गवत फुला रे गवत फुला

Submitted by जिप्सी on 2 December, 2010 - 11:46

=================================================
=================================================
कुंडित, बागेत किंवा इतरत्रः लावलेल्या शोभेच्या,फुलांच्या झाडांपेक्षा मला हि इवली इवली गवत फुले फार आवडतात. थोड्या दिवसांसाठीच जन्माला आलेल्या या लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढर्‍या निळ्या, हिरव्या, गुलाबी शलाका पावसाळ्यानंतर जमिनीवरच्या हिरव्या तारांगणात लखलखत असतात. निसर्गाची अशी हि सतरंगी उधळण करीत फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन आलेली हि रानफुले आपल्याला निखळ आनंद देऊन जातात आणि मग आपले मनही लहान होऊन शांताबाईंच्या कवितेसारखेच गाऊ लागते. Happy

रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा

मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
– शांता शेळके
=================================================
=================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

गुलमोहर: 

प्रतिसादाबद्दल धन्स, लोक्स Happy

प्रचि ०१ व ०९ चे फोटो काढण्यासाठी मी खुप प्रयत्न केला पण मला जमले नाहीत.
एडीट केले का?>>>>>>>mak.kale55 रीसाईज आणि बॉर्डर टाकण्याशिवाय फोटोंवर कुठलेहि संस्कार केलेले नाहीत. Happy

जिप्सी, फोटो कोकणात जाऊन काढलेत का? छान आलेत. प्रचि. १० : याच्या जवळून गेल्यावर त्याच्या काटयांचा प्रसाद मला मिळाला आहे. आणि ही कविता मला पण होती. अजूनही पाठ आहे. सुंदर कविता !!

फोटो कोकणात जाऊन काढलेत का? >>>>>नाही, हे फोटो कोराईगड (लोणावळा), सिंहगड (पुणे), कास पठार (सातारा), रायगड किल्ल्ला, अजिंक्यतारा (सातारा) इ. ठिकाणी काढलेली आहेत. Happy

२ , ४ अन १८ नंबरचे फोटो मस्तच वाटले.. हिरव्या तुर्‍यांचं मलाहि कायम आकर्षण वाटुन राहिलय. दवात भिजल्यानंतर त्यांना पाहणं एकदम खास.. तसं एखादं प्रचि घ्यायला हवं होतस.. एखाद्या मुखपृष्ठा साठी मस्तच वाटेल ते. Happy

आहा!!!!!!क्या बात है!! अतिशय सुरेख प्रचि!!
लाजवाब!! मन एकदम रंगरंगुल्या सानुल्या गवतफुलाचे झाले!!

मस्त!

मस्त . पावसाळ्यात रानात सगळीकडे असतात , पण आपल्याकडे पहायला आवड व सवड कुठे आहे .

व्वा ! मस्तच.....आई ही कविता माझ्या लेकाला झोपवताना म्हणायची. आजही मी कधी गुणागुणायला लागले की तो कान टवकारून ऐकतो. Happy

Pages