ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०११

Submitted by Adm on 8 January, 2011 - 10:03

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, १७ जानेवारी ते ३० जानेवरी दरम्यान खेळली जाणार आहे. यंदा भारताच्या सोमदेव बर्मनला पुरुष एकेरीत वाईल्ड कार्ड देण्यात आलं आहे.
पुरुष एकेरीत स्पेनच्या रफाएल नदालला तर महिला एकेरीत कॅरोलाईन वोझनियाकीला अग्रमानांकन मिळालं आहे. दुखापतीमुळे सेरेना विल्यम्स यंदाच्या स्पर्धेत उतरू शकणार नाहिये तर गेले जवळजवळ वर्षभर दुखापतीमुळे खेळू न शकलेला अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यंदाच्या स्पर्धेद्वारे पुनरागमन करत आहे.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही स्पर्धा तशी कंटाळवाणी झाली. एज ऑफ द सीट्स मॅचेस कुठे होत्या?
जोकोला ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्यासाठी शुभेच्छा मी यु एस ओपनच्या धाग्यावरच दिल्या होत्या Happy
आता भारतात येणार का तो? डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुपमधला सर्बियाचा सामना भारताशी आहे.

ही स्पर्धा तशी कंटाळवाणी झाली. >>>> हम्म्म्म... बर्‍याच मॅचेसमध्ये खेळाडूंनी खूप चूका केल्या.. विनर्सपेक्षा अनफोर्स्ड एररवर जास्त पॉईंट मिळाले.. किम आणि जोको जिंकले ते बरं झालं त्यातल्या त्यात..

चला एका बर्‍यापैकी रटाळ ग्रँड स्लॅमचा शेवट झाला एकदाचा... फायनल तर फक्त लेडीज, लेडीज दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या टफ झाल्या. म्हणजे शेवटच्या सेट मध्ये निकाल लागला.. बाकीच्या पुरुषांच्या दोन्ही अगदीच सरळ सरळ झाल्या.. प्रतिकार फारसा बघायलाच मिळाला नाही...

जोको जिंकला तेच बर झालं.. मरेला उगाचच भाव मिळाला असता... त्याचा पण हेन्मन होणार बहुतेक..

हा जुनाच धागा ऑस्ट्रेलियन ओपनच्या निमित्ताने पुनः वाचायला मजा आली. बरेच मोती गळाले. पण हिरे तेच आहेत.
Diamonds are forever हेच खर.

ऑस्ट्रेलियन ऑपन २०२०

परागराव, तुमच पारड जरा भारी दिसतेय. पण हौदिनी काही पण करू शकतो. असो बघू काय होते ते.
पहिल्या आठात बिग थ्री मधले तिघेही. काय करतात काय नविन मंडळी- सिसिपास, शपॉलोव, किर्गी. बघू झेरेव (१-१ सेट आहे) , थिम काय करतो. ..

मिक्स्ड डबल्स मधे २ भारतीय अजून आहेत आठात. (एक शर्मा ( ?), बोपन्ना ). राम डबल्स मधे सेमी..

या धाग्यातील पहिली पोस्ट. रिपीट मोड,

सिंडी, पन्ना, सँटी, लालू, मुकुंद, मयुरेश, रंगासेठ, मयेकर, सिद्धार्थ, राज, हिम्या, सुमंगल ताई, त्रिविक्रम आणि इतर सगळेच टेनीस फॅन्स हजेरी लावा !! आत्तापर्यंत गेल्या युएस ओपनला सर्वात जास्त म्हणजे २०० पोस्टी पडल्या होत्या.. तर यंदा तो रेकॉर्ड मोडूया..

Happy

पंडित, आहात कुठे? शेवटचा डेडिकेटेड धागा उघडला गेल्यानंतर कित्येक ग्रँड स्लॅम्स पुलाखालून वाहून गेल्या. तिघांची दोन दोन तरी पुनरागमने झाली असतील.

भरत, धागा काढायचा मक्ता परागभाउ यांचा आहे. Happy
तिघांची दोन दोन तरी पुनरागमने झाली असतील.>> आणि अनेक ग्रँड स्लॅम.

आज राफा-थिम ही मॅच बघणार .. अजुन एक तासानी सुरु होइल..

कालची फेडररची मॅ च पाहीली का कोणी? मी पाहीली.. फेडररने ७-८ मॅच पॉइंट्स वाचवुन चौथा सेट घेतल्यावरच कळले होते की त्या फडतुस अपोनंटने फेडररसारख्या अद्वितिय टेनिसपटुला हरवण्याची सुवर्णसंधी गमावली..

नदालची क्वार्टर फायनल .. निक किरियोस बरोबर .. मस्त अटीतटीची झाली.. दोन्ही टायब्रेकर कोणीही जिंकु शकले असते..

