Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजा आली बॉ! नेहमी सारख्याच
मजा आली बॉ! नेहमी सारख्याच धमाल गप्पा, मस्त मेनू!
केपी, आरती, नात्या, नीलांबरी (नक्षी), एबाबा आणि सौ चमन ह्यांना भेटून सही वाटलं. आता जमेल तसं वृत्तांत लिहेन. डिज्जे, तुझा मसाला दिलाय मै कडे.
ज्ञाती, सॉरी जरा पाठवायला उशीर होतोय (नेहमी सारखाच).
मैत्रेयी, माझ्या अक्षम्य
मैत्रेयी, माझ्या अक्षम्य गुन्ह्याबद्दल तुझी जाहीर माफी मागते :फिदी:.... पण ते वृतांत वगैरे लिहायला सांगु नको. मी वृतांत लिहिला तर लोक पुन्हा यायची नाहीत ए.वि.ए.ठी. ला
ते खास वृत्तान्त लिहिणार आहेत
ते खास वृत्तान्त लिहिणार आहेत असे कळले >> ही निव्वळ अफवा आहे.
नमस्कार. कालच्या समारंभाला
नमस्कार.
कालच्या समारंभाला फार मजा वाटली. मैत्रेयि, अनिलभाइ, नात्या इ. नी आधी येऊन कार्यक्रमाची सुसज्ज व्यवस्था केली होती. नात्या व नक्षी यांना प्रथमच भेटत होतो. आरती व कांपो यांची पुनश्च अनेक मैलांवरून येऊन भेट झाली, फार बरे वाटले. ज्या अर्थी लाल कार्पेट, सनई चौघडा, वाजंत्री, ढोल ताशे, ट्रंपेट, पुष्पहार इ. दिसले नाहीत त्या अर्थी रसमलाई येणार नाहीत हे लगेच कळले. वाईट वाटले.
खाण्यपिण्याची चंगळ, कार्यक्रम नेहेमी प्रमाणे धमाल. काय एकेक गुणवंत लोक आहेत इथे. गायन, अभिनय, तबला वादन, विनोद, कश्शाकश्शात कमी नाही. तीन चार तास कसे गेले समजले नाही.
सर्व जण घरी सुखरूप पोचलात ना? विशेषतः नक्षी, वैद्यबुवा, तुम्ही का बरे थांबला होतात? तुम्हाला काही मदत हवी होती का? 'स्वाती_आंबोळे, बाई, इबा' जे काय तुमचे आज नाव असेल ते, तुम्हाला गाडीसाठी गॅस मिळाला का?
कांपो, आरती, तुमच्या परतीचा प्रवास सुखसमाधानाचा व आरामात होवो ही शुभेच्छा. वैद्यबुवांचा अनुभव वाचलात ना? काही नाही, कुणि काही म्हंटले तरी आपण आपले सांगितल्या वेळी जाउन चेक इन करावे. त्या आधीच काय ती गळाभेट करायची ती करून घ्यावी.
सायोंनी एव्हढ्या प्रतिकूल परिस्थितीत अत्यंत कौशल्याने गाडी चालवून आम्हाला सुखरूप पोचवले याबद्दल त्यांचे मनापसून आभार. गाडीतहि येताजाता, नक्षी, कांपो, 'स्वाती_आंबोळे, बाई, इबा' जे काय तुमचे आज नाव असेल ते, वैद्यबुवा, पन्ना, सायो अश्या बुद्धिमान लोकांच्या संगतीत जरा संकोचल्यासारखे होत होते, तरी पण मुक्ताफळे उधळलीच. आता हसत असतील घरी जाऊन मला.
साध्या कांदापोहे सारख्या लहान नावाचे लघुरूप करतात, 'स्वाती_आंबोळे, बाई, इबा' जे काय तुमचे आज नाव असेल ते,' यांच्या पण नावाचे करा ना जरा, म्हणजे नुसते नाव लिहायला एक सबंध ओळ खर्च होणार नाही.
आता कुणी तरी खुमासदार वृत्तांत लिहा. माझे फोटोहि टाकलेत तरी चालेल, काय कुणाला त्यावर दाढी मिशा, काढायच्या असतील त्या काढू देत. शिवाय नेहेमी असतो तसा, काहीतरी खाताना किंवा पिताना फोटो येतो तसा तरी नाहीये यावेळी बहुतेक. असेल तर टाकू नका.
धन्यवाद.
झक्की मस्त झालं गटग.
झक्की
मस्त झालं गटग. सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून मजा आली. ३,४ तास मिळूनही वेळ कमीच पडला असं वाटलं. देसाई, भाई, ईबा, एबाबा,फचिन्, बुवा या मंडळींनी मनोरंजनाची जबाबदारी पार पाडून कार्यक्रमाला चार चांद लावले. जेवण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
बाकी वृत्तांत लिहायचा विडा कुणीतरी उचलावा.
