Submitted by webmaster on 3 June, 2008 - 00:45
"उजळ कांती हवी" या विषयावर पूर्वी झालेलं हितगुज इथे वाचा
http://www.maayboli.com/hitguj/messages/103387/107548.html
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिमूरी, मीपण तेच लिहीणार होते
चिमूरी, मीपण तेच लिहीणार होते वर्षाला.. धन्स, माझं काम वाचवलंस!
स्वप्ना , रोज रात्री झोपताना बदामाचे तेल डोळयाखाली लावले तरी काळी वतॄळे कमी येतात.>> खरंय... पण काळी वर्तुळे येण्याची खुप कारणे आहेत... HB कमी होणे, झोप कमी, विचार जास्त, कॉम्प्युटरसमोर जास्त वेळ काम करणे... मला पण झालेत... आणि त्याचा विचार केला की वाढतात, जाऊदे म्हटलं... HB कमी झालेयच त्यावर उपाय करतेय सध्या..
अरोमाचं चंदनादी कल्क रोज झोपताना मसाज करून लावायचं, मला त्याने फरक पडला होता. मग कंटाळा केला...
>>कॉम्प्युटरसमोर जास्त वेळ
>>कॉम्प्युटरसमोर जास्त वेळ काम करणे
बरोबर ग. मला पण हीच शंका येतेय. आजकाल घरी पण लॅपटॉपवर काम करत असते. म्हणून कदाचित जास्त झाली असतील. पण तू कंटाळ्याचं म्हणतेस ते अगदी खरं आहे. मी पण एक नाईट क्रीम लावले ते सुध्दा कंटाळत कंटाळ्त
olay total effect कोणत्या
olay total effect कोणत्या वयापासुन वापरता येइल?
हाय साधना, उर्जिता जैन चं
हाय साधना, उर्जिता जैन चं अॅलोवेरा जेल कुटे मिळेल.?
प्राजक्ता उर्जिता जैन चे
प्राजक्ता उर्जिता जैन चे कोरफड जेल आणि जास्वंद जेल कुटे मिलतिल.
अगं तु मुंबईत राहतेस ना? मग
अगं तु मुंबईत राहतेस ना? मग केमिस्टकडे विचार ना. ब-याच ठिकाणी 'उर्जिता जैन प्रॉडक्ट्स इथे मिळतील' अशी पाटी असते. मी नव्या मुंबईत राहते जिथे अशी पाटी मी पाहिली नाही, पण इथल्या एका केमिस्टच्या दुकानात जास्वंद जेल पाहिले. मी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ऑर्डर दिल्यास मागवुन देऊ असे कळवले. तुझ्या आजुबाजुला विचारुन पाहा.
सगळ्या आर्युवेदिक दुकानात
सगळ्या आर्युवेदिक दुकानात किंवा केमिस्ट मध्ये मिळेल.
ए॑रडेल तेलामुळे आय्बोज दाट
ए॑रडेल तेलामुळे आय्बोज दाट होतात का? मग चेहयावर लावल्याने चेह्यावरचे केस वाटणार नाहि का?
चेहर्यावर लावू नका ना.
चेहर्यावर लावू नका ना.
चेहेर्याला लावण्यासाठी
चेहेर्याला लावण्यासाठी चान्गले moisturizer कोणते? (Day and Night) Especially in late 30's. Market मधे एवढे products available आहेत की काही कळत नाही. मी US मधे आहे.
थंडीत त्वचेची काळजी मध्ये हे
थंडीत त्वचेची काळजी मध्ये हे टाकलेय. पण मी हे बाराही महिने वापरतेय. इथे कोणाला उपयोग होत असेल तर पाहा. -
माझी त्वचा तेलकट आहे. उन्हाळ्यात तेलाच्या विहिरी उसळतात आणि हिवाळ्यात इतकी कोरडी की जरा ताणले तरी फाटेल की काय असे वाटते. पावसाळा हा एकच ऋतू मानवतो. या त्वचेला कुठलेही क्रिम सुट होत नाही. मी इतक्या वर्षात कधी वापरलेही नाही, पण आता वयपरत्वे हिवाळ्यातले कोरडेपण वाढायला लागले म्हणुन क्रिमकडे वळले.
इथली उजळ कांती वाचुन अलोएवेरा जेल आणि दुकानात पाहुन कुकुंबर जेल आणले. माझ्या वहिनीने ब-याच वर्षांपुर्वी उर्जिता जैनच्या पार्ल्यातल्या सेंटरमधुन अरोमाथेरपीचा कोर्स केला होता. त्याचे पुस्तक तिने मला दिलेले. त्यातले पाहुन खालिल क्रिम्स केली आणि ती बरीच उपयोगी ठरताहेत हे लक्षात आले.
