=================================================
=================================================
कुंडित, बागेत किंवा इतरत्रः लावलेल्या शोभेच्या,फुलांच्या झाडांपेक्षा मला हि इवली इवली गवत फुले फार आवडतात. थोड्या दिवसांसाठीच जन्माला आलेल्या या लाल, पिवळ्या, जांभळ्या, पांढर्या निळ्या, हिरव्या, गुलाबी शलाका पावसाळ्यानंतर जमिनीवरच्या हिरव्या तारांगणात लखलखत असतात. निसर्गाची अशी हि सतरंगी उधळण करीत फक्त काही दिवसांचेच आयुष्य घेऊन आलेली हि रानफुले आपल्याला निखळ आनंद देऊन जातात आणि मग आपले मनही लहान होऊन शांताबाईंच्या कवितेसारखेच गाऊ लागते.
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा
मित्रांसंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती डुलता डुलता झुलताना
विसरुन गेलो पतंग नभीच अन विसरुनी गेलो मित्रांना
पाहुन तुजला हरखुन गेलो अशा तुझ्या रे रंगकळा
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हा मधे हे रंग पहाता भान हरपुनी गेले रे
पहाटवेळी अभाळ येते लहान होउनी तुझ्याहुनी
निळ्या करानी तुला तुला भरविते दवमोत्यांची कणीकणी
वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होउन म्हणते अंगाईचे गीत तुला
रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझारे तुझा लळा
– शांता शेळके
=================================================
=================================================
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
सही!!
सही!!
माझी खूप आवडती कविता. सगळी
माझी खूप आवडती कविता. सगळी प्रचि सुंदरच.
हिरवी नाजुक रेशिम पाती दोन बाजुला सळसळती
नीळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
असे फूल नाही का मिळाले?
मी बघितलेले गवतफूल त्याला काही रंग नसायचे, नुसत्च हिरवे तुरे. पण त्यावरून हात फिरवताना काय छान वाटायचे.
व्व्व्वा! जिप्सी!
व्व्व्वा! जिप्सी!
प्रिती, भरत, बेफिकीरजी
प्रिती, भरत, बेफिकीरजी धन्यवाद.
नुसते हिरवे तुरे. पण त्यावरून हात फिरवताना काय छान वाटायचे.>>>>भरत, हे तुरे का?
रायगडवारीत सकाळी काढलेले हे फोटो. पहाटे दवांत भिजल्यावर छान दिसतं होते. माबोकर नीलवेद आणि किरू यांनी तर अक्षरश: झोपून त्या गवतफुलांवर (त्यावर पडलेल्या दवांवर) चेहरा फिरवला होता.
अगदी हेच हेच . जादुगाराची
अगदी हेच हेच . जादुगाराची पोतडी दिसतेय तुझ्याकडे.
अप्रतिम नाद.....
अप्रतिम नाद.....
हे आणखी एक गवतफुल. हे फुल
हे आणखी एक गवतफुल. हे फुल प्रत्यक्षात नखाच्या आकाराएवढेही नव्हते.
२ आणि १४ खूप आवडले ..
२ आणि १४ खूप आवडले ..
छान निरुपण, छान कविता आणि छान
छान निरुपण, छान कविता आणि छान फुलं!
अप्रतिम प्रचि. यातल्या
अप्रतिम प्रचि. यातल्या कितीतरी फुलांमुळे बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र, दिवाळीच्या सुमारास आमच्या बंगल्याभोवती मस्तपैकी, गवत उगवलेल असायचं...त्याचा तो उग्र गंध, ही गवतफुलं, चिमणचारा, त्यावर उडणारी फुलपाखरं, वातावरणात दरवळणारा तो दिवाळीच्या तळणाचा वास, किशोरच्या दिवाळी अंकाची उत्सुकता ..... भरकटले माझे मन!
नेहमीप्रमाणेच छान प्रचि रे,
नेहमीप्रमाणेच छान प्रचि रे, हि कविता तर आम्हालाही होती. अजून आठवतेय.
ही कविता आम्हाला होती. सुरेख
ही कविता आम्हाला होती. सुरेख फुले.
