दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल
आता ही कृती प्रचि त टाकण्याचं कारन कि पाककृती सदरात फोटो कसा टाकायचा ते समजलच नाय मला
दोन वाट्या रवा,दोन वाट्या ताक,१ वाटी तांदूळाचे पीठ, बारीक चिरलेला कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिर्च्या,
मीठ,चिमुटभर सोडा,१ टेबल स्पून कोरड्या नारळाचा कीस, ४ टेबल स्पून तेल एकत्र करून १ तास भिजवून ठेवा.
गरम निर्लेप तव्यावर १ टी स्पून तेल पसरून नेहमीप्रमाणे दोसा करा
दोन्ही बाजूने खरपूस ,सोनेरी रंग येईस्तोवर भाजा
शेंगदाण्याच्या चटणीबरोबर छान लागतो
शेन्गदाण्याच्या चटणीची कृती
एक टी स्पून तेलावर थोडा चिरलेला कांदा, कढीपत्ता,लाल ,सुक्या मिर्च्या , हे सर्व परतून ,सोललेल्या शेंगदाण्यांबरोबर,चवीपुरते मीठ,चिंचेचा कोळ मिक्स करून ब्लेंडरवर चटणी वाटावी.
वरून मोहर्या,हिंग,सुक्या लाल मिर्च्या ची फोडणी करून घालावी.
वैभु,मंजिरी, थांकु थांकु..
वैभु,मंजिरी, थांकु थांकु..
भाग्यश्री, आता तुझी नेक्स्ट हॉलिडे स्पॉट 'चायना' ठरव.. फिर दोसे क्या .. बहुत कुछ खिलाऊंगी ,,,,
वर्षू, छान दिसतोय रवा डोसा.
वर्षू, छान दिसतोय रवा डोसा. पण फक्त पाहून चव कशी कळणार? (तुम्ही केलेल्या डोस्यांची?)
करून पाहा.. खुद बनाओ,खाओ,खुद
करून पाहा.. खुद बनाओ,खाओ,खुद जान जाओ
करुन पाहिला हा डोसा. एकदम
करुन पाहिला हा डोसा. एकदम छान झाला. चटणी तर अप्रतिम!!
एवढी सोपी आणि छान रेसिपी टाकल्याबद्द्ल धन्यवाद.
धन्स मराठी कुडी..
धन्स मराठी कुडी..
वर्षा खूप खूप धन्स... दर
वर्षा खूप खूप धन्स... दर रविवारी पोहे, उपमा करून कंटाळा आलेला, म्हणून एकदा सक्काळी सक्काळी भेळ केली काहीतरी वेगळा नाष्टा करावा म्हणून...
हे बरे आहे स्वादिष्ट, पोटभरू आणि पौष्टीक आयटम... दिसतंय पण म्स्त तोंपासू आणि खास चटणीची रेसिपीपण टाकल्याबद्दल धन्स.. पुढच्या सोमवारी पोस्टते... आमच्या गिनीपिगची प्रतिक्रिया...
सूकिची मज्जाय बुवा... डोसा, चटणी वर धम्मकलाडू पण?? सूकि, नुस्तच रेसेप्या ४वर्ड करू नये... मदत पण करावी... खाण्याची नव्हे, करण्याची!
ते बाजूचे काचेचे बाऊल्स पण मस्त आहेत!>> अगदी अगदी!
करुन पाहिले आज. मस्त झाले. चव
करुन पाहिले आज. मस्त झाले. चव एकदम सुंदर. चटणीही तू लिहील्याप्रमाणेच केली.
धन्यवाद वर्षु.
(अवांतर-माझे करताना काहीतरी चुकले बहुतेक. थोडेसे जाड झाले दोसे. thin जमायला हवे. )
अरे व्वा.. रैना ..छान वाटलं
अरे व्वा.. रैना ..छान वाटलं ऐकून.. नेक्स्ट टाईम पणी जास्त अॅड करून बघ हाकानाका
सही रे, मी हे आजच पहिल्यांदा
सही रे, मी हे आजच पहिल्यांदा खाल्ले.. लगेच इथे पाकॄ मिळाली.. जाम टेस्टी प्रकार आहे!
निलू, आज तुझ्या पध्द्तीने
निलू, आज तुझ्या पध्द्तीने दाण्याची चटणी केली होती. मी त्यात आल्याचा तुकडापण घातला. छानच लागते ग. सँडवीचसाठीपण मस्त होईल ही चटणी.
हमनाम.. कसली सही रेसपी दिलीस
हमनाम.. कसली सही रेसपी दिलीस ग.. मस्त मस्त मस्त
आणी चटणिही छानच
थांकु थांकु आर्च आणी वर्षी
थांकु थांकु आर्च आणी वर्षी
डोश्याच्या पिठात थोडे तीळ आणी
डोश्याच्या पिठात थोडे तीळ आणी काजुचे तुकडे घातले तर अजुन मस्त्त होतो.
वर्षूतै, कॅन यू बिलीव्ह. मी
वर्षूतै, कॅन यू बिलीव्ह. मी बनवलेला पहिला पदार्थ. (आता नाही, न्हानपनी) मस्त जमायला लागला होता. अगदी पातळ बनवता यायचे, पण मग अडजीभेला लागले नी पडजीभ बोंबलली अस व्हायचं.
या मधे काकडी कीसुन टाकली तर
या मधे काकडी कीसुन टाकली तर अजुनच मस्त लागतो.
माली आणी सुप्रिया .सजेशन करता
माली आणी सुप्रिया .सजेशन करता थांकु हां
अम्या.. तुझी बायको तुझ्यापेक्षा छान दोसे करते नं????????
मी या पद्दतीने डोसे केले आज,
मी या पद्दतीने डोसे केले आज, मस्त झाले.
एक्दम छान सोपी रेसिपी, नेमके प्रमाण आहे. धन्यवाद!
<< तुझी बायको तुझ्यापेक्षा
<< तुझी बायको तुझ्यापेक्षा छान दोसे करते नं >>
डोसे ? तूला ठोसे म्हणायचय का वर्षूतै ?
धन्स गं अम्या तुला दोसे
धन्स गं
अम्या तुला दोसे ऐवजी ठोसेच मिळत असतील
वर्षु, आत्ताच तुझ्या
वर्षु, आत्ताच तुझ्या पध्दतीने डोसा आणि शेन्गदाण्याची चटणी करुन खाल्ले. एकदम मस्त. नवरा आणि मुलगा दोघे खुश.... धन्स.
वर्षू, जमलाय ना मला ?
वर्षू, जमलाय ना मला ?
खुप छान रेसिपी आहे,
खुप छान रेसिपी आहे, रविवारच्या नास्ट्यासाठी उत्तम! मी नक्की करुन पाहीन
दिनेश दा--- व्वाव्वा १००%
दिनेश दा--- व्वाव्वा १००% जम्याकि
४ टेबल स्पून तेल चुकून लिहिलय
४ टेबल स्पून तेल चुकून लिहिलय का?
नाही आशु, तेच प्रमाण आहे
नाही आशु, तेच प्रमाण आहे
वर्षुतै.... रवा बाआआआआआआरीक
वर्षुतै.... रवा बाआआआआआआरीक असेल तर चालेल का? की जाडच हवा? माझ्या साबांना लै आवडतो रवा डोसा, करुन घालीन म्हणते.
रच्याकने, इथे कोणाला उपासाच्या कचोरीची रेसिपी येते का? इथे टाकली असेल तर लिंक देईल का मला कोणी???
Pages