१. ५० ग्रॅम अलोवेरा जेलमध्ये खालील तेले घालावीत -
रोसमेरी तेल ८ थेंब
जेरॅनियम तेल १२ थेंब
जुनिपर तेल १० थेंब
लेमन तेल ८ थेंब
बदाम तेल ५ मिलि
अवोकॅडो तेल ५ मिली
जेल लहान टोपात काढुन घ्यावा, त्यात वरील तेले घालुन लहान रवीने किंवा चमच्याने चांगले घुसळावे. २०-२५ मिनिटे घुसळल्यावर पारदर्शक जेल पांढरा होतो आणि हाताला एकदम मऊ लागतो. परत त्याच डबीत भरुन ठेवावे आणि आंघोळ केल्यावर हात्-पाय्-तोंड्-मान-गळा-ओठ इथे लावावे. त्वचेत जिरते, त्वचा हाताला मऊ व गुळगुळीत लागते. चेहरा अजिबात तेलकट दिसत नाही. यावर नेहमीची पावडर लावावी. हे सनस्क्रिनसारखेही काम करते. बाहेर जाण्याआधी हात्-तोंड्-मान-गळा-ओठ इथे फासावे.
२. ५० ग्रॅम कुकुंबर जेलमध्ये खालील तेले -
लेमन तेल १२ थेंब
जुनिपर तेल १० थेंब
मार्जोराम तेल ८ थेंब
कॅरट तेल ५ मिली
ग्रेपसिड तेल ५ मिलि
वरच्यासारखेच क्रिम करावे. झोपण्याआधी विस मिनिटे ह्या क्रिमने तोंड-गळा-मान इथे हलका मसाज करावा. ह्याने मात्र चेहरा तेलकट दिसतो. २० मिनिटांनी फक्त पाण्याने धुवावे (नो साबण), टोवेलने पुसावे आणि शांत झोपावे. पहिल्या दिवशी जरा झोंबेल, दुस-या दिवशी थोडे कमी झोंबेल आणि मग सवय होईल. पहिल्या दिवशी चेहरा पुसल्यावर हवे तर अलोए क्रिम लावा. कुकुंबर क्रिम खुप इफेक्टिव आहे. याने माइल्ड ब्लिच होते. दोन्-तिन रात्री सतत वापरल्यास चौथ्या रात्री चेहरा पुसताना ब्लॅकहेड्सपण आपोआप निघताहेत असे लक्षात येईल.
३. रुक्ष त्वचेसाठी -
चंदन तेल १० थेंब
जेरॅनियम तेल १० थेंब
रोजवुड तेल ५ थेंब
येलँग यॅलंग तेल ५ तेल
व्हीटजर्म तेल १० मिली
हे सगळे ५० मिली तिळाच्या तेलात मिसळावे आणि जरुर तेवढे घेऊन संध्याकाळी तक्रारीच्या जागी मसाज करावा.
४. दिवसा आर्द्रतेसाठी -
कॅमोमाईल तेल ४ थेंब
चंदन तेल ६ थेंब
रोज तेल ६ थेंब
५० मिलि बदामतेलात मिसळुन आंघोळीनंतर चेहरा मान गळा इथे लावावे.
मी १ आणि २ बनवले. बाकीच्याची अजुन गरज पडली नाहीये. अलोईवेरानेच काम होते. १. तीळाच्या तेलातही बनवता येते. मी १०० ग्रॅमचा डब्बा आणलाय. १०० ग्रॅमसाठी थेंबांचे प्रमाण दुप्पट करावे. एखादे तेल असले/नसले तरी चालते. फॉर्मुल्यात नसले तरी मी व्हीटजर्म तेल (५० ग्रॅम जेलला ५ मिली) वापरते कारण ते सुरकुत्या घालवुन त्वचा तरुण ठेवते. यावेळी चंदन तेल आणलेय. ते उष्णता कमी करते (रु ३००/५ मिली. ५० ग्रॅम जेलमध्ये ६ थेंब)
गरोदरपणी यातली काही तेले वापरु नयेत असे लिहिलेय. तसेच हि तेले थेट त्वचेवर लाऊ नये. तीळाच्या तेलात्/जेल/ किंवा इतर तेलात मिसळुन वापरावीत.
५० ग्रॅम जेलसाठी साठी सगळी इसेंसियल तेले मिळून ३०-४० थेंबांवर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. १००ग्रॅम साठी प्रमाण दुप्पट.
