भारतातील पहिले "सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम"

Submitted by जिप्सी on 28 November, 2010 - 23:42

लंडनमधील मादाम तुसॉं या प्रसिद्ध वॅक्‍स म्युझियमच्या (मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय) धर्तीवर लोणावळा येथे उभारले आहे भारतातील पहिले सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. तेंव्हा आता मेणाचे पुतळे बघायला लंडनला जायची गरज नाही. Happy सुनिल कंडल्लूर या केरळ येथील तरूणाने हे म्युझियम उभारले असुन सध्या येथे २५ सेलिब्रिटींजचे मेणाचे पुतळे आहेत. १९९३ साली फाईन आर्ट्समध्ये डिप्लोमा केलेल्या सुनिलचे स्वप्न आहे मुंबईत वॅक्स म्युझियम उभारण्याचे.

सदर म्युझियम हे लोणावळ्यापासुन अंदाजे २-३ किमी अंतरावर असलेल्या "वरसोली" या गावात आहे (लोणावळा टोलगेटजवळ). हे वॅक्स म्युझियम उभारून सुनिलने जगाला दाखवून दिले आहे कि, "हम भी किसीसे कम नही".
वेळः सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत
प्रवेश फि: ७५ रुपये (प्रति माणशी)
वेबसाईट: www.celebritywaxmuseum.com
संपर्कः ०२११४ ३२३८६६/०२११४ २७७६६६
=================================================
छत्रपती शिवाजी महाराज

महात्मा गांधी
मदर तेरेसा

स्वामी विवेकानंद
पंडित जवाहरलाल नेहरू
राजीव गांधी
माता अमृतानंदमयी
अ‍ॅडॉल्फ हिटलर
रसुल पुक्कुट्टी
हरीहरन
एस्. सुब्बलक्ष्मी

ए. आर. रहमान

मायकल जॅक्सन

श्री. बालाजी तांबे

सत्यसाईबाबा

सद्दाम हुसेन

गुलमोहर: 

वा, सहीच आहेत पुतळे! विशेषतः रेसुल पोकुटी, रहमान, शिवराय, राजीव गांधी हे फार छान जमलेत. जायला हवे इकडे नक्की.

चाचा नेहरुंचे कपडेही जरा जास्तच ढगळ आहेत Wink
योग्या, या म्युझियमची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

मस्त आहेत पुतळे. माहिती आणि फोटोंबद्दल धन्यवाद योग्या.
ते कपडे, केस, दागिने खरे घातलेत की ते ही मेण आहे?

कौतुक आहे मूर्तिकारांचं.... आणि हे संग्रहालय आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल तुमचे विशेष धन्यवाद! Happy

छान माहिती आणि फोटोज..
ज्या पुतळ्यांचे फोटो लांबून काढले आहेत ते एकदम खरे वाटत आहेत. सुब्बलक्ष्मी, रेहेमान, हरीहरन, गांघीजी जबरी आहेत !!

शिवाजी महाराज की जय
मस्तच..याबद्दल कहीही माहीती नव्हती...धन्यवाद...
शिवाजी महाराज मस्तच....
विवेकानंद बिघडले आहेत,तसेच नेहरू पण बिघडले आहेत यात काही शंका नाही?
पण मला एक समजल नाही -सिलेब्रिटी मध्ये --सत्यसाईबाबा मला जरा खटकतय....

मस्त Happy

>>उदा: स्वामी विवेकानंद व नेहरुचाचा सोडल्यास बाकी बरेच जमले आहेत.

मलाही तसंच वाटतंय. रहमान, सुब्बलक्ष्मी, हिटलर, सद्दाम एकदम जमलेत. तेंडुलकर, लता मंगेशकर ह्यांची वर्णी लागलेली नाही का? म्युझियमचे कर्ते-करविते दाक्षिणात्य असल्यामुळे तिथल्या सेलेब्रिटीज जास्त दिसताहेत. साईटवरच्या इंग्लिशमध्ये सुधारणा करायची गरज आहे.

मला ह्या म्युझियमबद्दल माहिती नव्हती. आता नक्की जाईन. जिप्सी, धन्यवाद!

मी आत्ताच १ तारखेला जाऊन आलो. बालाजी तांबे सही जमले आहेत. येत्या काही दिवसात लता दिदी चा पुतळा येणार आहे असे कळले.

मस्तच... फोटोपण खूप छान आलेत..

विवेकानंद बिघडले आहेत,तसेच नेहरू पण बिघडले आहेत यात काही शंका नाही?>>>>>>> मानस याची वाक्यरचना जरा बदलणार का?... वाचायला खटकतय... Happy

Pages