माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अल्पना थोडेच दिवस गावाला जाणार असाल तर नारळ तसाच ठेव की फोड्लेला नसेल तर नीट राहील. थोडासा कोरडा होईल बहुतेक. तुमच्याकडे नुसते साखर खोबरे वाटीत घेऊन खातात का? माझ्याकडे बरेच खोबरे तसेच संपते. Happy

मामी नारळ फोडलेला आहे हो.
आम्ही ५-६ दिवस तरी जाऊच. आमचा जायचा प्लान फिक्स असतो, यायचं तिकडे गेल्यावर ठरतं. (मी ऑफिसात सांगून ठेवलय, जर जास्त दिवस थांबणार असेन, तर तिकडून काम करेन. :))
नुसतं ओलं खोबरं खातात नवरा अन दीर हौसेने. (पण ज्यावेळी मला खोबरं हवं असतं त्याचवेळी खातात, आता खा म्हणलं तर ढुंकून पण बघणार नाहीत खोबर्‍याकडे. :))

मितान, अश्या वेळी थोडं दूध शिँपडायचं.. मिश्रण छान मऊ होतं. Happy

अल्पना, खोबरं खरवडून कोरड्या डब्यात घालून डीप फ्रिजमध्ये डबा ठेव आणि बिनधास्त गावाला जा. फोडलेला नारळ फ्रिजमध्ये ठेवला होतास ना?

हो हो, नारळ फ्रिझमध्ये ठेवला होता. ठेवते फ्रिझरमध्ये, आल्यावर करते त्याचं काहीतरी. आता पॅकिंग अन निघण्याच्या घाईत अजून काही करायचा कुटाणा नाही काढणार. थँक्स ग.

दिनेशदा आणि स्निग्धा , sorry मधले १-२ दिवस response नाहि देउ शकले.
अगं लिहितानाच चूक झाली. ५ वाट्या पाणी आणी ५ वाट्या पीठ घेतलं. आणि प्रमाणाची वाटी same च होती. Happy
दिनेशदा, तुम्ही सान्गीतल्या प्रमाणे मी चकली कागदावर चुरुन बघीतली. कागद बराच तेलकट झाला.
चकल्याच प्यायल्या तेल सगळं Sad

मावेमधे काहि भाजले कि हा नेहमीचा प्रॉब्लेम असतो. मावेमधले पदार्थ शिजण्याची / भाजण्याची प्रक्रिया
तो बंद केला तरी चालूच असते. म्हणून तो अंदाजाने अधीच बंद करावा लागतो. शिवाय पदार्थ बाहेरून
गरम न होता, आतून शिजत जातो.
पातळ पोहे थेट कढईत पण तेलात परतून गरम करुन, कुरकुरीत करता येतात.

No prob. Arundhati, पुढच्या वेळेस १ वाटी पिठाला ३/४ वाटी पाणी घेऊन पहा. म्हणजे पिठ-पाणी बरोबरीने न घेता पाणी कमी घ्या.

<<स्निग्धा, पिथ सैल नाहि का होणार जर १ वाटि ला ३-४ वाट्या पाणी घेतलं तर?>>
<<अरुंधती, स्निग्धा ३/४ म्हणजे पाऊण वाटी पाणी घ्यायला सांगतेय >>>

Lol Lol Lol

दिनेशदा मी नेहमीच चिवड्यासाठी मा.वे. मध्येच पोहे कोरडेच गरम करते. मात्र एकदम सगळे पोहे नाही गरम करत... एका काचेच्या प्लेटमध्ये थोडे थोडे पोहे १ मिनीट साठी ठेउन गरम करते.... कालच चिवडा केला (अर्धा कीलो पोहे ५-६ instalments मध्ये प्रत्येकी १ मिनीट ठेउन गरम केले.)

मी काल तिखट शंकरपाळे केले काही काही छान Crisp झाले काही मऊ पड्ले... कशामुळे असेल?

मी मायबोली वरील रेसिप वाचुन केले होते...(१ कप मैदा, १ कप कणीक, २ चमचे तांदळाचे पीठ, थोडे हिंग, तिखट, जीरे पावडर आणि धणे पावडर, मीठ, थोडे मोहन आणि पाणी मिक्स करुन १/२ तास ठेउन मग बनवले होते...)

काय चुकले असेल??

निकिता तु तिखट कोणतं वापरलंस ? किंवा हळद घातलिस का चकलीच्या पिठात ? तळाताना तिखट किंवा हळद जळते आणि चकली काळी पडते.

कसला वेन्धळेपणा ना माझा :):) वेन्धळेपणा च्या बी बी वर टाकण्या योग्य आहे. Happy
स्निग्धा करुन बघते ग next time तुझ्या प्रमाणा प्रमाणे चकल्या.
झाल्यावर सान्गीन.

माझ्या मेत्रिणीचे गुलाबजाम आतुन कच्चे राहीले आहेत. ते तिने पाकात टाकले आहेत. त्या गुलाबजामचे काही करता येईल का? की वाया गेले.

गुलाबजाम म्हणून ते वापरता येनार नाहीत.
त्यातला पाक पूर्णपणे काढून प्रत्येक गुलाबजाम अलगद फोडायचा. त्यातला कच्चा राहिलेला भाग काढून टाकायचा.
वरचा भाग इतर पदार्थात वापरता येईल. शाही तुकडा, फ्रूट सलाड, आईस्क्रीम कॉकटेल मधे वापरता येईल, गाजरहलव्यात वापरता येईल.

गुलाबजाम १/२ कापुन एका पॅनमधे कट साईड डाऊन ठेवायाचे. कडेने सगळा पाक ओतायचा. अगदी बारीक गॅसवर उकळले तर ते गुलाबजाम शिजायचे चान्स आहेत Happy
४-५ गुलाबजाम्चे करुन पहायला हरकत नाही.

अन्यथा सगळे गुलाबजाम फिशाआऊट करुन कुस्करायचे आणि कणकेमधे स्टफ करुन खव्याच्या पोळ्यासारख्या पोळ्या करायच्या.

तो वरील भाग ग्रेवीला थिकनर म्हणून वापरता येइल मग साखर घालायची नाही. शाही पनीर किंवा कुर्मा मध्ये?

प्लीज मदत करा , मी केक चे मिश्रण ओवन मधे ठेवले आणि १५ मि. नंतर बघितले तर ते भांड्याबाहेर येत होते फुगल्यामुळे.भांडे छोटे झाले केक साठी. मी मिश्रण कमी करुन पुन्हा केक बेकिंग्वर ठेवलाय, तर काढ्लेल्या मिश्रणाचा केक होइल का किंवा दुसरे काय करता येइल?

काढलेले मिश्रणाचा गॅसवर अगेच केक केला तर होइल. कुकर मधे.. रिंग आणि शिटी काढुन करतात तसा..

जास्त वेळ तसेच राहिले तर खराब होउ शकते... सोदा / बेपा घातलेली असल्यामुळे.

Pages