Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16
एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...
"कविता" म्हणजे काय ?
त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .
इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...
गुलमोहर:
शेअर करा
१. मुक्तछंदाला लय कशी असेल?
१. मुक्तछंदाला लय कशी असेल? उदाहरण असल्यास कृपया द्यावे.
बेफिकिरजी, मला वाटते की मुक्तछंदाला एक स्वतंत्र लय असतेच..... वर लिहिले होते मी. लय म्हणजे अश्या अर्थाने की, जेव्हा ती मुक्तछंदातली कविता आपण मांडतो किंवा सादर करतो तेंव्हा ती लय आपल्याला सापडते...... शेवटी लय म्हणजे र्हिदम.......... तो मुक्तछंदाला असायला काहीच हरकत नाही. काही मुक्तछंदातल्या रचना अगदीच गद्य असतात, त्याला मी तरी "छंदमुक्त" असेच म्हणतो.....
म्हटले तर योग्य म्हटले तर शब्दांचा खेळ.....
कारण मुक्तछंदाला जर 'पद्य'
कारण मुक्तछंदाला जर 'पद्य' म्हणता येत असेल तर 'गद्य'ही म्हणता यायला हवे.>>> हेच मला म्हणायचे आहे !!
कवी व कविता म्हणजे काय या चर्चेमध्ये जर 'मुक्तछंदात कविता असू शकते' असा मुद्दा निघाला तर मुक्तछंद या विषयावरही चर्चा होणे साहजिक आहे असे मला वाटते.>>>> हा प्रश्ण अन्डीसायडेबल आहे म्हणुन तो टाळुन पुढे जात होतो ....
कारण मुक्तछंदाला जर 'पद्य'
कारण मुक्तछंदाला जर 'पद्य' म्हणता येत असेल तर 'गद्य'ही म्हणता यायला हवे.
>>> पद्याला गद्य म्हणता यायला हवे असे म्हणने आपणास योग्य वाटते का?
मुक्तछंद हा काव्य प्रकार म्हणूनच स्विकारला गेला आहे (तुम्ही स्विकारला नसला तरी) त्याला गद्य कसे म्हणता येईल?
वाचणियता, रंजकता, आशयघनता या संकल्पना आपण गद्य व पद्य दोन्हीकडे वापरतो आणि त्या वेगवेगळ्या संदर्भाने वापरल्या जातात. आणि पद्याबाबत बोलत असताना गद्यातले उदाहरण घेऊन त्याला कविता म्हणता येईल का असा प्रश्न आपण कसा विचारू शकता?
मुक्तछंदाबाबत लय हा शब्द मी काव्यवाचनाच्या अनुशंगाने प्रभावी वाचनविशेष असणारी रचना अशा अर्थाने वापरला आहे. यमकाशिवाय लयबध्दता येऊच शकत नाही असे म्हणने अयोग्य ठरावे.
ही वही कोरडी नकोस ठेवू
ही वही कोरडी नकोस ठेवू
माझी वही भिजो
शाई फुटो
ही अक्षरं विरघळोत
माझ्या कवितांचा लगदा होवो
या नदीकाठचं गवत खाणा-या म्हशींच्या दुधात
माझ्या कवितांचा अंश सापडो
- भिजकी वही - अरुण कोलटकर
आता ह्याला मुक्तछंदातली "कविता" का म्हणावे ???:अओ:
मुक्तछंदाबाबत लय हा शब्द मी
मुक्तछंदाबाबत लय हा शब्द मी काव्यवाचनाच्या अनुशंगाने प्रभावी वाचनविशेष असणारी रचना अशा अर्थाने वापरला आहे. यमकाशिवाय लयबध्दता येऊच शकत नाही असे म्हणने अयोग्य ठरावे.
हणमंतरावांना प्रचंड अनुमोदन.....!!!
मलाही काव्यवाचनाच्या दृष्टीकोनातून मुक्तछंदाला लय असते असेच वाटते, निदान सादर करणारा तरी ती लय मांडतोच, मग कवीने ती लय योजली नसेल तरीही.
