सदस्य प्रवेश |
तो आणि तीतो आणि ती... जिथे तिथे दिसणारे. सर्वत्र असणारे. एकमेकापासून पूर्ण भिन्न आणि तरीही सतत एकमेकाच्यासोबत.. ++++++++++++++++++++ तो त्याच भागात केव्हाचा फिरतोय. ती त्याला "हे दुकान दिसलं की उजवीकडे वळ" वगैरे टाईप सूचना करतेय. आईबाबाच्या बेडरूममधून तो रस्त्यावर फिरताना दिसतोय. उन्हात पार घामेजलाय. तिने त्याला सांगितलय "कुणाला पत्ता विचारू नको. कुणीतरी घरी आईला सांगेल." तो बिचारा आता वैतागलाय. हातातला फुलाची वाट लागलेय. ती फक्त मोबाईलवर बोलतेय. दिसत नाहीच. तितक्यात तो चालता चालता थबकतो. काहीतरी आठवल्यासारखा. डाव्या हाताकडच्या बिल्डिंगमधल्या तिसर्या मजल्यावर. तो सर्रकन बघतो. पडद्याची हालचाल होते. तो गालातल्या गालात हसतो. येणार्या रिक्षेला हात करतो. ती फोनवर ओरडते. हार्बर लाईनचा प्लॅटफॉर्म. दुपारी दोनची वेळ. स्टेशन बान्द्रा. अजिबात गर्दी नाही. तिथे ती दोघं येतात. सोबत अख्खं खानदान. ती असेल सोळा सतरा वर्षाचा. तोही तितकाच. ती नवीन ड्रेसमधे अवघडलेली. त्यात वर तो कधी न घातलेला बुरखा. अम्मीने आणि नानीने तिला आज सजवलय. एखाद्या बाहुलीसारखं. ती दिसतेय पण तशीच नाजुक. तिला आज "पसंतीसाठी" आणलं होतं. ती कुणालाही आवडेल अशी. पहिल्याच नजरेत तिकडच्याच्या नजरेत भरलेली. ती गप्प बसलेय. ट्रेनचची वाट बघत. आणि त्याच्या चिडवण्याला नुसता उत्साह आलाय. एरवी असतं तर तिने त्याला चांगलंच झोडलं असतं. पण आता सोबत अब्बा आहेत नाना आहेत चाचा आहेत सगळेच मोठे आहेत. आता कसं काय बोलणार? तो बोलतच चाललाय.. गाणं म्हणतोय. "ये चांदसा रोशन चेहरा.. जुल्फोका रंग सुनहरा.." ===================== ती जबरदस्त घाबरलेली आहे. तरी त्याचा हात धरून उभी आहे, "आई, मी हात धरतोय ना तुझा?" त्याने तिचा हात हलकेच धरत विचारलय... तो गालातल्या गालात हसतोय. त्याची आई इतक्या वर्षात सरकत्या जिन्यावर कधीच चढली नव्हती. आज ती चढलीये. अजून दोन पावलं बास.. पण त्याचे डोळे का भरून आलेत तेच समजत नाही त्याचं त्याला. =========================================== समाप्त
17 December, 2007 - 09:19 nandini2911
|
|
एकदम मस्त.....
खुपच छान....
नन्दिनी, त्या 'पाहिलय तुम्ही कधी' च्या लेव्हल चे वाटले नाहीत निदान हे पहिले दोन तरी. पुढच्यांसाठी थांबणार होतो प्रतिक्रिया देण्या आधी, पण वेळ लागतोय असे दिसते. आणि त्या रोशन चेहरा वालीच्या कुटुंबियांना कोणीतरी सांगा, १६-१७ व्या वर्षीच लग्नं?
हे चौथे नवीन टाक्ले का? ते छान आहे.
खुपच सुरेख्..
नन्दिनि .............खुप मस्त आहे हा लेख.
असेच लेख आनखि मिल्तिल अशि अपेक्शा....
अविजित............
तो आणि ती ,
खरचं खुप छान ,
शेवटचा भाग खरच मनाला भरपुर आवडला.