मी कॉलेजमध्ये होते तेव्हाची गोष्ट !
आई,बाबा,ताई अन मी; आम्ही काश्मिर बघायला गेलो होतो. काश्मिरबद्दल खुप काही ऐकलं होतं, वाचलं होतं, अन मनातही त्याची काही स्वप्न होती. जम्मू, श्रीनगर, पहेलगाम, गुलमर्ग आणि डक्सूम या ठिकाणी आम्ही फिरलो होतो. अन खोटं वाटेल तुम्हाला मला नाहीच आवडलं काश्मिर ! अनेक जणं याला नावं ठेवतील... म्हणतील काश्मिर काय आई, बाबा, ताई बरोबर बघायचं का... गाढवाला गुळाची चव काय ... इ. इ.
पण नंतर मी माझा नवरा अन लेक आम्ही काश्मिरला गेलो तेव्हाही हेच झालं. खरं तर मी माझा मागचा अनुभव अगदी मनापासून दूर ठेवला होता... पण याही वेळेस नाहीच आवडलं काश्मिर !
परत आल्यावर मी जरा नीट विचार केला.... आपल्यातच काही कमतरता आहे का ? आपल्याला महाबळेश्वर आवदतं, माथेरान आवडतं, मुनार आवडतं... मग काश्मिर का नाही आवडलं ... ?
न मग काही कारणं जाणवली...
एक तर जम्मू हे आपलं म्हणायचं म्हणून काश्मिर... त्यामुळे ते नावडणं ठिक होतं.
त्यातल्या त्यात गुलमर्ग अन डक्सूम आवदलं होतं; डक्सूमतर फारच आवदलं होतं.
पण श्रीनगर अन पहेलगाम ... अजिब्बात आवदलं नव्हतं... दोन्ही वेळेस...
मुळात काश्मिर हे व्हॅलीत वसलय... हिमालयातल्या अनेक पर्वत राशींच्या कुशीत वसलय ते... पण त्याच मुळे तिथली हवा जरी थंड असली तरी एक प्रकारे तिथली हवा कोंदट आहे... जे जे काश्मिरला गेलेत त्यांनी आठवून बघाबरं छान गार हवेची झुळूक, झोत आठवतोय अंगावर आलेला ? म्हणजे जणू काही गारे गार बंद खोलीच... अर्थात गुलमर्ग याला अपवाद ! कारण ते डोंगरावर वसलय.
चारी बाजूंनी प्रचंड पर्वतांनी वेढलेल्या काश्मिर व्हॅलीत हवा येणार कोठून ? अन मग असे कोंदट काश्मिर मला नाही आवदले हे बरोबरच होते... आजही एसी खोलीत मी नाही जास्ती वेळ बसू शक्त... त्यापेक्षा मला गॅलरीत जास्त आवडेल उभं राहायला
अन डक्सूम हे ही चारी बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आहे, पण तिथे मोठी मोठी झाडं आहेत अन मुख्य म्हणजे खळखळ वाहणारी नदी आहे... मला वाटतं बाकीचे काश्मिर म्हणजे बर्फाची बंद पेटी आहे... काहीसा निर्जीवपणाचा भास तिथे होतो...
असो... तर मला नाहीच आवदत काश्मिर... आता तुम्ही म्हणाल, हे काय चाललय? नाव लवासाचे अन विषय कुठल्या कुठे चाललाय ? पण हे सगळं मी सांगितलं कारण वरचे माझे लॉजिक ज्यांना पटलं निदान समजलं, त्यांनाच पटेल, समजेल मला लवासाबद्दल काय म्हणायचय ते असो नमनालाच मणभर तेल असं झालय नाही का ? तसा ललित लेख लिहायचा माझा हा पहिलाच प्रयत्न... त्यामुळे मला माफ कराल असं वाटतय.... कराल ना ?
आता लवासाबद्दल. इथे खुप वाचलं होतं लवासाबद्द्ल, काही फोटोही बघितले, बहिण, भाचा, मित्रमैत्रिणींकडून खुप ऐकलं, अन लेकाला थोडा वेळ होता म्हणून आम्ही रविवारी निघालो लवासाला....
