बर्‍याच दिवसांनी एक प्रयत्न .. (तिरळे)

घर सजलं
अंगण भिजलं
... पावलांची प्रतीक्षा !

*******************

तानपुरा आणि ती -
तत्सूर ...
विधात्या, नाहीच कुठे कसूर !

******************


पीके, पहिला आवडला. दुसर्‍यात तत्सूर म्हणजे?



आवडले तिरळे

चिन्नु , तीचा सूर असं बहुदा,



असेल गं. अर्थाबद्दल धन्सं.



तदाकार .... तद्रूप ..तादात्म्य ... तसं 'तत्सूर'. असा शब्द अस्तित्वात आहे की नाही माहीत नाही, पण इथे अगदी चपखल वाटतो.

परागकण



पीक्या येलकम बॅक रे.. स्मित

असेच लिहित जा नेहमी....

पहिल्या तिरळ्यातून नक्की काय सुचवतो आहेस? डोळा मारा

http://milindchhatre.blogspot.com



धन्सं पीके. पण तत्सूर-तिचा सूर असंचं ध्वनित होतोय. स्मित
तुम्हाला अभिप्रेत अर्थ छान आहे.



तुम्हाला??? हे कोण बुवा .... तुम्ही?
(मायबोलीला 'बहुवचनी आदरातिथ्याची' सवय लागलेली दिसते स्मित )

मिल्या, असं प्रत्येक तिरळ्यातून काही सुचवायला लागलो तर झालं कल्याण .... स्मित

- परागकण



मी चिन्नु. तुम्ही पीके!
कधीपासून असं होतयं-तुम्हाला? ~P

छान लिहिता तुम्ही, keep it going!