देवनागरीत कसे लिहावे?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:09

नवीन मायबोलीत लिप्यंतर तक्ता (Transliteration Chart) आता उपलब्ध आहे. लेखनासाठी असलेल्या खिडकीवरील प्रश्नचिन्हावर टिचकी मारली तर हा तक्ता दिसू शकेल. तुम्हाला जर हा तक्ता दिसला नाही तर तुमच्या Browser चे पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

अधिक माहितीसाठी खालील नियम पहा:
अ = a, आ= aa or A, इ= i, ई= I or ee, उ= u, ऊ= U or uu, ए= e, ऐ= ai, ओ= o, औ= au, अं= a.n or aM

क= ka, ख= kha, ग=ga, घ=gha, ङ= Ga

अनुस्वार= M

च= cha, छ= chha, ज= ja, झ= jha or za, ञ = Y

ट= Ta, ठ= Tha, ड= Da, ढ= Dha, ण= Na

त= ta, थ= tha, द= da, ध= dha, न=na

प= pa, फ=pha or fa, ब= ba, भ=bha, म=ma

य= ya, र= ra, ल= la, व= wa, श= sha, ष= Sha, स= sa, ह= ha, ळ= La, क्ष= xa, ज्ञ= dnya, श्र= shra

का= kaa or kA, कि= ki, की= kI, कु= ku, कू= kU, कं=kM, क्र= kra, कृ= kR, र्क= rk
Examples:

माझे (maaze) नाव (naaw) लक्ष्मण (laxmaNa) आहे (aahe).
फुले (phule) वार्‍यावर (vARyAvar) नाचत (nAchat) होती (hotI).
राजाचे (rAjAche) सेवक (sevak) अष्टौप्रहर (aShTauprahar) पहारा (pahArA) देत (det).
वक्रतुंड = wakratu.nD
अर्जित रजा = arjit rajaa
सर्व = sarva
कर्क = karka
क्षत्रिय=xatriya
चाँद=chO.nda
मॅच=mEch
खूँखार=khEMUkhAr
हूँ=hEMU

विंडोज ८ किंवा आय. ई. ८ /९/१० वर देवनागरी लिहीता येत नसेल तर त्यासाठी मदतपुस्तिकेतले हे पान बघावे.

अगं धन्यवाद कसले Happy
मी नवीन असताना अशाच शंका असायच्या माझ्यापण !
काही ही लागले तर जरूर विचार. इथे किंवा माझ्या विचारपूस मध्येही Happy

भरभर टाइप कसे करावे, भरभर टाइप करताना अक्षरे जोड्ली जातात.
आता वरचे वाक्य पहा.
उदा. भर्भर टाइप क्से क्रावे भर्भर टाइप क्र्ताना अक्श्रे जोद्लि जातात.

कोणत्याही नवीन गोष्टीची थोडी सवय करावीच लागते.

पहिल्या दिवशी दोन चाकाच्या सायकलीवर बसून वेगात जाता येते का?

डुआय : अरे वरती लिहीलेला तक्ता वाचला नाहीस का नीट?
>>ज्ञ= dnya,
jna टाइप करूनही ज्ञ लिहीता येतो.

हाय,

क्रोमात टाईप करताना मला प्रत्येक वेळेस प्रत्येक अक्षरानंतर स्पेस देउन मगच पुढच अक्षर टाईप करावं लागतंय काही उपाय? की आयईच वापरायला हवं?

प्रतिसादच्या खाली लिस्टिंगचा जो ऑप्शन आहे तो कसा वापरायचा? लिस्ट कशी करायची?

मला मायबोलीचा सभासद झाल्यामुळे खूप आनन्द वाटतो्. हे मी प्रथमच लिहीत आहे.अगदी पहिलीत असल्यासारखे वाट्ते.धन्यवाद माय्बोली आणि सर्व सभासद.

truth हे मराठीत कसे लिहू ?
TrUth असे लिहिले तर ते असे दिसतेय ट्रूथ .... प्लिज मदत करा. मला एका लेखात लिहायचय ;

Pages