उजळ कांती हवी

Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45

"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हसरी,
मी कधी हातावर लावलं नाही, पण त्यांच्या instruction नुसार ते "चेहर्या' साठीच आहे.... तुला हाताच्या ट्यानिंग वर उपचार हवाय का?

मला पण हात काळे झालेले आवडत नाहीत, मी म्हणूनच खात्रीलायक उपचार करते.... मी बेसन (चण्याच्या डाळीच जाडसर पीठ) आणि हळद एका डब्यात कालवून ठेवली आहे... रोज आंघोळीच्या वेळेस दुधात ते मिश्रण कालावायच आणि हातांवर चांगलं चोळून कोमट पाणी घ्यायचं... शेवटी किंचित साबण लावायचा.... नंतर हात कोरडे झाल्यावर sunscreen लावते.... ऑफिस मधून घरी गेले कि हात पाय धुवून झोपण्याआधी चांगलं मोईस्चोराईजर लावते... छान राहतात हात!

Sunscreen - Lakame च वापरते, आणि मोईस्चोराईजर - अयुर चं (cold cream) चांगलं स्निग्ध आहे ते...

स्वप्ना,
सारख ब्लीच करणे योग्यच नाही आहे.... वर्षातून दोनदा वगैरे OK
आणि आजकाल प्री- ब्लीच क्रीम मिळतात, त्याने कमी त्रास होतो...
दररोज 'Home care " गरजेची आहे, त्वचेचा तजेला आणि ग्लो कायम राखण्यासाठी...

माझी फक्त नाक आणि कपाळावरचीच स्कीन जास्त तेलकट होते. सध्या तर घाम इतका येतो की पावडर सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. घरातुन निघाल्यावर ५-१० मि. तच सगळा चेहरा उतरतो. काय करु??

साक्षी,
ते तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे

तुझ्या त्वचेचा पोत तेलकट असेल तर तु, २/३ थेंबच लाव आणि ते पूर्ण मुरेपर्यंत मसाज कर चेहर्याला ... २ मीनटे मसाज पुरतो... फार वेळ खाऊ काम नाही आहे... पण रिझल्ट "बेहतरीन" आहे....

मला outlets माहित नाहित, पण मी ठाण्याला घेते, माझ्या घराच्या जवळ आयुर्वेदिक औषधाचे दुकान आहे, तिथ मिळतं

साक्षी,
गुगलायचं गं ! गुगल वर सगळं मिळतं आजकाल... शक्य झालं तर घरपोच पण मिळतं Wink

हे घे http://www.nishaherbal.com/availab.htm

Dadar (W)

Hasmukh Ent. 24307643
Laxmi Ent. 24323263
Vijay Stores 982061461
Pooja Ayur 9322236723
Kubal Pharmacy 24381256
Dadar Pharmacy 24228035

बागेश्री, मी पाहिली ती जाहिरात. त्यात हे तेल काळे डाग घालवायला आहे असं दिलंय. माझी त्वचा खुप कोरडी आहे, त्यासाठी उपयोगी आहे का हे तेल ?

चमकी, हे तेल चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी आहे असे पण जाहीरातीत वाचले... मी वापरून नाही पाहीलं पण बागेश्री म्हणतेय म्हणजे असेल, तिचीपण कोरडीच आहे ना स्कीन! बघ वापरून आणि सार्थ कर तुझं नाव!!! Wink Happy

हाय सगळ्या मायबोलीकर पर्‍यांनो... शुभ प्रभात...
जोरात तयारी चालू आहे उजळ कांतीची... माबोवर स्पर्धा वगैरे आहे काय??? Wink

हो गं चमकी, आपल्या कोरड्या त्वचेला "वरदान" आहे ते तेल... काळे डाग, पिम्पल्स- सार्या समस्यांवरचं समाधान... खुप R & D केल्यावर मिळालय, ultimate final solution... गं पर्यांनो... Wink

बागेश्री सकाळ पेपर नाही येत ग... पण ड्रीमगर्ल ने दिलेल्या लिंक वर पहाते
धन्यवाद सर्वाना... आता वापरल्यावरच फिडबॅक देते Happy

साक्षी लिंक कशाला फोन कर डायरेक्ट नंबर्स दिलेत... दादरमधील विजय स्टोअर्स फेमस आहे कोणीही सांगेल... त्यांना फोन कर नाहीतर!

अग मी रहाते तिथला जवळच्या मेडिकल्चा नं. मिळाला त्या लिंक वरुन, जाईन लवकरच घ्याय्ला.... रिझल्ट्स सांगेनच इथे Happy

स्वप्ना, चेहर्‍यावरची लव घालवण्यासाठी तुरटीची पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून लावा. अगदी हलक्या हातानं हे मिश्रण चेहर्‍यावर चोळा. २० मिनिटं ठेउन धुवून टाका.
डोक्याला स्कार्फ बांधा हे करताना आणि भुवयांची विशेष काळजी घ्या (अजिबात लागू देउ नका हे मिश्रण ), अतिशय इफेक्टिव्ह उपाय आहे.

स्वप्ना, तुरटीच्या पावडरीची पेस्ट होणार नाही. पण चोळता येइल इतका ओलावा येइल.
गुलाबपाणी स्ट्राँग घ्या ( म्हणजे मिठायात घालायला वापरतात ते नको )

गुलाबपाणी स्ट्राँग घ्या ( म्हणजे मिठायात घालायला वापरतात ते नको )>> म्हणजे केमिस्टकडे जे मिळते ते चालेल का? तसेच ह्याने upper lips पण फायदा होतो का?

Pages