यमकामुळे साचा मिश्चित होतो असे म्हणता येऊ शकेल...... पण यमकामुळेच लय मिळते असेच काही नाही. मुक्तछंद साच्यात बसत नाही, पण वाचनाच्या दृष्टीने त्याला लय ही असतेच.
का म्हणतोयस?
का म्हणतोयस?
श्री भुंगा - आपल्या मताचा आदर
श्री भुंगा - आपल्या मताचा आदर आहेच. पण मला असे माहीत आहे की 'लय' म्हणजे 'काळाच्या विशिष्ट स्थानी कवितेच्या पंक्तीमधील विशिष्ट जागा यायला हवी'!
उदा:
गंधीत रात आहे, हातात हात आहे
ही कल्पना मनाला फसवून जात आहे
यातील पहिल्या ओळीतील दोन्ही 'आहे', दुसर्या ओळीतील 'मनाला' पैकी 'नाला' व शेवटचा 'आहे' हे विशिष्ट काळालाच येतात. हे मुक्तछंदात अशक्य आहे.
हणमंतराव,
१. कविता = पद्य + काव्य (पद्य हे तंत्राबाबत तर काव्य हे आशयाबाबत)
२. गद्य = व्याकरणाचे सर्व नियम पाळून केलेले लिखाण + त्यातील लिखाणाचा हेतू, जो कधी काव्यमयता असाही असू शकतो.
३. मुक्तछंद = व्याकरणाचे कोणतेही नियम पाळण्याची सक्ती नाही आणि 'मग निदान काव्यमयता तरी असलीच पाहिजे ' या अटीलाही न पाळणे व ही कविताच आहे असे म्हणणे!
आपल्याला काय वाटते? (काव्यमयता नसलेल्या मुक्तछंदातील असंख्य शब्दरचना मायबोलीवर आहेत. काव्यमयता असलेली रचना आपण उदाहरनादाखल द्यावीत असे सुचवतो.)
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
हणमंतराव, चर्चा छान चालू
हणमंतराव,
चर्चा छान चालू आहे. विश्वास ठेवावात की आपण उदाहरण म्हणून दिलेली रचना मी काव्यमय नाहीच असे निश्चीतच म्हणणार नाही. समर्थन देईन तसे म्हणालो तर!
काव्यमयता नसलेल्या
काव्यमयता नसलेल्या मुक्तछंदातील असंख्य शब्दरचना मायबोलीवर आहेत.>>> त्याना मिही बर्याच वेळा तसे सुचविले आहे. आणि आपल्या या वाक्यातून हेही सिध्द होते की आपण मुक्तछंदात काव्यमयता शोधण्याचा प्रयत्न याआधीही केला आहे व या चा एक अर्थ असाही होतो की आपणास आवडत नसला तरी आपण मुक्तछंद स्विकारला आहे.
आपण गझलेतला शेर दाखवून मुक्तछंदात तशा लयीची अपेक्षा करू शकत नाही.
प्रगो, कवितेचा अजुनही एक अर्थ
प्रगो, कवितेचा अजुनही एक अर्थ असाही असला पाहिजे की, "मोजक्या शब्दात बंदिस्त मांडणी".
कदाचित वरील कविता कोलटकर गद्य म्हणून लिहायला गेले असते तर ५० वाक्यांची फोडणी लागली असती. पण तेच अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी ती कवितेत मांडलिये.... मला वाटते की, हाच गद्य आणि पद्य मधला मुलभूत फरक आहे / असावा.
उदा. बेफिकिरजी, गद्यकथाही लिहितात आणि पद्य "गझल"ही. पण जितका नेमकेपणा त्यांच्या गझलेत आढळतो तो गद्यात मोजक्या शब्दात येईलच असे नाही..... (बेफिकिरजी, वैयक्तिक तीका नसून केवळ एक उदा. दिले आहे.) आणि मोजक्या शब्दात सगळ्या भावना मांडणे हेच खर्या कवीचे कसब आहे.
