|| श्री गणेशाय नमः ||

ऍडमिननी रंगीबेरंगीचे पान देवुन बरेच दिवस झाले. ऍडमिनचे त्याबद्द्ल मन:पूर्वक आभार!!
पण या पानाचं करायचं काय हा यक्ष प्रश्न.. कारण लिखाण, कविता आणि मी काही समीकरणच जुळत नाही:)
मग याचं करायच काय?? मग म्हटले की आपली चित्रांची कला तरी यातुन मांडता येईल.. पण त्यालाही मुहुर्त मिळत नव्हता... काही कामं वेळच्यावेळी करायच्या बाबतीत मी तशी आळशीच हाहा असो...
मग विचार केला अनायासे नवीन वर्ष येतच आहे तर तेव्हाच माझ्या रंगीबेरंगी पानाचा श्रीगणेशा करुया..
बघुया आता किती नियमित चित्र टाकायला मिळतात ते...

सर्व मायबोलीकरांचे इथे स्वागत आहे...
सुरुवात माझ्या एका जुन्याच चित्राने करते...
Ganapati.jpg


झाल का श्रीगणेशा नवीन वर्षात?? स्मित नीलू, तू इथे चित्रं टाकणार हे बघून एकदम छान वाटल!! आता खूप छान चित्र पहायला मिळतील ना? स्मित सूचना मनावर घेतलीस हे एक मस्तच झाल!! आता येऊदेत एकामागून एक एकसे एक चित्र स्मित



निलुटाय.. तुझा रंगिबेरंगी पान.. !!!!!!
मस्तच गे.. नि तुझि चित्रकला म्हणजे मेजवानिच..
तुका काय म्हणतात ते... कोंग्रेट्स हं..
"पार्टि व्हयि.." खरातर या म्हनुचा व्हता.. हाहा
तरि बरा वाट चुकलि नि हयसर इलो.. नि तुझा ह्या पान दिसला..
तुका मॉप शुभेच्छा..

यो !



निलु, चित्रं सुरेख आहे. अजून उत्तमोत्तम कलाकृती येवु दे!



हा माझा आवडता देव आणि त्याचं असं सुर्रेख चित्रं.
तुझी चित्रकला सार्‍या अंगांनी बहरू दे, नीलू



हे बेस केलस.
आता आम्हा ल्हान भावंडाना चित्र दाव चित्र दाव म्हणायला हक्काची जागा घावली स्मित
भरपुर चित्र काढ आणि इथे टाक.



वा नीलू विघ्नहर्त्याने सर्वच विघ्न हरण केली आता अश्याच नवनवीन कला़कृतीनी बहरु दे रंगीबेरंगी नवीन वर्षात!
नव वर्षाच्या खूप सार्‍या शुभेच्छा.
अन्जलि



निलगे,
मिया दिलेल्या शुभेच्छा एकदम अमलात येतल्या म्हणान वाटला नव्हता गो.. आश्चर्याचो सुखद धक्का दिलंस एकदम स्मित
अशीच छान छान चित्रा येवंदेत स्मित
मॉप मॉप शुभेच्छा स्मित



नीलु,
चित्र फार सुरेख आहे...
माका माहीत नव्हते तु artist आहेस ते!
स्मित



नीलू, एकदम झकास चित्रं........ ह्या वर्षात भरपूर छान छान चित्रं काढ आणि आम्हाला असंच नेत्रसुख दे.



शैलू, योगी, चिन्नू, दाद, झकास, अंजू, महेश, गोबू, मंजू सर्वांचे प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी खुप आभार!!! स्मित



नीलु ग्रेट , नविन वर्षाची भेट आवडली.............



बाप्पा आवडले. मस्तच सुरवात.



मस्त सुरवात ग! येउ दे आता छान छान चित्र आणि अजुन बरच काहि, तुझ्या चारोळ्यापण वाचल्या आहेत मी जुन्या गुलमोहरात तेंव्हा तेहि चालेल आम्हाला स्मित



नीलु,
खुपच सुंदर . आणखीय वारली चित्रा टाक गो . आशीर्वाद.



लोपा, दिव्या, श्यामली, गुरुकाकाका धन्स
लोपा तुझ्याकडुनही अश्या भेटींची अपेक्षा आहे स्मित
काकानु तुमच्या मागणीची अंमलबजावणी केलीय स्मित