लवासाला जायचा रस्ता अतिशय सुरेख ! ड्रायव्हिंगचे स्कील पणाला लागावे अशी वळणं अन त्यांचे चढ... आजूबाजूचा निसर्ग...
नुकतीच थंडी पडायला लागली होती त्यामुळे छान वाटत होतं. पौड वरून डावीकडे वळलो अन थोड्याच वेळात वरसगावचे धरण दिसू लागले. अगदी जवळ गेल्यावर माणसाच्या या कलाकृतीत निसर्गाने आपली भर घातली होती ती अशी :
१. From LAVASA
आम्हाला मुळात निघायलाच इशीर झाला होता त्यामुळे ऊन चांगलेच होते, त्यामुळे सगळ्या फोटोत ते जाणवतेय, पण असो. तर या इंद्रधनुष्याने खुष होऊन आम्ही पुढे निघालो...
आजू बाजूचा निसर्ग हिरवा शालू नेसून आमच्या स्वागताला सज्ज होता. पहावे त्या डोंगरावर हिरवाई नांदत होती. डोळ्यांचा थकवा पार पळाला. वरचे ऊन जाणवेनासे झाले. पहा ना तुम्ही पण
२. From LAVASA
३. From LAVASA
४. From LAVASA
मनात खात्री पटली आता खरच निसर्ग सुखात आम्ही नाहून निघणार ! आता रस्ताही चांगला रुंग, नितळ अन स्वच्छ अन नीट बाक दिलेला झाला. ड्रायव्हिंग करणे सुखाचे वाटू लागले. अन तेव्हढ्यात हा दिसला... प्रथम चटकन लक्षात नाही आले.. अन लक्षात आल्यावर आम्ही चकीतच....
५. From LAVASA
लवासाच्या श्रीमंतीबद्दल ऐकून असूनही आम्ही जरा चक्रावलोच. भारतात अशी यंत्र आहेत... कार्यरत आहेत हे मी तरी पहिल्यांदाच पहात होते. तिथल्या श्रीमंतीची ही चुणूक पहिल्या काही मीटरातच पहायला मिळाली. रस्ता झादणारं, धुणारं, बाजूचे गवत काढणारे हे यंत्र बघून मी तरी धन्य झाले बाई
अन मग बरीच चढाची वळणं घेत आम्ही लवासाच्या प्रवेशद्वाराशी आलो. आता लवासाची ओढ लागल होती, म्हणून न थांबता चालत्या गाडीतूनच फोटो घेतला त्याचा अन पुढे झालो.
६. From LAVASA
वाटेत गाड्यांमधून जाणार्या, दमलेल्या वाटसरूंसाठी अनेक सुरेख थांबेही आहेत. अतिशय आखीव रेखीव अशा या थांब्यावर मला मात्र एकही वाटसरू दिसला नाही ते सोडा. पण तिथल्या फुलझाडांच्या नीगे वरून किमान दिवसातून दोनदा माळी नक्की येत असावा तिथे हे खरं. चला १००-१२० च्या स्पीडने, काळ्या काचा केलेल्या गाडीतून जाणार्या, डोळ्यावर रेबेनचा गॉगल चढवून, मागे रेलून डोळे मिटून बसलेल्या वाटसरूच्या डोळ्यांना त्या फुलझाडांनी केव्हढे सुख मिळत असेल नाही !
७. From LAVASA
८. From LAVASA
मग उताराची बरीच वळणं घेत घेत आम्ही लवासाच्या शोधात असेच पुढे पुढे जात राहिलो. अन मग डोळ्यांना सुखावह प्रचंड जलाशय दिसला. हेच ते वरसगावने अडवलेले पाणी.
९. From LAVASA
अन अखेर आम्हाला पहिले दर्शन झाले लवासाचे ....