साधना, मी मिरारोडला राहते.
साधना, मी मिरारोडला राहते. दादरला जॉब आहे. त्यामुळे दादरच्या आयुर्वेदामधून ही तेले-जेले घेऊ शकते. सगळी मिळू शकतील का??
१. माझी स्कीन खूप सेन्सेटिव व मिक्स रूक्ष(काही ठिकाणी ऑईली तर काही ठिकाणी कोरडी) आहे., डवशिवाय दुसरा सोप चालत नाही. नाहीतर रॅशेस होऊन आणखी कोरडी होते. ही तेले/जेले चालतील का?
२. थंडीत तर इतकी निस्तेज वाटते. कुठलेही मॉईस्चर क्रीम (रात्रीच लावते) लावले तर काळी पडते. नाही लावले तर कोरडी रूक्ष निस्तेज वाटते.
३. फेशिअल्स करून बघितले, पण त्या स्टिमींगने ब्लॅकहेड्स चे होल्स अस्पष्ट खड्ड्यांसारखे दिसत आहेत. मला उजळ कांती नाही मिळाली तरी चालेल पण या खडबडीत निस्तेज रूक्ष त्वचेऐवजी सतेज, प्लेन, नितळ गुळगुळीत त्वचा हवेय काय करू???
अगं करुन तर बघ. जैन्बाईंच्या
अगं करुन तर बघ. जैन्बाईंच्या मते ह्या तेलांनी २-३ महिन्यात त्वचा ५-१० वर्षांनी तरुण दिसायला लागते. अनेकजणांनी वापरुन अभिप्राय दिला आहे.
पहिल्यांदा फक्त अलोए क्रिम बनवुन बघ. थोडा फरक वाटला तर मग कुकुंबरही बनव. माझ्या अनुभवावरुन सांगते, फरक पडेल नक्की.. अलोए कुठल्याही त्वचाप्रकाराला चालते.
दादरला नक्कीच मिळतील. पण घेताना dr. jain नाव बघुन घे. मी घेताना नीट पाहिले नाही तर त्याने dr. jain ऐवजी d.jain चे अलोए आणि कुकुंबर जेल दिले. मी भानुपद्म मधुनच घेतले होते. तेले मात्र फक्त dr. jain चीच मिळतात.
साधना हे "भानुपद्म " दादरला
साधना हे "भानुपद्म " दादरला कुठे आहे?
रानडे रोडवर वैद्य सोनाराचे
रानडे रोडवर वैद्य सोनाराचे दुकान आहे त्याच्या आधीच्या गल्लीत. गल्लीच्या तोंडाशी उभे राहिले तरी दिसते.
thanks ग साधना, करुन
thanks ग साधना, करुन बघेन....
dreamgirl, मलापण कोरड्या त्वचेचा त्रास होतोय. ३ - ४ दिवसांनपुर्वीच मी तीळाच्या तेलात कडुलिंबाची पाने टाकुन उकळवले आणि ते रात्री चोळतेय. खुप फरक पडलाय. माझ्या पायावर वैगरे भाजल्यासारखे डाग पडायला लागले होते ह्या थंडीने पण आता ह्या तेलाने बराच फरक पडलाय.
साधना धन्स ग .. खूपच उपयोगी
साधना धन्स ग .. खूपच उपयोगी माहिती
Thanks Sadhana...Good info.
Thanks Sadhana...Good info. क्रीम्स तयार करायचा प्रयत्न करीनच पण लगेच वापरासाठी एखादे क्रिम सुचवु शकशील का? US मधे मिळणारे?
युएसमधले मला माहित नाही गं.
युएसमधले मला माहित नाही गं. इथलीच मागची पाने चाळुन बघ. कदाचित तुला हवी ती माहिती मिळेल.
नेटवर उर्जिता जैन गुगलुन बघ.
me_mastani : Oil Of Olay
me_mastani : Oil Of Olay Total Effect चान्गले आहे. कॉस्टकोमधे घेतले तर १००मिलीची बाटली साधारण $२६ वगैरे मिळेल तेच क्रीम ५० मिली बाटली टार्गेट मधे $२०ला मिळेल.
न्युट्रोजिनाचे पण मॉइश्चरायझर छान आहे.
साधनाताई, वर जे अॅलो क्रिम
साधनाताई,
वर जे अॅलो क्रिम सांगितले आहेस ते थंडीत हातापायांना लावायला म्हणूनपण चालेल ना??
