूबाजूला फिरकूही नका.
अर्धा चमचा तुरटीची पावडर आणि २-३ चमचे गुलाबपाणी. फार जोरजोरात घासायच नाही अजिबात, अगदी हळूवार पणे बोटं फिरवायची गोलाकार. आग नाही होणार.
खूप शंका वाटत असेल पहिल्यांदा हाताच्या पंज्याच्या मागच्या बाजूला लावून बघा १० मि.
२० मि. धूवून टाकल्यावर क्रीम लावा.
अर्पणा, आजच घरी गेल्यावर करुन
अर्पणा, आजच घरी गेल्यावर करुन बघते. तु स्वतः हा उपाय केला आहेस का? लहान मुलानसाठि कितपत सेफ आहे??
लहान मुलांसाठी करू नये असं
लहान मुलांसाठी करू नये असं मला वाटतं.
डाळीचं पीठ, हळद सायीसकटच्या दुधात कालवून अंघोळीला वापरावे लहान मुलांसाठी अधून मधून.
पिंपल्सचे डाग जाण्यासाठी,
पिंपल्सचे डाग जाण्यासाठी, तसेच ज्यांना मुमा, चंदनादीचा फेस पॅक लावल्यावर कोरडेपणा जाणवतो त्यांनी, आधी कोरफड जेल चेहर्याला लावावे व मग त्यावर कोणताही फेस पॅक लावावा. त्याने टॅन, काळे डाग कमी होतात, शिवाय फेस पॅक अर्धा तास घट्ट राहतो, त्वचेला किंचित ओढले जाऊन लिफ्ट मिळतो. धुतल्यानंतर एक मऊ, कोवळा फील येतो. हे नियमाने ८ दिवस करुन पहा, फरक कळेल.
हे नियमाने ८ दिवस करुन
हे नियमाने ८ दिवस करुन पहा
>>
मग हे होणं कठीण दिसतंय.
मला कोरफड जेलने लगेच मोठे मोठे गाठीसारखे पिम्पल्स येतात, त्यामुळे शक्यतो नाहीच लावत मी.
हे नियमाने ८ दिवस करुन
हे नियमाने ८ दिवस करुन पहा
>>
मग हे होणं कठीण दिसतंय. >>> अगदी.
मी मध्यंतरी इथेच वाचून आयामसाठी उटणं केलं होतं. उटणं चाळल्यावर वर राहिलेलं जाडसर उटणं मी वापरत होते. किमान चेहरा धुवायला तरी. छान झाली होती त्वचा.
नंतर कसं काय कोण जाणे पण बाथरूममध्ये ते उटणं ठेवलेलं असूनही लावलं गेलं नाही. आता त्वचा परत काळवंडलेली, रखरखीत आणि घाण...
व्वा चला मी एकटीच आळशी
व्वा चला मी एकटीच आळशी नाहीये... सख्यांनो, पण उपाय नियमित करून पाहायलाच हवा ना.. कंटाळा आला की आरशात बघायचं आणि म्हणायचं सुंदर मी होणार! मग नंतरच्या रिझल्टसची, सुंदर त्वचेची आणि येणार्या छान छान कॉम्प्लीमेंट्स व हेवामिश्रीत दृष्टीक्षेपांची कल्पना करा... आणि आपोआप लावायची इच्छा होते की नाही बघा. नाही झाली तर माबो वर या.. माझ्यासारखीच दुसरी कोणीतरी तुम्हाला इन्सीस्ट करेलच!
केल्याने होत आहे रे, आधी
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे - ही संत रामदासउक्ती कायम लक्षात ठेवावी. आयुष्यात सगळीकडे उपयोगी पडते आणि माझ्यासारख्या आळशांना थोडे तरी का होईना पण कामाला लावते.
तुरटी - याने केस लगेच जातील तर मग जे पुरूष दाढीनंतर चेह-यवरुन तुरटी फिरवतात त्यांचा दाढी करण्याचा त्रास काही दिवसांत नाहीसा का नाही होत?????
अर्थातच दिवे घेऊन वाचा वरचे. मीही करुन पाहिन तुरटीचा प्रयोग अपरलिपवर.