१०. From LAVASA
लांबून मेकॅनोनी तयार केलेल्या खेळण्यातल्या घरांसारखी एकसारखी रंगीबेरंगी घरं दिसू लागली. छोट्या खिडक्या, कौलारू छपरं, पिवळी-केशरी ( सॉरी हं यलो अँड ऑरेंज काँबिनेशन... ) भिंती, सगळे कसे टायनी, स्वीट, स्टाईलीश अन सोफेस्टीकेटेड.....
अन तेव्हढ्यात डावी कडे निवांतची पाटी दिसली. आधी गेलेल्यांनी फार कौतुक केलेले असल्याने अन 'आधी पोटोबा मग विठोबा' यावर आमचा नितांत विश्वास असल्याने आमची गादी वळली निवांत कडे
ब्रेकफास्टची वेळ संपल्याने आम्ही सँडविचेस अन कॉफीची ऑर्डर दिली अन मग मी तिथल्या टेरेसवर गेले. व्वा काय सुरेख टेकड्या होत्या आजूबाजूला... समोर ही
११. From LAVASA
तर डावी कडे ही
१२. From LAVASA
अन उजवी कडे ही
१३. From LAVASA
हिरव्यागार पर्वतराजींवरून नजर अजून डावीकडे वळली
१४. From LAVASA
आहाहा.. सुरेख गडद हिरवाई ... अन अजून डावी कडे....
१५. From LAVASA
झालं ना तुम्हालाही धस्स.... ! हिरव्यागार निसर्गाखाली असलेली भडक्क लाल माती...... मानसाचा निसर्गावरचा रानटी- लासवट विजय !
या अजून काही विजयपताका .....
डोंगराची कुसही नाही सोडली उकरायची....
१६. From LAVASA
एका छापाची घरं करण्यासाठी निसर्गातले वैविध्य पार घालवून लावलच पाहिजे नाही ? निसर्गाची पाळंमुळं पार पार उखडलीच पाहिजेत ना....
१७. From LAVASA
१८. From LAVASA
मग डोंगराची कुस असू दे, उतार असू दे नाही तर माथा... आम्हाला थांबा नाहीच म्हणू शकत ना निसर्ग.....
१९. From LAVASA
२०. From LAVASA
२१. From LAVASA
डोंगराचा हा उभा चिरलेला उतार... काळजाला चीरत नाही जात ????????
२२. From LAVASA
निसर्गाला ज्याच्या रुपात अनेक जणं पाहतात त्या देवाच्या देवळालाही एका चौकटीत बांधून ठेवलय, अगदी त्याच्या जवळच्याही झाडाला केवळ नमुना म्हणून ठेवल... हेही नसे थोडके...
२३. From LAVASA
एकूणच कशी झाडांची कत्तल झालीय याचे एक नमुना चित्र... एव्हढ्या मोठ्या लँडस्केपमध्ये मोठी म्हणावी अशी झाडं सहज हातावर मोजता येतील इतकीच.... बघा बरं मोजून....
२४. From LAVASA
किती झाली... १४ की १५ ???????
अजून खरं वाटत नाही ?
मग बघाच हे...
याला भूमीचे वस्त्रहरण नाही म्हणायचे तर काय म्हणायचं.....
२५. From LAVASA
बघा, मागचा निसर्ग अन पुढची आमची प्रगतीच्या नावाने चाललेला
षंढपणा... निलाजरेपणा....भोगासक्ती.....
२६. From LAVASA
हा फोटो पुन्हा बघताना मला एक फार भयानक गोष्ट जाणवली... यात पुढे डावीकडे एक गाय दिसतेय...
बघितलीत बिचारी १२च्या उन्हात बसलीय, तिला सावली देणारे एकही झाड नाही सापडले... याही पेक्षा भयानक म्हणजे आम्ही जवळ जवळ तीनदा गोल गोल, आडवे, तिरके सगळ्या वाटांवरून फिरलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक फोटो घेतले होते. पण या फोटोत दिसतेय तेव्हढीच गाय आम्हाला दिसली... दुसरा कोणताही प्राणी तिथे आढळला नाही, अगदी खरच. अन हेही माझ्या फोटो बघताना लक्षात आलं, अन लेक, नवरा दोघांनीही आठवून बघितलं... अहं दुसरा कोणताही प्राणी आम्हाला आढळला नाही...