फेडरर- नदाल-जोको.. तिघांची लाँजेव्हिटी.. तोंडात बोटे घालण्याजोगी आहे... जस्ट अनबिलिव्हेबल! नुसतीच लाँजेव्हिटीच नाही .. तर खेळाचा दर्जाही.. गेल्या १८ वर्षात त्यांना सातत्याने हरवु शकणारे.. तेच तिघे आहेत. काय कमाल आहे.. कुठल्याच खेळात.. फक्त ३ खेळाडुंनीच जवळ जवळ १५- २० वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवणारे फक्त हेच तिघे असतील..

(जाता जाता.... बास्केटबॉल लेजेंड.. कोबी ब्रायंटचा .. अकाली अपघाती म्र्त्यु ... काळजाला चटका लावुन गेला.. दॅट गाय प्लेड एव्हरी सिंगल गेम.. विथ फायर इन द बेली..मी विल्ट चेंबरलेन, ऑस्कर रॉबर्ट्सन, एल्जिन बेलर वगैरे जुने एन बी ए.. ग्रेट्स खेळताना बघीतले नाहीत.. पण करिम अब्दुल जब्बार( त्याच्या उतारवयात), मॅजिक जॉन्सन, लॅरी बर्ड, मायकेल जॉर्डन, व सध्याचे स्टेफान करी व लिब्रॉन जेम्स... यात मी कोबी ब्रायंटला..टॉप ३ मधे टाकीन .. अलबत.. मायकेल जॉर्डन.. ऑन द टॉप.. अ‍ॅज ऑल टाइम ग्रेट..)

बघतय का कोणी? २०१८ यु एस ओपन क्वार्टरफायनलसारखी मॅरॅथॉन मॅच होइल अस वाटतय.... . जबरदस्त रॅलीज चालु आहेत.. राफा कुड नॉट क्लोज द फर्स्ट सेट ऑन हिज ओन सर्व्ह.. गॉट ब्रोकन.. .. नाउ टायब्रेकर .. पहिला सेट.. १ तास १० मिनिटे..

थिमने पहिला सेट घेतला.. ऑल्दो थिम इज प्लेयिंग रिअली गुड.. .. राफाने मोक्याचे पॉइंट्स लुज खेळुन घालवले.. परवाच्या मॅच मधे पण राफा कुड नॉट क्लोज मेनी सेट पॉइंट्स व ब्रेक पॉइंट्स.. ही लुक्स नर्व्हस ऑन मेनी इंपॉर्टंट् पॉइंट्स..

दुसरा सेटही राफाने टाय ब्रेकर मधे गमावला..अगदी पहिल्या सेटचीच पुनरावृत्ती.. १ गेम ब्रेक अप असुनही मोक्याच्या पॉइंटला ढेपाळला.. आज मात्र थिम विरुद्ध टु सेट्स टु झिरो डाउन झाल्यावर कम बॅक करणे मुष्कील आहे..

ऑस्ट्रेलियन ओपन हॅज नॉट बिन व्हेरी काइंड टु राफा .. त्याने इथे खुप ( बहुतेक सगळेच !) अटीतटीचे सामने गेल्या १५-१६ वर्षात गमावले आहेत.. इथे त्याने खुप कष्ट घेतले आहेत व घाम घाळला आहे.. पण इथे त्याच्या पदरी अपयशच आले आहे.. त्याच्या अगदी विरुद्ध जोकोव्हिक.. इथे त्याला मात्र अमाप यश मिळाले आहे.. मेनी टाइम्स.. अ‍ॅट द एक्स्पेन्स ऑफ राफा..

राफाचा आजचाही घाम व मेहनत पाण्यात गेली ऑस्ट्रेलिअन ओपन मधली.. सव्वाचार तास मॅच चालली... थीम मस्तच खेळला.

खर म्हणजे राफा-फेडरर—जोको नंतर तोच एक असा खेळाडु मला वाटत की राज्य करेल.. ही हॅज अ गेम!

बाकी मेडव्हेडेव्ह, रावनिक वगैरे खुप इन्कन्सिस्टंट आहेत.

महिलांमधे तर आनंदी आनंदच आहे..

चला यावर्षी ओल्ड गार्ड विरूद्ध न्यू गार्ड अशी फायनल होणार. चेंन्ज ऑफ गार्ड होणार की नाही ते माहित नाही. पण आता ती वेळ आलेली आहे अस कुठेतरी चिन्ह दिसायला लागल आहे. थीम वि झेरेव कोण जिंकेल सांगता येणार नाही. जोको वि. फेडरर मधे जोको जिंकेल अस वाटत (जरी जिंकू नये अस वाटत असल तरी). आतापर्यंतचा यावर्षीचा खेळ बघून आता बास म्हनायची पाळी आली आहे. इतक्या अनफोर्स्ड एरर्स. शोभत नाही फेडररला. इतर कुणी असता तर सेमीला गेला म्हणून आनंद झाला असता.