मुक्तछंदातली माबोवरची उत्तम
मुक्तछंदातली माबोवरची उत्तम कविता शोधतो आहे. थोडा वेळ द्या.
मुक्तछंदातली माबोवरची उत्तम
मुक्तछंदातली माबोवरची उत्तम कविता शोधतो आहे. थोडा वेळ द्या.
>>>
मयुरेश ची "बाप" , उमेश कोठीकरांची "अर्पण पत्रिका " ही मस्त उदाहरणे आहेत !
पण तरीही मी त्यांन्ना मुक्तछंदच म्हणतो ...कवीता म्हण्वत नाही ...
माफ करा, पण मी मुक्तछंद
माफ करा, पण मी मुक्तछंद स्वीकारलेला नाही आणि तो स्वीकारणारा अथवा न स्वीकारनारा मी कुणीही नाही.
बंदिस्तता हा एक गुण आहेच! पण तो छंदोबद्ध कवितेतही असतोच! बंदिस्ततेमुळे मुक्तछंद डिफाईन होत असेल असे वाटत नाही.
आग्रही भूमिका घ्यायचा माझा अधिकार नाही, पण मी एक विचारतो...
ओवी - सहा, सहा, सहा, चार किंवा आठ, आठ, आठ, सहा
गझल - उदाहरणार्थ भटसाहेबांची बाराखडी
अष्टाक्षरी - आठ, आठ, आठ, आठ
भावगीत - ध्रुपद, तीन तीन / दोन दोन / चार चार वगैरे
अशी मुक्तछंदाची काही तांत्रिक व्याख्या का नसावी??
आणि नसावी हे मान्य असेल तर 'काहीही आणि कसेही' लिहीले तरी ती कविताच ठरणार हे योग्य आहे का??
मुक्तछंदच म्हणतो ...कवीता
मुक्तछंदच म्हणतो ...कवीता म्हण्वत नाही ...
>>> प्रसादजी, आपणास रचना गद्याकडे झुकणारी वाटत असल्यास आपण वर कुणीतरी सुचविल्याप्रमाणे तिला छंदमुक्त म्हणू शकता. पण जर मुक्तछंद म्हणायचे असेल तर तिला कविताच म्हणावे लागेल.
मुक्त छंदातल्या दोन उत्तम
मुक्त छंदातल्या दोन उत्तम कविता खाली मांडत आहे. किती साध्या शब्दांत किती उच्च प्रतीचे काव्य रचता येते याचे प्रतिक म्हणून मी नेहमी त्यांची उदाहरणे देतो;
.................................................................
१.
काल माझा बाप मेला,
मयताला कुणी नव्हतं..
आज पत्रांचा पाऊस,
'तुझ्या दु:खात आम्ही सहभागी आहोत'
कवी: आठवत नाही
..........................................................
२.
चंद्र झाला खुळा..
कारण
"चांदोमामा चांदोमामा भागलास का?
लिंबोणीच्या झाडामागे लपलास का?"
म्हणणारी चिल्ली-पिल्ली आज नाहीत.
काका गेले,
मामा गेले,
चिरेबंदी वाडे गेले..
काका गेले, मामा गेले, चिरेबंदी वाडे गेले..
वाडे गेले, पाडे गेले, घोडे गेले, गाडे गेले..
काल
रात्री
काढले
होते
पाठीवरचे
पाढे गेले!!
कवी. फ.मुं. शिंदे
.............................................................................
मा.बो. वर विशाल कुलकर्णींची एक खूप सुंदर कविता आहे:
दादा म्हनले ..... !
दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या...
दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी...
दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी...
दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी ...
दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?
विशाल
http://www.maayboli.com/node/6745
हणमंतराव, मुक्तछंदाला कविताच
हणमंतराव,
मुक्तछंदाला कविताच म्हणावे लागेल हे मत आपण कोणत्या बेसिसवर मांडले आहेत ते समजायची इच्छा आहे.
१. साहित्य विश्व तसे मानते म्हणून....