हे अजून एक गोजिरे रुपडे....
२७. From LAVASA
सुंदर जलाशय, बोटींगची सोय अन अलिशान बंगले, घरं....
२८. From LAVASA
झाडं नसलेला निर्विकार रस्ता, उंच खांब-आसपास कुत्रे नसलेले
२९. From LAVASA
आणखीन एक उभा कापलेला डोंगरउतार....
३०. From LAVASA
अन ही आहे तिथली शाळा...
ग्राऊंडला जागाच नाही.... बंद खिडक्या - एसीत वाढणारी ही प्रजा निसर्ग काय अनुभवणार तिथला ?
ना एकही झाड आहे.... मला तर तो आधुनिक कोंडवाडाच वाटला बाहेरून....
३१. From LAVASA
अन हे काय आहे कलले नाही. नाव होते- MERCURE . काय होते हे कलले नाही पण रविवारी सुटीच्या दिवशी हे पाहून राग आला, मनस्ताप झाला अन वाईटही वाटले.
भारताचा राष्ट्रध्वज असा कोठेही कधीही लावता येतो? अन त्या शेजारी ऑस्ट्रेलियाचा मग फ्रन्सचा अन माहिती नाही कुठचा... हे नक्की काय होते मला कळले नाही....
३२. From LAVASA
या अशा ठोकळेबाज, भव्य, बंदिस्त इमारती
३३. From LAVASA
तिथली आवडलेली एकच गोष्ट... तिथल्या हॉटेलमधले हे...
३४. गोटे From LAVASA
अन मग पाय उचलले आमचे. पुन्हा न येण्याचा वादा केला अन बाहेर पडलो...
३५. From LAVASA
काहींना यात फारच टोकाची भूमिका मी घेतलीय असे वाटेल. पण ही भूमिका नाही, हे सगळे वातणे आहे... माझा लवासाबद्दल काहीही अभ्यास नाही. फक्त एका सामान्य माणसाची ही प्रतिक्रिया आहे. अन सामान्य आहे म्हणूनच काही प्रश्न मला पडलेत.
तिथल्या हवे साठी जर हे लोक तिथे गेलेत तर मग सगळी घरं अशी बंदिस्त- एसी वाली का ?
तिथे जाऊन जर ते एसीतच बसणार आहेत तर त्या पेक्षा आपापल्या एसी घरात बसले तर काय वाईट?
तिथे जाऊन काय करणार? ना तिथे काही पाहण्यासारखे आहे ना काही करण्या सारखे..
एवढा सगळा खर्च कशासाठी?
जाऊ दे ये हमारे बस की बात नहीं, हेच खरं....
मी आपली लवासाला नवं नव दिलंय, ल. वा. सा. " लई वाईट साईट "
त्या ल. वा. सा. पेक्षा त्याच्या आजूबाजूचा हा निसर्ग मला तरी जास्त भावला....
३६. From LAVASA
मस्त ग आवडला लेख
मस्त ग आवडला लेख
किश्या लईच फास्ट वाचतोस की रे
किश्या लईच फास्ट वाचतोस की रे धन्स .
आशु सुंदर प्रचि आहेत आणि
आशु
सुंदर प्रचि आहेत आणि वर्णनही.
अवल, आवडला लेख. आता vested
अवल, आवडला लेख.
आता vested interests असलेले "विकास हवा, विकास हवा" असं बें.दे.पासून ओरडत येतील बघ इथे.
मग बोरीवली मधली आंब्याची कलमं कोणी तोडली, पुण्यातल्या भांडारकर रोड वगैरे परिसरातल्या चिकूच्या बागा कोणी सपाट केल्या वगैरे "जाओ पहले उसका साईन लेके आओ" छाप विधानं पण येतील.