तुरटीमध्ये 'हीलींग' इफेक्ट
तुरटीमध्ये 'हीलींग' इफेक्ट आहे. त्यामुळे जखमा भरुन निघतात. रक्त येणे थांबते. दाढी केल्यावर कापले गेले असेल तर तुरटी फिरवल्याने बरे वाटते. आपण हळदीची चिमूट लावतो तसेच. अँटिसेप्टिक क्रीम्सवर घटक पदार्थात Alum चा उल्लेख आढळतो.
लहान मुलांसाठी सरळ
लहान मुलांसाठी सरळ वेखंडासारखा उत्तम उपाय नाही पण उन्हाळ्यात जरा जपूनच वेखंड गरम असते.
तुरटी - याने केस लगेच जातील
तुरटी - याने केस लगेच जातील तर मग जे पुरूष दाढीनंतर चेह-यवरुन तुरटी फिरवतात त्यांचा दाढी करण्याचा त्रास काही दिवसांत नाहीसा का नाही होत????? >>>>>>>>
तुरटीची पावडर गुलाबपाण्यात मिसळून लावायची आहे, नुसती तुरटी फिरवायची नाही आहे.
ओक्के मंजुडी, मी वापरुन बघते
ओक्के मंजुडी, मी वापरुन बघते आता. रु. २५ वाचतील थ्रेङिंगचे.
तुरटी म्हणजे अॅस्ट्रींजटच
तुरटी म्हणजे अॅस्ट्रींजटच असते.
मसुर डाळ मिक्सरला वाटुन
मसुर डाळ मिक्सरला वाटुन लावल्यानेपण लव कमी होते असं ऐकलंय. माझी आत्या तिच्या लेकीला लावायची उटण्यातुन लहानपणी.
मी हजार प्रकारचे फेपॅ, हि
मी हजार प्रकारचे फेपॅ, हि माती, समुद्र माती वै आणून ड्रेसर वर समोर ठेवलीय पण त्याचे उद्घाटन होइल तर शप्पथ.
रात्री येवून रोज क्रीम लावायला पण कंटाळा...
योडि, मी माझ्या मुलीला २
योडि, मी माझ्या मुलीला २ वर्षापर्यंत मसुर डाळीचे पीठ, हळद आणि साय ह्याने आंघोळ घालायची. त्याने तीची त्वचा एकदम छान झाली आहे पण खांद्यावर वैगरे अजुन लव आहे. लहान असताना वेखंड लावुन घ्यायची पण आता नखरे करते. तरी अजुनहि तीच्यासाठि अनंतमुळ, वेखंड अशा बर्याच पावडरी एकत्र करुन ठेवल्या आहेत त्यानेच आंघोळ घालते. आताशी ३ वर्षाची होतेय त्यामुळे हळुहळु कमी होईल अस वाटतेय.
तुरटी चा उपाय लहानमुलांसाठी
तुरटी चा उपाय लहानमुलांसाठी नको. पण मी १४-१५ वर्ष वयाच्या मुलींना त्यांच्या आया हे लावताना पाहिलं आहे.
पुरूष तुरटीचा भुगा १५-२० मि. गुलाबपाण्यात घालून हळूहळू घासत नाहीत ना चेहर्यावर
गुलाबपाण्याचं काम काय ते नक्की माहित नाही पण आत्तापर्यंत माझ्या माहितीतल्या ज्यांनी हे करून पाहिलं त्या सगळ्यांना पॉझिटिव्ह रिझ्ल्ट्स मिळाले आहेत.
वर मसूरडाळ पीठ आणि हळद सांगितलय योडींनी, ते लहान बाळांसाठी मस्तच आहे.
मोठ्यांवरही होत असेल इफेक्ट फक्त जास्त पेशन्स लागेल.
मी_सखी: हो मी स्वतः केलय हे, माझी अत्यंत सेंसिटिव्ह आणि कमालीची कोरडी त्वचाआहे (उट्णं, फेस्वॉश,साबण काही चालत नाही ). मला काही त्रास झाला नाही.
अर्पणा हे साधारण किती दिवस /
अर्पणा हे साधारण किती दिवस / आठवडे / महिने करावे लागते?