सुर्रेख्च .. प्रसन्न वाटतं
सुर्रेख्च .. प्रसन्न वाटतं फुलांना बघून
सगळेच फोटो मस्त आलेत !
सगळेच फोटो मस्त आलेत !
छान फोटो. कित्ती दिवसांनी
छान फोटो. कित्ती दिवसांनी वाचली ही कविता
प्रचि ४,प्रचि ६ सुंदर.
ते खालचे तुरे आहेत त्यांना आम्ही चिमणीचे दाणे म्हणायचो.
योग्या, निव्वळ अप्रतिम आहे
योग्या, निव्वळ अप्रतिम आहे कविता अन अन सगळीचे प्रकाशचित्रे. खरोखर तू एक वेगळा फोटोग्राफर आहेस.
मफो... नेहमीप्रमाणेच... अ प्र
मफो... नेहमीप्रमाणेच... अ प्र ति म प्रचि
कित्ती दिवसांनी वाचली ही कविता<<< ... हो ना.. विसरुनच गेले होते... आता परत पाठ करायला हवी
प्रतिसादाबद्दल धन्स
प्रतिसादाबद्दल धन्स
किशोरच्या दिवाळी अंकाची उत्सुकता ..... >>>>मामी, अगदी अगदी. किशोरबरोबरच चंपक आणि ठकठक सुद्धा.
ते खालचे तुरे आहेत त्यांना आम्ही चिमणीचे दाणे म्हणायचो.>>>>>सावली, हे घे चिमणीचे पोहे (हे नाव मात्र दिनेशदांनी सांगितले :-)).
सर्व प्रची ..क्लास
सर्व प्रची ..क्लास ,अप्रतिम....
योगेश, नेहमीप्रमाणेच मस्त
योगेश, नेहमीप्रमाणेच मस्त प्र.चि.
प्रचि ३ - काँग्रेस गवत
प्रचि ४/५ - सफेद गेंद (Eriocaulon)
प्रचि ७ - तारागुच्छ (Neanotis montholonii)
प्रचि १५ - रानवांगी ??
प्रचि १६ - आभाळी (Cyanotis Tuberosa)
प्रचि १८ - कुर्डू
माधव, खुप खुप धन्यवाद फुलांची
माधव, खुप खुप धन्यवाद फुलांची नावे सांगितल्याबद्दल.
प्रचि १६ आभाळीला "निलवंती"पण म्हणतात ना? आणि प्रचि ३ मधल्या कांग्रेस गवताला एक उग्र वास आणि कडवटपणा असतो ना?
अहाह्हाआ... सुंदर दिवसाची
अहाह्हाआ... सुंदर दिवसाची सुरुवात
मस्तच
मस्तच
वॉव! प्रचि १४ .... अ प्र ति म
वॉव! प्रचि १४ .... अ प्र ति म
खासच रे योग्या... ४, ६, ११
खासच रे योग्या... ४, ६, ११ अप्रतिम....
भन्नाट...
निलवंतीबद्दल बघून नक्की
निलवंतीबद्दल बघून नक्की सांगतो.
हो, काँग्रेस गवताला काहिसा उग्र वास असतो. त्याच्या स्पर्शाने खाजही येते. ते मूळ भारतीय उपखंडातले झाड नाही. स्वातंत्र्यानंतर जेंव्हा भारत सरकारने (काँग्रेसने तेंव्हा सत्तेत होती) अमेरिकेतून गहू आयात केला तेव्हा त्याच्याबरोबर हे पण इकडे आले.
नेहमीप्रमाणे फोटो
नेहमीप्रमाणे फोटो मस्तच,
प्रचि ०१ व ०९ चे फोटो काढण्यासाठी मी खुप प्रयत्न केला पण मला जमले नाहीत.
इडीट केले का?
छान आहेत प्रचि ६, ११ आणि १८
छान आहेत प्रचि ६, ११ आणि १८ खूप आवडले.
सुंदर..खुप आवडले.. शेवटच्या
सुंदर..खुप आवडले..
शेवटच्या फोटोत आहेत हे तुरे कोल्हापुराकडे पाडव्याच्या दिवशी जे 'पांडव' घालतात त्यावर खोचलेले असतात ना? कोणाला माहीतेय का?
मस्तच
मस्तच
Pages