२. ती कविता रचणारा तसे मानतो म्हणून...
३. तुम्हाला प्रत्येक मुक्तछंद ही कविता आहे असे वाटते म्हणून..
माफ करा, ही थट्टा वगैरे नसून सिरियसली विचारत आहे.
तसेच, छंदमुक्त व मुक्तछंद या दोन शब्दांमधला नेमका फरक काय आहे ते कुणी सांगेल काय??
पुन्हा एकदा
पुन्हा एकदा हणमंतराव.....
प्रसादराव, एक्झॅक्टली...... मुक्तछंद हा वेगळा प्रकार नाही तो कवितेचाच एक भाग आहे..... नाहीतर मी म्हणतो तसे आपणही त्यास छंदमुक्त म्हणा.....
शरदरावांनी नोंदवलेल्या रचना
शरदरावांनी नोंदवलेल्या रचना मला व्यक्तीशः सामान्य वाटल्या. क्षमस्व!
असे कित्तीतरी लिहीता येईल! ते जवळपास गद्य आहे.
तसेच, माझे हे मत शरदरावांच्या अभिरुचीबाबत अजिबात नसून त्या रचनांबाबत आहे.
वाटले बापास अग्नी देत
वाटले बापास अग्नी देत असता
चंदनाला जाळले मी चंदनावर
बेफिकीरजी, माझ्याकडे
बेफिकीरजी,
माझ्याकडे पुस्तकरुपाने उपलब्ध माहिती मी तुम्हाला देईनच तोवर शोधून सापडलेली ही हिंदी माहिती देत आहे.
छंद का सबसे पहले उल्लेख ऋग्वेद में हुआ है। वर्णों की संख्या, क्रम, मात्रा और गति-यति के नियमों से नियोजित पद्य रचना छन्द कहलाती है। छंद को पद्य रचना का मापदंड कहा जा सकता है। बिना कठिन साधना के कविता में छंद योजना को साकार नहीं किया जा सकता।
छंद की संरचना में लय का होना आवश्यक है कि क्योंकि छंद का प्राण लय और ध्वनि है। यह भी ज़रूरी है कि गीत का छंद हो या मुक्तछंद का छंद हो- दोनों के लिए लय का होना परमावश्यक है। मुक्त छंद का अर्थ यह नहीं है कि छंद लयहीन हो, मुक्त हो क्योंकि मुक्तछंद भी छंद है।
छंदमुक्त व मुक्तछंद या दोन
छंदमुक्त व मुक्तछंद या दोन शब्दांमधला नेमका फरक काय आहे ते कुणी सांगेल काय??
मी वर म्हटल्याप्रमाणे कदाचित कुणी याला शब्द्च्छल म्हणेलही. पण मुक्तछंदालाही लय असते हे मांडताना "छंदमुक्त" हा शब्द मी वापरला......
आता, वर शरद यांनी दिलेली मुक्तछंदातली उदाहरणे बघा. या कवितांचे "वाचन" करायचे झाल्यास ते मांडताना त्याला एक लय नक्कीच आहे. मी वाचताना ती त्याच लयीत वाचली आणि सादर करतानाही त्याच लयीत करेन.......
पण काही कविता अश्याही आहेत की ज्या अश्या लयीत मांडणे (वाचणे यापेक्षा मांडणे हाच शब्द योग्य वाटतोय) अशक्य असते, त्यासाठी मी "छंदमुक्त" हा शब्द वापरला.
हणमंतराव, एका तर्हेने आपण
हणमंतराव,
एका तर्हेने आपण जवळपास माझेच मत लिहीले आहेत. आता प्रश्न फक्त एवढाच राहिला की
'क्योंकि मुक्तछंदभी छंद है' - तर तो छंद कसा असावा नेमका?? कारण इतर प्रत्येक छंदाची व्याख्या आहे.
आणि विशिष्ट व्याख्या नसलेला छंद असे जर म्हणायचे असेल तर त्यला अर्थ राहणार नाही. कारण ते 'छंद' या शब्दाच्या बरोब्बर विरुद्ध ठरेल.