शुभांगी, मंदार धन्स. मंदार
शुभांगी, मंदार धन्स.
मंदार म्हणून तर ही एक " एका सामान्य माणसाची ही प्रतिक्रिया आहे"असं म्हटलय मी.
त्या मुळे त्या वादात मी पडणारच नाहीये. :ठेंगा दाखवणारी बाहुली :
आरती बरोबर आहे. आपण पडलो
आरती बरोबर आहे. आपण पडलो सामान्य माणसं
मस्त लेख
मस्त लेख
मलाही घुसमटल्यासारखेच होईल
मलाही घुसमटल्यासारखेच होईल तिथे. निसर्गात सामाऊन गेलेली घरे, आपल्याकडेही दिसतात की. त्या निसर्गाचाच भाग असावीत अशी वाटतात ती.
>>अन हे काय आहे कलले नाही.
>>अन हे काय आहे कलले नाही. नाव होते- MERCURE . काय होते हे कलले नाही पण रविवारी सुटीच्या दिवशी हे पाहून राग आला, मनस्ताप झाला अन वाईटही वाटले.
मर्क्यूर ही हॉटेलांची साखळी आहे. हॉटेलांच्या समोर असे झेंडे लावण्याची पद्धत आहे. या सगळ्या राष्ट्रांच्या नागरिकांचे इथे स्वागत आहे असे सांगण्यासाठी. त्यात रागावण्यासारखे काही नाही.
बाकी मला घरासाठी मातकट रंग आणि छपरासाठी कौलाचा रंग आवडला. रंगीत (रंगीबेरंगी) इमारती आवडल्या नाहीत. इमारतींच्या ठोकळ्यांशेजारी तेव्हढ्या उंचीची झाडे आली की चांगले दिसेल.
जंगले कापून विकास सगळीकडेच होतो त्यात विशेष काही नाही. बांधकामे झाल्यावर सुशोभीकरणापुरती हिरवाई नक्कीच येईल असे वाटते.
दिनेशदा, अगदी अगदी. मला ते
दिनेशदा, अगदी अगदी. मला ते सगळं पाहून अगदी घुसमटल्यासारखेच वातले. अन हो आपली कोकणातली कित्तीतरी घरं अन कित्तीतरी मोठ्ठी घरं याचं उअत्तम उदाहरणं आहेत नाही ? धन्यवाद !
मृदुला, >>>हॉटेलांच्या समोर असे झेंडे लावण्याची पद्धत आहे <<<
माझ्या माहिती प्रमाणे आपला राष्ट्रध्वज कोणालाही केव्हाही वापरता येत नाही. २६जानेवारी अन १५ ऑगस्ट वगळता इतर दिवशी राष्ट्रध्वज लावणे - सरकारी इमारती /कार्यालये वगळता - गुन्हा आहे. जाणकार अधिक/ योग्य माहिती सांगतीलच...
>>>जंगले कापून विकास सगळीकडेच होतो त्यात विशेष काही ना<<<
अगदी खरे पण इतक्या मोठ्या प्रमाणात होते का हा प्रश्ण आहे. अन त्यातही त्या त्या भागाच्या/ तेथील लोकांच्या गरजेचा भाग म्हणून आपापतः होणारा विकास योग्यच आहे. पण असा ट्रान्सप्लान्ट केलेला विकास ???? मला शंका आहे की हा विकास आहे की अतिक्रमण अगदी निसर्गावरही अन तेथील रहिवाशांवरही.....
मनातून उतरलेला लेख.....
मनातून उतरलेला लेख.....
नुसते फोटो पाहून जे तुला जाणवलं ते तू लिहिलेलं वाचून जास्त तीव्रतेनं जाणवलं.
छान लिहिलंयस गं. मलाही असा
छान लिहिलंयस गं. मलाही असा ओढूनताणून निसर्ग बनवून त्यात घरं ही कल्पनाच आवडली नाही. "नैसर्गिक" निसर्ग पाहिजे. म्हणजे झाडांमध्ये लपलेलं पिटुकलं घर.....कोकणात असतं तसं. इथेही अशीच घरं आहेत. प्रत्येक घराभोवती बाग.आणि त्यात नारळ-सुपारी-केळीची झाडं.