एबाया???... ह्या कुठल्या
एबाया???... ह्या कुठल्या बाया?.
एबाबा आहे.. बाया काय?
नेहमी प्रमाणे एवेएठि धमाल पार पडल.
तसा माझ आणि तालाच खुपच वाकड आहे. मला ताल अजिबात जमत नाहि.
पण म्हंटल आपलच पब्लिक आहे. गावुन घेवुया.
फचिनने तबला आणला होता. फचिन तबला खुप छान वाजवतो हं. बाईंच्या भजनाला असा मस्त वाजवला होता.
मी गायला सुरवात केली आणि ते गाण काय लयीत येईना. तरी मी रेटत होतो.
शेवटच कडव राहील होत. आणि अचानक मला लय सापडली.
आणि मग फचिन चा तबला जो सुरु झाला.
अहाहा. माझ मलाच इतक बर वाटल.
सुंदर रे फचिन...
आणि फचिन गातो पण बरकां. त्याने दोन कॅरिओकी गाणी म्हंटली. आतापर्यंत का गायला नव्हता कोन जाणे.
सर्वांचा गोंगाट ऐकून मजा आली.
सर्वांचा गोंगाट ऐकून मजा आली.
टायपो भाई. ते विबासं डोक्यात
टायपो भाई. ते विबासं डोक्यात होतं म्हणून बाया झालं.
लालू, नुसती हूल दिलीस.
लालू, नुसती हूल दिलीस. आम्हांला वाटलं खरंच येते आहेस.
नेहमीप्रमाणे धमाल ए वे ए ठी!!
नेहमीप्रमाणे धमाल ए वे ए ठी!! कांपो, आरती, नात्या, एबाबा, नक्ष ह्या माबोकरांची प्रथमच भेट झाली. चमी आणि बामा ह्यांनाहि भेटून आनंद झाला
खानपान सेवेची नेहमीप्रमाणे चंगळ होतीच.
आणि मनोरंजनात्मक कार्यख्रमांची तर लाईनच होती. फचिन मामा लई फॉर्मात होता. सुचक गाणी अन तालबध्द तबला एबाबा आणि V ह्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त देसायांनी लग्नाचे उ.उ.वि. सादर केले. तसचं भाई अन देसायांनी एका दिवसाच्या तयारीत 'कौतुकात्मक फु बाई फु' करून उपस्थितांना हशिवले सोबतीला ईबांची 'बिडीरूपी भक्तीगीतं'ही होती
भाईंनी आर्च आल्याची हुल उठवली पण चाणाक्ष माबोकरांनी (म्हण्जे पार्ल्याक्का हे कळलं असेलच ) ती नक्षी असल्याचे लग्गेच ओळखले तसचं मैत्रेयीच्या राशीवर नक्षी उठल्याचेही ऐकू आलय
पन्ना फचिन मामांच्या सूचक
पन्ना
फचिन मामांच्या सूचक गाण्यांचं काय करावं?
पन्ना आयला, मी इथे मांडवली
पन्ना
आयला, मी इथे मांडवली करायचा प्रयत्न करत आहे... तु का उगा.....:डोमा:
एवेएठीला मजा आली.
एवेएठीला मजा आली. नेहमीप्रमाणे पदार्थ मस्त होते आणि मी पुष्कळ पदार्थ बांधून घेऊन आलो.
नवीन भेटलेले लोकः नात्या आणि नक्षी. दुसर्या दोघा प्रमुख पाहुण्यांना मी आधीच भेटलो आहे.
भाई, धन्यवाद. खरंतर मलाच तुमच्या गाण्यावर ठेका पकडता आला नाही. पुढच्यावेळी नक्की सुधारणा करेन. अहो मी कराओके असलं की म्हणतो गाणी. २००९ च्या एवेएठीत म्हटलं होतं की. त्यावेळी दुसरं सायोच्या नवर्याने म्हटलं होतं. काल मला सिंड्रेला म्हणाली की मागे म्युझिक चालू असेल तर गाणार्याच्या चुका वगैरे काही कळत नाहीत. म्हणून मग मी म्हटली गाणी.
फचिन मामांच्या सूचक गाण्यांचं काय करावं>> अहो कसलं सूचक आणि काय.. हिंदी चित्रपटातली ९९% गाणी अशीच असतात.. सूरत, आंखे, होंट वगैरे. उरलेली १% गाणी बेवफाई, दिल टूटा वगैरे टाईप असतात. पण मग लोक झोपतील म्हणून तसली नाही म्हटली.