हो गं. मी लावते. थंडीत
हो गं. मी लावते. थंडीत माझ्झ्या पायांची त्वचा खुप ताणते. अगदी पोर्सेलिनसारखी चकचकीत होते आणि मग जाम खाजते. ह्यावर्षी हे क्रिम लावुन खुपच आराम पडलाय..
साधना तुम्ही दिलेली माहीती
साधना तुम्ही दिलेली माहीती खुपच उपयोगी आहे.
डोंबिवली मधे मला ह्या तेला मधिल काही तेल मिळाले नाही. कुणाला माहीत आहे का एखादे दुकान, डोंबिवली मधे किंवा दादर मधे असेल तरी चालेल.
Thank you Minoti. उद्याच जाते
Thank you Minoti. उद्याच जाते Costco मधे.
रचु, तु / तुम्ही डोंबिवलीत
रचु, तु / तुम्ही डोंबिवलीत पुर्वीच्या गणेश कोल्डिंग च्या समोर एक आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे तिथे बघितले का?? बहुतेक तिथे मिळतीय किंवा ते आणुनपण देतात. मागे मी उटने केलेले तेव्हा काहि पावडरी त्यांनी मागवुन दिलेल्या.
रच्याकने, तुला कुठली तेलं मिळाली आहेत?? आणि कुठे? प्लीज सांग मलाहि आणायची आहेत.
रचु, कामत मधे विचारले का??
रचु, कामत मधे विचारले का?? मला वाटतं सांगितलं तर आणून देतात दुकानदार!!
सखि तुच म्हण. actually मी ना
सखि तुच म्हण.:)
actually मी ना माझ्या भावाला सांगितल होत दुकानात चेक करायला. माझी यावेळीची मुंबई वारी खुप थोड्या दिवसांची आहे ना म्हणुन. त्यानी डोंबिवली वेस्ट्ला गुप्ते रोडवर "पुजा"नावाच छोटसं स्टोर आहे तिथे विचारल होत.
त्या दुकानदारानी त्याला त्यांच्याकडे लेमन, चंदन,बदाम आणि रोज तेल आहे म्हणुन सांगितल.
त्याला कामत आणि गणेश कोल्डिंग च्या समोर च्या आयुर्वेदिक दुकानात चेक करायला सांगते.
रोचीन आणि सखि थॅन्कु
रोचीन आणि सखि थॅन्कु
सख्यांनो, उर्जिता जैनने आता
सख्यांनो, उर्जिता जैनने आता ही सगळे फोर्मुले वापरुन स्वतःच क्रिम्स बनवुन आणलीत बाजारात. माझ्या वैनीकडे माहितीपत्रक येते जैनचे नेहमी त्यात तिने वाचले. आता माझ्या हाती ते पत्रक लागले की मी त्या क्रिम्सची माहिती तुम्हाला देईनच. मग स्वतः बनवायचे झंझट नको. (मी मात्र स्वतःच बनवुन वापरेन, कुठले तेल वापरायचे ते आपल्याला ठरवता येते एखाद्या तेलाचा वास आवडत नसेल तर ते टाळता येते. मला बर्गॅ.चा आव्डला नाही )
पण घेताना dr. jain नाव बघुन
पण घेताना dr. jain नाव बघुन घे. मी घेताना नीट पाहिले नाही तर त्याने dr. jain ऐवजी d.jain चे अलोए आणि कुकुंबर जेल दिले. मी भानुपद्म मधुनच घेतले होते. तेले मात्र फक्त dr. jain चीच मिळतात.>> कालच गेलेले भानुपद्ममधे. मलाही त्याने d.jain चीच जेले दिली. तू आधीच सांगून ठेवलेलंस म्हणून त्याला म्हटलं डुप्लीकेट नकोय नाहीतर नकोत. (आधीच तोंडावर मद्दड भाव असतात, कोणीपण शेंडी लावेल म्हणून आधीच खबरदारी घेतली प्रसंगावधान राखून :फिदी:) तर त्याने dr. jainचं मोठ्ठं पँप्लेट दाखवलं. त्यात अलोए आणि कुकुंबर जेल च्या नवीन पॅक कार्टन्सवर d.jain आहे पण ती उर्जिता जैन चीच आहेत फॉर शुअर. सो साधना, निराश नको होऊ; बरोबर आणली आहेस जेले
पण ते कुकुंबर मधली काही तेले जसं कॅरट आणि ग्रेपसिड तेलं बंद केलेत म्हणे चालतात ती नसली तरी?? तू काय केलंस?? मिळाली तुला???
Pages