अवल.. फार सुरेख लिहिलायेस
अवल.. फार सुरेख लिहिलायेस लेख.. ल.वा.सा. .. अगदी!अगदी!!
डॉक्टर, रुणूझुणू, वर्षू नील
डॉक्टर, रुणूझुणू, वर्षू नील धन्यवाद......
डोंगराचा हा उभा चिरलेला
डोंगराचा हा उभा चिरलेला उतार... काळजाला चीरत नाही जात ?>>>
एकूणच कशी झाडांची कत्तल झालीय याचे एक नमुना चित्र..>>>
का हो मला एक सांगा ह्याआधी तुम्ही अशी दृष्य कधी पाहिलीच नाहीत का ? आणि नसतील पाहिली तर तुम्ही भारतात कधी राहीलाच नसाल. की सगळे लवासाच्या नावाने शंख करताहेत म्हणुन तुम्हीही करताय . नाही तरी अशी हल्ली फॅशनच आली आहे.
बाजिंदा, >>>दृष्य कधी पाहिलीच
बाजिंदा, >>>दृष्य कधी पाहिलीच नाहीत का<<< हो पाहिलीत ना; पण तुकड्या तुकड्यांनी ! अन तेही गरज म्हणून घडत असताना.
श्रीमंतांची हौस म्हणून असे एकसंध चित्र पाहिले नव्हते अजून तरी, म्हणून खरच मनापासून वाईट वाटलं, ते शेअर केलं. यात तुम्हाला जर फॅशन दिसत असेल तर मी काय कऊ ? असते आपली एकेकाची नजर तशी
यात मी जे लिहिलय, त्याबद्दल काही चुका दाखवायच्या तर जरूर दाखवा पण असा सरसकट आरोप ! मला नाही वाटत ही मायबोलीची प्रथा आहे... अर्थात आपापले मत झिंदाबाद हे आहेच नाही का?
>>>की सगळे लवासाच्या नावाने शंख करताहेत म्हणुन तुम्हीही करत<<<
हे म्हणजे जरा जास्तच होतय बरं का... आजपर्यंत माझ्या कोणत्याच प्रतिक्रिया/ लेखन असे इतरांच्या पावलावर पाऊल अशा नव्हत्या. उलट अनेकदा माझे लिखाण सरसकट ऐवजी जरा हटकेच आहे-- सामान्यांना पटणार नाही अशा अर्थाने हटके-- यात पुन्हा 'मी म्हणजे वेगळी कोणी ' ही भूमिका नाही याची नोंद घ्यावी ही विनंती !
असो.
आरती सुंदर लिहलेस्....लवासा
आरती सुंदर लिहलेस्....लवासा मला आता कळले...
आरती.... निर्मितीकडुन
आरती.... निर्मितीकडुन विध्वंसाकडे प्रवास छान उलगडुन दाखवलास!!
नंतरचे फोटो बघतांना काळजात चर्र झाले... खरोखरच निर्मनुष्य रस्ता, ओकेबोके डोंगर आणी ठोकळाछाप को-या चेह-याची घरं पाहुन मन विद्ध होते!
भारतातील लोक कॉपी पेस्ट फारच
भारतातील लोक कॉपी पेस्ट फारच करतात बुआ..
अमेरिकेत स्मोकी माऊंटन्स आहे .. तिकडेपण हिच गंमंत आहे
एवढ्या छान निसर्ग रम्य ठिकाणी ए.सी च्या खोलीत जाऊन कशाला राहायचे
एक्दम पटेश
बाकी ल.वा. सा.
एक्दमच वाईट आहे.. निसर्ग सौंदर्याची अशी अवहेलना केलेली नाही बघवत ..
आणी हे सर्व फक्त पैशांसाठी.. आणी तो पैसा जाणार कुणाला.. ज्यांच्या कडे ऑलरेडि अमाप आहे त्यांनाच ...