देसाईंनी उउवि छान केले. मी पाहिले होते ते पूर्वी आमच्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात. भाई आणि देसाईंनी कौतुक चे ते स्किट भारी केले. एकदम हहपुवा झाली तेव्हा. बुवा, बाई आणि एबाबा (काय आयडी घेतलेत एकेक खरंच ) यांनी नेहमीप्रमाणे गाणी छानच म्हटली.
या गटगला आरतीने माझ्या ज्ञानात थोडी भर घातली. तिने पश्चिम बंगाल आणि इशान्येकडच्या राज्यांमधील निसर्गसौंदर्याचे पुष्कळ कौतुक केले आणि माहिती दिली.
देसाई हे आपले निर्वाचित वृत्तांतवीर आहेत. त्यांनाच द्या तो विडा. ह्यावेळी पान कोणी आणले नव्हते जीटीजीला.
फचिन मामानी खूप
फचिन मामानी खूप लग्नाळु/स्वप्नाळु गाणी गायल्याचं समजलं, लगे रहो फचिनभाय
तसच मुन्नी-शीला ला भाईंसकट सगळे विसरल्याच समजलं !
फचिन, सिंडीचे डबे परत केले की
फचिन, सिंडीचे डबे परत केले की परत द्यायच्या डब्यातच बांधून नेले का पदार्थ? पुढह्च्या वेळी परत देण्याच्या बोलीवर?
अहो, झक्की मी नवी, मी कशची
अहो, झक्की मी नवी, मी कशची तुम्हांला हसते. खरतर तुम्हां दिग्ग़ज मायबोलीकरां मध्ये मी म्हणजे बालवाडीतुन उचलुन डायरेक्ट १० वी च्या बोर्डाच्या परीक्षेला बसले कि काय अस झालं.
कार्यक्रम तर उत्तम झालेच, जेवणपण बेश्ट होत. विशेषतः मी फुकटचंद होते... झक्कीनीं दिलेल्या सल्ल्यानुसार कोटाच्या खिशात हात घालुन आले होते...
- भाई आणि देसाईंच स्किट खुपच छान झालं विशेष म्हणजे एका दिवसात बसवलं. देसायांच उ.उ.वि. पण झकास होत.... मा.बु.तु.
- बाईंच बीडी रुपी भजन व इतर अभंग ऐकुन कान तृप्त झाले.
- फचिनची (याला मामा म्हणावं का?) सुचक (?) गाणीपण मस्त होती.
- बुवांना मात्र गाण्यासाठी फारच आग्रह करायला लागला....
तसच मुन्नी-शीला ला भाईंसकट
तसच मुन्नी-शीला ला भाईंसकट सगळे विसरल्याच समजलं >>> छे, भाईंच्या लक्षात होत्या मुन्नी, शीला. पण ईबा 'मी ही गाणी गाणाअर नाही' ह्या निश्चयावरुन न ढळल्याने नाईलाज झाला.
अर्र एबाबांच गाण विसरलेच
अर्र एबाबांच गाण विसरलेच की.... माफी असावी... बघा, तुम्ही आणलेल्या तिळाच्या वड्यांना जागले...:)
नक्षी, फचिन माझ्या मुलाचा
नक्षी, फचिन माझ्या मुलाचा मामा आहे तुझा नाही
पन्ना,
नेहमीप्रमाणे धमाल आली. बारागटग सारखे धम्माल गटग बघायला मिळाल्याने इथे अमेरिकेत येणं सार्थकी झालं असं कुणीतरी पुणेकर म्हणाले बॉ.
केपीने सगळ्यांसाठी भारी गिफ्ट्स आणले. धन्यवाद केपी.
मेनु (तीर्थप्रसादासह) जोरदार होता नेहमीप्रमाणेच. तुरिया पात्रा, कोथिंबीरीच्या वड्या, मसाले भात आणि तिमिपु विशेष उल्लेखनीय. नॉन व्हेज माहिती नाही.
लालूला भेटून मज्जा आली. बटाटे वडे आणि सुमंगलताईंचा मँगो-पाय जबरी.
तुझ्या मडकाभाजीचा का उल्लेख
तुझ्या मडकाभाजीचा का उल्लेख नाही? मस्त झालेली ती. एकदम वेगळी चव.
यावेळी मी परत न कराव्या
यावेळी मी परत न कराव्या लागणार्या डब्यांमध्ये, म्हणजे झिपलॉक मध्ये, घेऊन आलोय
झक्कींनी केपी आणि आरतीला ताकीद दिली आहे की पुण्यात जाऊन जीटीजीचं कौतुक करायचं. आता दोघे तिकडे काय सांगतात बघूयात.