श्री. भुंगा, कविता सादर करणे
श्री. भुंगा,
कविता सादर करणे व कविता रचणे - या दोन्ही प्रक्रियांमध्ये एकच लय असायला हवी. अगदी दोन भिन्न माणसे असली तरीही, म्हणजे रचणारा व ती सादर करणारा!
लय कवितेबरोबरच जन्माला येणार! पुढे ती कविता वाचली जाईल का नाही याचा विचार कविता निर्मीतीवेळेस नसणार!
मी मुक्तछंदाला काव्यप्र्कार
मी मुक्तछंदाला काव्यप्र्कार मानतो कारण काव्यशास्त्र मानते.
छंदमुक्त व मुक्तछंद >>> मुक्तछंदात लिहीतानाही आपण लयबध्दता जोपासणे आवश्यक आहे (छंद का प्राण लय और ध्वनि है।) काहिही लिहीले तर त्याला मुक्तछंद म्हणता येणार नाही आणि अशा काहिही रचनाना कोणत्याच छंदात न बसणार्या म्हणून छंदमूक्त म्हटले गेले. ही संकल्पनाही बरीच जुनी आहे.
एका मीटिंगला जात आहे. काही
एका मीटिंगला जात आहे.
काही काळाने उत्तर देऊ शकेन. सर्वांना धन्यवाद!
छान चर्चा चालू आहे...प्रगो तु
छान चर्चा चालू आहे...प्रगो तु म्हणतोस ते काही अंशी पटते खरे...पण नुसती एकापुढे एक ठेवलेली वाक्ये आणि एका एबस्ट्रॅक्ट मांडणीत रचलेले शब्द यात फरक आहेच ना...
माझा काही यावर बोलण्याचा अधिकार नाही..पण मला असे वाटते की कित्येकदा तालबद्ध मांडणी करण्याच्या नादात जे विचार मनातून येतात उस्फुर्त असे ते जसेच्या तसे वापरता येत नाहीत. मग त्या कवितेचा आनंद राहतो बाजूला..(हे मी अनुनभवी कवींबद्दल बोलत आहे..कृपया गैरसमज नसावा).
मग अशा वेळी मनातील विचार एका लिमिटेड पातळीपर्यंत जसेच्या तसेच रचले तर ती मुक्तछंद होऊ शकते अथवा नाही
गीत का छंद हो या मुक्तछंद का
गीत का छंद हो या मुक्तछंद का छंद हो- दोनों के लिए लय का होना परमावश्यक है। मुक्त छंद का अर्थ यह नहीं है कि छंद लयहीन हो, मुक्त हो क्योंकि मुक्तछंद भी छंद है।
>>>
इतर छंदाप्रमाणे निश्चीत मात्रा, निश्चीत शब्दसंख्या इ. ची मर्यादा नसली तरीही कोणत्याही इतर छंदाप्रमाणेच लयीचे (जी पद्यरचनेचा आत्मा असते) बंधन असलेला आणि काव्यशास्त्राची मान्यता लाभलेला प्रभावी काव्यप्रकार / छंद म्हणजे मुक्तछंद.
मी मुक्तछंदाला काव्यप्र्कार
मी मुक्तछंदाला काव्यप्र्कार मानतो कारण काव्यशास्त्र मानते.
>>>> हे म्हणजे फारच गोल कन्सेप्ट झाली ....
प्रगो, यात गोल काय आहे??? आणि
प्रगो, यात गोल काय आहे??? आणि वरचे दाखालेही त्याने दिलेत.......
हे म्हणजे फारच गोल कन्सेप्ट
हे म्हणजे फारच गोल कन्सेप्ट झाली .... >> ती कन्सेप्ट कशी आहे यापेक्षा तुमची काय कन्सेप्ट आहे ते सांगा. मी एक व्याख्याही दिली आहे जी अभ्यासकानी मांडलेल्या मतांवरच आधारलेली आहे. त्यावर मत दिलेत तर आनंद वाटेल.
Pages