=================================================
=================================================
कुंडित, बागेत किंवा इतरत्रः लावलेल्या शोभेच्या,फुलांच्या झाडांपेक्षा मला हि इवली इवली गवत फुले फार आवडतात. थोड्या दिवसांसाठीच जन्माला आलेल्या या लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढर्या निळ्या, हिरव्या, गुलाबी शलाका पावसाळ्यानंतर जमिनीवरच्या हिरव्या तारांगणात लखलखत असतात. निसर्गाची अशी हि सतरंगी उधळण करीत फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन आलेली हि रानफुले आपल्याला निखळ आनंद देऊन जातात आणि मग आपले मनही लहान होऊन शांताबाईंच्या कवितेसारखेच गाऊ लागते.
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
– शांता शेळके
=================================================
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
खूप सुंदर फोटो.
खूप सुंदर फोटो.
प्रतिसादाबद्दल धन्स, लोक्स
प्रतिसादाबद्दल धन्स, लोक्स
प्रचि ०१ व ०९ चे फोटो काढण्यासाठी मी खुप प्रयत्न केला पण मला जमले नाहीत.
एडीट केले का?>>>>>>>mak.kale55 रीसाईज आणि बॉर्डर टाकण्याशिवाय फोटोंवर कुठलेहि संस्कार केलेले नाहीत.
छानच रे योग्या....
छानच रे योग्या....
सुं द र !
सुं द र !
जिप्सी, फोटो कोकणात जाऊन
जिप्सी, फोटो कोकणात जाऊन काढलेत का? छान आलेत. प्रचि. १० : याच्या जवळून गेल्यावर त्याच्या काटयांचा प्रसाद मला मिळाला आहे. आणि ही कविता मला पण होती. अजूनही पाठ आहे. सुंदर कविता !!
फोटो कोकणात जाऊन काढलेत का?
फोटो कोकणात जाऊन काढलेत का? >>>>>नाही, हे फोटो कोराईगड (लोणावळा), सिंहगड (पुणे), कास पठार (सातारा), रायगड किल्ल्ला, अजिंक्यतारा (सातारा) इ. ठिकाणी काढलेली आहेत.
२ , ४ अन १८ नंबरचे फोटो मस्तच
२ , ४ अन १८ नंबरचे फोटो मस्तच वाटले.. हिरव्या तुर्यांचं मलाहि कायम आकर्षण वाटुन राहिलय. दवात भिजल्यानंतर त्यांना पाहणं एकदम खास.. तसं एखादं प्रचि घ्यायला हवं होतस.. एखाद्या मुखपृष्ठा साठी मस्तच वाटेल ते.
u never disappoint coolpix!
u never disappoint
coolpix!
आहा!!!!!!क्या बात है!! अतिशय
आहा!!!!!!क्या बात है!! अतिशय सुरेख प्रचि!!
लाजवाब!! मन एकदम रंगरंगुल्या सानुल्या गवतफुलाचे झाले!!
मस्त!
मस्त . पावसाळ्यात रानात
मस्त . पावसाळ्यात रानात सगळीकडे असतात , पण आपल्याकडे पहायला आवड व सवड कुठे आहे .
ख त रा फोटोज! खल्लास! आवडली
ख त रा फोटोज! खल्लास! आवडली रे गवतफुलं!!
मस्तच!
मस्तच!
सुंदर... !!!! ती कविता आठवुन
सुंदर... !!!!
ती कविता आठवुन मस्त वाटले.
मस्त !
मस्त !
व्वा ! मस्तच.....आई ही कविता
व्वा ! मस्तच.....आई ही कविता माझ्या लेकाला झोपवताना म्हणायची. आजही मी कधी गुणागुणायला लागले की तो कान टवकारून ऐकतो.
शांता शेळके यांची हि सदबहार
शांता शेळके यांची हि सदबहार कविता! आणि त्याला अनुरुप टाकलेले फोटो! शाळेतले दिवस आठवले!
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!
योगेश... #२ आवडला.. मस्त.
योगेश... #२ आवडला.. मस्त.
ही कविता शांता शेळकेंची नसून
ही कविता शांता शेळकेंची नसून इंदिरा संत यांची आहे.
अरेच्या मीही समजत होते की
अरेच्या मीही समजत होते की शांता शेळके यांची आहे.
Pages