मी_सखी, ३-४ आठवडे तरी
मी_सखी, ३-४ आठवडे तरी सातत्याने करावं लागेल. मग फरक जाणवू लागेल.
आयुर्वेदिक दुकानात मिळेल तुरटी, ती बत्त्यानं कुटा फक्त.
अपर्णा तू सगळे व्यवस्थित
अपर्णा तू सगळे व्यवस्थित लिहीले आहेस्,पण तरी काही शंका आहेत्.तू जे प्रमाण लिहीले आहेस तेव्हढेच घ्यायचे का,कि त्या प्रमाणात कमी जास्त घेऊ शकतो .जसे पाव चमचा तुरटीला १,१/२ चमचा पाणी ?घेतलेले सोल्यूशन सगळे जिरवायचे,कि २,४दा बोटाने जिरवले तर चालेल. हा उपाय पर्मनंट आहे,कि वरचे वर करावा लागतो ?हातापायालाही चालेल ना?खुप प्रश्ण झाले ना?:दिवा:
कुंकूमादितैलं, नाही मिळतेय,
कुंकूमादितैलं, नाही मिळतेय, ठाण्याला कुठे मिळेल?
समइ: प्रमाण म्हण्जे तुरटीचा
समइ: प्रमाण म्हण्जे तुरटीचा भुगा + गुलाबपाणी हे द्रव असावं, पेस्ट्ची कंसिटंसी नको पण अगदीच पाणी पाणी झालं तर नाही चालणार. हे मिश्रण त्वचेमधे शोषून घेतलं जात नाही ( म्हण्जे तुरटी तरी नाही ). ह्यानं हळूवारपणे गोलाकार मुव्हमेंट मधे चोळायच. १० -१५ मि. करताना पाणी वाळून जातं, मग परत परत घ्यायच ते भिजवलेलं मिश्रण.
३-४ आठवडे सलग केल्यावर केसांची वाढ प्रचंड कमी होते, नंतर दर ३-४ दिवसांनी एक्दा करायच १ महिना, मग दर आठवड्यानं एकदा असं कमी कमी करत जायच.
हातापायावरही करायला काहीच हरकत नाही, फक्त सरफेस एरिया जास्त असल्यानं फार काम करावं लागेल
अपर्णा, ह्या पाण्याने असे
अपर्णा, ह्या पाण्याने असे दररोज केले तर त्वचा कोरडी होते का?
नक्कीच होणार. कारण तुरटी
नक्कीच होणार. कारण तुरटी अस्ट्रींजंट आहे. प्रचंड तेलकट त्वचा असणार्यांना ठिके पण कोरडी त्वचा असलेल्यांनी जरा जपून करा हा उपाय असं मला वाटतंय.
ठाण्याला वर्तक नगर च्या
ठाण्याला वर्तक नगर च्या वेदांत कोम्प्लेक्स मधे मिळतं कुंकूमादितैलं...
नीधप, धन्यवाद. मला नाही करता
नीधप, धन्यवाद.
मला नाही करता येणार मग. साध्या साबणाने दोनदा धुतले तर त्वचा फाटते माझी.
बागेश्री, धन्स, पुढच्या
बागेश्री, धन्स, पुढच्या विकांतला, नवर्याला पिटाळते.
ओके, म्हणजे तेलकट, घामट त्वचा
ओके, म्हणजे तेलकट, घामट त्वचा असणार्यांना तुरटी+गुलाबपाण्याचा दुहेरी फायदा होईल का?
नी, अॅस्ट्रिंजंट रोज चेहर्याला लावलेलं चालतं का?
अगं अॅस्ट्रींजट पण लावताना
अगं अॅस्ट्रींजट पण लावताना डायल्यूट करून लावायला सांगतात. किंवा कापूस ओला घ्यायचा आणि जेमतेम एक थेंब घ्यायचं आणि चेहराभर लावायचं डोळ्याचा भाग सोडून.
खूप पिंपल्स, काळीडोकी, पांढरीडोकी असतील तर अॅस्ट्रींजंट वापरावे रोज अन्यथा रोज टोनर आणि दोन तीन दिवसातून एकदा अॅस्ट्रींजंट असं करावं....
Pages