टु बी फेअर टु फेडरर.. त्याला जांघेत दुखापत झाली होती.. उपांत्यपुर्व फेरीत खेळताना.. तरीसुद्धा ती मॅच तो जिंकला. पण एकंदरीत तिघात .. फेडरर लुक्स रेडी टु रिटायर..

राफा बाबत तसे म्हणता येणार नाही... तो थिम बरोबर हरला.. पण एफर्ट्स मधे कुठेच कमी पडला नाही.. त्या दिवशी थिम आउट ड्युएल्ड हिम इन लाँग रॅलीज.. व्हिच इज नदाल्स ब्रेड अँड बटर.. तिनही सेट जे नदाल हरला.. ते तिनही सेट्स नदाल टायब्रेकर मधे क्लोज मार्जिन ने हरला.. ऑल दोज ३ सेट्स वेअर विदिन हिज ग्रास्प.

मी आधी म्हटल्याप्रमाणे.. धिस हॅज बीन अ हॅपी हंटींग ग्राउंड फॉर जोको.. धिस यिअर प्रॉबेबली इज गोइंग टु बी द सेम ..

जोकोने दाखवुन दिले.. अजुनही ग्रँड स्लॅम टेनिस विजेतेपद मिळवायचे असेल तर बिग ३ पैकी एकाला किंवा दोघांना.. एकाच टुर्नामेंटमधे... हरवले तरच ते शक्य आहे..दोज ३ हॅव्ह्व मोनॉपॉली ओव्हर ग्रँड स्लॅम्स.. फेडरर १९.. अँड काउंटींग..राफा१८.. अँड काउंटींग..जोको १७.. अँड काउंटींग..

थिमचे परत एकदा.. वाइट वाटले.. ही कांट क्रॅक द कोड टु बिट दिज गाइज इन ग्रँड स्लॅम फायनल्स.. ही इज ०-३ नाउ इन ग्रँड स्लॅम फायनल्स.. आज फायनल बघताना वाटले होते की पहिला सेट हरल्यावर ज्या पद्धतीने थिमने पुढचे २ सेट घेतले.. की हिज टाइम टु विन ग्रँड स्लॅम हॅज अराइव्ह्ड.. बट.. जोको हॅड अदर थॉट्स..

या तिघांची मानसिक घडणजडण इतरांपेक्षा वेगळी आहे.. थिम व तत्सम खेळाडु.. हे ३ रिटायर होइसपर्यंत.. बघ्याचीच भुमिका यथोचित पार पाडतील. दे कांट मॅच दिज ३ इन मेंटल टफनेस..

असे एक नाही.. दोन नाही.. तर ३ टेनिसपटु.. एकाच वेळेला.. एकाच जनरेशन मधे .. एकत्र राज्य करत आहेत .. ही अद्वितिय बाब आहे.. आणी त्यांचा खेळ आपल्याला आपल्या हयातीत बघायला मिळणे हे आपले भाग्य!

जोकोचे अभिनंदन..८ वे ऑस्ट्रेलिअन ओपन विनेतेपद.. वॉव!

एक नाही.. दोन नाही.. तर ३ टेनिसपटु.. एकाच वेळेला.. एकाच जनरेशन मधे .. एकत्र राज्य करत आहेत .. ही अद्वितिय बाब आहे.. आणी त्यांचा खेळ आपल्याला आपल्या हयातीत बघायला मिळणे हे आपले भाग्य!>> खरं आहे! परवा फेडरर आणि जोकोविच सामना सुरू होताना आतून कोर्टवर येताना दाखवले तेव्हा ते पाहताना हेच विचार मनात आले. पुढे फेडरर चालत होता, मागे जोकोविच. ते तसे चालताना बघायलाही मस्त वाटत होतं. Happy solvay conference मधला एक प्रसिद्ध फोटो आहे. अनेक भलेभले शास्त्रज्ञ त्या फोटोत एकत्र दिसतात. तसं काहीसं वाटलं Happy

खरोखर या तिघांचा खेळ एकत्र पाहिला मिळाला हे आपल भाग्य Happy . शिवाय त्यांच्यातील स्पर्धा कोर्ट पुरतीच मर्यादीत आहे हे विषेश.
२००४ पासून फक्त या तिघांव्यतिरिक्त फक्त ६ खेळाडूंनी स्लॅम जिंकला आहे एकंदर १० वेळा. त्यात मरे ३, वॉरविंका ३, चिलिच १, पोट्रो १, आणि अजून दोघे. जोको आणि नादाल ३१ व ३२ आहेत. ते नक्की फेडररच्या पुढे जातील. फेडररला शेवटची संधी यावर्षी विंबल्डनला असेल. २०१० नंतर फेडरर फक्त ३ वेळा स्लॅम जिंकला आहे.

Pages