फार फार छन लेख आहे. मनापासुन
फार फार छन लेख आहे. मनापासुन लिहिलेला आहे. आवडला. निळु लिमये यांचे पुस्तक म्हणजे मखलाशी आहे. असो, विषय लवासा चा निघाला आहे तर माझी बर्याच दिवसांची एक शंका आहे, बघा कोणाला निरसन करता आले तर. लवासा हे निवासी क्षेत्र आहे कि व्यापारी, घरे दिसतात, म्हणजे निवासी क्षेत्र असावे. आणि शाळा, आणि इतर हॉटेल इ. उद्योग पण दिसत आहेत. मग माझी शंका अशी की मी जर लवासा मधे घर घेतले तर मी नोकरी पण तिथे च करायची का? मग माझ्या सध्याच्या नोकरीचे काय? उदा. मी वकिल आहे माझे काम उच्च न्यायालयात असते रोज, तर ते तिथे कसे आणणार? आणि मी जर लवसच्य शाळेत लेखनिक म्हणुन काम करत आसेल आनी मला तेथे घर घेणे परवडणार नसेल तर मग मी रोज अप डाउन करायचे का? आणि तिथल्या घरांचे स्वरुप पहाता ते विकेंड होम आसेल आसे वाटत नाही. याचे काय स्पष्टीकरण आसु शकते?
मी अनेकांना विचारले पण काही उत्तर मिळाले नाहि.
आरती, लवासात आवडण्यासारख
आरती,
लवासात आवडण्यासारख नेमकं काय आहे ?
पण तुमचा लेख आवडला !
झाडं नसलेला निर्विकार रस्ता, उंच खांब-आसपास कुत्रे नसलेले
रस्त्यांची (कुत्र्यांसकट) साफसफाई करणारे मशीन तिथे असल्यावर फक्त खांबच दिसणार ना !
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो !
मुग्धानंद, अगदी , अगदी
अनिल, लवासात आवडण्यासारखं एकच आहे... वर लिहिलय बघ प्रचि ३४ मध्ये आहे ते
>>>रस्त्यांची (कुत्र्यांसकट) साफसफाई करणारे मशीन तिथे असल्यावर फक्त खांबच दिसणार ना !<<< पॉईंट आहे
लेख आवडला. निळू दामले सध्या
लेख आवडला.
निळू दामले सध्या सगळीकडे फिरत आहेत, माबोकरांनी देखील त्यांच्यासोबत चर्चा घडवून आणली आहेच.
ते लातुरला पण आले होते , मी बराच उशीरा गेलो होतो , त्यामुळे अर्धवट माहीतीवर बोलणे योग्य नाही.
पण त्यांची एकदोन वाक्ये खटकली, त्यांचे भाषण संपल्यावर जाताना तिथे कुणीतरी वाटलेले पत्रक
वाचले, त्यात लिहिलेले शेवटचे वाक्य मात्र समर्पक वाटले, " निळूभाऊ , तुम्ही भाऊचे भाई कधी झालात?" असे ते वाक्य होते.
पत्रक शोधेन , मिळाल्यास जरुर टाकेन.
Singapore "Sentosa" आणि
Singapore "Sentosa" आणि Malaysia " Genting Highlands" ला जाणारे आणि त्याचे कवतीक करणारे भारतात मात्र लवासाच्या नावाने बोंबा मारत फिरतात. परदेशातली ही ठिकाणं आणि तीथली हॉटेल्स अगदी नैसर्गीग रित्या उगवली असावीत.
गुजरात च्या विकासा बद्दल बोलताना हजिरा आणि जामनगरचे प्लान्ट उभे करताना किती गावं ऊठवावी लागली त्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाहित. निसर्गाचा समतोल, लोकांचे पुनर्वसन , योग्य मोबदला हे सगळे महत्वाचे आहेच पण प्रत्येक प्रोजेक्ट ला सरसकट विरोध हे न पट्णारे आहे.