सुरू झाली का पबलीक ... भाईंना
सुरू झाली का पबलीक ...
भाईंना अनुमोदन. फचिन, बेस्ट वाजवलास हा तबला!!! भिमसेन जोशींचे ते भजन (?) बाईंच्या आवाज आणि तुझा तबला फारच अप्रतिम!!!! एकदम मैफिलीत बसल्या सारखे वाटत होते. नक्की घेऊन येत जा तबला.
आणि हो ह्या वेळी कॅरियोकी पण भारी गायलास. बाईंची सगळीच गाणी मस्त झाली! आवाज मस्त "लागत" होता.
भाई आणि देसायांची स्कीट लै भारी!!!!! एक दिवसाच्या तयारी वर इतकी भारी स्कीट म्हणजे कमाल आहे!!!! देसायांचे हाव भाव फारच विनोदी होते. भाईंनी पार्ट भारी वठवला!!!! पुढच्या वेळी नक्की करा हा कार्यक्रम परत!!!!
विनयने बनवुन आणलेली वेज
विनयने बनवुन आणलेली वेज मंचुरीयन एकदम झणझणीत झकास, वैद्यबुवा,पन्नाच चिकन बेस्ट.
सिंडी ची मडका आलु, फालुदा , सायोचा तुरिया पात्रा वाटाणा,मैत्रेयीचे कढी पकोडे,ईबा चा मसाले भात एकदम मस्त,
अॅपेटायझरमधे वृंदातैच्या तिखटमिठाच्या पुर्या अहाहा, चमन चमी च्या पाणी पुरी, माणुस्,बाईमाणूस काय घेवुन आले होते विसरलो. कोथींबीर वड्या होत्या का?.
सिमच्या चपात्या, एबाबाच्या तिळाच्या वड्या झक्की ची बियर वाईन, वैद्यबुवाची हनी(वोडका), आणि चिज केक.
सगळच झकास. पोट आणि मन अगदी तुडंब..
फोटो येतीलच.
.
सिंडे : बटाटे वडे कोणी लालुने आणले होते. लवकर संपले. मला नाय मिळाले.
वैद्यबुवा, दतेम साठी धन्यवाद.
भाई, चिकन पन्नाने आणलेलं.
भाई, चिकन पन्नाने आणलेलं.
हो हो.. माझी चुकुन मिष्टेक
हो हो.. माझी चुकुन मिष्टेक झाली.
जाताजाता सुमालाही धन्यवाद
जाताजाता सुमालाही धन्यवाद देऊनच टाका. चविष्ट गुळपोळ्या बनवल्याबद्दल.
>>नक्षी, फचिन माझ्या मुलाचा
>>नक्षी, फचिन माझ्या मुलाचा मामा आहे तुझा नाही
अरे ते असं वाच... *** फचिनची (याला मामा का म्हणावं?)*** लिवताना लय गोंधळ झालाय...
बाकी, भेटलेल्या मा.बो.करांमध्ये नात्या, चमन - चमी, माणुस - बाईमाणुस, व्ही काकू/वहिनी, परदेसाई काकू/वहिनी, आरती सगळे खुपच शांत वाटले.
असो, हे सगळं माझं निरीक्षण... प्रत्येकाने घ्या.
ते "समंजस" का काढलं? वडे
ते "समंजस" का काढलं?
वडे आवडल्याबद्दल धन्यवाद.
मै आणि निराकारचे विषेश आभार!
मै आणि निराकारचे विषेश आभार! आयोजन झकास होतं. कोथिंबीर वड्या आणि फालुदा ह्या दोन गोष्टी पोटात जागा राहिली नसल्यामुळे खाता नाही आल्या. बाकी सगळेच पदार्थ भारी.
बरच काही बांधून पण आणलय.
नक्षी, आधीच सुमार आवाज त्यात बोल लक्षात नाही त्यामुळे गाणं गाण्यास धजत नव्हतो एवढच. शेवटी व्हायचं तेच झालं. पबलीक आपलीच होती त्यामुळे समोर न बोलता घरी जाऊन काही बाही बोलतील ह्याची थोडी फार खात्री होती म्हणून मग म्हणून टाकलं एकदाचं.
भाई, मी कुठलच चिकन आणलं नव्हतं. करी पन्नानी तर ड्राय चिकन सौ चमन (हे हिंदीत कसलं विनोदी वाटतं ना? ) नी आणलं होतं. मी फकस्त गो चि के आणि हनी वोडका आणला होता.
अर्रेच्या तु वाचलस होय? उगाच
अर्रेच्या तु वाचलस होय?
उगाच कोणाला वाईट वाटेल म्हणुन काढल...:)
Pages