कविता

ओथंबलेले

ओथंबलेले... साजिरे..सावळे
आज अंबरात, चित्र हे आगळे
स्तब्ध स्तब्ध का घन जाहले ?
बरसण्याचे का भान नुरले ?

नभाची निळाई, दिसे ना जराही
शालु अंधाराचा, नेसली धराही
अजब हुरहुर
कातळ आतुर
लोचनांना का वेध लागले ?

लागते चाहुल, वाजे न पाऊल

भूल

भूल

आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे

आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे

आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले

पावसात

एका साऊथच्या गाण्याचे सुर लोकलमधे ऐकले आणि सुचलं. ते तुमच्यासाठी...थोडं फिल्मी....

भेट .. थेट .. पावसात
खेट .. नीट ..पावसात
संधी अशी मिळते कुठे गं ? गं साजणी
संधी अशी मिळते कुठे गं ?
मोकळ्या मनाने असा, गं पाऊस
नेहमीच पडतो कुठे गं ?

साहित्य संमेलन : मदत हवी आहे

२००९ मध्ये फेब्रुवारी १४,१५ आणि १६ तारखांना सॅनफ्रॅन्सिस्को उपसागरीय भागात विश्व मराठी साहित्य संमेलन होणार आहे, ही बातमी बहुतेकांना माहिती असेलच.

प्रगल्भ स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे आस मनातलं सारं मिळवण्याची
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी आपल्यातला घास दुसरयाला भरवण्याची
स्वातंत्र्य म्हणजे उर्मी उत्तुंग भरारी मारण्याची
स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी सर्वांना संगे घेऊन विहरण्याची

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे गोळ्या बिस्किटं अन खूप खूप चॉकलेटं
पण ... आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणं
स्वातंत्र्य म्हणजे हुंदडणं बागडणं धम्माल करणं
पण ... पूर्ण प्रयत्नांनी जास्तीत जास्त मार्क मिळवणं

आरसा

आपल मन आपल्याच
वास्तव्याचा आरसा असत
म्हणूनच आपल्या मनाशि
खोट बोलणयाच धाड्स
अपल्यात नसत

माणसाचे डोळे
निश्पाप असतात
ते फक्त बघतात
त्या बघण्याचा
आर्थ आपलेच
विचार लावित असतात

या जगात कान
आणि डोळ्या॑ इतके

एकाच नभावर

एकाच नभावर किती आकृती
नश्वर पाउलखुणा स्मृती
मन वेडे अभिजात कळ्या
प्राजक्तफुले फुलतात किती

कुणी कुणाचे व्हावे आपले
अगणित सगुणांच्या जाती
असंख्य कवचे संभ्रम अवघे
मूळ स्त्रोत जातात सती

हरवुन जाते माणुसपण

तेच माझे

काल सत्यजीतच्या अकाउंटवर गजल गजल खेळण्याचा परिणाम आहे हा की काय कोण जाणे. उत्तररात्री जाग आल्यावर सुचलेलं देतोय खाली. ही गजल असते काय ?

सूर माझा बिंब माझे शब्द त्यातिल भाव माझे
सापडे ना ठाव कांही हरवलेले गाव माझे

रेशमाचं खळं

नभ उतरुन आलं झालं मेघाळ आभाळ
नव्या पावसानं नेलं सार्‍या जगाचं गबाळ
चिंब भिजले आकाश भोर झाली काळी माती
खुणावत अंकुरास वाहु लागला पन्हाळ

सण ओलावल्या रानी म्हणे पेरतेव्हा गाणी
हिरवळल्या जमाती उतु गेला वनमाळ