BTW लवासा चा प्रोजेक्ट सुरु व्हातच्या आधि किती जणानी या भागाला भेट दिली होती?
निर्मितीकडुन विध्वंसाकडे
निर्मितीकडुन विध्वंसाकडे प्रवास छान उलगडुन दाखवलास!!>>>>आनुमोदन..........
लवासाच्या नावाने बोंबा मारत फिरतात>>>>ईथल्या वन्यजिवनाच अन "नैसर्गिक" संपत्तिच काय ? घंटा का?
"नैसर्गिक" प्रेमा पोटि विवश
"नैसर्गिक" प्रेमा पोटि विवश .... कुनिहि वइय्क्तिक न घेने...
दादाश्री- लवासाला टार्गेट
दादाश्री- लवासाला टार्गेट कस्टमर/ टुरीस्ट फक्त हॉटेल मधे राहयला येणार नाहित तर 'नैसर्गीक' सौदर्याचा आनंद घ्यायला येतिल, कुणिही व्यावसाईक 'निसर्गा'च्या प्रेमापोटी नाही तर 'धंद्याची' गरज म्हणुन या गोष्टीची काळजी घेईल.
येक उदाहरण सांगतो- आमच्याकडे स्वतःची पुर्वपार सागवानाची लागवड होती , ती मालकीचि झाडं लावण्या /तोडुन विकण्याच सायकल कायम चालु असायचे. नंतर पुढे फोरेस्ट च्या कायद्याचे रिस्ट्रीक्शन्स आल्यावर हे झाडं लावणेच बंद झाले कारण तोडुन विकायला कठीण झाले. यातुन जंगल वाचाय ऐवजी नष्ट झाली.
धंद्याची गरज म्हणुन लवासा निसर्ग वाचवील
माझ्या वर लिहिलेल्या शंकेचे
माझ्या वर लिहिलेल्या शंकेचे कोणीतरी निरसन करा लोक्स
मुग्धानन्द, शंका निरसन होईल
मुग्धानन्द, शंका निरसन होईल या भाबड्या आशेवर राहू नकोस.
मुग्धानन्द, परवडणार्या
मुग्धानन्द,
परवडणार्या किंमतीत घरे सध्या भारतात कुठेच शक्य दिसत नाहीत. गावे आणि अगदी छोटी शहरे सोडली तर. पण या ठिकाणी रोजगारनिर्मितीच्या शक्यताही अगदी कमी असतात..म्हणून रोजगारप्रधान क्षेत्रातच घरांची मागणी जास्त असते.आज मुंबईमधे सक्तीने अपडाउन करावे लागते. पुण्यातही तेच. लो बजेट घरे आज कर्जत,बदलापुर,सफाळे,पालघर इ. ठिकाणीच परवडू शकतात आणि त्याप्रमाणे ती तिथल्या सुंदर निसर्गाला किंवा भातशेतीला वगैरे विचारात न घेता बांधली जात आहेत. सध्या हा सर्व टापू विकसनशील आहे म्हणून इथे घरे उपलब्ध आणि परवडणारी आहेत.दोन चार वर्षांनी परिस्थिती बदलणार.लवासा बाबतही तेच होईल. तिथे सफाई कामगार,रुग्णसेवक,सुरक्षारक्षक व तत्सम अकुशल आणि अर्धकुशल कामांसाठी वेगळ्या घरे/क्वार्टर्स ची योजना आहे. तसेही आपले सुस्थित व्यवसाय/नोकर्या सोडून कुणी तिथे जाईल असे नाही. गेले तर अधिक उत्पन्नासाठी जातील. उत्पन्न वाढल्यास घरे परवडू शकतील. तेही स्वखुशीनेच घडेल.आपापले चांगले कामधंदे सोडून तिथे जाण्याची कुणावरही सक्ती नाही. ज्यांना काम आणि निवारा नाही असे पात्र आणि इच्छुक लोक तिथे धाव घेतील हे नक्की. मग ते परप्रांतीय असोत की आणखी कुणी.
Pages